
काही पाकृ हया वाचताना बघताना एकदम वॉव अशा वाटतात. आयत्या कोणी दिल्या तर अहाहा! असा विचार आधी मनात येतो (जश्या लाजोच्या बर्याचश्या रेसिप्या)
काही पाकृ करुन बघण्या करता बराच धीर एकवटावा लागतो/ बर्याच बेसिक संत्र्यांना कोणीतरी सोलून द्या रे आधी असं करायला घेतल्यावर वाटतं (जश्या लाजो + जागुच्या रेसिप्या. स्पे. जागुच्या सामिष रेसिप्या. मुळात त्यातले मुख्य घटक कोणी ओळखून पारखून आणून दिले साफही करुन दिले तर ज्या बात है असं वाचताना वाटतं)
तर काही पाकृ असतात तशा सोप्या (सोप्पं कॅरेमल पुडींग सारख्या किंवा केक इन कॉफी कप सारख्या :फिदी;) ज्या वाचनाता यु यु चुटकी मे जमतील वाटतं पण नेमक्या फसतात
तर काही फसत नाहीत पण वारंवार करुन बघुयात ही लिटमस टेस्ट पास करत नाहीत
तर ह्या सगळ्या निरनिराळ्या कसोट्यांवर माझ्या वारंवारतेची लिटमस टेस्ट्+माझ्या लेखी सोप्पी पाकृ बनवण्याचं श्रेय ज्या रेसिपिंना जाईल त्यातली ही एक रेसिपी आता तुमच्या लिटमस टेस्ट आणि कसोट्यांवर उतरायला सज्ज
सध्या पाकृ लिहिण्याआधी अमेय ह्यांनी सुंदर ट्रेन्ड सेट केलाय, पाकृ विषयी छान छान असं लिहायचा. पण ते काही आपल्याला जमण्यातलं नाही तरी पण त्यांचा ऑर्किडचा गुलदस्ता आवडला हे सांगण्यासाठी आमच पण हे पाकृच्या आधीचं अस्टरचं फुल
--------
साहित्य:
१) रवा २ वाट्या (बारिक/ जाडा कोणताही चालेल फक्त न भाजलेला हवा)
२) ताक - २ वाट्या (खुप जास्त आंबट ताक असेल तर त्यात पाणी घालून थोडं त्याला मवाळ करा)
३)आलं लसूण पेस्ट - १ चमचा
४) हिरवी मिरची १ - आलं लसणी बरोबरच मिरची देखील वाटली तरी चालेल. तस न करता चिरुन घातली तरी चालेल. नाही घातली तरीही चालेल किंवा पक्के तिखटे असाल तर एका पेक्षा अधिक घातल्यात तरिही चालतील
५) मीठ चवी प्रमाणे
६) साखर - १ चिमुट
७) भाज्या - कोबी, कांदा, सिमला मिरची बारिक चिरुन, गाजर किसून. (भाज्या घातल्या नाहीत तर साधे प्लेन अप्पे होतील. भाज्या घातल्यात तर तेव्हढच हेल्दी ऑप्शन निवडल्याचही समाधान मिळवाल)
८) खाण्याचा सोडा चिमुटभर (ह्याला ऑप्शन म्हणून इनो चालेल असं वाटतय. करुन बघा. माझ्या घरी खाण्याचा सोडा होता, इनो नव्हता म्हणून मी त्या वाटेला गेले नाही)
९) पाणी जरुरी प्रमाणे लागेल तसे (मिश्रण इडलीच्या पीठा सारखे होण्या इतपत लागेल इतकेच)
कृती:
रवा ताकात भिजवावा. हे ४-५ तास तसेच झाकून ठेवावे. (रात्रभर राहिले तरी चालते. मी रात्री भिजवून सकाळी केले होते अप्पे.)
अप्पे करायच्या वेळी त्यात मीठ, साखर (ही घातली नाही घातली तरी चालेल. रात्रभर पीठ ठेवल्याने थोडं आंबट होतं म्हणून मी चिमुटभर घातली होती) आलं लसुण/ आलं लसुण मिरची चे वाटण घालावे.
ह्यात लागेल तसे पाणी घालून मिश्रण इडलीचं मिश्रण असतं तितपत पातळ करुन घ्या. त्यात चिमुटभर खायचा सोडा घालून चांगलं ढवळून घ्या.
