छोटी वांगी - ६
छोटे कांदे - २
छोटे बटाटे - २
डाळीचं पीठ (बेसन) - एक ते सव्वा वाटी (किंचित जाडसर बेसन असल्यास उत्तम.)
सांबार मसाला - ३-४ चमचे
धने पूड - अर्धा चमचा
जीरेपूड - अर्धा चमचा
चिंचेचा पातळ कोळ - पाऊण वाटी
मीठ - चवीनुसार
तिखट - चवीनुसार
तेल
- वांगी धुवून आणि कांदे, बटाटे सालं काढून उभी चीर पाडून घ्यावेत. (देठाचा थोडा भाग ठेवला, तर वांगी पालटायला सोपी जातात.)
- चिंचेचा कोळ आणि तेल वगळता अन्य कोरडं साहित्य एका भांड्यात चांगलं मिसळून घ्यावं.
- आता या मिश्रणात अंदाज घेत थोडा थोडा चिंचेचा कोळ घालावा. मिश्रणाचा ओला लगदा होता कामा नये. केवळ त्याचा भुरभुरीतपणा जावा आणि ते वांग्यात व्यवस्थित भरता यावं इतकाच कोळ घालायचा.
- हा मसाला कांदा-वांगं-बटाट्यात भरावा.
- कढईत तेलाची चळचळीत फोडणी करून त्यावर भरली वांगी-कांदे-बटाटे ठेवावेत.
- झाकण टाकून एक वाफ द्यावी.
- झाकण काढून मसाला उरला असेल तर तो भाजीवर पसरावा. वांगी-कांदे-बटाटे थोडे हलवावेत. (हे अलगद करावं लागतं. नाहीतर अर्धा कोरडा मसाला बाहेर येतो.) २-३ चमचे चिंचेचा कोळ सगळीकडे पसरून घालावा. पुन्हा झाकण ठेवून वाफ द्यावी. भाजी खरपूस शिजेपर्यंत हे करावं. (३-४ वेळा कोळ घालावा लागतो.)
- पोळी/भाकरीबरोबर भाजी वाढावी. (मी तर नुसतीही खाते. :फिदी:)
१. प्रत्येक कांदा-वांगं-बटाट्यासाठी एक-एक चमचा बेसन आणि पाव-पाव चमचा सांबार मसाला असं प्रमाणही वापरू शकता.
२. ही भाजी अगदी मंद गॅसवर कढईतच करावी लागते; प्रेशर-कुकर/प्रेशर पॅनमधे नाही.
३. जरा पेशन्सचं काम आहे, पण चव अप्रतिम लागते.
४. नुसत्या वांग्यांचीही भाजी चांगली लागते. एकदा मी केलेला मसाला जास्त झाला. म्हणून मी त्यात कांदे-बटाटे पण घातले. ते चांगले लागले. तेव्हापासून या तीनही भाज्या वापरून करते.
५. मी चमचा-वाटी मोजून काटेकोर प्रमाण कधी घेत नाही. मात्र कोळ घालण्यापूर्वी कोरड्या मिश्रणाची चव घेऊन पाहते.
६. ३० मिनिटे हा वेळ भाज्या चिरण्यापासून ते भाजी शिजण्यापर्यंतचा धरलेला आहे.
भारी आहे पाकृ, माहितीच्या
भारी आहे पाकृ, माहितीच्या स्त्रोताकडे खायला मिळणार का?
पण वांगी फ्यानांसाठी मस्ट आणि मस्त आहे, करणेत येईल कृ का ची वा आली होती, नुकतीच संपली आहेत, आता मिळेल त्या वांग्यावर समाधान मानावे लागेल
व्वा मस्त रेसिपी!!! फोटो अगदी
व्वा मस्त रेसिपी!!! फोटो अगदी तोंपासू..
आगळी-वेगळी रेसिपी.. नक्की करणार...
चमचमीत. वांगी भयानक प्रिय,
चमचमीत. वांगी भयानक प्रिय, करून पाह्यलाच हवी
लले, तु आणि वांग्याची पाकॄ
लले, तु आणि वांग्याची पाकॄ तुमसे यह उम्मीद ना थी
लले, अगदी टिपांसहित! जाडसर
लले, अगदी टिपांसहित! जाडसर बेसन वगैरे!
लवकरच पाकृंच पुस्तक लिहिलंस तरी आश्चर्य वाटणार नाही!
मस्त पाकृ सांबार मसाला हिट
मस्त पाकृ सांबार मसाला हिट है !
मी कांदे खाईन बाकिच्याना वांगी
दिसतंय चांगलं. पण वांग्याचं
दिसतंय चांगलं. पण वांग्याचं आणि माझं काही जमत नाही... त्यामुळे पास!!
मस्त. एकदम तोंपासु. नवर्याला
मस्त. एकदम तोंपासु. नवर्याला सांबार मसाला आणि दाक्षिणात्य पदार्थ भारीच प्रिय असल्याने नक्कीच करुन बघणार
मस्त!
मस्त!
छान वाटते आहे भाजी. भरल्या
छान वाटते आहे भाजी. भरल्या मसाल्यात बेसन चांगले लागेल. पण मी सांबार मसाला घालणार नाही! दुसरा कुठलातरी घालीन गरम, काळा, गोडा, कोल्हापुरी, दगडू तेली इ. पैकी. गोड काही नको का यात, गूळ-साखर?
बर, "चळचळीत फोडणी" म्हणजे काय?
मानुषीताई, इकडची वांगी खाल्ली नाहीत काय घरच्यांनी? "वांगी ती वांगी" म्हणतायत ते!
लले, उतरलीस का या प्रांतात
लले, उतरलीस का या प्रांतात सुद्धा! मस्त दिसताहेत वांगी आणि रेसिपी. करून बघणारच.
