Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16
निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.
कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.
मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाटील तो जमिनीचा आत्ताचा रेट
पाटील तो जमिनीचा आत्ताचा रेट आहे. वसईवाल्या भाजीवाल्यांच्या पिढीजात जमिनी आहेत, आत्ताच्या रेटने विकत घेऊन केलेल्या नाहीत.
अर्थात पण अपॉर्चुनीटी कॉस्ट
अर्थात पण अपॉर्चुनीटी कॉस्ट नावाची गोष्ट असते ना , त्या जमिन न विकता अजुन शेती करतायत याचेच कौतुक.
ते बहुतेक सगळीकडच्या शेती,
ते बहुतेक सगळीकडच्या शेती, बागायती जमिनीबद्दल म्हणता येईल.
तोच हिशोब आंबे, काजू सगळ्यांना लावता येईल की.
सकाळी कधी लेकीला शाळेत
सकाळी कधी लेकीला शाळेत सोडायला गेले तर मला तुळशीपाईप रोडवर तीन तीन होलसेल बाजार आणि त्यांची सकाळची लगबग बघायला मिळते. कमलामिल्सपासून सुरू होणारा फ्लायओवर उतरला की लगेच उजवीकडे होलसेल मासळीबाजार लागतो. तिथे अनेकानेक ट्रक्स भरभरून बर्फाच्या मोठ्ठ्या ट्रेजमधून मासळी येते. ती उतरवून आतल्या गाळ्यांमध्ये घेऊन जाण्याचं काम सुरू असतं. इतकावेळ बर्फ आणि पाण्यात कामं करून त्या कामगारांची बोटं नक्कीच खराब झाली असणार. तिथे मासळीचा वासही जोरदार असतो.
त्याच्या शेजारीच अगदी खेटून आहे फुलबाजार. मासळीबाजाराशेजारीच फुलबाजार वसवण्याची विनोदबुद्धी महानगरपालिकेनं दाखवलीये. मात्र फुलबाजाराचा वास नसतो, निदान सुगंध तरी नसतो. कारण मुख्यत्वे झेंडू आणि इतर रंगिबेरंगी बिनवासाची फुलंच मी इथे पाहिलीयेत. गुलाब, रातराणी हवे असतील तर अजूनही दादरच्या ब्रिजखालच्या फुलमार्केटातच जावं लागतं. या ब्रिजखालच्या मार्केटातही सकाळी प्रचंड प्रमाणात आणि प्रचंड विविधतेची फुलं येतात. जाताना घाई असते म्हणून मी येताना लिली किंवा गुलाबाची खरेदी इथे करते. पण जाई-येईपर्यंत लागलेल्या पाऊणएक तासात इथला रस्त्यावर चाललेला होलसेल बाजार जवळजवळ संपुष्टात आलेला असतो. मग केवळ दुकानात फुलं मिळतात नाहीतर आदल्या दिवशीची शिळी फुलं टोपलीत घेऊन बसलेल्या बायकांकडे अतिस्वस्त्यात फुलं मिळतात. दुकानातून घेतलेली फुलं मात्र आठेक दिवस सहज टिकतात.
तसंच पुढे गेल्यावर, दादरब्रिजवरून खाली उतरल्या उतरल्या डावीकडे लागतो तो भाजीबाजार. इथे भाज्यांच्या जागाही ठरल्या आहेत आणि बरेचदा पाहिल्याने आता मलाही पाठ झाल्या आहेत. सगळ्यात पहिले डावीकडे असतात फ्लॉवर्-कोबीचे गड्डे आणि पिवळी मद्रासी काकडी. नंतर लगेच (टिळकब्रिजच्या खाली), वर दिनेशदांनी उल्लेख केलाय तो मिरची बाजार त्याला लागून. तिथेच कोथिंबीर, लिंबं आणि पुदिना असतो. नंतर काही कांद्या-बटाट्याची दुकानं, टोमॅटोचे विक्रेते. मग एक रस्ता जातो आतमध्ये - तिथे बांधलेली मंडई आहे. पण आजूबाजूला, मंडईबाहेर, रस्त्यावर भाज्याच भाज्या. या रस्त्यानंतर पालेभाज्यांचा विभाग येतो. या ठिकाणी सगळे टेंपो एका ओळीत उभे असतात. मी जाते तोवर भाज्या आणलेले ट्रक्स माल उतरवून गेलेले असतात. आता इथल्या टेंपोंच्यात माल भरण्याची प्रक्रीया सुरू असते. त्यामुळे इथे ट्रॅफिक खोळंबलेला असतो. (त्यामुळे मला इथे बाहेर चांगलंच निरीक्षणही करता येतं).
