Submitted by झक्की on 10 April, 2009 - 12:19
हा बातमी फलक उघडण्याचे कारण असे की, जे मायबोलीकर बृहन्महाराष्ट्राच्या फिलाडेल्फिया येथे जुलै २, ३, ४, ५ - २००९ या दिवशी भरणार्या अधिवेशनाला येणार असतील त्यांनी आपली नावे, आपल्याबरोबर कोण कोण असतील, तसेच कुठल्या गावाहून किंवा राज्यातून येणार आहोत, ते इथे लिहावे.
जमल्यास सगळे जण थोड्या वेळासाठी तरी एकत्र येऊन एकमेकांना भेटू अशी माझी इच्छा आहे.
पहिले नाव माझे. आनंद म्हसकर (झक्की) व सौ. हेमा (ही बहुधा माझ्याबरोबर सार्वजनिक जागी नसते, तेंव्हा मायबोली च्या लोकांना भेटणार नाही)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झक्की, छान
झक्की,
छान केलंत हा बाफ उघडून.
दुसरे नांव माझे. समीर सरवटे (svsameer) आणि सुप्रिया जोशी (Supriyaj) ..आम्ही दोघे कॅलीफोर्नियाहून येऊ. अजून रहाण्याची व्यवस्था करायची आहे.
माझे नाव
माझे नाव मेधा पै. मी पण येणार.
माझी रहाण्याची व्यवस्था झालेली आहे. बेबी सीटिंगची पण व्यवस्था झालेली आहे. अधिवेशनाच्या वेळी पार्किंगसाठी काहीतरी करावं लागेल , पण ते मी जमवीन
सगळ्यांना जर वेळ असेल तर एक एवेएठी माझ्या घरी करायची माझी इच्छा आहे. ( साधारण ४५ मिनिटे लागतात कंव्हेन्शन सेंटर पासुन माझ्या घरी यायला ). कार्यक्रम सुरु व्हायच्या आदल्या दिवशी किंवा शेवटच्या दिवशी वगैरे जमवता येईल.
मी (विनय)
मी (विनय) आणि बायको (योगिनी ) पण येणार आहोत...
आम्ही घरून ये-जा करू असा विचार आहे. माझे एक किंवा दोन किंवा तीन कार्यक्रम आहेत...
माझी एक मैत्रीण जवळच राहते (४० मिनिटे आगगाडीने) ती सोबतीच्या बदल्यात फुकट रहायची सोय करायला तयार आहे....
(तिला जायचं आहे, नवरा व मुलगी जाणार नाहीत म्हणून तिला सोबत असल्यास आवडेल). मोठं घर आहे त्यामुळे एका कुटूंबाची सोय होऊ शकेल....
विनय
मी (रूपाली)
मी (रूपाली) आणि माझा नवरा (नितीन) येणार आहोत. आम्ही कन्व्हेन्शन सेंटर जवळच्याच हॉटेलमध्ये रहाणार आहोत.
मी येणार
मी येणार आहे..
विनयबरोबर 'उभ्या उभ्या विनोद' कार्यक्रमात सहभागी आहे; तसेच भारतातून येणार्या कार्यक्रमांचे नियोजन करणार्या समितीत असल्याने अधिवेशनात धावपळ होणार याची मानसिक तयारी झालीय
कन्व्हेन्शन सेंटरजवळच्या हॉटेलमधे रहायची सोय झालीय.
सगळ्या माबोकरांना अधिवेशनात भेटायला नक्कीच आवडेल.
ए आम्हाला
ए आम्हाला पण माहिती देत जा रे काय काय होतंय ह्याची
~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/
त्यामुळे
त्यामुळे एका कुटूंबाची सोय होऊ शकेल....

>>हे आधीच स्पष्ट केलेत ते बरे...
मी (अश्विनी), नवरा(नितिन) आणि मुले (२) जाणार आहोत. आम्ही डाऊनटाऊन मॅरिएट्मध्ये उतरतो आहोत.
लोकहो, कुठल्या हॉटेलमध्ये राहाणार ते पण लिहा म्हणजे किमान हॉटेलमधल्या लोकांना तरी तिथल्या तिथे भेटता येईल.
संदीप, गुडलक. तुला गरज पडेल त्याची. अधिवेशनात कमिटीवर काम करणे म्हणजे काय हे प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कळणार नाही.
खालील
खालील माहिती मी त्यांच्या वेब पानावरून घेतली. त्याचा काही उपयोग होतो का बघा.
There is no dedicated registration help line number. We encourage you to email us with your registration details at registration@bmm2009Philadelphia.org or contact Mrs. Gautami M. Joglekar at 215-997-2055 between 7-9 p.m. EST. We generally respond to the emails within 2-3 business days.
We are not acknowledging the receipt of the paper registration by mail. Your cancelled check
is your proof of payment. You will be given your registration packet in person at the convention center, after you provide your confirmation number and photo ID. If you have mailed your paper registration before May 2009 with a valid email address but have not received an acknowledgment from us and you have not received your cancelled check, please contact Ms. Shaila Karnik at 215-591-1579 between 7-9 p.m. EST or send email to
registration@bmm2009Philadelphia.org.
