Submitted by समीर चव्हाण on 3 April, 2013 - 15:14
संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह!! आणखी एक चांगला
वाह!! आणखी एक चांगला लेख...
देवासी लागे सकळांसी पोसावे
आम्हा नलगे खावे काय चिंता
देवा विचारावे लागे पापपुण्य
आम्हीसी हे जन अवघे भले
देवासी उत्पत्ति लागला संहार
आम्हा नाही फार थोडे काही
देवासी काम लागला धंदा
आम्हासी ते सदा रिकामीक
तुका म्हणे आम्ही भले देवाहून
विचारता गुण सर्वभावे................
हा अभंग पहिल्यांदा वाचला... धन्यवाद समीर.
बारकाईने वाचूनच सविस्तर
बारकाईने वाचूनच सविस्तर प्रतिसाद देतो.
मालिका सुरू ठेवल्याबद्दल आभार!
अप्रतिमच लेख आहे समीर.
अप्रतिमच लेख आहे समीर. प्रशासकांना विनंती करून लेखमालिकेत समविष्ट करून घे.
येथे विनंती कर
समीर, लेख आवडला. अनुभवी देव
समीर, लेख आवडला.
अनुभवी देव स्वयें जाले >> ज्यांनी (देवाचा) अनुभव घेतला ते स्वतःच देव झाले, आस्तिकतेच्या आणि नास्तिकतेच्या पलिकडे गेले. आणि जे मागे उरले त्यात आस्तिक आणि नास्तिक हा वाद कायमच राहिला. थोडक्यात - आपल्याला वाद घालायचा आहे का प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे हे आपणच ठरवायचे आहे.
रात्री जाली कोण सोडी मग
तुका म्हणे अंतकाळी
जाती टाळी बैसोनि >>>
रात्र = अंतकाळ. दिवसा जी खरेदी करायची आहे ती करून घ्या. रात्र झाली की दुकानांना टाळी (कुलुपे) लागतील. मग तुम्हाला काही हवे असले तरी मिळायचे नाही. 'याच साठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा' या अभंगासारखाच काहीसा अर्थ आहे या अभंगाचा पण.
तुम्ही कबीरावर पण एक मालिका करा. वाचायला खूप आवडेल.
सगळ्यांचे आभार. भूषणः
सगळ्यांचे आभार.
भूषणः लिन्कसाठी धन्यवाद.
लवकरच लिहीन.
माधव: काही मिसइन्टरप्रिटेशन्स निदर्शनास आणण्याबद्दल धन्यवाद.
खरेतर समजून घेताना माझी गल्लत झाली.
आपले मत प्रस्तुत लेखात समाविष्ट करीत आहे.
खरेतर आपल्यासारख्या जाणकारांमुळे लिहिण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
तुम्ही कबीरावर पण एक मालिका करा. वाचायला खूप आवडेल.
माझाही विचार आहे. कबीर आणि काही उर्दू-पर्शियन कवी ह्यांचे विचार कसे अदलून-बदलून आलेत, ह्यावर जाफरींचे कबीर वानी ह्या त्यांच्या पुस्तकात सुंदर भाष्य आहे. नक्की लिहीन.
धन्यवाद.
चांगलं लिहिलंय - वाचतोय
चांगलं लिहिलंय - वाचतोय ...
माधव - खूप छान अर्थ विशद केलाय ...
अप्रतिम!! वर लिहिलेले अर्थ
अप्रतिम!!
वर लिहिलेले अर्थ कळले असले तरी अर्थांचे अर्थ समजण्याइतकी मानसिक कुवत अजून नाहीये माझी, पण खूप सुरेख लिहिलं आहे तुम्ही...
आधीचे दोन भागही वाचेन आता...
अतिशय सार्थ निरूपणासह भाग -३
अतिशय सार्थ निरूपणासह भाग -३ वाचकांपुढे आलेला आहे ह्यात शंका नाही. पहिल्या दोन भागांच्या तुलनेत लांबीही आटोपशीर केलेली असल्याने वाचकाला मनात घोळवत ठेवण्यास मदत होईल. 'इम्पॅक्ट' अपेक्षित असा होऊन तुकारामाच्या कवितेच्या प्रसाराच्या दिशेने एक पाऊल पुढे दर्शविणारा हा लेख खूप आवडला.
अभिनंदन आणि धन्यवाद! पुढील भागात आणखी काहीतरी नवीन मिळेल ह्या अपेक्षेत!
सर्वांशी सहमत !! प्रचंड
सर्वांशी सहमत !!
प्रचंड आवडला
आधीच्या २ भगांपेक्षा नेमका झालाय
पुढील भाग याहीपेक्षा उत्तम होवून तुकाराम अधिक स्पष्ट होवून तुम्हाहाती लागावा अशी विठ्ठल चरणी प्रार्थना
आहे नाही चा अभंग वाचून एक वेगळाच आल्हाददायक धक्का बसला मझा असा एक शेर होता
असेच काहीसे आहे पण नक्की माहित नाही
आहे आणिक नाही मधले काही विठ्ठल आहे
आतातर तुकाराम वाचायची इच्छा अजूनच बळावली आहे माझी. ... परवा तर एक शेरच केलाय मी ...
वाचायचा अहे मला तुकया तुझा विठ्ठल अता
मी पाहिला नाही तसा ओवीत ..आहे ना तुझ्या ?
या लेखमालिकेसाठी आपला ऋणी
~वैवकु
छान लिहिताय. आधीचे भाग बहुधा
छान लिहिताय. आधीचे भाग बहुधा वाचले नव्हते - आता वाचते.
प्रत्येक भागाच्या शेवटी मागच्यापुढच्या भागाची लिंक दिली तर बरं होईल.
>> सहज व्यापला आहे नाही
हे वाचताना नाझ खिलावींच्या 'हो भी नहीं और हरजाँ हो - तुम इक गोरख धंधा हो' या कव्वालीची आठवण झाली.
सर्व प्रतिसाद आणि प्रोत्साहन
सर्व प्रतिसाद आणि प्रोत्साहन देणा-यांचे मनापासून आभार.
स्वातीजी: पहिल्या दोन भागांच्या लिंक लेखाच्या शेवटी दिल्यात.
समीर
आधीचे दोनही वाचेन
आधीचे दोनही वाचेन ...
तुकारामांसोबतच गालिब ,कबीर यांच्या रचनांची एकाच लेखात सुंदर तशीच विचारपूर्ण गुंफण झाली आहे..
शुभेच्छा!