![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2020/12/29/Baal-batate%20bhaaji.jpg)
बाळ बटाटे - पाव किलो
कांदे - २ मोठे
तमालपत्र - १
वाटलेली हिरवी मिरची - साधारण चमचाभर (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त)
किसलेलं आलं - साधारण चमचाभर (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त)
जिर्याची पूड - १ चमचा
चिंचेचा कोळ - एक चमचा
हळद, तेल, मीठ, साखर(मी घालते)
साजूक तूप - दोन चमचे
लाल तिखट - अर्धा चमचा (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त)
या आयडीला कोणाकोणाच्या विपुतच रेसिप्या लिहिण्याची खोड आहे, निषेध करूनही काऽही उपयोग नाही. या आयडीची विचारपूस करताना त्या रेसिप्यांवरचे प्रश्न आमच्या नजरेस पडतात मग कितीही नाही म्हटलं तरी मूळ रेसिपी आणि उत्तरे शोधण्यासाठी विपौड्या मारण्याचा मोह आवरत नाही. विपौड्या मारण्याची खोड आम्हांला याच आयडीमुळे लागली असे मानायला हरकत नाही.
आता ह्या रेसिपीची प्रमाणं काही त्या विपूमधे लिहिलेली नव्हती, सगळं आम्ही आमच्या अंदाजानेच घेतलं, पण भाजी मात्र त्या आयडीने लिहिल्याप्रमाणे अफाट चवीची झाली. मग त्या आयडीचे आणि रेसिपीच्या मूळ स्रोताचे आम्ही जाहिर आभार मानले, तर बाकी लोकं आम्हाला योग्य विपूचा पत्ता विचारू राहिली. आता ती विपुतली रेसिपी तशी मागे पडली आहे. विपुची पानं उलटता उलटता लोकांचा भाजी करण्याचा उत्साह सरायचा, त्यापेक्षा म्हटलं की ही भाजी लिहूनच टाकूया. ही भाजी लिहिण्यासाठी परवानगी मागण्याचे पुण्यकर्म एका प्रिय मैतरणीने केले आहे, तिचे आभार! तसेच ही भाजी विपूत ठेवणारीचे आभार! तसेच ही भाजी (कुठेतरी का होईना) लिहिण्याचे काम करणारीचे अनंत आभार!
तिच्याच शब्दांत आता पुढे भाजीची रेसिपी:
बारके बटाटे उकडून. (त्यांची सालं काढावी लागत नाहीत.)
किसलेला कांदा, तेजपान, किसलेलं आलं, वाटलेली हिरवीमिरची, हळद तेलात घालून परतायचं. यात उकडलेले बटाटे घालायचे. अगदी जरासा चिंचेचा कोळ आणि मीठ घालायचं. व्यवस्थीत परतून भाजलेल्या जिर्याची पूड वरून घालायची. जितका पातळ रस्सा हवा तितकं पाणी घालायचं. उकळू द्यायचं. आता सगळ्यात मस्त भागः चमचाभर (किंवा भाजीच्या क्वांटिटीनुसार) साजुक तूप कडकडीत गरम करून त्यात तिखट घालायचं आणि पोळलेलं हे तिखट्+तूप लागलीच उकळत्या भाजीत ओतायचं. अफाट चविची भाजी होते!
आभार: अलकामावशी
रबडी-पुरीबरोबर ही अशी भाजी झकास लागते.
![alakamavashi bhaji 3 edited.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u85/alakamavashi%20bhaji%203%20edited.jpg)
मला वाटतं मी केली आहे ही
मंजूडी भारी लिहिलीये रेसिपी
मंजूडी भारी लिहिलीये रेसिपी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मी पण अ ने क वेळा ही भाजी केलीये. अप्रतिम लागते.
भाजी कातिल दिसते आहे. लवकरच
भाजी कातिल दिसते आहे. लवकरच करणेत येईल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कुणाकुणाच्या विपू म्हणजे ह्या आयडीने लिहीलेल्या पाककृतींची बखर झाल्या आहेत. कृती खणून इथे टाकल्याबद्दल तुमचे पण खास आभार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी ही केली आहे ही भाजी ...
मी ही केली आहे ही भाजी ... अफाट होते.
प्रस्तावना आत्ता नीट वाचली![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मंजूडी, मी अगदी सिरियसली विचार करत होते 'विपुतल्या रेस्प्या' नावाचा बाफ काढायचा. प्रस्तावनेत प्रत्येक पानावरच्या रेसिप्या अपडेट करत जायचे. काढू का ?
अगो. मला बाळबटाटे हे संबोधन
अगो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला बाळबटाटे हे संबोधन आवडलं आम्ही त्याला बोरीचे बटाटे असं तिरपागडं नाव दिलं होतं त्यापेक्षा हे नाव गोड आहे.
भाजी बनाके देखेंगे.
'विपूतल्या पाककृती' असा टॅग
'विपूतल्या पाककृती' असा टॅग लावत जा म्हणजे आपोआप एका लिंकवर सगळ्या कृती दिसतील![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भाजी अफाट दिसतीय. लवकरच
भाजी अफाट दिसतीय. लवकरच करण्यात येइल.
मला पण बाळबटाटे हे नाव आवडलं. काही दिवसांपूर्वी, याच आयडीनी "अॅडल्टकैरी" असंही एक नामकरण केलेलं वाचण्यात आलं होतं. त्या आयडीचं कल्पक नामकरणांबद्दल कौतुक. आणि अर्थातच रेसीपीबद्दल सुद्धा.
