चंद्रशेखर गोखले ह्यांच्या 'मी माझा' ह्या प्रसिद्ध संग्रहात एक चारोळी आहे.
'घर दोघांचं असतं
ते दोघांनी सावरायचं
एकाने पसरवलं
तर दुसर्याने आवरायचं'
एक आणि दुसरा आलटून पालटून पसरवणं-आवरणं करत असतील तर खरंच त्यात रेखाटलेलं सहजीवनाचं चित्र रम्य आहे. गोखल्यांच्या प्रत्येक चारोळीबरोबर अनेक प्रति-चारोळ्या येतातच. ही चारोळी वाचल्यावर वाटलं की प्रत्यक्षात मात्र ...
'घर दोघांचं असतं
त्यात दोघांनी वावरायचं
त्याने पसरवलं
तरी तिनेच आवरायचं' असंच चित्र बहुतकरुन दिसतं.
शिक्षण आणि करियर-निवड आपल्या मनाप्रमाणे करणे आजच्या काळात मुलींसाठी तुलनेने सोपे झाले आहे. वयाच्या एका टप्प्यानंतर मात्र मुलीची वाट अजूनही वेगळी होते. त्यातही अधोरेखित करुन सांगायचे तर लग्नानंतर. करियर करायचे की होममेकर व्हायचे की नोकरी आणि ब्रेक आलटून-पालटून की आधीची नोकरी सोडून नवऱ्याबरोबर नवीन जागी स्वत:ला रुजवायची धडपड ... एक ना अनेक पर्याय ! ह्या पर्यायांबद्दल आक्षेप नाही. किंबहुना मुली अतिशय डोळसपणे ह्या पर्यायांना सामोरं जातात. पण पर्यायाची निवड केली की प्रश्न संपतात का ? तर तसे नाही. नाहीतर मग नोकरीत अत्यंत यशस्वी असणारी पण मुलांसाठी वेळ काढू शकत नाही ह्या गिल्टचं ओझं बाळगणारी किंवा घरासाठी खस्ता खाल्ल्या पण आपल्यासाठी वेळ काढायचा राहून गेला, छंद जोपासायचे राहूनच गेले असं म्हणून हळहळणारी किंवा पैसे कमावत असून आर्थिक स्वातंत्र्य नसणारी किंवा मल्टिटास्किंग करताना दमछाक होणारी स्त्री आजूबाजूला सतत का बरं दिसली असती ?
स्त्री नोकरी करत असो वा पूर्णवेळ गृहिणी असो, कुठलीही भूमिका निभावताना तिला ओढाताण न होता ती समाधानाने निभावता येणं, त्या भूमिकेचा काच न वाटणं हे साधायचं असेल तर तर तिच्या आजूबाजूच्या माणसांनी, विशेष करुन तिच्या जोडीदाराने सहजीवनातील आपली जबाबदारी ओळखणं आणि ती वाटून घेणं अतिशय आवश्यक आहे. जोडीदाराची साथ असेल तर बाकीचे अडथळे पार करणे सुकर होते हे नक्की !
आपापली स्वप्नं पूर्ण करत एकमेकांच्या साथीने वाट चालताना आणि 'घर दोघांचं' उभं करताना तिच्या जोडीदाराचा सहभाग आणि पाठिंबा किती आणि कसा असतो हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणं हा ह्या धाग्याचा उद्देश आहे.
ह्या धाग्यावर काय लिहिणे अपेक्षित आहे ? :
हा धागा पुरुषांसाठी आहे. 'मी अमूक अमूक करतो.' अशा प्रकारच्या पोस्ट्स अपेक्षित आहेत.
१.प्रापंचिक जबाबदारीचं ओझं फक्त बायकोच्या खांद्यावर पडू नये म्हणून तुम्ही काळजी घेता का ? घेत असल्यास कशा प्रकारे घेता ? कामांचं स्वरुप लिहू शकाल का ?
२.आपापल्या ध्येयांमागे धावताना नवरा-बायकोंची वर्तुळं छेदतात ती घर आणि घरातील इतर सदस्य, मुलं ह्यांच्यामुळे. ह्यांच्याशी संबंधित असलेली कामं तुम्ही कशाप्रकारे वाटून घेता ?
३.घरातल्या स्त्रीला तिच्या छंदांसाठी वेळ काढता येतो का ? तिला आपले छंद जोपासता यावेत म्हणून तुम्ही कशाप्रकारे प्रयत्न करता?
