चणा डाळ पाव किलो
२ मिडियम कांदे चिरुन
२ ते ३ मिरच्या चिरुन
मुठभर कोथिंबीर चिरून
१ चमचा धणेपुड (असल्यास)
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
चविनुसार मिठ
तळण्यासाठी तेल
वडा नावाचा मासा आहे पण डाळ नावाचा नाही तसेच डाळ घालून माशाचे प्रकार केले जात नाहीत त्यामुळे हा माशाचा प्रकार असेल असा गैरसमज करुन घेऊ नका.
माझ्या वहिनीकडे एक समारंभ होता तेंव्हा मी हे डाळवडे केले होते म्हणून फोटोतील प्रमाण जास्तीचे आहे. पण सोयीसाठी मी पावकिलोचे प्रमाण लिहीले आहे.
५-६ तासांनंतर ती स्वच्छ धुवुन मिक्सरमधुन थोडेसेच पाणी घालून जाडसर लगदा होईल अशी थोडी चरट वाटून घ्या. (बापरे किती शब्द टाकले? : हाहा: गोंधळ उडाला नाही ना?)
वाटलेल्या पिठात चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची, हिंग, हळद, धणेपुड, मिठ घालून एकत्र करा.
आता लिंबाएवढा ह्या मिश्रणाचा गोळा घेउन त्याचे चपटे वडे करुन तेलावर मिडीयम गॅसवर शॅलोफ्राय करावेत. ६-७ मिनिटे एक बाजू शिजायला लागते.
हे आहेत तयार डाळवडे.
घरात लहान मुले असतील तर मिरची सरळ डाळीसोबत वाटून घ्या म्हणजे खाताना मिरची तोंडात येणार नाही.
आल-लसुण पेस्ट तसेच गरम किंवा गोडा मसालाही घालू शकता.
हा वडा चटणी किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. वरुन गरम गरम चहा तर मस्तच.
मला हे वडे जाम आवडतात.. पण मी
मला हे वडे जाम आवडतात..
पण मी करते तेव्हा एक गोष्ट खटकते आणि ती म्हणजे हे वडे खाताना खुप कोरडे वाटतात. कधीकधी घशाला बसतात. थोडे थंड झाल्यावर तर खुपच कोरडे वाटतात. असे कोरडे होऊ नये म्हणुन काय करावे? थोडा खायचा सोडा घातला तर? मी ब-याच वर्षात केले नाहीत, आता करेन तेव्हा थोडे वडे सोडा घालुन करुन बघेन, पण त्याव्यतिरीक्त अजुन काही युक्ती असल्यास सुचवा मैत्रिणींनो.
हे वडे कुठल्याश्या रेल्वे
हे वडे कुठल्याश्या रेल्वे स्टेशनात मिळतात ना?
कुठल्याशा नाही, सगळ्या.
सोडा घातल्यावर तेल 'पितील' ते
सोडा घातल्यावर तेल 'पितील' ते वडे.
थोडेच करून ओलसर चटणीबरोबर खाणे सगळ्यात उत्तम.
छानच लागतात हे वडे. मुंबईहून
छानच लागतात हे वडे. मुंबईहून कोईम्बतुरला जाताना धर्मावरम स्टेशनवर हे गरमगरम मिळतात त्याची आठवण झाली.
छान प्रकार. आमचे एक कारवारी
छान प्रकार.
आमचे एक कारवारी शेजारी होते. त्या आजी या प्रकाराला बिस्कुट अंबाडा म्हणत. ( आणखी डाळी पण असत त्यात. )
शॅलो फ्राय - डीप फ्राय फरक
शॅलो फ्राय - डीप फ्राय फरक स्पष्ट केला प्रतिसादांमधे ते एक बरं झालं.. आता हेच विचारायला परत एकदा पाकृ चा हा धागा उघडलेला..
दिनेशदा, बिस्कुट अंबाडा /
दिनेशदा, बिस्कुट अंबाडा / आंबोडा नावाचा प्रकार जो मी खाल्लाय तो बोंडा स्टाईलचा होता!
कदाचित प्रांता-प्रांताप्रमाणे नामकरण वेगवेगळे असावे. कारण हा प्रकार मी बंगळुरात खाल्लेला.
जागू, फोटो व कृती दोन्ही मस्त आहेत. मला हे वडे खूप आवडतात. बंगळुर रेल्वे ठेसणावर पुण्याला परत निघताना प्रवासात खाण्यासाठी पार्सल बांधून घेतेच घेते. सोबत 'नंदिनी'चा सॉफ्ट मैसुरपाक आणि काप्पी.
व्वाह!!!! एकदम तोंपासु
व्वाह!!!! एकदम तोंपासु
शॅलोफ्राय करुन हा इफेक्ट
शॅलोफ्राय करुन हा इफेक्ट आलेला बघून मस्तच वाटलं. नक्की करुन बघणार.
जबरी मानुषी >>>बरं झालं गं
जबरी
मानुषी >>>बरं झालं गं बाई >>>>>>>>>> वडा नावाचा मासा आहे पण डाळ नावाचा नाही तसेच डाळ घालून माशाचे प्रकार केले जात नाहीत त्यामुळे हा माशाचा प्रकार असेल असा गैरसमज करुन घेऊ नका.>>>>>>>>>>>
हे क्लिअर केलंस ते..........हेहेहेहेहेहेहे! +१००००००००००००००००
सगळ्यांचे धन्यवाद. श्रद्धा पण
सगळ्यांचे धन्यवाद.
श्रद्धा पण मी ह्या वड्यांना जरा जास्त तेल वापरले आहे. पण इतर वेळी मी कमी तेलातच शॅलोफ्राय करते.
दिनेशदा, अरुंधती छान नाव आहेत वड्यांची.
साधना ओल्याचटणी बरोबर नाही लागणार कोरडा. नाहीतर सोबत चहा घ्यायचा.
जागु तुला हाणु का? माझ्या
जागु तुला हाणु का?:फिदी: माझ्या उपासाच्या दिवशीच टाकतेस असे तोंपासु फोटो?
आता उपासाच्या थालिपीठावर भूक भागवावी लागेल्.:अरेरे::फिदी:
मस्त कुरकुरीत दिसतायत.
सशलने केलेली चटणी पण झकास दिसतीय्.:स्मित:
चटणीची पण कृती मिळेल का सशल?
कधीतरी चालतं तेवढं..चविष्ट
कधीतरी चालतं तेवढं..चविष्ट खायचं म्हटलं तर
Pages