सुकं भरलं वांगं (सांबार मसाल्यासहित)

Submitted by ललिता-प्रीति on 14 March, 2013 - 00:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

छोटी वांगी - ६
छोटे कांदे - २
छोटे बटाटे - २
डाळीचं पीठ (बेसन) - एक ते सव्वा वाटी (किंचित जाडसर बेसन असल्यास उत्तम.)
सांबार मसाला - ३-४ चमचे
धने पूड - अर्धा चमचा
जीरेपूड - अर्धा चमचा
चिंचेचा पातळ कोळ - पाऊण वाटी
मीठ - चवीनुसार
तिखट - चवीनुसार
तेल

क्रमवार पाककृती: 

- वांगी धुवून आणि कांदे, बटाटे सालं काढून उभी चीर पाडून घ्यावेत. (देठाचा थोडा भाग ठेवला, तर वांगी पालटायला सोपी जातात.)
- चिंचेचा कोळ आणि तेल वगळता अन्य कोरडं साहित्य एका भांड्यात चांगलं मिसळून घ्यावं.
- आता या मिश्रणात अंदाज घेत थोडा थोडा चिंचेचा कोळ घालावा. मिश्रणाचा ओला लगदा होता कामा नये. केवळ त्याचा भुरभुरीतपणा जावा आणि ते वांग्यात व्यवस्थित भरता यावं इतकाच कोळ घालायचा.
- हा मसाला कांदा-वांगं-बटाट्यात भरावा.
- कढईत तेलाची चळचळीत फोडणी करून त्यावर भरली वांगी-कांदे-बटाटे ठेवावेत.
- झाकण टाकून एक वाफ द्यावी.
- झाकण काढून मसाला उरला असेल तर तो भाजीवर पसरावा. वांगी-कांदे-बटाटे थोडे हलवावेत. (हे अलगद करावं लागतं. नाहीतर अर्धा कोरडा मसाला बाहेर येतो.) २-३ चमचे चिंचेचा कोळ सगळीकडे पसरून घालावा. पुन्हा झाकण ठेवून वाफ द्यावी. भाजी खरपूस शिजेपर्यंत हे करावं. (३-४ वेळा कोळ घालावा लागतो.)
- पोळी/भाकरीबरोबर भाजी वाढावी. (मी तर नुसतीही खाते. :फिदी:)

Copy of DSC03739.JPG

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 

१. प्रत्येक कांदा-वांगं-बटाट्यासाठी एक-एक चमचा बेसन आणि पाव-पाव चमचा सांबार मसाला असं प्रमाणही वापरू शकता.
२. ही भाजी अगदी मंद गॅसवर कढईतच करावी लागते; प्रेशर-कुकर/प्रेशर पॅनमधे नाही.
३. जरा पेशन्सचं काम आहे, पण चव अप्रतिम लागते.
४. नुसत्या वांग्यांचीही भाजी चांगली लागते. एकदा मी केलेला मसाला जास्त झाला. म्हणून मी त्यात कांदे-बटाटे पण घातले. ते चांगले लागले. तेव्हापासून या तीनही भाज्या वापरून करते.
५. मी चमचा-वाटी मोजून काटेकोर प्रमाण कधी घेत नाही. मात्र कोळ घालण्यापूर्वी कोरड्या मिश्रणाची चव घेऊन पाहते.
६. ३० मिनिटे हा वेळ भाज्या चिरण्यापासून ते भाजी शिजण्यापर्यंतचा धरलेला आहे.

माहितीचा स्रोत: 
मंजीचं सासर.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी आहे पाकृ, माहितीच्या स्त्रोताकडे खायला मिळणार का?Uhoh Proud

पण वांगी फ्यानांसाठी मस्ट आणि मस्त आहे, करणेत येईल कृ का ची वा आली होती, नुकतीच संपली आहेत, आता मिळेल त्या वांग्यावर समाधान मानावे लागेल

छान वाटते आहे भाजी. भरल्या मसाल्यात बेसन चांगले लागेल. पण मी सांबार मसाला घालणार नाही! दुसरा कुठलातरी घालीन गरम, काळा, गोडा, कोल्हापुरी, दगडू तेली इ. पैकी. गोड काही नको का यात, गूळ-साखर?
बर, "चळचळीत फोडणी" म्हणजे काय? Wink

