चिकन
कांदे
टोमॅटो पेस्ट
आलं
लसूण
ओलं खोबरं
पुदीना ( ऑपश्नल)
हळद
तिखट(काश्मिरी)
मीठ
एव्हरेस्ट किचन किंग मसाला
बटर चिकन मसाला
ही चिकनकरी टोटली बिनडोक प्रकरण आहे. याला वाटणं घाटणं काही नाहीत.
चिकन थाय तुकडे, उभा पातळ चिरलेला कांदा, टोमॅटोपेस्ट, बारिक चिरलेली कोथिंबीर आणि फ्रिजात असेल तर आयतं खवलेलं खोबरं. मी मायबोलीत वाचून वाटलेल्या पुदिन्याच्या आइसट्रेमधे घालून क्यूब्ज करून ठेवते, म्हणून त्याही ढकलल्या. मसाला: हळद, तिखट, मीठ, एव्हरेस्टचा कीचनकिंग मसाला आणि जरासा बटरचिकन मसाला.
-तेलात कांदा ब्राऊन करून घेऊन त्यात चिकनचे तुकडे घालायचे.
-सगले तुकडे वरून पांढरे-हलके ब्राऊन झाले की किसलेलं आलं-लसूण घालून परतायचं.
-यानंतर टोमॅटो पेस्ट घालून, सगळ्याचा उग्र वास जाईपर्यंत परतून घ्यायचं.
-मसाले घालून जरासं ढवळून मंद आचेवर शिजू द्यायचं. किंचित पाणी सुटतं.
-यात आता भरपूर कोथिंबीर, (घातलाच तर जरासा पुदिना) घालून, उकळीचं थोदं पाणी आणि खोबरं घालून शिजवायचं.
लाल रंग काश्मिरी तिखटामुळे. नॉनदेशी खाणार होते म्हणून नेहमीचं तिखट न घालता का. ति. आणि मसाल्यात जे काय असेल ते.
यात कांदे-टोमॅटो बारिक चिरणं वगैरे भानगडी नसल्यामुळे, तसंच मसाले वाटायची गरज नाही, त्यामुळे आता पिठल्याइतकं पटकन चिकन होतं. अगदीच थोडकं असेल तर भांड्यात नाहीतर प्रेशरकुकरात २० मिनिटात.
स्लो कुकरातच केलंय. पण मसाले आणि चिकन परतणं वेगळ्या भांड्यात. परतून, किंचित पाणी सुटायला लागलं की कुकरात ट्रान्सफर करून, थोडं आणखी पाणी. कमी वाटलं तर वरून घालता येतं.
ओला नारळ घाल. सुक्या खोबर्याचा वास विचित्र येतो.
मृने लिहिलेल्या कृतीने मी चिकन केलं ते हिट्ट झालं. मी प्रेशर पॅनमध्ये केलं. खरोखरच अर्ध्या तासात झालं.
हा घ्या फोटो. तेलाचा तवंग
हा घ्या फोटो. तेलाचा तवंग प्रेशर पॅन मध्ये केल्याने आला आहे असं एक्स्पर्टांचं मत आहे.
अरे वा! खरंतर मृ च्या
अरे वा!
खरंतर मृ च्या खरोखरच्या काय किंवा बोलाच्या "कमी कटकटीच्या" ह्या विशेषणावर माझा विश्वास नाही ; पण ही दिसतेय खरी कमी कटकटीची ..
छान आहे. आता फ चौ चि रेसिपी
छान आहे. आता फ चौ चि रेसिपी येऊ दे.:) ती बहुदा मॅक्सच्या वि पू त होती.
शूम्पे, इथे पाककृती
शूम्पे, इथे पाककृती दिल्याबद्दल धन्यवाद.
सशल, कमी कटकटीची, सो'प्पी' असं लिहिल्यावर कधीकधी करून बघण्याचा उरक येतो.
स्लो कुकरमधे तवंग येत नाही. प्रेशरपॅनात प्रेशरमुळे जास्त फॅट बाहेर येतं का?
मृ, काही कोथींबीर वगैरे
मृ, काही कोथींबीर वगैरे घालशील की नाही वरून? किंवा अगदीच गेला बाजार दोन काड्या खुडून नुसत्या वर ठेवायच्या, म्हणजे ती चिरण्याचाही त्रास वाचला ..
फोटो मस्तच आहे ..
धन्यवाद! मधेमधे ते कळकट
धन्यवाद!
मधेमधे ते कळकट हिरव्या रंगातलं, मरियल, जे काय तरंगतय ती कोथिंबीरच आहे. वरून आणखी पुन्हा सजावटीला कशाला?
तेलात कांदा ब्राऊन करून घेऊन
तेलात कांदा ब्राऊन करून घेऊन त्यात चिकनचे तुकडे घालायचे.
-सगले तुकडे वरून पांढरे-हलके ब्राऊन झाले की किसलेलं आलं-लसूण घालून परतायचं.>> या स्टेप न.न्तर चिकन्चे पिसेस भा.न्ड्यात ठेवायचे की काढुन घेवुन मग मसाले परतल्यावर परत टाकायचे का?