कृती खणून इथे टाकल्याबद्दल, मंजूडी तुमचे पण खास आभार.
मंजू, धन्यवाद हो. आणि
मंजू, धन्यवाद हो. आणि मृण्मयीचेही या पाककृतीबद्दल आभार.
नक्की करून बघणार.
नक्की करून बघणार.
मस्त दिसतेय भाजी करुन
मस्त दिसतेय भाजी
करुन पाहीन
अवांतर = पहिल्यांदा शीर्षक बाळमभटजीची भाजी असे वाचले
मंजूडे, धमाल चालवली आहेस
मंजूडे, धमाल चालवली आहेस
भाजी मस्त दिसतेय. करण्याच्या अटोक्यात आहे कधीही कारण हे सगळं सामान केव्हाही घरी असतंच.
बेडुकौड्या, सश्याच्या उड्या सारखं विपौड्या वाटतंय![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
धन्यवाद मनजुडे! फोटो फार मावॉ
धन्यवाद मनजुडे!
फोटो फार मावॉ आहे.
निषेधाचा परिणाम व्हावा म्हणून कुठलं व्रत घ्यावं?
मंजूडे, व्हाइल यू आर अॅट इट,
मंजूडे, व्हाइल यू आर अॅट इट, माझ्या विपूत त्या आयडीने मस्ता चिकनची पा़रु दिली आहे. खरोखरच सोपं आणि कमी कटकटीचं चिकन आहे ते.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ती रेसिपी पण स्वतःचं मानाचं स्थान माबोत पटकावेल असं बघ की. )ही लापी आहे)
.
.
.
.
मी स्वतःच ते सत्कृत्य पार पाडलं
बेडुकौड्या, सश्याच्या उड्या
बेडुकौड्या, सश्याच्या उड्या सारखं विपौड्या वाटतंय >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
छान पाकृ. माझी आई ह्याच्यात
छान पाकृ.
माझी आई ह्याच्यात अजून थोडे बदल करुन भाजी बनवते (काय बदल ते आईला विचारावे लागेल, कारण साहित्य थोड ज्यास्ती असत एवढच माहीती आहे :अओ:) आमच्या इथे ह्या भाजीला बटाट्याच सोंग अस म्हणतात.
विपौड्या ... रेस्पी मस्त.
विपौड्या ...
रेस्पी मस्त. देखेंगे भै देखेंगे, भाजी करके देखेंगे!
शीर्षकामुळे बाळबटाट्यांनाच अलकामावशी असंही म्हणतात की काय असं वाटतंय.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्त दिसतेय रेसिपी.. ट्राय
मस्त दिसतेय रेसिपी.. ट्राय करेन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
LOL! मंजूडी, सही आहेस तू
LOL!
मंजूडी, सही आहेस तू ..
(आता ह्या रेसिपी बरोबरच मंजूडीच्या चौकस वृत्तीचं आणि लेखनकौशल्याचंही कौतूक होईल कायम तीच ह्या आयडीची शिक्षा ..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्त आहे रेसिपी .. करून बघायला हवी ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मन्जुडी फोटो आणि कृती मस्त
मन्जुडी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आजच सन्ध्याकाळी करणार.
फोटो आणि कृती मस्त
मन्जुडी फोटो आणि कृती मस्त
मन्जुडी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आजच सन्ध्याकाळी करणार.
फोटो आणि कृती मस्त
मस्त पाकॄ. मी पण एकदा केलिये
मस्त पाकॄ. मी पण एकदा केलिये विपौड्या मारुन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त दिसतेय भाजी करुन
मस्त दिसतेय भाजी
करुन पाहीन........
ही रेसिपी शोधूनही सापडली
ही रेसिपी शोधूनही सापडली नसती. मृणकडे (उपयोग होत नाही, तरीही) तु क.
वरून साजूक तूपाची फोडणी- हा प्रकार चित्ताकर्षक आहे. लवकरच रिपोर्ट देण्यात येईल. धन्यवाद.
अवांतर = पहिल्यांदा शीर्षक
अवांतर = पहिल्यांदा शीर्षक बाळमभटजीची भाजी असे वाचले>>>
मला हे वाचुन फर्फार च हसु येतंय.
मस्तच दिसतेय भाजी. नक्की करुन
मस्तच दिसतेय भाजी. नक्की करुन बघेन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आतापर्यंत अशा बाळबटाट्याची दम आलुशिवाय दुसरी भाजी माहित नव्हती.
आर्या, मग तू ही 'कढाई आलू
आर्या, मग तू ही 'कढाई आलू खास' पण बघ..
सोप्पी न छान पाकृ!
सोप्पी न छान पाकृ!
बाळ बटाटे हे नामकरण फार्फार
बाळ बटाटे हे नामकरण फार्फार आवडले!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भाजीचा फोटू सह्ही दिसतोय!
ही नक्की मस्त लागेल. करून
ही नक्की मस्त लागेल. करून बघणेत येईल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चांगली म्हणजे चांगलीच लागणार,
चांगली म्हणजे चांगलीच लागणार, कोई शक नही. करून फोटो देतोच. तूप + तिखट आयडीआ भारी आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लेखनसुद्धा आवडले
Pages