चणा डाळ पाव किलो
२ मिडियम कांदे चिरुन
२ ते ३ मिरच्या चिरुन
मुठभर कोथिंबीर चिरून
१ चमचा धणेपुड (असल्यास)
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
चविनुसार मिठ
तळण्यासाठी तेल
वडा नावाचा मासा आहे पण डाळ नावाचा नाही तसेच डाळ घालून माशाचे प्रकार केले जात नाहीत त्यामुळे हा माशाचा प्रकार असेल असा गैरसमज करुन घेऊ नका.
माझ्या वहिनीकडे एक समारंभ होता तेंव्हा मी हे डाळवडे केले होते म्हणून फोटोतील प्रमाण जास्तीचे आहे. पण सोयीसाठी मी पावकिलोचे प्रमाण लिहीले आहे.
५-६ तासांनंतर ती स्वच्छ धुवुन मिक्सरमधुन थोडेसेच पाणी घालून जाडसर लगदा होईल अशी थोडी चरट वाटून घ्या. (बापरे किती शब्द टाकले? : हाहा: गोंधळ उडाला नाही ना?)
वाटलेल्या पिठात चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची, हिंग, हळद, धणेपुड, मिठ घालून एकत्र करा.
आता लिंबाएवढा ह्या मिश्रणाचा गोळा घेउन त्याचे चपटे वडे करुन तेलावर मिडीयम गॅसवर शॅलोफ्राय करावेत. ६-७ मिनिटे एक बाजू शिजायला लागते.
हे आहेत तयार डाळवडे.
घरात लहान मुले असतील तर मिरची सरळ डाळीसोबत वाटून घ्या म्हणजे खाताना मिरची तोंडात येणार नाही.
आल-लसुण पेस्ट तसेच गरम किंवा गोडा मसालाही घालू शकता.
हा वडा चटणी किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. वरुन गरम गरम चहा तर मस्तच.
नेहेमीप्रमाणेच मस्त!
नेहेमीप्रमाणेच मस्त!
चटणीनाही का बरोबर?
त्याचा ही फोटो दाखवा ना .. 
अग फोटोच नाही काढला तेंव्हा
अग फोटोच नाही काढला तेंव्हा चटणीचा. पाहुणे चालू होत होते त्यामुळे राहून गेला.
मी मस्करी केली .. तुझे फोटो
मी मस्करी केली .. तुझे फोटो इतके मस्त असतात की चटणी कशी होती त्याची उत्सुकता लागली ..
मस्त दिसतायत. सशल, दीपच्या
मस्त दिसतायत.
सशल, दीपच्या कोथिंबीर चटणीबरोबर मस्त लागतील.
मस्त. वड्यांचा कुरकुरीतपणा
मस्त. वड्यांचा कुरकुरीतपणा जाणवतोय फोटोतून
>> सशल, दीपच्या कोथिंबीर
>> सशल, दीपच्या कोथिंबीर चटणीबरोबर मस्त लागतील.
आले आले .. दीपचे स्पोक्स्पर्सन आले ..
सशल चटणीची टिप टाकायला विसरले
सशल चटणीची टिप टाकायला विसरले होते तुझ्यामुळे आठवण झाली धन्स.
सायो, अगो धन्यवाद.
हे घ्या .. सायो, ही घरी
हे घ्या .. सायो, ही घरी खवलेल्या ताज्या नारळाची चटणी बरं का
..
वॉव , झकास फोटो !!
वॉव , झकास फोटो !!
मस्त दिसतेय चटणी. थोडे दाणे
मस्त दिसतेय चटणी. थोडे दाणे किंवा डाळं घातलं आहेस का?
वरुन फोडणी घातलीस तेव्हा घरातला कढीपत्ता संपला होता का?
सायो, इकडे डायग्रेशन नको ..
सायो, इकडे डायग्रेशन नको .. जागूचे वडे मस्तच आहेत ..
मस्त दिसतायत वडे!
मस्त दिसतायत वडे!
भारी दिसताहेत वडे!!!
भारी दिसताहेत वडे!!!
छान दिसतायत. हे शॅलो फ्राय
छान दिसतायत.
हे शॅलो फ्राय केलेत?
जागू मस्त दिसताहेत वडे. हे
जागू मस्त दिसताहेत वडे. हे वडे आप्पेपात्रात शॅलोफ्राय करता येतील ना.
व्वाह!!!! एकदम तोंपासु असे
व्वाह!!!! एकदम तोंपासु
असे वडे आणि गरमागरम चहा.... के बात!!!!
यात मी थोडे जीरे / बडीशेप भरडुन टाकते.
वडे तोंपासू दिसत आहेत
वडे तोंपासू दिसत आहेत जागू.
एका ओळखिच्यांकडे खाल्ले होते असे वडे. खूप टेस्टी होते.
जागु नेहमीप्रमाणेच तोंपासु
जागु नेहमीप्रमाणेच तोंपासु रेसिपी आणि फोटो.
हे शॅलो फ्राय केलेत?>>>> +१
तसेच आप्पेपात्रात हे वडे किंवा इतर प्रकारचे वडे शॅलोफ्राय कसे करायचे? खरच खरपुस होतात का?
जागुले, मस्तच डाळवडे.
जागुले, मस्तच डाळवडे.
हे वडे माझी आई नेहेमी
हे वडे माझी आई नेहेमी बनवायची....चविला खुप मस्त लागतात...
सशल चटणी छानच. दिपांजली,
सशल चटणी छानच.
दिपांजली, प्राजक्ता, ज्ञाती, लोला, लाजो, ऑर्किड, वत्सला, दक्षिणा, अनिष्का धन्यवाद.
लोला, लाजो खर्या सुगरणी आहात
जास्त प्रमाणात होते आणि लवकर होण्यासाठी शॅलोफ्राय करायच्या तव्यातच जास्त तेल घातले होते. कडा बुडतील एवढे. पण मी घरी करते तेंव्हा मात्र कमी तेलातच शॅलोफ्राय करते.
रुनी मला अस वाटत की आप्पे पात्रात होऊ शकतील शॅलो फ्राय. करुन बघायला हरकत नाही.
सॉल्लिड दिसतायत डाळवडे मला
सॉल्लिड दिसतायत डाळवडे
मला वाटायचं तळायचे असतात हे वडे.
अश्विनी अग डिप फ्राय पण
अश्विनी अग डिप फ्राय पण करतात. हॉटेल मधले डिप फ्रायच असतात. पण उगाच जास्त तेल वापरायला नको म्हणून मी शॅलो फ्राय करते.
मस्त मस्त
मस्त मस्त
जागू, डाळवडे झक्कास दिसताहेत!
जागू, डाळवडे झक्कास दिसताहेत!
जागुले बरं झालं गं बाई
जागुले
बरं झालं गं बाई >>>>>>>>>> वडा नावाचा मासा आहे पण डाळ नावाचा नाही तसेच डाळ घालून माशाचे प्रकार केले जात नाहीत त्यामुळे हा माशाचा प्रकार असेल असा गैरसमज करुन घेऊ नका.>>>>>>>>>>>
हे क्लिअर केलंस ते..........हेहेहेहेहेहेहे!
हे वडे कुठल्याश्या रेल्वे स्टेशनात मिळतात ना?
तोँपासू
तोँपासू
सकाळी.. सकाळी भुक लागलि
सकाळी.. सकाळी भुक लागलि असताना असे फोटो पाहने. म्हनजे.........
आता करन्यात येतिल,,,,,,
छान दिसताहेत डाळ वडे!
छान दिसताहेत डाळ वडे!
मस्त दिसतायेत
मस्त दिसतायेत
Pages