४.तुमची बायको नोकरी करणारी किंवा गृहिणी ह्यापैकी कुठल्याही भूमिकेत असेल तरी तिला फक्त स्वत:साठी असा थोडा तरी वेळ बाजूला काढण्याची संधी मिळते का ? ती संधी मिळावी म्हणून तुम्ही खास प्रयत्न करता का ? कोणते ?
५.दोघांपैकी एकाला तडजोड करण्याची वेळ येणं हे कधीकधी अपरिहार्य आणि स्वाभाविक असू शकतं. अशावेळी साकल्याने विचार करुन बायकोऐवजी निदान काही काळासाठी ती तडजोड तुम्ही केली असे कधी घडले आहे का ? असेल तर त्याविषयी सांगू शकाल का ? उदा. जागाबदल, कामाच्या स्वरुपात बदल, हाती आलेली संधी सोडणे, बॅकसीट घेणे किंवा पूर्णपणे घरी राहणे, मुलांसंबंधीचे निर्णय किंवा तत्सम तडजोडी.
सगळ्यांनी सगळ्याच प्रश्नांची उत्तरं द्यावी असं नाही पण इतरांना उपयोगी ठरतील अशा गोष्टी आवर्जून शेअर करा. मात्र प्रश्नांची उत्तरं फक्त होकारार्थी किंवा नकारार्थी देऊ नये. उदाहरणे देऊन लिहावे.
आपल्या प्रतिसादांची वाट पाहत आहोत
--------------------------
वरील चारोळी वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल व्यवस्थापनातर्फे श्री. चंद्रशेखर गोखले यांचे मनःपूर्वक आभार.
बेफिकीर अत्यंत प्रामाणिक आणि
बेफिकीर अत्यंत प्रामाणिक आणि छान पोस्ट >> +१
वैद्यबुवा, खूप छान लिहिले आहे तुम्ही..आवडलं..
आगाऊ - 'देणारा मी कोण?' हे पटलं आणि आवडलं. >>+१
आगाऊ आणि असामी पोस्ट्स
आगाऊ आणि असामी पोस्ट्स आवडल्या.
सर्व लिखाण वाचले. चांगल्या
सर्व लिखाण वाचले. चांगल्या गोष्टी वाचयाला मिळाल्या. पण फक्त एकाच दिवशी महिला दिन का म्हणून साजरा करायचा. "घर दोघांचं असतं" तर मग सर्व कामे दोघांनी मिळून जर का केली तर प्रत्येक दिवस हा महिला दिन होईल.
ता. क : घरातील सर्व कामे आम्ही दोघे करतो. (स्वयंपाक सोडून, तो मी आता शिकत आहे.)
वैद्यबुवा, आगाऊ, असामी, योग
वैद्यबुवा, आगाऊ, असामी, योग यांच्या पोस्ट्स आवडल्या. केदार यांचंही कौतुक!
आगाऊ, असामी, पोस्ट्स आवडल्या.
आगाऊ, असामी, पोस्ट्स आवडल्या.
संयोजकांचे बीजभाषण, इतरांच्या
संयोजकांचे बीजभाषण, इतरांच्या पोस्टी आणि त्यावरचे प्रतिसाद वाचले. काही गोष्टी लिहायचा प्रयत्न करतो.
चारोळीबाबत असामीला अनुमोदन.
माझा अनुभव सांगायचा तर गेल्यावर्षी भारतात परत आल्यानंतर एकत्र कुटूंबात असल्याने खूप वैयक्तिक गोष्टी सोडता, 'घर दोघांचे'च नाहीये. घरात खूप जण असल्याने कामाची, जबाबदारीची, अर्थकरणाची आपोआपच वाटणी होते आणि घरकाम, स्वयंपाक, भाज्या आणणे, चिरणे वगैरे करायची माझ्यावर वेळ येत नाही. काही कामांसाठी कामवाली बाईही असते. बाहेरची कामं नेहमी केली जातात.
जेव्हा घरी असतो तेव्हा मुलीला संभाळणं, खेळवणं, फिरायला घेऊन जाणं, जेवण भरवणं, डायपर/कपडे बदलणं,झोपवणं हे सगळं मी करतो. मला ते आवडतं आणि मोठ्या भावाची दोन मुलं घरात असल्याने अगदी लहान बाळाला उचलायची, खेळवायची, झोपवायची वगैरे सवय पण होती. (ह्यावरून नातेवाईक मंडळींकडून जोरदार कौतुक ते प्रचंड तु.क. अश्या दोन्ही प्रतिक्रिया मिळतात!) घरकामाची जबाबदारी घरातल्या महिला वर्गावर असूनही सगळ्या महिलांचं सोशल सर्कल, छंद जोपासणं वगैरे व्यवस्थित सुरु असतं. कारण लागेल तसं वेळापत्रक/जबाबदार्या बदलणं, वेळा संभाळणं वगैरे सगळेच जण करतात.