लहान, मोठे भाजीविक्रेते भाजी निवडून निवडून पटापट पिशव्यांतून कोंबत असतात, टॅक्सीत भरत असतात, टोपल्या डोक्यावर घेऊन जात असतात. कटिंग चहावाले जोरदार धंदा करत असतात. ही गडबड, लगबग चालू असते. प्रत्येकजण एक ध्येय समोर ठेऊन आजूबाजूचा आणि आजूबाजूच्यांचा विचार न करता धावत असतो.
या सर्व परिसरात भाज्यांचा प्रचंड कचरा साठलेला असतो. अनेकजण त्या कचर्यातून आणि टाकलेल्या भाज्यांतून त्यातल्या त्यात बर्या भाज्या निवडण्याचं काम इमानेइतबारे करत असतात.
महापालिकेची कचरा गाडीही कधीकधी उभी असते. त्यांचं कचरा उचलण्याचं काम सुरू झालेलं असतं. आता हा इतका कचरा कसा आणि कधी उचलणार या विचारानं मला नेहमी हबकायला होतं. पण दरवेळी परतीच्या वाटेवर परिसर पुन्हा स्वच्छ झालेला दिसतो.
कितीतरी वेळा पाहिलंय हे दृष्य पण दरवेळी तितक्याच अचंब्यानं मी बघत असते.
जिप्सीला खास इथे जाऊन इथली लगबग कॅमेरात बंद कर म्हणून सुचवलंय. कधी मनावर घेतोय बघुयात.
पुर्वी आमच्या घरा समोर विहिर
पुर्वी आमच्या घरा समोर विहिर होती.>>>>> परळमधे विहीर????????? केव्हाची गोष्ट ही????
फेरीवाल्याकडुन/दुकानदारांकडुन
फेरीवाल्याकडुन/दुकानदारांकडुन घेतल्या जाणार्या हप्त्यासाठी 'बापट' शब्द प्रचलित होता. जसं मटका लागला की त्याचे जे पैसे मिळत त्यासाठी, ' आज वळण आलय' किंवा ' वळण घेउन येतो' वगैरे वाक्य कानावर पडाची. हे शब्द जसे येतात तसेच विरुनही जातात. फार जुने नाहियेत हे शब्द. ८०-९० मधलेच आहेत.
मामी- ती दादर ब्रीज च्या पुढे
मामी- ती दादर ब्रीज च्या पुढे असलेलया मंडईत एके काळी भाज्यांची होलसेल व्हायची , नंतर तो बाजर वाशी APMC ला हालला. पहाटे पहाटे ट्रक लागायचे
मामे, तुझ्या घराच्या इथल्या
मामे, तुझ्या घराच्या इथल्या तुळशीपाइपच्या कॉर्नरपासून निघून मग पुढे आधी परळ स्टेशन आणि नंतर करी रोड स्टेशनकडे जाणारा जो सगळा ब्रिज/ रस्ता आहे ना. तो सॉलिड आहे.
आणि तो अजून एक एस आकाराचा फ्लायओव्हर जो भाऊ दाजी लाडच्या समोर उतरतो (पेजिंग शर्मिला.. आपण गेलो होतो तो कुठला फ्लायओव्हर?) तो पण गमतीशीर आहे.
दादर ब्रिजच्या इथली मंडई
दादर ब्रिजच्या इथली मंडई म्हणजे ते कामगार कल्याणचं ग्राउंड आहे त्याच्या बाजूची का?
नाही, उत्तरेकडची, काम्गार
नाही, उत्तरेकडची, काम्गार कल्याण म्हणजे मामीनी जे मासे आणि फुल मंडई लिहलेय तो भाग
ओह.
ओह.
पुढे आधी परळ स्टेशन आणि नंतर
पुढे आधी परळ स्टेशन आणि नंतर करी रोड >>> आधी लोअर परेल आणि मग एलफिस्टन. करीरोड पलिकडे, मध्यरेल्वेच्या लाईनीवर येतं.
