१. भात: २ कप (शक्यतो बासमती अथवा कुठलाही मोकळा शिजणारा भात)
२. अर्धा कप चिंच पाण्यत भिजवून ठेवावी. पाणी जरा जास्त असावे.
३. १ चमचा मेथीदाणे
४. डाळीएवढा हिंगाचा खडा
५. हळद, मोहरी,
६. गुळाचा एक छोटा खडा.
७. एक चमचा चणाडाळ
८. सहा लाल छोट्या मद्रासी सुक्या मिरच्या (नसतील तर नेहमीच्या सिक्या मिरच्या)
९. तिळाचे तेल (पारंपारिक रीत्या तिळाचे वापरतात, हवं असल्यास नेहमीचे रीफाईन्ड तेल वापरले तरी चालेल.)
१०. थोडे काजू आणि शेंगदाणे. (हवे असल्यास)- तळून घ्या. अथवा नंतर फोडणीत घालून परता.
११. ताजा कढीपत्ता.
मीठ चवीनुसार
भात शिजवून एका परातीत मोकळा करून घ्या.
एका पॅनमधे मेथीदाणे आणि हिंग कोरडेच परता. नंतर हे कुटून पावडर करून घ्या.
चिंचेच्या कोळामधे मीठ हळद, गूळ, आणि मेथी हिंगाची पावडर घालून मिक्स करा.
तेलाची फोडणी करून त्यामधे मोहरी, चणाडाळ (आवडत असल्यास उडीद डाळ पण घालू शकता) मिरच्या, (घालायचे असतील तर काजू-शेन्गदाणे ) व कढीपत्ता घाला.
आता यामधे चिंचेचा कोळ घालून उकळा. कोळ चांगला घट्टसर झाला पाहिजे. कन्सिस्टन्सी साधारण घट्ट पिठल्याइतकी आली पाहिजे.
हा कोळ नंतर भातामधे व्यवस्थित मिक्स करा. काजू शेंगदाणे तळून घेतले अस्तील तर तेही मिक्स करा,
टॅमरिंड राईस-पुळिसादम-चिंच भात तय्यार.
हा भात अतिमसालेदार/जळजळीत होत नाही.
चिंचेचा आंबटपणा जितका हवा असेल त्याप्रमाणे चव अॅडजस्ट करा.
हा भात दोन तीन दिवस टिकू शकतो त्यामुळे प्रवासात नेण्यासाठी उत्तम!
याच्यासोबत मिरचीचे लोणचे आणि तळलेले पापड झकास लागतात.
मस्त झाला नंदिनी काल केलेला
मस्त झाला नंदिनी काल केलेला तो. रेडी मेड मसाल्यांपेक्षा वेगळी चव झाली.
अरे वा, फोटो काढल्यास इथे
अरे वा,
फोटो काढल्यास इथे डकवणे.
'आधी पोटोबा मग फोटोबा'
'आधी पोटोबा मग फोटोबा' करण्याच्या नादात तेव्हढे मात्र राहून गेले. पुढच्या वेळी नक्की काढेन,.
वा चिंच म्हटल्यावरच तोपासु.
वा चिंच म्हटल्यावरच तोपासु. छान आहे रेसिपी.
मीही केला काल. मेथ्यांची पूड
मीही केला काल. मेथ्यांची पूड करून घातल्याने आलेली चव आवडली. चिंचेचा कोळ आधी उकळून मग त्यात भात एकत्र करणे ही पद्धत मस्तच आहे.
मस्तच
मस्तच
पूनम, धन्यवाद!
पूनम, धन्यवाद!
आत्ता केला भात. मस्त जमला, पण
आत्ता केला भात. मस्त जमला, पण मेथी पूड जास्त वाटली. जरा कमी घालायला पाहिजे पुढल्या वेळी.
ते कोकोनट, टोमॅटो वगैरे भात कसे बनवायचे ते सांगा, की आहेत ऑलरेडी रेसिप्या टाकलेल्या?
मस्त आहे पनीर, छोले अशा
मस्त आहे
पनीर, छोले अशा पंजाबी पद्धतीच्या भाज्यांबरोबर हा भात मेन्यूत फिट होईल का ?
Pages