थोडे अप्पे साधे आणि थोडे भाज्या घातलेले असं करणार असाल तर आधी साधे अप्पे करुन घ्या मग त्या मिश्रणात भाज्या मिसळा म्हणजे दोन भांडी होणार नाहीत.
अप्पे पात्राला तेलाचा हात लावून चमच्याने हे मिश्रण त्यात घाला. मध्यम आचेवर वर झाकण ठेवून अप्पे होऊद्या. साधारण ६-७ मिनिटांमधे एक बाजू होईल. सुरीने अप्पे उलटा. दुसरी बाजू पण जरा सोनेरी होऊ द्या. मग अप्पे पात्र सरळ ज्या पातेल्यात/ भांड्यात/ताटात काढायचेत त्यात उलटं करा. अप्पे अलगद पणे त्यात पडतील. सुरी फिरवा/ उलथण्याच्या मागच्या बाजुने जरा त्या अप्प्यांच्या साईडला टोका असले प्रकार करावे लागत नाहीत.
हे अप्पे हिरवी चटणी/खोबऱ्याची चटणी/सॉस/ भाजीवाले असतील तर नुसते सुद्धा चांगले लागतात
टिप: ह्यात व्हेरिएशन म्हणून अजून काही भाज्या वाफ़वून/पालक चा पल्प/ कोथिंबिर/ खोबऱ्याचे काप इ. घालू शकता. मी पुढच्यावेळी ह्यातलं काही तरी घालून एक घाणा तरी करुन बघणार आहेच. हि टिप हेल्थ कॉन्शस मंडळी/ मुलां करता टेस्टी भी आणि आयांसाठी हेल्दी भी वाले पर्याय शोधणाऱ्या आयांसाठी आहे.
माहितीचा स्त्रोत:
हि कमी कटकटीची आणि टेस्टी+हेल्दी पाकॄ माझ्या पोतडीत टाकण्याचं श्रेय - माबोवरच्या फाटक भगिनींना
मोठ्या फाटक भगिनी काही ह्यात गाजर घालत नाहीत ही ऍडिशन धाकट्या बाईसाहेबांची ह्याच कारण माझ्यातल्या चतूर आईने लग्गेच ओळखलं. ह्यात पुढच्यावेळी कोथिंबीर पण घालून बघुयात गं, खोबऱ्याचे काप पण चालतील इ. इ. आईमोड वाल्या इमेली पण झडल्या.
ह्या निमित्ताने दोन वर्षांपुर्वी भेट मिळालेलं अप्पे पात्र धन्य झालं आणि कायमचं माळ्यावरुन वापरातल्या भांड्यांमधे आलं ह्यातच ह्या रेसिपीचं खरं यश आहे.
हे मिश्रण असं दिसेल
हे तयार अप्पे. ह्यातला मध्यभागी असलेला एक अप्पा (:फिदी:) बसलेला रुसलेला फसलेला नसुन तो उलटलेला नाहीये. त्याआधी फोटो काढलाय ते उलटलेली आणि न उलटलेली अशा दोन्ही बाजू दाखवण्यासाठी - हे स्प. खास धाकल्या फाटक भगिनीसाठी आहे.
मस्तच
मस्तच
मस्त! ताकात रवा एवढा वेळ
मस्त!
ताकात रवा एवढा वेळ भिजवला तरी सोडा/ इनो लागतो का?
मी झब्बू देणार
मवाने प्राचीच्या विपूत लिहिलेल्या मिश्र डाळींच्या आप्प्यांचा हा फोटो :
मवे, आतातरी रेस्पी लिवशील काय?
ए तुमचे अप्पे सोनेरीबिनेरी
ए तुमचे अप्पे सोनेरीबिनेरी होतात की मस्त. माझे अंमळ 'खरपूस'च होतात
आच मंदच असते. आधी उलटले तर कच्चे होतील असं वाटतं.
हीच कृती रवा इडलीची आहे. ज्यांच्याकडे अप्पेपात्र नाहीये, त्यांनी इडल्या करा आणि नंतर 'सोनेरी' रंगावर शॅलो फ्राय करा. जराऽऽसे मोठे अप्पे! हाकानाका!
पौतै, फोटू गंडलाय बगा
पौतै, फोटू गंडलाय बगा जरासा...
खरपूसच होते ते आप्पे, त्यावर ट्युबप्रकाश पडून सोनेरी झालेत
ही रेसिपी मस्त आहे. करून
ही रेसिपी मस्त आहे. करून बघणार.
