येतास मा या सुट्टीत ?

Submitted by गिरिश सावंत on 16 March, 2013 - 01:08

आच-याच्या किना-यावर झावळाच्या खोपटात चुलीवर रटारटाणा-या तेलात तळलेली गरमागरम भजी .. किना-याचा गार गार वारा ...सूर्यास्ताची लाली ...आणी हवीहवीशी साथ ...

IMG_4096 copy

IMG_4095

येतास मा या सुट्टीत ?

कणकवलॆजवळ रव्हाची सोय केली हा
IMG_4604 copy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कणकवलीपेक्षा त्या पहील्या फोटोतल्या झावळ्यांच्या खोपटातच राहायला आवडेल... गरमागरम पिठी-भात नाहीतर झणझणीत आमटी-भात ओरपायला... नंतर तिथेच थोडंसं साफसूफ करून लवंडायला... झावळांच्या आडून डोकावणार्‍या चांदण्याचे तुकडे झेलत... व्वा!!! काय फोटोज आहेत!!! मस्त मस्त मस्त!!!

ओ किनार्यवर पण देवया झोपाक..आदी येवा तर ..
मायबोलीकर सिन्धुदुर्गात येतत आणि गुपचुप जातत..
मी आपलो कणकवलेत वाट बघतय ..
हे फोटु काढुक येणारे कधितरी गावतीत म्हनान...

गिरिश सावंत आणि सारीका, पत्ते व नंबर देणार का कणकवली आणि देवबाग चे...
कोंकणात वरचे वर येणं असतंच... घरही आहे... पण एक निवांतपणा व वेगळा अनुभव म्हणून नक्की यायला आवडेल... विपू केलीत तरी चालेल...