छोटी वांगी - ६
छोटे कांदे - २
छोटे बटाटे - २
डाळीचं पीठ (बेसन) - एक ते सव्वा वाटी (किंचित जाडसर बेसन असल्यास उत्तम.)
सांबार मसाला - ३-४ चमचे
धने पूड - अर्धा चमचा
जीरेपूड - अर्धा चमचा
चिंचेचा पातळ कोळ - पाऊण वाटी
मीठ - चवीनुसार
तिखट - चवीनुसार
तेल
- वांगी धुवून आणि कांदे, बटाटे सालं काढून उभी चीर पाडून घ्यावेत. (देठाचा थोडा भाग ठेवला, तर वांगी पालटायला सोपी जातात.)
- चिंचेचा कोळ आणि तेल वगळता अन्य कोरडं साहित्य एका भांड्यात चांगलं मिसळून घ्यावं.
- आता या मिश्रणात अंदाज घेत थोडा थोडा चिंचेचा कोळ घालावा. मिश्रणाचा ओला लगदा होता कामा नये. केवळ त्याचा भुरभुरीतपणा जावा आणि ते वांग्यात व्यवस्थित भरता यावं इतकाच कोळ घालायचा.
- हा मसाला कांदा-वांगं-बटाट्यात भरावा.
- कढईत तेलाची चळचळीत फोडणी करून त्यावर भरली वांगी-कांदे-बटाटे ठेवावेत.
- झाकण टाकून एक वाफ द्यावी.
- झाकण काढून मसाला उरला असेल तर तो भाजीवर पसरावा. वांगी-कांदे-बटाटे थोडे हलवावेत. (हे अलगद करावं लागतं. नाहीतर अर्धा कोरडा मसाला बाहेर येतो.) २-३ चमचे चिंचेचा कोळ सगळीकडे पसरून घालावा. पुन्हा झाकण ठेवून वाफ द्यावी. भाजी खरपूस शिजेपर्यंत हे करावं. (३-४ वेळा कोळ घालावा लागतो.)
- पोळी/भाकरीबरोबर भाजी वाढावी. (मी तर नुसतीही खाते. :फिदी:)
१. प्रत्येक कांदा-वांगं-बटाट्यासाठी एक-एक चमचा बेसन आणि पाव-पाव चमचा सांबार मसाला असं प्रमाणही वापरू शकता.
२. ही भाजी अगदी मंद गॅसवर कढईतच करावी लागते; प्रेशर-कुकर/प्रेशर पॅनमधे नाही.
३. जरा पेशन्सचं काम आहे, पण चव अप्रतिम लागते.
४. नुसत्या वांग्यांचीही भाजी चांगली लागते. एकदा मी केलेला मसाला जास्त झाला. म्हणून मी त्यात कांदे-बटाटे पण घातले. ते चांगले लागले. तेव्हापासून या तीनही भाज्या वापरून करते.
५. मी चमचा-वाटी मोजून काटेकोर प्रमाण कधी घेत नाही. मात्र कोळ घालण्यापूर्वी कोरड्या मिश्रणाची चव घेऊन पाहते.
६. ३० मिनिटे हा वेळ भाज्या चिरण्यापासून ते भाजी शिजण्यापर्यंतचा धरलेला आहे.
आखिर मैंने भी एक पाकृ चिपकाही
आखिर मैंने भी एक पाकृ चिपकाही दी ... !!
अरे खूपच छान आगळा वेगळा
अरे खूपच छान आगळा वेगळा प्रकार. नेहेमी तेच तेच दाण्याचे कुट आणी तीळ कुट वापरुन कंटाळा आलाय. धन्यवाद ललिता.
लले, तोंपासु माझ्यासारख्या
लले, तोंपासु
माझ्यासारख्या स्वैपाकमठ्ठ व्यक्तीलासुद्धा करून पहावीशी वाटतेय.
वरदा, मी पण तुझ्याच लायनीतली
वरदा, मी पण तुझ्याच लायनीतली आहे गं
मस्त रेसिपी >>>>छोटे कांदे -
मस्त रेसिपी
>>>>छोटे कांदे - २
डाळीचं पीठ (बेसन) - एक ते सव्वा वाटी (किंचित जाडसर बेसन असल्यास उत्तम.)
धने पूड - अर्धा चमचा
जीरेपूड - अर्धा चमचा
तिखट - चवीनुसार
तेल>>>>>>>
वर दिलेले सगळे मसाले कांदा वैगरे भाजुन वाटायचे की कापुन डायरेक्ट वांग्यात भरायचे?
भारी दिसतंय. वांगी अगदी
भारी दिसतंय. वांगी अगदी प्रज्वलीत दिसतायत, क्रांतीज्वाळांसारखी!
मस्तय रेस्पी लले..
मस्तय रेस्पी लले.. माझ्याकडे छोटे बटाटे आहेत त्यांचं काय करायच प्रश्नच होता आता ते बटाटे खपवाय्ला वांगी नि छोटे कांदे ( म्हण्जे नाल्यासाठी घोडा ) आणते नि ही रेस्पी करुन बघते..
लले.. कांदे दिसत नाहीयेत विरघळलेत की काय ग ??
मेधे, दिसतायत ते कांदेच आहेत,
मेधे, दिसतायत ते कांदेच आहेत, फोटोतल्या भाजीत बटाटे नाहीयेत...
लले मस्त रेस्पी, अतिशय
लले मस्त रेस्पी, अतिशय तोंपासु, पण सध्या वांगी खायला बंदी आहे मला
हायला लले तुम भी? (रेसिपी
हायला लले तुम भी? (रेसिपी लिखती हो?)
