Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16
निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.
कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.
मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
है शाब्बास, पाटील. याला
है शाब्बास, पाटील. याला म्हणतात सामाजिक बांधिलकी!
हो सगळ्यांच्या वतीने जाऊन आलो
हो सगळ्यांच्या वतीने जाऊन आलो असेच समजा
मामी, >> सामाजिक बांधिलकी!
मामी,
>> सामाजिक बांधिलकी!
आ.न.,
-गा.पै.
<<<हल्ली अनेक बायका
<<<हल्ली अनेक बायका पार्ल्याला लोकलीतून उतरून भाजी घेऊन मग बोरिवलीला जातात>> अगदी अगदी , आणि त्यातही पार्ला इस्ट आणि वेस्ट ह्यांपैकी कुठे भाजी चांगली मिळते यावर वादविवाद .
माझ्या भारतभेटीत , मंगलदास ते भुलेश्वर हा सगळा भाग आणि दादर (तिथल्या खादाडीसकट ) फिरून आल्याशिवाय मुंबई भेट झाल्याच feeling अजिबात येत नाही.
<<ती डेबल डेकर बस असायची आणि
<<ती डेबल डेकर बस असायची आणि तीला ड्रायव्हरची वेगळी केबिन असायची... ती वळताना बघायला जाम मजा यायची.>>.इंद्रा
अगदी . नेट वरून नेटाने शोधलेली प्रचि , त्या बस ला Articulated Trailer Bus म्हणत त्याच बोलीभाषेतील भाषांतर एडका बस झाल असेल . जस सांडहर्स्ट रोड च संडास रोड केल तसं 
असं नाही गौरी. १ आकड्याला
असं नाही गौरी. १ आकड्याला एडका म्हणतात बहुतेक.
सगळा गच्च वस्तीचा भाग वगैरे
सगळा गच्च वस्तीचा भाग वगैरे आणि मग पार भुलेश्वर/ काळबादेवी वगैरे एरियांपर्यंत? > १ नंबर महमद अली वरुन जाते... भुलेश्वर / काळबादेवीला ६६, ६१ वैगरे बस जातात.
सामाजिक बांधिलकी! > :d
गौरी बस दिसत नाही.
गेल्या महिन्यात मॅमुभ मधे
गेल्या महिन्यात मॅमुभ मधे जुन्या मुंबईच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरलं होतं. लेकाची आणि माझी जायची फार्फार इच्छा होती. पण बारावीची परिक्षा आणि ते प्रदर्शन एकाच दिवशी संपलं.
एक नंबरचा लास्ट स्टॉप कुठे
एक नंबरचा लास्ट स्टॉप कुठे आहे मग?
मस्त लिहित आहेत सगळे ! माझी
मस्त लिहित आहेत सगळे !
बाकी गेटवे ऑफ इंडिया, फ्लोरा फाऊंटन वगैरे मुंबईतले पटेल स्पॉट्स कधीतरी पाहिले.. बाबांचं हेडऑफिस नरीमन पॉईंटला.. मग मी आईच्या ऑफिसला जायच्या दिवशी ते तिथे असले तर आम्ही तिथेही जात असू.. तिथे सरकता जिना होता त्याचं खूप कुतूहल होतं.. मी पूर्णवेळ त्या सरकत्या जिन्यावर खेळत बसे.. समुद्रावर किंवा इतर कुठे गेल्याचं आठवत नाही मला..
माझी आई बिएमसीत काम करायची.. त्यामुळे रोज डोंबिवलीहून व्हिटीला जायची.. लहान असताना मी कधीकधी तिच्याबरोबर जायचो ऑफिसला... तेव्हा ती हाफडे घ्यायची.. त्या दिवशी व्हिटीस्टेशनवर चॉकोबार, मग समोरच्या फुटपाथला मिळणारा कालाखट्टा, लंचला सुविधामधली रवा ईडली आणि पारशी डेअरीमधली कुल्फी असा भरगच्च खाणे कार्यक्रम असायचा..
<<असं नाही गौरी. १ आकड्याला
<<असं नाही गौरी. १ आकड्याला एडका म्हणतात बहुतेक.>> असेल असेल
पण बाकिच्य रुट ला सुद्ध ती बस असायची.
<<गौरी बस दिसत नाही.>>> ? मला दिसतेय . माहित नाही
<<एक नंबरचा लास्ट स्टॉप कुठे आहे मग?>>> ती बस कुलाबा- माहीम अश्या रुट वर धावायची बहुतेक ;
(No subject)
बरोबर आहे गौरीम. १ नंबर हल्ली
बरोबर आहे गौरीम. १ नंबर हल्ली कुलाबा (रोमन क्याथलिक चर्च) ते वांद्रे स्थानक (पश्चिम) अशी धावते. पूर्वी माहीम आगारापर्यंतच होती. आजही तिच्या कित्येक फेर्या माहीम आगारात संपतात.