पुपाशु!
अरेच्च्या, इतके प्रतिसाद!
अरेच्च्या, इतके प्रतिसाद! थ्यांकू
कृ.का.ची वांगी.... हाय! :सांगली-कर्हाडमधे बालपणीची प्रत्येक सुट्टी घालवलेली बाहुली:
मंजू, आशू, तुम्हाला वांगी आवडत नाहीत?? एका मोठ्या आनंदाला मुकता तुम्ही (मी गोड खात नाही, म्हणून माझ्या सा.बा. मला हेच ऐकवतात ;))
लोला, गरम, काळा इ. मसाले घातले, तर ती नेहमीचीच भरल्या वांग्याची भाजी होईल ना? सांबार मसाल्याचा स्वाद ही या भाजीची खासियत आहे.
चळचळीत फोडणी म्हणजे काय? - या प्रश्नाचं उत्तर 'अ' ते 'ज्ञ' यांपैकी कुठल्याही अक्षरांनी लिहिता येणार नाही. तो घमघमाटावरून ओळखायचा प्रकार आहे.
यो, मी एकवेळ पदयात्रा करत काशीला जाईन, पण पाकृचं पुस्तक कदापि लिहिणार नाही
ललीने ट्रॅक बदलला ? अभिनंदन
ललीने ट्रॅक बदलला ?
अभिनंदन लले...
सुपर्ब
सुपर्ब
बेसन कच्च घालायचय ना? शिजत
बेसन कच्च घालायचय ना?
शिजत असे घालून? पाणी सुद्धा नाही म्हणून विचारतेय की आतले बेसन कसे शिजते?
लले लले गहिवरुन आल्याने पुढे
लले लले गहिवरुन आल्याने पुढे लिहायला सुचत नाहिये काही. त्या गहिवराच्या भरात मी चक्क पैसे खर्च करुन समस केला तुला
भारी वाटततेय. करगे देखेंगे इस्सी विकांत को.
यो, मी एकवेळ पदयात्रा करत
यो, मी एकवेळ पदयात्रा करत काशीला जाईन, पण पाकृचं पुस्तक कदापि लिहिणार नाही >> पुस्तक लिहू नकोसच... अनुवाद कर
आणि अनुवाद करुन मग पुन्हा " ओ
आणि अनुवाद करुन मग पुन्हा " ओ मारिया .."
ललिता...तेरा वांग तो बस
ललिता...तेरा वांग तो बस निकलपडा घरघरमे...काँग्रॅट्स....
अब दुसरी रेसिपी कौनसी???
रेसिपीचं भरीत... ऊप्स
रेसिपीचं भरीत... ऊप्स वांग्याचं भरीत
कवी, हाच कोरडा मसाला भेंडीत
कवी,
हाच कोरडा मसाला भेंडीत भरून थोड्या जास्त तेलावर परतून आमच्याकडे भरली भेंडीही करतात.
हाच कोरडा मसाला भेंडीत भरून
हाच कोरडा मसाला भेंडीत भरून >>> १५ वर्षं होऊन गेली हिच्या लग्नाला, आजवर एकदाही केलेली खाल्ली नाहीये, करताना पाहिलेली नाहीये, ऐकलेलीही नाहीये
कवे, गहिवरून
समसचे पैसे वाया जाणार नाहीत तुझे, भाजी जमेल तुला पहिल्याच प्रयत्नात
लले, परवा तूच म्हणालीस की
लले, परवा तूच म्हणालीस की उकाड्यामुळे तुझ्या घरी यायचं की नाही ते बघू म्हणून, नाहीतर मी ठरवलंच होतं यावेळी तू आलीस की भरली भेंडी करायचं
लले भाजी बरोबरच रव्याचे अप्पे
लले भाजी बरोबरच रव्याचे अप्पे पण करेन म्हणतेय विकांताला. गरज पडल्यास एकाच तज्ञाला फोन लावून दोन्हीच्या शंका फेडण्याच काम एकाच फोन कॉल मधे होईल म्हणजे
लले.. तुझी रेस्पी ईनोदी
लले.. तुझी रेस्पी ईनोदी विभागात हलव पाहू...लईच हसवतीयेस लोकांना...
हाच कोरडा मसाला भेंडीत भरून
हाच कोरडा मसाला भेंडीत भरून थोड्या जास्त तेलावर परतून आमच्याकडे भरली भेंडीही करतात >>> लग्न कार्यालयात असते ना अशीच भेंडी ?
आहाहा तोपासु एकदम.
आहाहा तोपासु एकदम.
वा वा भारी दिस्तेय ही
वा वा भारी दिस्तेय ही रेसिपी!!
करण्यात येईल.
>>गरम, काळा इ. मसाले घातले,
>>गरम, काळा इ. मसाले घातले, तर ती नेहमीचीच भरल्या वांग्याची भाजी होईल ना?
नाही, मी बेसन घालत नाही वांग्यात त्यामुळे माझ्यासाठी तरी नवीन भाजी होईल.
बाकी "लले, लले" करत टाईमपास करणार्या बायकांशी गप्पा मारण्यात विचारलेल्या प्रश्नांकडं दुर्लक्ष करु नको. ती झंपी बघ काय विचारतेय. उत्तर दे नाहीतर ती म्हणेल "यात काय वेगळं आहे? फक्त सांबार मसाला घातलाय" मग तू काय म्हणणार? तूच वर लिहिलंयस तसं.
अय्या, लोला किती
अय्या, लोला किती दिवसाने?
किती हो काळजी.. पण मी कधी असे म्हणाले... ह्यात काय वेगळं... ते दुसर्या बाई म्हणत. विसरलीस का?
Pages