मानुषीताई, इकडची वांगी खाल्ली नाहीत काय घरच्यांनी? "वांगी ती वांगी" म्हणतायत ते! Happy

अरेच्च्या, इतके प्रतिसाद! थ्यांकू Happy

कृ.का.ची वांगी.... हाय! :सांगली-कर्‍हाडमधे बालपणीची प्रत्येक सुट्टी घालवलेली बाहुली:

मंजू, आशू, तुम्हाला वांगी आवडत नाहीत?? एका मोठ्या आनंदाला मुकता तुम्ही Wink (मी गोड खात नाही, म्हणून माझ्या सा.बा. मला हेच ऐकवतात ;))

लोला, गरम, काळा इ. मसाले घातले, तर ती नेहमीचीच भरल्या वांग्याची भाजी होईल ना? सांबार मसाल्याचा स्वाद ही या भाजीची खासियत आहे.
चळचळीत फोडणी म्हणजे काय? - या प्रश्नाचं उत्तर 'अ' ते 'ज्ञ' यांपैकी कुठल्याही अक्षरांनी लिहिता येणार नाही. तो घमघमाटावरून ओळखायचा प्रकार आहे. Wink

यो, मी एकवेळ पदयात्रा करत काशीला जाईन, पण पाकृचं पुस्तक कदापि लिहिणार नाही Proud

लले लले Wink गहिवरुन आल्याने पुढे लिहायला सुचत नाहिये काही. त्या गहिवराच्या भरात मी चक्क पैसे खर्च करुन समस केला तुला Proud

भारी वाटततेय. करगे देखेंगे इस्सी विकांत को. Happy

यो, मी एकवेळ पदयात्रा करत काशीला जाईन, पण पाकृचं पुस्तक कदापि लिहिणार नाही >> पुस्तक लिहू नकोसच... अनुवाद कर Happy Light 1

हाच कोरडा मसाला भेंडीत भरून >>> १५ वर्षं होऊन गेली हिच्या लग्नाला, आजवर एकदाही केलेली खाल्ली नाहीये, करताना पाहिलेली नाहीये, ऐकलेलीही नाहीये Wink

कवे, गहिवरून Proud
समसचे पैसे वाया जाणार नाहीत तुझे, भाजी जमेल तुला पहिल्याच प्रयत्नात Wink

लले, परवा तूच म्हणालीस की उकाड्यामुळे तुझ्या घरी यायचं की नाही ते बघू म्हणून, नाहीतर मी ठरवलंच होतं यावेळी तू आलीस की भरली भेंडी करायचं Proud Wink

लले भाजी बरोबरच रव्याचे अप्पे पण करेन म्हणतेय विकांताला. गरज पडल्यास एकाच तज्ञाला फोन लावून दोन्हीच्या शंका फेडण्याच काम एकाच फोन कॉल मधे होईल म्हणजे Wink

हाच कोरडा मसाला भेंडीत भरून थोड्या जास्त तेलावर परतून आमच्याकडे भरली भेंडीही करतात >>> लग्न कार्यालयात असते ना अशीच भेंडी ?

>>गरम, काळा इ. मसाले घातले, तर ती नेहमीचीच भरल्या वांग्याची भाजी होईल ना?
नाही, मी बेसन घालत नाही वांग्यात त्यामुळे माझ्यासाठी तरी नवीन भाजी होईल.

बाकी "लले, लले" करत टाईमपास करणार्‍या बायकांशी गप्पा मारण्यात विचारलेल्या प्रश्नांकडं दुर्लक्ष करु नको. ती झंपी बघ काय विचारतेय. उत्तर दे नाहीतर ती म्हणेल "यात काय वेगळं आहे? फक्त सांबार मसाला घातलाय" मग तू काय म्हणणार? तूच वर लिहिलंयस तसं. Wink

अय्या, लोला किती दिवसाने?
किती हो काळजी.. पण मी कधी असे म्हणाले... ह्यात काय वेगळं... ते दुसर्‍या बाई म्हणत. विसरलीस का?

Pages