रेल्वेवरून आठवलं, मध्यरेल्वेवर दादर-माटुंगा ही स्टेशन्स सगळ्यात जवळ आहेत. आणि ठाणा आणि मुलुंड स्टेशनांमध्ये सगळ्यात जास्त अंतर होतं. (त्याहीपेक्षा जास्त अंतर दिवा-डोंबिवलीत आहे. पण तज्ञांच्यामते ती स्टेशनं मुंबईच्या चर्चेत धरायची नाहीयेत.
अर्थात मुंबईतील ऑफिसेस तुमच्या व्याख्येतल्या मुंबईबाहेरून येणार्या लोकांमुळे चालतात हे कृपया लक्षात ठेवा. असो.) आता ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नाहूर स्टेशन झाल्यानं कदाचित मुलुंड-नाहूर अंतर सगळ्यात कमी भरत असेल.
(pradyनं या वरच्या परिच्छेदातली चूक ध्यानात आणून दिली आहे. मुलुंड आणि भांडूप स्टेशन्समध्ये जास्त अंतर होतं (ठाणा-मुलुंड नाही) आणि नाहूर स्टेशनही मुलुंड-भांडुपच्यामध्ये आहे. prady धन्स.)
जाणकारांनी प्रकाश टाकावा.
भेंडी बाजारातली अत्तर गल्ली
भेंडी बाजारातली अत्तर गल्ली कुणाला माहीती आहे का?
क्रॉफर्ड मार्केट भागात, मुसाफिर खान्यात पर्फ्युम्स मीळतात ते बहुतेक लो क्वालीटि/ बनावट असतात, अत्तर गल्लीचा काहि अनुभव आहे का कुणाला?
>> मध्यरेल्वेवर दादर-माटुंगा
>> मध्यरेल्वेवर दादर-माटुंगा ही स्टेशन्स सगळ्यात जवळ आहेत
आणि पश्चिम रेल्वेवर ग्रॅन्ट रोड - बॉम्बे सेन्ट्रल.
मजा येते आहे वाचायला.
आता डबलडेकर बसेस नाहीतच ना?

मला एक १२३ नंबरचा रूट कौतुकाचा म्हणून आठवतो - राणीच्या रत्नहारावरून जाणारा - दुसर्या बाजूला पार नेव्ही नगरपर्यंत. बाकीच्या बसेस 'उपयुक्त' कॅटेगरी.
शाळेत असताना टीआयएफआरचं नुस्तं ते हिरवंगार लॉन बघून किती इम्प्रेस झाले होते ते अजून आठवतं.
सीनियर कॉलेजला रूपारेलला अॅडमिशन घेतल्यावर आईला 'रोज इतक्या लांब ट्रेनने जाणार मुलगी' म्हणून काळजी वाटल्याचं आठवतंय. मी जायचे ग्रॅन्ट रोडहून.
नाना चौकातलं महादेवाचं देऊळ हा एक भर गर्दीतला अत्यंत शांत 'स्पॉट' आम्हा मैत्रिणींचा फार आवडता. तसंच गावदेवीचं देऊळ. तिथे पूर्वी तलाव होता म्हणे. मी कायम गेले की इमॅजिन करून बघते तो!
तसाच चर्नीरोडचा तो पायपूल मला अजूनही आवडतो चालायला - सीफेसला समांतर जातो तो.
बॉम्बे सेंट्रल-ग्रांट रोड मधे
बॉम्बे सेंट्रल-ग्रांट रोड मधे पण खुप कमी अंतर आहे.
हो तो एस ब्रीज. राणी बागेसमोर
हो तो एस ब्रीज. राणी बागेसमोर येऊन संपतो. कसला सॉलिड आहे. भायखळा, सातरस्ता वगैरे भाग जबरदस्त आहे. भायखळ्याचं पॅलेस टॉकिज मुंबईच्या अगदी जुन्या वन स्क्रीन पैकी जी मोजकी शिल्लक आहेत त्यातलं एक. सातवळेकरांच्या एका पेंटींगमधे अचानक हा भाग ओळखायला आला आणि मस्त वाटलं. गेले दीड वर्ष भाऊ दाजी लाड म्यूझियममधे जाण्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच हा भाग इतक्या जवळून न्याहाळला. फार फार पूर्वी सात रस्त्यावर शाहिर अमरशेखांच्या जुन्या घराजवळ त्यांच्या मुलीने म्हणजे प्रेरणा बर्वेनी मला नेले होते. तिथे नामदेव ढसाळ आणि मल्लिका अमरशेखांचं घर होतं. आता नाही.