मी आणि
मी आणि माझी आई(मनुस्विनि आणि डॉ जया),रहणार मेरीलँड मध्ये वहीनीच्या माहेरी.
मी रेजिस्ट्रशन केले नाही अजून कारण सुट्टीच नक्की होत न्हवतं. आता रेजिस्ट्रशन करण्यापूर्वी एक प्रश्ण होता, की इतक्या उशीरा केले तर सीट काय खूप लांबची मिळणार्?(मी पहिल्यांदाच जात आहे इथे म्हणून हा प्रश्ण). कोणाला माहीती असल्यास कळवले तर बरे होइल.
मनु, २५
मनु, २५ डॉलर्स जास्तीचे (प्रत्येक माणशी) दिल्यास पुढच्या सीट्स मिळतील. माझ्या एका मैत्रिणीने परवाच रजिस्ट्रेशन केले तिला मिळाल्या.
पुढच्या
पुढच्या म्हणजे पहिले हजार आहेत त्यांच्याहि पुढे? मग कुणि दहाहजार डॉ. दिले तर एकदम सगळ्या कार्यक्रमांना व्यासपीठावर जागा नक्की का?
पैशासाठी लोक काय करतील याचा भरवसा नाही! अमेरिकन लोक ना हे! वैयक्तिक लाच घेणार नाहीत, पण संस्थेसाठी पैसे घेतील. म्हणजे मग भारतातल्या आपल्या मित्रांना अमेरिकेची फुकट वारी! जसे साहित्य संमेलन (?!) झाले तसे!
नाही हो.
नाही हो. पुढच्या म्हणजे पहिल्या हजारातच. पण हे खरे आहे की डोनेशन दिले (अगदी दहा हजार नाही, माझ्या मते पाचशे किंवा हजारापासून डोनेशन्स घेतात ते) तर पहिल्या हजार सीटसच्याही पुढे जी डोनर्स एरिआ म्हणून राखीव जागा आहेत तिथे सीटस देतात.
********पैशासाठ
********पैशासाठी लोक काय करतील याचा भरवसा नाही! अमेरिकन लोक ना हे! वैयक्तिक लाच घेणार नाहीत, पण संस्थेसाठी पैसे घेतील. म्हणजे मग भारतातल्या आपल्या मित्रांना अमेरिकेची फुकट वारी! जसे साहित्य संमेलन (?!) झाले तसे!**********
झक्कीकाका, तुमच्या अशाच बोलण्याची माफी मागताना तुम्ही कन्व्हेंशन मध्ये मदत करायचं कबूल केलं आहे, लक्शात आहे ना?
हे काय?
हे काय? अजून कोणी मायबोलीकर येणार नाही का अधिवेशनाला?
समीर, लालू
समीर,
लालू आणि कुटूंब येणार आहे नक्की. तिने इथे लिहीले नाहीये तरी.
अनिलभाईपण येणार म्हणाले होते.
तसा अजून
तसा अजून चिक्कार अवकाश आहे. जून १५ ला परत पाहू, तेंव्हा खरा अंदाज येईल.
आजकाल नेमस्तकांना (moderators) ना कुठे कसे पत्र लिहायचे? पूर्वी कुठला कुठला यज्ञ केला, आहुति दिल्या, मंत्र म्हंटले की कुठल्या कुठल्या देवता प्रसन्न होत. त्यावरून त्या यज्ञाला नावे असत. तर आता नेमस्तकांना आवाहन करायला नेमस्तक यज्ञ कसा करावा हे कुठल्या ब्राह्मण ग्रंथात सांगितले आहे? तो ग्रंथ कुठे मिळेल?
म्हणजे जून महिन्यापासून हा बातमी फलक सगळ्यांच्या लगेच नजरेस पडेल अश्या ठिकाणी हलवता येईल.
इप्रसारण
इप्रसारण वर दर आठवड्याला अधिवेशनाच्या तर्फे कोणाचं तरी ५-७ मिनिटांचं भाषण असतं. तसंच काहीतरी इथे मायबोलीवर पण त्यांच्यापैकी कोणी लिहू शकेल का ? संदीप ? गौतमी ?
संमेलनासा
संमेलनासाठी पुरेशी नोंदणी झालेली दिसत नाही. परवाच discount coupons बघितली.
आम्ही
आम्ही येणार नाही
नवर्याला कदाचीत भारतात जावे लागणार आहे त्याच आठवड्यात 
छान आहे.
छान आहे.