आमच्याकडे आठवड्यातून एकदा तरी आप्पे होतातच. त्यामुळे आप्पेपात्र कायम वापरात असतंच. रवा-मैदा वापरून आप्पे बर्याचदा केले आहेत. डाळ तांदूळ, मिश्र डाळींचे वगैरे तर कायमचेच. फक्त रव्याचे कधी केले नाहीत. आता करून बघेन..
कवे, तू आणि ललीने नविन
कवे, तू आणि ललीने नविन प्रांतात उडी घेतली काय?
मस्त दिसतायत. रव्याचे तिखट आप्पे कधी केले नाहीत अजून. इडलीच्या पिठाचे केलेत. रव्याचे गोड आप्पे केलेत पण ते शिर्यासारखेच लागले त्यामुळे तांदुळ रव्याचे आणि डाळीचे करते.
वॉव्,मस्त दिस्तायेत
वॉव्,मस्त दिस्तायेत आप्पे...रेस्पीच्या आधीच्या गप्पे ..सॉरी गप्पा पण आवडल्याच!!!
मिश्र डाळिच्या आप्प्यामधे
मिश्र डाळिच्या आप्प्यामधे तादुळ एवजी ईडली रवा घातला तरी मस्त आप्पे होतात.
मंजुडे, मस्तच दिसतायत अप्पे.
मंजुडे, मस्तच दिसतायत अप्पे. मिक्स डाळ अप्प्यांची फुलप्रुफ रेस्पी देणे आता
इनो/ सोडा लागेलच का?>>> ते नाही माहिती. मी पहिल्यांदाच हिम्मत केली करायची म्हणून लली +मंजी म्हणाल्या तस्सेच केले
पोर्णिमा, माझे खरोखर सोनेरीच झाले होते चक्क पैकी.
पोर्णिमा, रवा इडली करता पण
पोर्णिमा, रवा इडली करता पण इनो घालावा लागतो का?
लले तुझं इमेल आमच्या ऑफिस
लले तुझं इमेल आमच्या ऑफिस सर्वरने खाल्लं बहुतेक
मला मंजीचा रि मिळाला तुझा नाही
छान झाले आमचे आप्पे! धन्यवाद
छान झाले आमचे आप्पे! धन्यवाद कविन.
पहिलीच वेळ असल्यामुळे काही बदल केले नव्हते, आता पुढच्या वेळी भाज्या, डाळी वगेरे ट्राय करेन!
इडलीच्या पिठाचे, इडलीच्या
इडलीच्या पिठाचे, इडलीच्या पिठात वाटलेली हरबरा डाळ + भाज्या घालून, भिजवलेले काळे चणे + रवा+ दही + अद्रक, मिरची कोथींबीर घालून अप्पे केलेत. नुसत्या रव्याचे कधी केले नाहीत. आता करुन बघेन.
हीच कृती रवा इडलीची आहे. >>>>
हीच कृती रवा इडलीची आहे. >>>> मलाही हेच वाटले.
कविता, हो, सोडा घालायचा,
कविता, हो, सोडा घालायचा, म्हणजे इडली हलकी होते. सेम हीच कृती आहे, फक्त इडल्या वाफवतो, आणि अप्पे शॅलो फ्राय करतो आपण.
भाज्या नसतील, तर आले-लसूणही वगळले तरी चालते.
त्या ऐवजी जिरं, मिरचीचे अगदी बारिक तुकडे, ताजा कढीपत्ता जरा चुरून आणि असेल तर ताज्या नारळाचे काप घालायचे.
चार तास जरी भिजवायचे असले, तरी हे पारंपरिक पद्धतीच्या मानाने 'इन्स्टन्ट' कॅटॅगरीतलेच आहेत
छान झाले आमचे आप्पे!>>अश्विनी
छान झाले आमचे आप्पे!>>अश्विनी इथे कळवलस आवर्जुन म्हणून धन्स
पोर्णिमा, रवा इडली साठी धन्स ग. हो इंन्स्टंट प्रकार मी शोधतच असते
चार तास जरी भिजवायचे असले,
चार तास जरी भिजवायचे असले, तरी हे पारंपरिक पद्धतीच्या मानाने 'इन्स्टन्ट' कॅटॅगरीतलेच आहेत >>> मी नाही चार तास भिजवत. रवा तुपावर भाजून घेऊन थोडा निवला की त्यातच दही आणि पाणी घालून इडलीच्या पिठासारखे भिजवते आणि लगेच इडल्या लावते. इनो लागतोच. त्याने हलक्या होतात
अगो, असे इतके 'ताबडतोब' मोडात
अगो, असे इतके 'ताबडतोब' मोडात जाऊन अप्पे / इडल्या केले नाहीत कधी. (आम्ही बाबा सगळं प्लॅन करूनच करतो
:दिवा:)
पण आता करून बघेन नक्कीच
धन्यवाद!
