Submitted by उमेश वैद्य on 13 April, 2013 - 03:37
आकाशमोगरा
आकाशमोगर्याची फुलली असंख्य पुष्पे
व्योमातही तशीच.. असतील अनन्त विश्वे
एकेक फूल त्याचे तारे असंख्य झाले
रात्रीस जे फुलोनी धरतीवरी गळाले
पडले गळून जेंव्हा मातीस ही सुगंध
दुस-यास देत गेले उरले जरी कबंध
प्रगतास का असावा दातृत्व हा अभाव
त्याच्यावरी पडेना याचा कधी प्रभाव
येथून एक जाता काही दुज्यास देतो
मनुष्य मात्र याला अपवाद काय ठरतो
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान वाटली. आशय चांगला आहे.
छान वाटली.
आशय चांगला आहे.
खुरसाले +१
खुरसाले +१
.जुन्या काळच्यासारखं तात्पर्य
.जुन्या काळच्यासारखं तात्पर्य असलेली कविता छान वाटली..
सुशांत, वैभव, भारतीताई
सुशांत, वैभव, भारतीताई धन्यवाद.