मी ब्लू
मी ब्लू बेल मधे राहतो. माझी आई अधिवेशनाला जाणार आहे. मी आणि बायको-मुले त्या वीक-एन्ड ला बाहेर आहोत. आई ट्रेन चा प्रवास बक्कळ करते. इथून फिली, न्यू जर्सी सगळीकडे जाते. त्यामुळे तो प्रोब्लेम नाहिये. पण घरापासून स्टेशनही १०-१२ मिन चा ड्राईव्ह आहे आणि आई ड्राईव्ह करत नाही. कोणी इथून जवळपासहून जाणार (ब्लू बेल, प्लिमाऊथ मीटिंग, किंग ओफ प्रुशिया, लन्सडेल इ.) आहे का? आईचा ड्रॉप / पिकप चा प्रश्न सुटेल आणि सोबतही होईल म्हणून शोधाशोध करतो आहे. कृपया मला संपर्क करा - पुलस्ति@याहू.कोम
आम्ही
आम्ही कन्व्हेन्शन सेंटरच्या जवळ Mariott मध्ये रहाणार आहोत. विनय्/संदीपचा कार्यक्रम तर नक्की पहायचा आहे. आमच्या ग्रुपचं "माझी माय सरोसती" पण आहे कार्यक्रमात.
पुलस्ति,
पुलस्ति, मी फिनिक्स्व्हिल वरून येईन जाईन. माझ्या गाडीत जागा असेल का नाही हे अजून ठरत नाही. मी अन आई नक्की आहोत. पण अजून एक मैत्रिणीची आई अन सासुबाई बाहेर गावाहून माझ्याकडे येतील असं दिसतंय. त्यांचं ठरत नाहीये अजून माझ्याकडे रहाणार की जवळच्या हॉटेलात रहाणार ते. पाचवी सीट चालत असेल तर मी नक्की पिकप ड्रॉप ऑफ करु शकते
नागपुरात
नागपुरात बस भरली की 'बगीचेमे बैठना है तो आओ' असे कंडक्टर म्हणत असे. बगीचा म्हणजे सीटांच्यामधे, जमीनीवर.

माझं नाव
माझं नाव वैभव पुराणिक, मी लॅास एंजेलिसवरुन येणार आहे. आमचा माझी माय सरसोती हा कार्यक्रम आहे - बहुतेक ४ ला आहे. आपण सर्वांनी नक्की या. बहिणाबाई चौधरींच्या जीवनावर आणि त्यांच्या काव्यवर पाश्चिमात्य धर्तीचे नृत्यनाट्य किंवा संगितिका आहे.
पुर्राणिक
पुर्राणिक बोव्वा , 'तू नळी'वर टाकायला विसरू नका
नमस्कार... र
नमस्कार...
रजीस्ट्रेशन चा गुण्ता काही कळत नाहिय मला.
प्रश्नः
रजीस्ट्रेशन असल्यास सगळे कार्यक्रम,आशा भोसले यान्चा कार्यक्रम वगळत, मोफत आहेत का?
रजीस्ट्रेशन न करता फक्त कार्यक्रमाण्चे टिकिट मिळेल का?
like: phakta haasyapanchami
like: phakta haasyapanchami aani maitar che ticket milatil kaa?
झक्की, एक
झक्की, एक प्रश्न
]
>>>>> बृहन्महाराष्ट्राच्या फिलाडेल्फिया येथे जुलै
यातिल महाराष्ट्र या शब्दाला बृहन हा प्रत्यय की कायसेसे इन्जिन मागुन जोडले की महाराष्ट्राची सीमा सातासमुद्रापार फिलाडेल्फिया येथवर पोचते का?
तस असेल तर बृहन्भारत, गेलाबाजार बृहन्पुणे म्हणायला काही हरकत नसावी!
अस म्हणले की झाले, पुण्याच्या शनिवारवाड्याची वेस पोचली सातासमुद्रापार! हाय काय अन नाय काय!
अन महाराष्ट्रातील "पब्लिक" पण खूष! [आता "शनिवारवाडा" चालत नसेल तर "बहुमताने" दुसरे काही ठरवू, हरकत नाही आपली
तर, झक्की, या बृहन बद्दल तुमचे काय मत????
(मी वरील विषय चेष्टेने वा कुचेष्टेने काढला नसून, शाब्दिक ज्ञानसम्पदा वाढवुन घेण्यासाठी प.पू. झक्कीन्ना विचारत आहे, याचा त्या अधिवेशनाशी सम्बन्ध नाही, अधिवेशन यशस्वी थाटामाटात मराठी भाषेत होवो ही सदिच्छा, मला येता येणार नाही, पण तुम्ही बाकी लोक निभावुन न्यालच! ["कार्य सिद्धिस नेण्यास श्री समर्थ आहे" हे वाक्य उच्चारावे की नाही? बुप्रा मधे ते बसते का???? या शन्कान्मुळे, बाकी लोकान्वरच सर्व सोपवले आहे, याची कृपया नोन्द घ्यावी])
लिंबुटिंब
लिंबुटिंबू,
मला वाटतं बृहन हा प्रत्यय महाराष्ट्राला लावलेला नसून महाराष्ट्र मंडळाला लावलेला आहे. बृहन महाराष्ट्र मंडळ ही उत्तर अमेरिकेतल्या सर्व मंडळांची पालक संघटना (Umbrella organization) आहे.
Pages