कविता, आप्पे करते मी अधून
कविता,
आप्पे करते मी अधून मधून, आज पहिल्यांदा रव्याचे केले. आवडले.
रवा ताकात भिजवला की ५ मिनिटात फुलून येतो. त्यामुळे ४-५ तास भिजवायची गरज नसावी. ताक खूप गोड असेल तर कदाचित थोडा जस्त वेळ लागेल.
मी आज ५-१० मिनिटे भिजवून ठेवले आणि लगेच केले. मस्त झाले. खायचा सोडा घातला होता.
धन्यवाद.
साक्षी.
पौर्णिमा! 'म्रु'ची शेवया
पौर्णिमा! 'म्रु'ची शेवया ईडली रेसिपी पण भारी आहे त्यातल्या शेवया वगळल्या की झाली रवा ईडली
सोडा घालायचा नसेल तर किती वेळ
सोडा घालायचा नसेल तर किती वेळ भिजवायला लागेल? मला सोडा घालणं नको वाटतं का कोण जाणे..
अगोला, इन्स्टंट मोदक. सकाळी
अगोला, इन्स्टंट मोदक.

सकाळी डब्यात द्यायला एकदम सोप्पा प्रकार म्हणजे रवा इडली.
आता आप्पे करून बघेन.
हायला इधर मेरा नाम ?? मंजूडै
हायला इधर मेरा नाम ??
आत्ता पण दोन्तीन ऑ बंगाली रेस्प्या आहेत, पंचफोडन अन खजूर वाली टोमॅटो चटणी इ.
मंजूडै इथे रेस्पी लिहीणं जमलं असतं तर बंगळुरुत असताना मैत्रिणी आणि कुक कडून साभार अश्या पंचवीसेक तरी ऑथेंटीक सौदिंडीयन / नॉर्थी रेस्प्या नसत्या का पाडल्या ?
वो मेरेकू नय जमता, तुमही लिख दो.
मला कोणीतरी मुळातली
मला कोणीतरी मुळातली आप्प्यांची रेसिपी सांगेल का? वरीजीनलवाली. मला तिच माहित नाहिये. तोवर अर्थात ही करुन पाहीन.
सानुली, http://www.maayboli.c
सानुली,
http://www.maayboli.com/node/27981
इथे माझी रसिपी आहे.
साक्षी.
रवा तुपावर भाजून घेऊन थोडा
रवा तुपावर भाजून घेऊन थोडा निवला की त्यातच दही आणि पाणी घालून इडलीच्या पिठासारखे भिजवते आणि लगेच इडल्या लावते. इनो लागतोच. त्याने हलक्या होतात>>> हे सर्व करून सज्जिगे रोटीपण झटपट करता येते. इनो घालायचा नाही, कांदा, मिरची कोथिंबीर आणि मिरच्या चिरून घालायच्या. आणि थालिपीठासारख्या थापून तव्यावर भाजायच्या!! इडल्या वाफवायचा वेळ अजिबात लागत नाही. (इन्स्टंटमे भी इन्स्टंट :फिदी:)
अरे वा नंदिनी, करुन पाहण्यात
अरे वा नंदिनी, करुन पाहण्यात येईल
आमच्याकडे भाजी उरली रे उरली की दुसर्यादिवशी त्याचे थालिपीठ झालेच म्हणून समजा
अगो,, हे बघ!!
अगो,, हे बघ!! http://www.maayboli.com/node/28023
आमच्याकडचा ब्रेकफास्टचा हिट आयटम आहे.
धन्स साक्षी! नक्की करून बघेन.
धन्स साक्षी! नक्की करून बघेन.
तुम्ही ज्या दिवशी रेसिपी
तुम्ही ज्या दिवशी रेसिपी लिहिलीत त्याच दिवशी करून बघितले अप्पे. मस्त झाले. दुपारी रवा भिजवला आणि संध्याकाळी केले. अगदी छान झाले. धन्यवाद ह्या सोप्या रेसिपी साठी.
Pages