या दिवसात लालबागच्या फ्लायओव्हर ब्रीजवरुन भायखळ्याला जाणे हा एक आनंददायी प्रवास असतो. केव्हढी फुलझाडं दिसतात बहरलेली दोन्ही बाजूंना. टबुबिया, जॅकरान्डा, गुलमोहोर, अमलताश, शाल्मली.. काही पूर्ण बहरात, काही कळ्यांनी लगडलेले. पार्ले ते भायखळा टॅक्सीप्रवासाला द्यायला लागलेले पैसे पूर्ण वसूल होतात.
अगं ते नाही. मी रस्ता
अगं ते नाही.
मी रस्ता म्हणतेय.
लोअर परेल स्टेशनातून इस्टला बाहेर पडलं की समोरच्या रस्त्याला करी रोड स्टेशन आहे ना.
तुझ्या इथल्या तु पा च्या कॉर्नरपासून करी रोड स्टेशनपर्यंत अशी पायपीट बरीच केलीये रिसेंटली.
पुढची स्टेशनं घ्यायची झाली तर
पुढची स्टेशनं घ्यायची झाली तर अंबरनाथच्या पुढे कर्जत पर्यंत्च्या स्टेशन्स मधे खुपच जास्त अंतरं आहेत. तसच कसारा लाईन वर तर त्याहीपेक्षा जास्त लांब आहेत स्टेशनस. असो. मी जाणकार नाही.
पाटिल. अत्तर गल्लीचं मला
पाटिल. अत्तर गल्लीचं मला प्रचंड आकर्षण आहे. खूप वर्षांपासून एक फिचर करायचं मनात आहे त्यावर. तिथले अत्तराचे बुधले, निळ्या काचेच्या फिरकीच्या अत्तराच्या बाटल्या आणि कनौजी अत्तराचा दरवळ.. अहाहा! जाम माजोरडे आहेत पण ते अत्तरवाले मियां. माहितीकरता ओठ उघडतील तर शपथ.
रस्ताच तो. सर्पाकृती, मधे गोल
रस्ताच तो. सर्पाकृती, मधे गोल विहिर आहे तोच ना?
लोअर परेल स्टेशनातून इस्टला
लोअर परेल स्टेशनातून इस्टला बाहेर पडलं की समोरच्या रस्त्याला करी रोड स्टेशन आहे ना.
>>> हा इस्टला! मग बरोबर.
व्हिटीला जे जे फ्लायओवरवरून प्रवास सुरू केला की भायखळ्याच्या आधी अचानक दोन रस्ते फुटतात. एक जातो भायखळा पूर्वेला आणि एक भायखळा फायरब्रिगेड डावीकडे टाकून दगडी चाळीकडे. भायखळा फायरब्रिगेड डावीकडे तर उजवीकडे खडा पारशी दिसतो. (तो तिथून हलवण्याचं घाटत होतं. हलवला की नाही पाहिला पाहिजे.) अतिशय सुरेख नक्षीकाम केलेला लोखंडी खांब आणि त्यावर एक पारशीबावा उभा. या खांबावर मनगटापर्यंतच असलेले तळहात आहेत. ते का कोण जाणे! एकदम क्रीपी वाटतं ते पाहून.
याच परिसरात कोपर्यावर 'कुप्रसिध्द' दगडी चाळ आहे. डावीकडचा रस्ता पुढे सातरस्ता जंक्शनला जातो तर उजवीकडचा भायखळा स्टेशनवरून करीरोड स्टेशनकडे. मी अनेकवेळा चाळींवरची नावं वाचून दगडी चाळ शोधायचा प्रयत्न केला पण काही दिसली नाही. मग एकदा अचानक कोपर्यावरच्या चाळीवरची 'स्टोन बिल्डिंग' अशी देवनागरीतली अक्षरं दिसली आणि ट्युब पेटली.
एक साधारण चाळींसारखी दिसणारी चाळ, काय प्रसिध्द झाली!
>> अत्तर गल्लीचं मला प्रचंड
>> अत्तर गल्लीचं मला प्रचंड आकर्षण आहे

मला तसंच दादरच्या फूल मंडईचं आहे. माझा लेक तिथे मोगरा वगैरे वजनावर विकताना बघून जो काही हरखून गेला होता!
