विपुतल्या रेसिप्या ४ - देवाशप्पथ खरोखरीच कमी कटकटीची चिकनकरी

Submitted by शूम्पी on 31 March, 2013 - 12:47
chicken curry
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिकन
कांदे
टोमॅटो पेस्ट
आलं
लसूण
ओलं खोबरं
पुदीना ( ऑपश्नल)
हळद
तिखट(काश्मिरी)
मीठ
एव्हरेस्ट किचन किंग मसाला
बटर चिकन मसाला

क्रमवार पाककृती: 

ही चिकनकरी टोटली बिनडोक प्रकरण आहे. याला वाटणं घाटणं काही नाहीत.
चिकन थाय तुकडे, उभा पातळ चिरलेला कांदा, टोमॅटोपेस्ट, बारिक चिरलेली कोथिंबीर आणि फ्रिजात असेल तर आयतं खवलेलं खोबरं. मी मायबोलीत वाचून वाटलेल्या पुदिन्याच्या आइसट्रेमधे घालून क्यूब्ज करून ठेवते, म्हणून त्याही ढकलल्या. मसाला: हळद, तिखट, मीठ, एव्हरेस्टचा कीचनकिंग मसाला आणि जरासा बटरचिकन मसाला.

-तेलात कांदा ब्राऊन करून घेऊन त्यात चिकनचे तुकडे घालायचे.
-सगले तुकडे वरून पांढरे-हलके ब्राऊन झाले की किसलेलं आलं-लसूण घालून परतायचं.
-यानंतर टोमॅटो पेस्ट घालून, सगळ्याचा उग्र वास जाईपर्यंत परतून घ्यायचं.
-मसाले घालून जरासं ढवळून मंद आचेवर शिजू द्यायचं. किंचित पाणी सुटतं.
-यात आता भरपूर कोथिंबीर, (घातलाच तर जरासा पुदिना) घालून, उकळीचं थोदं पाणी आणि खोबरं घालून शिजवायचं.

वाढणी/प्रमाण: 
जिन्नस ज्या प्रमाणात तसं
अधिक टिपा: 

लाल रंग काश्मिरी तिखटामुळे. नॉनदेशी खाणार होते म्हणून नेहमीचं तिखट न घालता का. ति. आणि मसाल्यात जे काय असेल ते.

यात कांदे-टोमॅटो बारिक चिरणं वगैरे भानगडी नसल्यामुळे, तसंच मसाले वाटायची गरज नाही, त्यामुळे आता पिठल्याइतकं पटकन चिकन होतं. अगदीच थोडकं असेल तर भांड्यात नाहीतर प्रेशरकुकरात २० मिनिटात.

स्लो कुकरातच केलंय. पण मसाले आणि चिकन परतणं वेगळ्या भांड्यात. परतून, किंचित पाणी सुटायला लागलं की कुकरात ट्रान्सफर करून, थोडं आणखी पाणी. कमी वाटलं तर वरून घालता येतं.

ओला नारळ घाल. सुक्या खोबर्‍याचा वास विचित्र येतो.

मृने लिहिलेल्या कृतीने मी चिकन केलं ते हिट्ट झालं. मी प्रेशर पॅनमध्ये केलं. खरोखरच अर्ध्या तासात झालं.

माहितीचा स्रोत: 
विपूरेस्प्या प्रसिद्ध मृण्मयी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा!

खरंतर मृ च्या खरोखरच्या काय किंवा बोलाच्या "कमी कटकटीच्या" ह्या विशेषणावर माझा विश्वास नाही ; पण ही दिसतेय खरी कमी कटकटीची .. Happy

शूम्पे, इथे पाककृती दिल्याबद्दल धन्यवाद.

सशल, कमी कटकटीची, सो'प्पी' असं लिहिल्यावर कधीकधी करून बघण्याचा उरक येतो. Proud

स्लो कुकरमधे तवंग येत नाही. प्रेशरपॅनात प्रेशरमुळे जास्त फॅट बाहेर येतं का? Proud

chicken-curry-maayboli.jpg

मृ, काही कोथींबीर वगैरे घालशील की नाही वरून? किंवा अगदीच गेला बाजार दोन काड्या खुडून नुसत्या वर ठेवायच्या, म्हणजे ती चिरण्याचाही त्रास वाचला .. Happy Wink

फोटो मस्तच आहे .. Happy

धन्यवाद!

