१. जाडे पोहे
२. नारळाचं दूध
३. चिंचेचा कोळ किंवा आगळ
४. गू़ळ
५. लाल तिखट
६. मीठ
७. फोडणीसाठी तूप आणि जिरं
८. कोथिंबीर
१. जाडे पोहे धुवून निथळून ठेवायचे.
२. नारळाच्या दुधात चवीनुसार चिंच किंवा आगळ, गूळ, लाल तिखट आणि मीठ घालून त्याला तूप/जिर्याची फोडणी द्यायची. आवश्यकता वाटल्यास एक चटका देऊन (थोडं गरम करून) गूळ विरघळवून घ्यायचा. उकळी आणायची आवश्यकता नाही. कोळ गारच चांगला लागतो.
३. उपलब्ध असल्यास मिरगुंडं किंवा पोह्याचे पापड तळायचे.
३. बोलमधे पोहे घालून त्यावर ते बुडतील इतका कोळ घालायचा, वरून भरपूर कोथिंबीर घालायची. मिरगुंडं/पापड हवं तर कुस्करून त्यावर घालायचे किंवा जोडीला घ्यायचे.
१. नारळाचं दूध मी कॅनमधलं वापरते म्हणून एकूण वेळ १५ मिनिटं म्हटला आहे. नारळ खवून दूध काढणार असाल तर अर्थातच जास्त वेळ लागेल.
२. इथे अमेरिकेत मी AROY-D ब्रॅन्डचा कॅन आणते. त्यात प्रिझर्व्हेटिव्ह्ज नसतात (असा त्यांचा दावाही आहे आणि तशी चवही असते). भारतात आता माझ्या माहितीनुसार नेस्लेची पावडर मिळते नारळाच्या दुधाची. कोमट पाण्यात मिसळली की झालं.
एकूण झटपट होणारा सोपा आणि चविष्ट प्रकार आहे.
नितीनचंद्र, भारतातही मिळत
नितीनचंद्र, भारतातही मिळत असेल कॅन्ड कोकोनट मिल्क. बाहेर (भारताबाहेर) सर्रास मिळते. खूप वेगवेगळ्या कंपन्या आहेत. पूर्व आशियाई देशांत थायलंडचं असतं बर्याचदा.
आर्च, इथे नारळ मिळाला तरी
आर्च, इथे नारळ मिळाला तरी बहुतेक वेळा खराब निघतो म्हणून मी १ कप खोबर्याची पावडर आणि निम्मा कॅन नारळाचे दूध एकत्र करुन १५-२० मिनिटे ठेवते.
नितीनचंद्र, आता भारतात माझ्या
नितीनचंद्र, आता भारतात माझ्या माहितीनुसार नेस्लेची पावडर मिळते नारळाच्या दुधाची. कोमट पाण्यात मिसळली की झालं.
इथे मी AROY-D ब्रॅन्डचा कॅन आणते. त्यात प्रिझर्व्हेटिव्ह्ज नसतात (असा त्यांचा दावाही आहे आणि तशी चवही असते).
सुमेधा, वांग्याबद्दल (आणि कुटाण्याबद्दलही) प्रथमच ऐकते आहे.
बी, हो, आगळ म्हणजे कोकमांचा (आमसुलं) अर्क.
मेधा२००२, तुमची रेसिपी पाहिलीच नव्हती की मी.
एकदाच खल्ले होते खूप
एकदाच खल्ले होते खूप वर्षांपूर्वी आणि खूप आवडले होते. रेसिपी शोधत होते. धन्यवाद! आता करून बघेन
Pages