मस्त दिसतोय हा वेगळा प्रकार. नक्की करणार!
मस्त रेसिपी >>>>छोटे कांदे -
मस्त रेसिपी
>>>>छोटे कांदे - २
डाळीचं पीठ (बेसन) - एक ते सव्वा वाटी (किंचित जाडसर बेसन असल्यास उत्तम.)
धने पूड - अर्धा चमचा
जीरेपूड - अर्धा चमचा
तिखट - चवीनुसार
तेल>>>>>>>
वर दिलेले सगळे मसाले कांदा वैगरे भाजुन वाटायचे की कापुन डायरेक्ट वांग्यात भरायचे? अ ओ, आता काय करायचं
..आखिर मैंने भी एक पाकृ
..आखिर मैंने भी एक पाकृ चिपकाही दी...ललिता......
मस्त तोंपासु दिस्तीये भाजी आणी छान सोप्पीही ..वॉव
अविगा, रेसिपी आणि टिपा
अविगा, रेसिपी आणि टिपा लक्षपूर्वक वाचा. तुम्हाला उत्तर मिळेल.
लल्ले, पैलीच रेस्पी
लल्ले, पैलीच रेस्पी लिहिलीस...ती पण वैंग्याची? वैट्टंहेस!
लले.. बटाटे कसे विरघळवलेस
लले.. बटाटे कसे विरघळवलेस ते पण लिही की ग..
लले तू आणि पाकृ स्क्रोल केले
लले तू आणि पाकृ
स्क्रोल केले तर एव्हड्या स्मायली.. मला वाटले विनोदी लेखन चुकुन इकडे टाकलेस की काय
बाकी दिसतय भारी.. नक्की करण्यात येइल
अरे वा, वांगी बटाट्याच्या
अरे वा, वांगी बटाट्याच्या आणखी एक अनोखा प्रकार !
मंजत, तू वांग्याशिवाय बनव.
मंजत, तू वांग्याशिवाय बनव. हाकानाका.
ललिताजीssssss आप भी, क्या बात
ललिताजीssssss आप भी, क्या बात है
मस्त दिस्त्येय बाकी रेसिपी
स्क्रोल केले तर एव्हड्या स्मायली.. मला वाटले विनोदी लेखन चुकुन इकडे टाकलेस की काय <<< वर्षे
लले, माहितीचा स्रोत वाचून
लले, माहितीचा स्रोत वाचून गहिवरून आलं.
माझ्या साबा(त्यामुळे मी पण) कोरडाच मसाला (बेसन, तिखट, मीठ, सांबार मसाला, थोडं शेंगदाणा कूट) वांगं, कांदा-बटाट्यात भरतात, भाज्यांच्या ओलेपणामुळे तो मसाला चिकटून राहतो आणि फ्राय पॅन मधे तेलावर हे सगळे भरलेले तुकडे ठेवल्यावर त्याच्यावर एकेका वाफेला चिंचेचा कोळ सोडतात.
बरेच दिवसात केली नाही ही भाजी, चला उद्याच करते आता
छान रेसिपी! आजच वांग्याची
छान रेसिपी! आजच वांग्याची भाजी केली पण तेव्हा हे वाचले नव्ह्ते नाहीतर लगेच करण्यात आली असती
आज चांगली छोटी काटेरी वांगी
आज चांगली छोटी काटेरी वांगी मिळाली आहेत. तेव्हा उद्याला ही भाजी करण्यात येइल.
(No subject)
सध्या मलापण वांगी खाण्यावर
सध्या मलापण वांगी खाण्यावर बंदी आहे. पण भाजी बघून राहावत नाही.. तेव्हा माझी खाद्यबंदी उठल्यावर मी ही भाजी करुन खाणारच..
- पिंगू
भाजी एकदम खल्लास दिसतेय.
भाजी एकदम खल्लास दिसतेय.
आम्ही अशी भरली घोसाळी (इथे झुकिनी) करतो. वर दिलेला मसाला वजा कोळ + भाजलेले आख्खे तीळ + आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस. चिंचेचा कोळ घालून करेन आता.
अरे हो, कोथिंबीर नाही घालायची
अरे हो, कोथिंबीर नाही घालायची मसाल्यात ? आमच्यात ती 'मस्ट' आहे
भन्नाट पाकृ. सांबारमसाला
भन्नाट पाकृ. सांबारमसाला घालून करतात हे नव्हतं माहिती. नक्की करणार.
छान आहे रेसिपी. सांबार मसाला
छान आहे रेसिपी. सांबार मसाला वापरून पहिल्यांदाच ऐकली. करणार नक्की.
वांग्यांचे कट्टर फॅन घरी
वांग्यांचे कट्टर फॅन घरी आहेत, त्यांच्याकडे ही पाकृ अतीव प्रेमाने सुपूर्द करण्यात येईल!
वा! ललिता मस्त पाकृ! माझ्या
वा! ललिता मस्त पाकृ!
माझ्या एका मैत्रिणीने परवा कोरडा मसाला भरून चाळणीवर वांगी वाफवली. केवळ अप्रतीम! बिन तेलाची वांग्याची भाजी कशी काय ? असा प्रश्न पडला होता पण फार चविष्ट झाली होती.
अर्थातच वांगी सांगलीची होती बरं! कृष्णाकाठची! तिचंही म्हणणं पडलं की अशी बिन तेलाची वांगी करायला तुमची ती नगरी वांगी नाही चालणार. यासाठी फक्त कृष्णाकाठचीच वांगी!
असो.........आमच्या घरात हा वादाचा मुद्दा आहे! वांगी ती वांगी.............त्यात काय एवढा फरक असणार आहे? इ.इ.
Pages