कातिल फोटो आहेत दोन्ही. योग्य
कातिल फोटो आहेत दोन्ही. योग्य सुत्रांना कृती देण्यात आली आहे.
या स्टेप न.न्तर चिकन्चे पिसेस
या स्टेप न.न्तर चिकन्चे पिसेस भा.न्ड्यात ठेवायचे की काढुन घेवुन मग मसाले परतल्यावर परत टाकायचे का?>> प्राजक्ता, रेसिपी खरोखरच कमी कटकटीची हा मंत्र लक्षात ठेवायचा आणि तेच भांड वापरायचं. म्हणजे मी तेच वापरलं. एक्स्पर्ट त्यांची मतं नोंदवतीलच
दोन्ही फोटो छान! शूम्पे, हे
दोन्ही फोटो छान!
शूम्पे, हे काम तूच केलंस ते बरं झालं. कारण हा माझा प्रांत नाही
रेसीपी वाचून वाटले एक शब्द
रेसीपी वाचून वाटले एक शब्द लिहायला पाहिजे होता नावापुढे,
"देवाशप्पथ! खरोखरीच कमी कटकटीची चिकन करी"
मला एकदम मानेला चिमटा घेवून शप्पथ घेवून रेसीपी सांगतेय असे वाटले.
देवाचे नाव घेतलय म्हणून तरी करतील लोकं. इतकी कन्विनसिंग नाव असलेली रेसीपी पाहिली न्हवती.
ज्यास्त वा कमी कटकट खूपच रेलेटीव शब्द नाही का?..
आज -उद्याकडे नक्की करुन बघणार
आज -उद्याकडे नक्की करुन बघणार
भारीये हे. मी नेहमी साधारण
भारीये हे. मी नेहमी साधारण अशीच करते, पण टोमॅटो आधी घालते, आणि कुकर मध्ये डायरेक्ट शिजवते.
चिकन आधी घातल्यामुळे चवीत फरक पडतो का? कटकट कमी होते का? नेक्स्ट टायमाला आधी टाकीन.
@ झंपी: तुमच्यात मानेला चिमटा घेऊन शप्पथ घेतात? आमच्यात गळ्याला.
शूम्पी, ह्या लेखनाला दिलेला
शूम्पी,
ह्या लेखनाला दिलेला टॅग "विपुतल्या रेसिप्या" असा ठेव. म्हणजे बाकीच्या रेसिपी बरोबरच्या लिस्ट मध्ये दिसेल.
बायानो! यातला बटर चिकन मसाला
बायानो! यातला बटर चिकन मसाला कुठ्ला? त्याचं नाव काय? तो कुठे मिळवायचा? अशा सर्व शंकांचं प्लीजच निवारण करा..... रेस्पी कमी कटकटीची वीकनाईट रेस्पी वाट्टेय.
मला एकदम मानेला चिमटा घेवून
मला एकदम मानेला चिमटा घेवून शप्पथ घेवून >>> तुम्हाला मानेला म्हणायचं आहे का ?
शुम्पी , आता ते ' देवाशपथ खरं सांगेन , खोटं सांगणार नाही' असं कर .
_मधुरा_, कमी कटकटीची म्हणजे
_मधुरा_, कमी कटकटीची म्हणजे मी त्याचा अर्थ कॅन मधली टो पेस्ट असा घेउन कॅनमधली टो पेस्ट वापरली! क्रम बदलल्याने काय फरक पडतो मला खरच माहित नाही.
सानुली, माझ्याकडे बटर चिकन मसाला नव्हता म्हणून मी घरातलाच एक कोणतातरी चिकनचा मसाला वापरला.
श्री, मागण्या वाढत चालल्यात
मॄण,फोटु एकदम कडक आलाय
मॄण,फोटु एकदम कडक आलाय चिकनकरीचा
शुम्पी, मी शाकाहारी आहे
शुम्पी, मी शाकाहारी आहे त्यामुळे नॉनव्हेज रेसीपी मी सहसा बघत नाही, पण शीर्षक वाचुन एकदातरी डोकवावंसं वाटलं
सिंडे, मंजूडे, आशुतोष,
सिंडे, मंजूडे, आशुतोष, धन्यवाद.
सानुली, MDHचा बटरचिकनमसाला सहज मिळतो. तो वापरते.
धन्यवाद मृण, शूम्पी!
धन्यवाद मृण, शूम्पी!
फोटो कस्सले जबरी आहेत!!
फोटो कस्सले जबरी आहेत!!
स्लर्प करके देखा जायेगा
स्लर्प करके देखा जायेगा
करी दिसते मस्त आहे.
करी दिसते मस्त आहे.
करी मस्त टे. लाल दिसत आहे बरं
करी मस्त टे. लाल दिसत आहे बरं का शूम्पी.
मस्त दिसताहेत फोटो.
मस्त दिसताहेत फोटो.