नवी तारीख आयोग ठरवणार
म . टा . प्रतिनिधी , मुंबई
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ( एमपीएससी ) घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा ठरल्याप्रमाणेच ७ एप्रिल रोजी होईल , असे बुधवारी जाहीर करणाऱ्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना गुरुवारी दुसऱ्याच दिवशी आमदारांच्या दबावापुढे झुकत ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला . एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी राज्य विध िमंडळाच्या उभय सभागृहात केली . परीक्षेची नवी तारीख आयोग जाहीर करील , असेही त्यांनी स्पष्ट केले .
एमपीएससीच्या वेबसाइटला व्हायरसची बाधा झाल्याने विद्यार्थ्यांच्या माहितीचा सर्व डेटा करप्ट झाला होता . त्यामुळे ही पूर्व परीक्षा रद्द करून नंतर घेण्यात यावी , अशी विद्यार्थी व पालकांची मागणी होती . तीच मागणी सर्वपक्षीय आमदारांनी कालपासून सभागृहात उचलून धरली . पण ही परीक्षा ठरल्या तारखेस घेण्याची आयोगाची तयारी असल्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी बुधवारी दिले होते . परीक्षा रद्द करण्यासाठी दोन्ही सभागृहांत गदारोळ होऊन कामकाज अनेकदा बंद पडले . विशेष म्हणजे ही मागणी रेटण्यात विरोधी पक्षाच्या आमदारांपेक्षा सत्ताधारी पक्षाचे आमदार अधिक पुढे होते .
आभाळ कोसळणार नाही
आयोगाची परीक्षा पुढे ढकलल्याने आभाळ कोसळणार नाही . हा मुद्दा कुणीही प्रतिष्ठेचा न करता मागणी मान्य करावी , अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली .
दोन लाख परीक्षार्थींची माहिती अपडेट
उमेदवारांच्या माहितीचा डेटा करप्ट झाल्यानंतरच्या दोन दिवसांत तीन लाख ७५ हजार उमेदवारांपैकी दोन लाखांहून अधिक उमेदवारांनी आपली माहिती पुन्हा वेबसाइटवर अपलोड केल्याचे एमपीएससीचे अध्यक्ष सुभाष ठाकरे यांनी सांगितले .
>>>>>>
जो निर्णय नाईलाजाने घ्यावा लागला तोच पूर्वी खबरदारी म्हणून घेतला असता तर ?????
कशाला या नोक-यांच्या मागे
कशाला या नोक-यांच्या मागे लागायचं ? बिहारी-युपीचे भैय्ये आपल्याकडे येतात. मिळेल त्या जागेवर राहतात. वडापावची गाडी लावतील, भेळेची गाडी लावतील, गोठा बांधतील. काहीही करतील. एकदा स्थिर झाले कि चांगली जागा घेतात, धंदा वाढवतात. मग अशा परिक्षा पास झालेले अधिकारी यांच्यामागे नोटीसा घेऊन फिरतात. मग त्यांच्यात अर्थपूर्ण बातचीत होते आणि बेकायदेशीरचं कायदेशीर होतं. काही दिवसांनी नदीपात्रातली एखादी जागा शर्माजी कि रसोई नावाने प्रसिद्ध होते, एखादी पुलाची जागा मंगल कार्यालय म्हणून माहीत होते तर कुठे अर्धभुयारी मार्गाची एण्ट्री बंद करून तिथे बिनदिक्कत गोठा स्थापन केला जातो.
घेणारे बनण्यापेक्षा देणारे बना.