लग्नानंतर अमेरीकेत असताना आम्ही दोघच होतो, तेव्हा स्वयंपाकापासून सगळी कामं दोघांनाही यायची आणि कामाच्या जबाबदार्या अधून मधून बदलायचो जेणेकरून कंटाळा नाही यायचा..
बर्याचदा लग्न झाल्यावर मित्रमैत्रिणींशी संपर्क रहात नाही आणि लग्न झाल्यामुळे वेळच मिळत नाही अशी सबब दिली जाते. आम्ही दोघांनीही आमच्या मित्र मैत्रिणींना एकदाही ही सबब दिली नाही किंवा आधी करत असलेली कुठली गोष्ट लग्नानंतर बंद केली नाही.. उलट काही गोष्टी आम्ही एकत्र करायला लागलो उदा. मी चालणे, पळणे, पोहोणे करत असे.. आता ती पण करते.. तिला इंग्लिश चित्रपट पहायची खूप आवड आहे.. आता मी पण बर्यापैकी बघायला लागलोय.. आणि हेच आम्ही एकमेकांसाठी वेळ आणि त्याचबरोबर दोघांनाही 'पर्सनल स्पेस' मिळत असल्याचं लक्षण मानतो.
>>>किंवा एखादे काम इतके वाईट
>>>किंवा एखादे काम इतके वाईट आणि चुकीचे करायचे, घोळ घालायचा आणि मग "बघ हे तुलाच जास्त चांगलं जमतं माझ्यापेक्षा!" म्हणून बायकोच्या गळ्यात घालायचे>>><<
+१०००
असामी, पराग मस्त पोस्ट!
असामी, पराग मस्त पोस्ट!
असामी, पराग छान लिहीलं आहे ..
असामी, पराग छान लिहीलं आहे .. लगे रहो!
छान लिहिताय सर्वजण...
छान लिहिताय सर्वजण...
पराग, पोस्ट आवडली
पराग, पोस्ट आवडली
पराग छान पोस्ट!
पराग छान पोस्ट!
वाचते आहे. वैद्यबुवा, आगाऊ,
वाचते आहे. वैद्यबुवा, आगाऊ, पराग - पोष्टी आवडल्या.
परागच्या शेवटच्या पॅराला
परागच्या शेवटच्या पॅराला अनुमोदन!
माझ्या लग्नाला जेमतेम २ वर्षे
माझ्या लग्नाला जेमतेम २ वर्षे होतील त्यामुळे माझे अनुभव फारच कमी 'इतिहासा'वर आधारीत आहेत. तसेच बहुतकरून हा सर्व वेळ आम्ही एकएकटे किंवा फक्त दोघेच असे राहिलो आहोत त्यामुळे एकत्र कुटुंब/इतर नातेवाईक वगैरे अनुभव नाहीत.
घराची एकुण कामे दोघांच्यात आपोआप विभागली गेली आहेत. माझ्या हातच्या सर्व स्वयंपाकाला (खिचडी ते उसळ) एकच चव येत असल्याने स्वयंपाक ती करते. भांडी/मागचे आवरणे/वॅक्युम क्लीनरने घर साफ करणे मी करतो. कपडे वॉशिंग मशिनला लावणे, घड्या करणे वगैरे जो हजर असेल तो करतो. इस्त्र्या स्वतःच्या स्वतः करतो. हंगेरीत आल्यापासून आठवड्यातून एकदा साधारण सर्व बाजार होतो तो दोघेही जाउन करतो - मी मुखतः ओझी उचलायला. तिला जर वस्तू निरखून (म्हणजे सुपरमार्केट/प्लाझात खूप वेळ घालवत) बघायच्या असतील ती मी कटाप होतो. एकूणात गेल्या दीड वर्षात घरकाम तुझे की माझे असा संवाद-वाद वा त्यावरून कुरबुर झाल्याचे आठवत नाही. म्हणजे बहुतेक ते सुरळीत चालू आहे.
