सहजीवनाचा अर्थ सांगणारा 'अनुमती'

Submitted by माध्यम_प्रायोजक on 2 April, 2013 - 13:25

सहजीवन म्हणजे नेमकं काय, हे सांगणारा नवा चित्रपट - 'अनुमती'.

तरुण, प्रयोगशील दिग्दर्शक व लेखक श्री. गजेंद्र अहिरे यांचा हा चित्रपट ३ मे, २०१३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.

या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे दीर्घ कालावधीनंतर प्रख्यात छायालेखक श्री. गोविंद निहलाणी यांनी मराठी चित्रपटासाठी छायालेखन केलं आहे. यापूर्वी 'शांतता! कोर्ट चालू आहे' आणि डॉ. श्रीराम लागू यांच्या 'झाकोळ' या दोन चित्रपटांचं छायालेखन त्यांनी केलं होतं. 'अनुमती' हा श्री. निहलाणी यांचा तिसरा मराठी चित्रपट.

अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये 'अनुमती'नं प्रेक्षकांची व समीक्षकांची वाहवा मिळवली आहे.

पुण्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'अनुमती'ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक व प्रेक्षकांच्या पसंतीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट असे पुरस्कार मिळाले.

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'अनुमती'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.

रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही 'अनुमती'चं विशेष कौतुक झालं.

'अनुमती'साठी विशेष आनंदाची बाब म्हणजे ज्येष्ठ अभिनेते श्री. विक्रम गोखले यांना यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटासाठी जाहीर झाला आहे.

विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, रिमा, किशोर कदम, आनंद अभ्यंकर, सुबोध भावे, सई ताम्हणकर या बिनीच्या कलावंतांचा अस्सल अभिनय, जोडीला गोविंद निहलाणींच्या नेत्रसुखद चौकटी आणि गजेंद्र अहिरे यांचं संयत दिग्दर्शन व कर्णमधुर संगीत यांचा अप्रतिम मेळ 'अनुमती'च्या निमित्तानं जमून आला आहे.

'अनुमती' ३ मे, २०१३ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होतो आहे.

मायबोली.कॉम या चित्रपटाचे माध्यम प्रायोजक आहेत.

POSTER_online.jpg

अनुमती

निर्माते - विनय गानू, नवलखा आर्ट्स आणि होली बेझिल प्रॉडक्शन्स
दिग्दर्शन, लेखन, संगीत - गजेंद्र अहिरे
छायालेखन - गोविंद निहलाणी
संकलन - संतोष गोठोस्कर

कलाकार - विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, रिमा, किशोर कदम, सुबोध भावे, सई ताम्हणकर, नेहा पेंडसे आणि कै. आनंद अभ्यंकर

माध्यम प्रायोजक - मायबोली.कॉम

***
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन! शुभेच्छा.
पुरस्कारांसोबत या सिनेमाला आर्थिक यशही मिळो.

स्वाती, बरोबर. कै. हवं
स्वर्गीय आनंदाकरता वगैरे वापरतात. तसंच निहलाणी की निहलानी?

गजेंद्र अहिरे संगीत दिग्दर्शनही करतात हे नव्हतं माहित!

नेहमीचा प्रश्न- इथे अमेरिकेत कधी बघायला मिळणार?

मराठी सिनेमांची पायरेटेड कॉपी सुद्धा लवकर मिळत नाही. आणि सगळ्यांनी चावून चोथा केला की बघण्याचा उत्साह पण रहात नाही. Sad

.

अहिरेंचा सुंबरान बघायला आवडला होता. हा पण जमेल तेव्हा बघणार.

>> नेहमीचा प्रश्न- इथे अमेरिकेत कधी बघायला मिळणार?

याला अनुमोदन.

अभिनंदन! शुभेच्छा.
पुरस्कारांसोबत या सिनेमाला आर्थिक यशही मिळो.
>>> रुनी + १. Happy

गजेंद्र अहिरेंचे चित्रपट बघण्यासारखे असतात. काहीतरी वेगळा अनुभव मिळतो.
अनेक शुभेच्छा!

छायालेखन म्हणजे सिनेमॅटोग्राफी का? Uhoh

सहज म्हणुन सुचना: माध्यम प्रायोजक हा शब्दही 'बोल्ड' केला तर चालेल. Happy

कलाकार दिग्गज आहेत. विक्रम गोखले आणि नीना कुलकर्णी शिवाय गजेंद्र अहिरेंचा सिनेमा म्हणजे... बोलायलाच नको. Happy

अभिनंदन! शुभेच्छा.
पुरस्कारांसोबत या सिनेमाला आर्थिक यशही मिळो.