Lol मधेमधे ते कळकट हिरव्या रंगातलं, मरियल, जे काय तरंगतय ती कोथिंबीरच आहे. वरून आणखी पुन्हा सजावटीला कशाला?

तेलात कांदा ब्राऊन करून घेऊन त्यात चिकनचे तुकडे घालायचे.
-सगले तुकडे वरून पांढरे-हलके ब्राऊन झाले की किसलेलं आलं-लसूण घालून परतायचं.>> या स्टेप न.न्तर चिकन्चे पिसेस भा.न्ड्यात ठेवायचे की काढुन घेवुन मग मसाले परतल्यावर परत टाकायचे का?

या स्टेप न.न्तर चिकन्चे पिसेस भा.न्ड्यात ठेवायचे की काढुन घेवुन मग मसाले परतल्यावर परत टाकायचे का?>> प्राजक्ता, रेसिपी खरोखरच कमी कटकटीची हा मंत्र लक्षात ठेवायचा आणि तेच भांड वापरायचं. म्हणजे मी तेच वापरलं. एक्स्पर्ट त्यांची मतं नोंदवतीलच Happy

रेसीपी वाचून वाटले एक शब्द लिहायला पाहिजे होता नावापुढे,
"देवाशप्पथ! खरोखरीच कमी कटकटीची चिकन करी" Wink
मला एकदम मानेला चिमटा घेवून शप्पथ घेवून रेसीपी सांगतेय असे वाटले. Proud
देवाचे नाव घेतलय म्हणून तरी करतील लोकं. इतकी कन्विनसिंग नाव असलेली रेसीपी पाहिली न्हवती. Wink
ज्यास्त वा कमी कटकट खूपच रेलेटीव शब्द नाही का?.. Happy

भारीये हे. मी नेहमी साधारण अशीच करते, पण टोमॅटो आधी घालते, आणि कुकर मध्ये डायरेक्ट शिजवते.
चिकन आधी घातल्यामुळे चवीत फरक पडतो का? कटकट कमी होते का? नेक्स्ट टायमाला आधी टाकीन.
@ झंपी: तुमच्यात मानेला चिमटा घेऊन शप्पथ घेतात? आमच्यात गळ्याला. Proud

शूम्पी,
ह्या लेखनाला दिलेला टॅग "विपुतल्या रेसिप्या" असा ठेव. म्हणजे बाकीच्या रेसिपी बरोबरच्या लिस्ट मध्ये दिसेल. Happy

बायानो! यातला बटर चिकन मसाला कुठ्ला? त्याचं नाव काय? तो कुठे मिळवायचा? अशा सर्व शंकांचं प्लीजच निवारण करा..... Happy रेस्पी कमी कटकटीची वीकनाईट रेस्पी वाट्टेय.

मला एकदम मानेला चिमटा घेवून शप्पथ घेवून >>> तुम्हाला मानेला म्हणायचं आहे का ?
शुम्पी , आता ते ' देवाशपथ खरं सांगेन , खोटं सांगणार नाही' असं कर . Proud

_मधुरा_, कमी कटकटीची म्हणजे मी त्याचा अर्थ कॅन मधली टो पेस्ट असा घेउन कॅनमधली टो पेस्ट वापरली! क्रम बदलल्याने काय फरक पडतो मला खरच माहित नाही.

सानुली, माझ्याकडे बटर चिकन मसाला नव्हता म्हणून मी घरातलाच एक कोणतातरी चिकनचा मसाला वापरला.

श्री, मागण्या वाढत चालल्यात Proud

शुम्पी, मी शाकाहारी आहे त्यामुळे नॉनव्हेज रेसीपी मी सहसा बघत नाही, पण शीर्षक वाचुन एकदातरी डोकवावंसं वाटलं
Happy

सिंडे, मंजूडे, आशुतोष, धन्यवाद.

सानुली, MDHचा बटरचिकनमसाला सहज मिळतो. तो वापरते.