बाकी अनेक बाबतीत आमचे मतभेत होतात - दोघांचे स्वभाव संपूर्ण भिन्न आहेत, आवडी-निवडी भिन्न आहेत. एका गोष्टीवर एकमत आहे ते म्हणजे दोघांनी कायम नोकरी-धंदा करत राहायचे, घरी बसायचे नाही. मग त्यासाठी वेगवेगळे काही दिवस-महिने तरी चालेल. त्यामुळे दीड-पावणे दोन वर्षाच्या काळात ६-८ महिने वेगळे राहिलो. त्याच्या तडजोडी - मुख्यतः मानसिक - दोघांनाही कराव्या लागल्या. बायकोने हंगेरीत येऊन धडपड करून नोकरी मिळवली - तीसुद्धा तिच्याच क्षेत्रात, काम पगार ह्यात तडजोड न करता ह्याचा मला अत्यंत अभिमान वाटला. अर्थात नोकरी नसती मिळाली तर रजा संपल्यावर भारतात जाऊन तिथली नोकरी सुरू करणे हे ठरलेले होते. इथेदेखील तिला जवळपास २ तास सकाळी आणि २ तास संध्याकाळी प्रवास करावा लागतो आहे. मी बुडापेस्टला घर घेउ असे म्हणत होतो पण इथे सेकेशफेहेरवारात माझा खेळाच्या वगैरे ग्रुप जमला आहे, माझे कामाचे तास जास्त आहेत वगैरे कारणाने तिने रोज बुडापेस्ट अपडाउन करण्याचा निर्णय केला आहे. अर्थात तिच्या स्केड्युलनुसार आम्ही रोजची कामाची-जेवणाची वगैरे घडी बदलली आहे. रात्री दोन वेळचे जेवण ती करते, मी बाकी सर्व आवरा-आवरी करतो. दोन दिवस जेव्हा संध्याकाळी तिचा झुम्बा वगैरे क्लास असतो तेव्हा मी जेवण करतो. संध्याकाळी घरी जाउन काहितरी खाणं करुन ठेवतो ज्यामुळे ती आली की तिला खायला काहितरी असेल (१० पैकी ८ वेळा धिरडी करतो ). पुढल्या वर्षी मला पुन्हा कुठेतरी जायला लागेल - तिला पुन्हा नवीन नोकरी तरी शोधायला लागेल किंवा पुन्हा भारतात जायला लागेल. हा विचार करून पुढील वर्षी अश्या जागी जायचा निर्णय घेतला आहे जिथे तिला उच्चमहाविद्यालयीन शिक्षण घेता येईल आणि मला काम करता येइल. पदव्युत्तर शिक्षण करच हा आग्रह मात्र माझा - माझ्या अनुभवानुसार त्यामुळे तिला जरी दोन वर्षे नोकरीतून ब्रेक घ्यावा लागला तरी पुढे ते तिच्या फार फायद्याचे ठरेल. मला इथे युरोपमध्ये अधिक पैसे-करीअरच्या तुलनेत बरा ब्रेक मिळाला असता जर पुढली काही वर्षे इथे थांबलो असतो तर पण एकत्र राहता येणं व बायकोचे पदव्युत्तर शिक्षण अश्या दोन्ही गोष्टी होत असल्याने दोघेही बहुतकरून अमेरिकेत जाऊ पुढल्या वर्षी. अर्थात बायकोने लगेच मागल्या वर्षी टोफेलचा पूर्ण अभ्यास केला, चांगले मार्क मिळवले आणि आत्ता जाने-२०१४ च्या टर्मसाठी तिच्याकडे ६ अॅडमिशन आहेत - १ युनिने फुल स्कॉलरशिपपण दिली आहे. हे सर्व श्रेय तिचे - फक्त युएसला जायचे, मग तिकडे गेल्यावर बघू पुढल्यावर्षी असे न करता तिने परिक्षेचा अभ्यास, अॅप्लिकेशन वगैरे पूर्ण तयारीने केले. त्याचे फळ ती उपभोगते आहे.
घरातील इतर नाती/सासर वगैरे बाबतीत 'तू स्वतंत्र आहेस. कुठल्याही रुढी-परंपरा ह्या पाळायसाठी नसतात' हा घोषा मी पहिल्यापासून लावला. ''तुला' हवे तसे तू वाग, दुनियेची कदर करू नकोस आणि लग्न केलं म्हणुन तु काहितरी वेगळी झालीस' ह्या तीन गोष्टी सारख्या सांगतो. ह्याची सुरुवात 'नाव-आडनाव' बदलू नकोस इथून झाली. म्हणजे तिला बदलायचे असते तर बदलले असते पण तिला काही तसे करायचे नव्हते. मग नाही झाले.