आ.न.,
-गा.पै.
भाऊ, गौरीम, बसचं प्रचि
भाऊ,
गौरीम, बसचं प्रचि मस्त. धन्यवाद.
ही एल जे रोडवरून सेनाभवनला
ही एल जे रोडवरून सेनाभवनला वळून शिवाजी मंदीर, प्लाझा, ब्रिज, दादर टीटीला उजवीकडे वळून चित्रा, हिंदमाता असं करत परळमधे घुसते ना/ का?
<< ही एल जे रोडवरून सेनाभवनला
<< ही एल जे रोडवरून सेनाभवनला ...... >> पुढचा हा मार्ग बरोबर आहे. पण वांद्रे रेल्वे स्थानकाजवळच्या डेपोतून सुटून ही बस हिल रोडवरून वांद्रे रेक्लेमेशनला [ लिलावती हॉस्पिटल]वळसा घालून मग माहिम, शिवाजी मंदिर या मार्गाने जाते.
परळमधे घुसते ना> हो... मग
परळमधे घुसते ना> हो... मग लालबाग, भायखाळा करत महमद अली रोड वरुन व्हिटीच्या पर्यंत जाते.
एल जे रोड वरिल १ नंबर आणि सायन डेपोतून सुटणारी ६६ नंबर या बस रात्र भर धावत असतात... मी स्वतः माहिम वरुन सकाळची ३.३०ची बस पकडलेली आहे.
विषय आलाच आहे म्हणून - माहिम
विषय आलाच आहे म्हणून - माहिम बस डेपोची जागा समोरच्या चर्चच्या मालकीची आहे व 'बेस्ट्'ला लीझवर दिलेली आहे, असं खात्रीलायकपणे कळतं. ह्या व्यवस्थेतील अनिश्चितपणामुळे ह्या डेपोतून सुरूं होणारे बरेचसे 'रूट' हळुहळू दुसरीकडून सुरूं करण्याचं 'बेस्ट्'चं धोरण असावं.
ते मुंबई म्हणजे हिकडे
ते मुंबई म्हणजे हिकडे माहीम-बांद्रा, मधे शीव आणि तिकडे वडाळ्यापर्यंतच ठेवा जरा. बाकी पलिकडे आहेत ती 'उपनगर' . मुंबई नव्हे. कसे? >>>>>>> +१
१ नंबर ची बस माहिम - कुलाबा अशी होती. काही काही बसेस शि.पा. (राम गणेश गडकरी चौक) पासून सुटायच्या.
मस्त मजा. गौरीची प्रचिमधली
मस्त मजा.
गौरीची प्रचिमधली डबलडेकर बस अंगावर आली जणू आणि छबिलदासच्या कुठल्याशा नवनाट्यातली 'बस आली आली बस आली - आपली नाही ती बस'' ही कॅचलाइन आठवली .
भाऊ, झकास व्यंचि.
नीधप,
>><<<हल्ली अनेक बायका पार्ल्याला लोकलीतून उतरून भाजी घेऊन मग बोरिवलीला जातात>>
माझी आई मंत्रालयातून येताना कधीमधी खास बॅलार्ड पीअरला जाऊन पडावातून उतरवलेले ताजे फडफडीत मासे कोळणींकडून घेऊन यायची ते आठवलं
मॅsssssssड... निव्वळ
मॅsssssssड... निव्वळ मॅड!
भारती, कस्ली भारी चित्रं आहेत... एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला झालय हे वाचून अन बघून.
दाद, मग अजून एक प्रचि
दाद, मग अजून एक प्रचि दिल्याशिवाय रहावत नाहीय.. ही ओव्हल मैदानावरची रग्बी मॅच

आईशप्पथ! भारती, सही आहे हा
आईशप्पथ! भारती, सही आहे हा फोटो
वरील प्रतिसाद वाचून बर्याचशा
वरील प्रतिसाद वाचून बर्याचशा ठीकाणांबद्दलच्या माझ्या खूप जुन्या आठवणी चाळवल्या गेल्या. एकदमच सगळ्या सागून 'बोअर' करणं नाही योग्य वाटत. म्हणूनच थोडा थोडा डोस पाजावा म्हणतो -
फॅशन स्ट्रीट-
हुतात्मा चौकातून मेट्रो सिनेमाकडे जाणारा हा रस्ता. दुतर्फा छान झाडी, दोन्ही बाजूस खुली मैदानं व बॉम्बे जिंमखान्याची सुरेख वास्तु व तिथलं हिरवंगार मैदान ! तिथल्या मैदानांत मनसोक्त खेळलेलों, तिथल्या 'रेलींग'वर झाडाच्या सांवलीत बसून विजय मांजरेकर, उम्रीगर, वाडेकर इत्यादी राष्ट्रीय संघातल्या खेळाडूंचा खेळ अगदीं जवळून पाहिलेला. आमच्या हृदयात त्या रस्त्यासाठी एक रांखीव कोपराच तयार झाला होता.