ती गर्दी, तो रबरबाट सगळं विसरायलाच होतं तिथली फुलं पाहिली की!
सीझनला बकुळ आणि सुरंगीचे वळेसर तिथे मिळतात!
अगदी अगदी. एकदा मी तिथे
अगदी अगदी. एकदा मी तिथे कृष्णकमळांचा हार पाह्यला होता.
मला तसंच दादरच्या फूल मंडईचं
मला तसंच दादरच्या फूल मंडईचं आहे. >> गणपतीत घरच्या गणपतीच्या सजावटीकरता त्या दिवशी मी भल्या पहाटे दादरच्या मंडईतून भरपूर फुलं (दामदुपटीनं पैसे मोजून) घेऊन जात असे.
इथे कमळंही मिळतात - निळी, गुलाबी, पांढरी.
रानडेरोडच्या दादरस्टेशन साईडच्या कोपर्यावर सोनचाफा, दवणा, मरवा, पाचू असतो. मोगरा-मदनबाणाचे गजरे असतात. कधी सुरंगीचेही गजरे असतात. क्वचित कवठीचाफाही बघायला मिळतो. नवरात्रीत शेवंतीच्या वेण्याही असतात.
असंच एक फुलांचं देखणं स्थान म्हणजे माटुंगा पश्चिम. तिथे फुलं फारशी नसतात विकायला. पण हारांचे इतके विविध नमुने असतात ना! आणि किती मोठे मोठे, खास दाक्षिणात्य दिसणारे हार. आता त्या बाजूला गेले की या हारांचे फोटो काढून इथे टाकेन. मज्जा येते ते हार पाहताना.
हो मामी. ते विणलेले दक्षिणी
हो मामी. ते विणलेले दक्षिणी हार एक अजब प्रकार आहे. काय देखणा दिसतो.
अगदी अगदी, शर्मिला. त्या
अगदी अगदी, शर्मिला. त्या हारांत गुलाबांच्या पाकळ्या पाकळ्या सुट्या करून आणि गुंडाळून गुंफलेल्या असतात. या गुंडाळलेल्या पाकळ्यांमुळे एक प्रकारचं शेडिंग दिसतं त्या हारांच्यात. काय कौशल्यानं बनवलेले असतात ते.
तसेच सुंदर मोगर्याच्या कळ्या
तसेच सुंदर मोगर्याच्या कळ्या गुंफून केलेले गजरे दिसतात. भरगच्च! सुईदोर्याने ओवून केलेला गजरा तसा कधीच दिसत नाही.
सुगंधी फुलांचे गजरे मलातरी मुंबईबाहेर कुठे मिळालेले नाहीत. कोल्हापुरात आणि पुण्यात कागडा + अबोली असले विरळ आणि हातावर मोजून दिलेले 'गजरे के नामपे धब्बे' बघितलेत सहसा.
गजरे के नामपे धब्बे
गजरे के नामपे धब्बे
हातावर मोजून दिलेले 'गजरे के
हातावर मोजून दिलेले 'गजरे के नामपे धब्बे' बघितलेत सहसा. >>> स्वाती,
आम्ही त्यांनाही मद्रासी गजरे म्हणायचो.
मुंबईतले गजरे, हार हे अतिचशय
मुंबईतले गजरे, हार हे अतिचशय सुंदर आणि कलाकुसरीचे, रंगसंगतीचे सुरेख नमुने असलेलं प्रकरण आहे. मी प्रेमात आहे अश्या हार/ गजर्यांच्या.
अगदी तुळजाभवानी झेंडूपासून ते हिरव्या - पिवळ्या दवण्याच्या तुर्यांपर्यंत, गुलाबाच्या पाकळ्या, अबोली, कण्हेरीची गुलाबी फुले काय काय गुंफून ते गजरे रंगीबेरंगी करतात - इतके देखणे गुंफतात की बस्स!
सुरंगीची वेणी, चाफ्याचा हार, तुळशीचे सुंदर हार, बकुळीचे - अबोलीचे गजरे, वेण्या, गुलाबाचे सुरेख हार यांसाठी भल्या सकाळी माटुंग्याच्या फूल बाजारातून चक्कर मस्ट!
Pages