Submitted by प्राप्ती on 2 April, 2013 - 13:07
शु बॉक्स पासून बनवलेला खेळण्यांचा डब्बा..... अगदी शुन्य खर्चात घरातला पसारा डब्ब्यात घाला ....
मॅग्झीन चे पेपर्स अगदी पोरांना फाडायला लावा...दोन चमचे फेविकॉल वाटीभर पाण्यात कालवून या पाण्याने हे तुकडे बुटांच्या खोक्यावर एकावर एक चिकटवायचे .....सगळे कॉर्नर ब्राऊन टेप ने व्यवस्थित ..बोर्डर चांगली दिसेल या पद्धतीने पँक करून घेणे . मॅग्झीनच्याच दोन कागदाला लांब निट घडी करत नेउन हँडल बनवून घ्यायचे.....
आणि तयार डब्ब्याच्या झाकणावर सेलोटेप + फेविकॉल लावून मजबूत चिकटवून घेणे.....
काही तास वाळू दिले कि झाला टॉयबॉक्स तयार ..
त्यानंतर घरातल्या लहानग्यांची सर्व लहान खेळणी यात चक्क ओतायची.......
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कल्पना छान आहे
कल्पना छान आहे
लहान मुलांनाच हा बनवायला
लहान मुलांनाच हा बनवायला लावला तर खेळणी इकडेतिकडे न टाकता ह्याच बॉक्स मध्ये टाकायचा त्यांचा हुरुप नक्की वाढेल. सोप्पा आहे. सो ते बनवत असतांना लक्ष ठेवावे लागणार नाही फारसे. आणि त्यांनाही स्वतःच्या हाताने काहीतरी बनवल्याचा आनंद !!!
छान दिसतोय आणि करायलाही सोपा
छान दिसतोय आणि करायलाही सोपा आहे.
अरे वा....
अरे वा....
छान दिसतोय
छान दिसतोय
तसेच गिफ्ट रॅपिन्ग पेपर लावून
तसेच गिफ्ट रॅपिन्ग पेपर लावून पण करता येइल. बारके मिरर्स, टिकल्या लावता येतील. आणि स्पार्कल पेन ने बॉर्डर करता येइल. सुट्टीचे मस्त उद्योग. थीम पण देता येइल. जसे बार्बीचे/ हाना मोंटानाचे चित्रे चिकटवायची, बेन टॅण आणि जी आय जो ची असे.
छान आयड्या!.........मुलं
छान आयड्या!.........मुलं खुषीने या खेळणी टाकतील.
छान आयड्या!.........मुलं
छान आयड्या!.........मुलं खुषीने या खेळणी टाकतील.
मस्त !
मस्त !
वा.... मस्तच...
वा.... मस्तच...
अरे वा मस्त दिसतोये
अरे वा मस्त दिसतोये बॉक्स.
(विचार करणारी बाहुली) - असे किती बॉक्स लागतील माझ्याकडे
मस्त!
मस्त!
मस्तच !!
मस्तच !!
मस्त!
मस्त!
मस्त
मस्त कल्पन!अमा+१००००.................
धन्यवाद सर्वांचे....हा बराच
धन्यवाद सर्वांचे....हा बराच मोठा बॉक्स आहे....आणि लहान भरपूर खेळणी येतात यात....त्यातल्या त्यात मासिकांचे पेपर एकावर एक लावल्याने मजबूत होतो....परत चीतर पितर दिसतो त्यामुळे मुलांना आवडतो...सुट्ट्यांमध्ये हा त्यांच्या कडूनच करवून घेणे आणि खेळणी त्यात ठेवायची सवय लावणे हाच मुख्य उद्देश होता माझा हे बनवण्य मागे....माझा मुलगा तरी त्या दिवसापासून सगळी खेळणी खेळून झाली कि त्यात टाकतो आणि डब्बा सुद्धा निट ठेवतो....