म्युझियमच्या परिसरात खूप शांत , स्वच्छ वातावरण असायचं. मग अचानक एकेक करत फेरीवाल्यानी तिथं बस्तान बसवायला सुरवात केली. हळुहळूं तयार कपड्यांचं एक छोटं मार्केटच म्युझियमच्या दारांतच उभं व्हायला लागलं. म्युझियमचे त्यावेळचे डीन [ बहुधा, गोरक्षकर नांव होतं त्यांचं] अस्वस्थ झाले व त्यानी संबंधित सर्व खात्याना म्युझियमच्या वातावरणाशी हें विसंगत असल्याचं पटवलं. पण सर्वांचेच हितसंबंध गुंतलेले. शेवटीं वैतागून डीननी फेरीवाल्याना उठवेपर्यंत म्युझियम बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. प्रशासन कोंडीत सांपडलं. मग त्यानी फेरीवाल्यांचीच मनधरणी केली; त्या आठ-दहा जणाना वरील रस्त्यावर हुतात्मा चौकाच्या बाजूचा एक कोपरा कपडे विक्रीसाठी देण्यात आला. म्युझियमचं, मैदानांचं महत्व, पावित्र्य धुडकावून एका निर्लज्ज लाचारीचा पाया घातला गेला !
आज तो सुंदर स्वप्नवत वाटणारा संपूर्ण रस्ता तयार कपड्यांचं ओंगळ मार्केट झालंय. ज्या 'रेलींग'वर बसून आम्ही मोकळी हवा खात खेळ पाहायचों तें आतां इथल्या त्या उपर्यांचं उष्टीं टाकायचं उकीरडं झालंय. मागच्या मैदानात खेळणार्या मुलाना तिथं मारलेला चेंडू आणण्याची घृणा वाटते. अशी आहे जन्मकथा आज मुंबईच्या ' टूरिस्ट अट्रॅक्शन' बनलेल्या 'फॅशन स्ट्रीट'ची !!!
माझ्या या लिखाणातून ओसंबणारा कडवटपणा केवळ माझ्या उतार वयाचा निर्देशक आहे कीं त्यांत कांही मूलभूत तथ्य आहे हें तुम्हीच ठरवा.
खेळ मांडला
खेळ मांडला

फार्फार पुर्वी एक्स्पो
फार्फार पुर्वी एक्स्पो एक्झिबिशन क्रॉस मैदानात लागलेलं मला अंधुक आठवतंय.
भाऊ, फॅशन-स्ट्रीटच्या
भाऊ, फॅशन-स्ट्रीटच्या निर्मितीची ही कथा खरंच माहिती नव्हती
इथे असणाऱ्या साऱ्याना
इथे असणाऱ्या साऱ्याना मनापासून धन्यवाद:) मामी तुम्हाला खासच
"मी मुंबईला जाउन आले " अस सासरी ( ठाण्याला) शेजारणीने म्हंटल्यावर मी सुरुवातीला हादरले होते. मुंबईला जाऊन आले? आपण कधी म्हणत नाही ना. म्हणजे फोर्ट ला जाऊन आले, दादरला गेले होते असच म्हणतो असाच समाज होता माझा. पण आता खूप जाणंवतय मुंबई ह्या शब्दातील जादु
दोन लिंक्स देत आहे. ( ह्या
दोन लिंक्स देत आहे. ( ह्या मनोगतावर जातात.) दोन्हीत जुनी मुंबई आहे.
http://www.manogat.com/diwali/2012/node/22.html
http://www.manogat.com/diwali/2012/node/22.html
या ट्रेलरवाल्या बसेस, ९०,
या ट्रेलरवाल्या बसेस, ९०, ३५१, ६ या रुटवर चालत. अगदी पहिल्या सीटवर बसल्यावर भन्नाट वारा यायचा. खास करुन ९० च्या रुटवर.
३८५, ३११, ३१३ वर आताआतापर्यंत साध्या ( आम्ही त्याला बिन मुंडक्याच्या म्हणायचो ) डबलडेकर बस होत्या.
या ड्रायव्हर्सचे कौशल्य खासच होते ( राजकुमारच्या कर्मयोगी (बहुतेक) चित्रपटात या डबलडेकर बसचा खास सीन होता.)
फार पुर्वी ९० चा आणि अलिकडचा वांद्रा स्टेशनजवळचा अपघात सोडला तर फार मोठे अपघात आठवत नाहीत मला.
Pages