तिला काही गोष्टींची हौस आहे. उदा मंगळागौर - ती तिने हौसेने केली. सत्यनारायण पाच वर्षातून एकदा ह्यावर मांडवली झाली. तिचे चार देव लग्नानंतर आले होते घरात त्यांना देवघर आणले - देवघर आणण्यात मी सहभाग दाखवला. पण तिने मला देवपूजा कर वगैरे सांगितले नाही (सुदैवाने ते देव विसा न मिळाल्याने भारतात आहेत :फिदी:). मला सारखे हिंडायचे असते, त्यात ती आनंदाने तर कधी दमलेली असली तरी सहभागी होते. मला अनेक गोष्टींची हौस आहे. त्याला मी बराच वेळ देत असतो. ते तिला विचित्र वाटते. तिला ते विचित्र वाटते ते मला विचित्र वाटते. मग भांडतो, शिकतो, पुढे जातो. 'भांडण हाच खरा गुरू' ह्या मंत्राने वाटचाल करीत आहोत. माझ्यामुळे तिच्या काही सवयी बदलल्या आहेत, माझ्या क्वचितच - पण त्या पुरुषी अहंकारामुळे नसून मूळ आडमुठ्या स्वभावामुळे आहे. एकुणात देवाणघेवाण चालू आहे.
वा टण्या! छान!
वा टण्या! छान!
टण्या, प्रामाणिक पोस्ट एकदम
टण्या, प्रामाणिक पोस्ट एकदम
>>टण्या, प्रामाणिक पोस्ट
>>टण्या, प्रामाणिक पोस्ट एकदम>> +१
पराग, चांगलं पोस्ट, पण हातचं
पराग, चांगलं पोस्ट, पण हातचं राखून लिहिल्यासारखं वाटतंय.
टण्या, प्रामाणिक लिहिलंय.
पग्या, टण्या, असामी, बुवा,
पग्या, टण्या, असामी, बुवा, पोस्ट्स आवडल्या.
आगाऊंची ('देणारा मी कोण') अर्थातच सर्वाधिक आवडली.
काही पोस्ट्समधले 'बायकोला वेळ देऊ शकत नाही' (अॅज अपोझ्ड टू 'बायकोबरोबर वेळ मिळत नाही') अशा प्रकारचे उल्लेख (त्यातला भावार्थ लक्षात घेऊनही) आवडले नव्हते. आगाऊंच्या पोस्टमुळे त्यावर जरा सुखद मलमपट्टी झाली.
बेफींच्या पोस्टमधे व्यक्तिगत तपशील जरा जरूरीपेक्षा अधिक वाटला, पण पोस्ट प्रामाणिक आहे नक्कीच.
सगळ्या पोस्ट्स अजूनही वाचून झाल्या नाहीयेत.
============================================================
मथळ्यातील चारोळीमुळे घरकाम या विषयावर उगाचच आवश्यकतेपेक्षा अधिक फोकस झाला आहे असं सतत वाटत राहिलं. घरात सगळ्या कामांना मोली माणसं लावलेली असली तरीही एकंदर प्रापंचिक निर्णयप्रक्रियेत एकाला सतत आणि नाइलाजाने बॅकसीट घ्यावी लागण्याची उदाहरणं कमी नाहीत. मुद्दा अधोरेखित व्हायला हवा होता तो हा.
आगाऊंची ('देणारा मी कोण')
आगाऊंची ('देणारा मी कोण') अर्थातच सर्वाधिक आवडली. >>> +१
घरातल्या कामाचं विभाजन करताना
घरातल्या कामाचं विभाजन करताना पैसे कमावून आणणे आणि ज्या घरासाठी ते कमावतो त्याच्याशी, घरातल्या माणसांशी संबंधित कामं असे दोन ढोबळ गट पडतात. ह्या दोन गोष्टींत असमतोल झाला तर ओढाताण होते. ’घर दोघांचं’ म्हणजे तराजूच्या पारड्यात तोलून ५०-५० कामं वाटून घ्या असं नाही पण तशी जाणीव असेल तर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार जबाबदाऱ्या योग्य रितीने वाटून घेतलेल्या असतात, त्या बदलण्याची तयारी ठेवली जाऊ शकते, छंद जोपासण्यासाठीचं वेळेचं नियोजन विचारपूर्वक केलं जातं. एकच व्यक्ती सतत आणि सक्तीने बॅकसीट घेत नाही ह्याची काळजी घेतली जाते.
त्यादृष्टीने सगळ्यांच्या पोस्ट्स आणि त्यात मांडले गेलेले वेगवेगळे अनुभव मस्त आहेत
तो 'देणारा' मी कोण? >>> आगाऊ, ह्या मुक्कामापर्यंत जास्तीतजास्त घरं पोचतील अशी आशा करुया
>>दोन दिवस जेव्हा संध्याकाळी
>>दोन दिवस जेव्हा संध्याकाळी तिचा झुम्बा वगैरे क्लास असतो तेव्हा मी जेवण करतो. संध्याकाळी घरी जाउन काहितरी खाणं करुन ठेवतो ज्यामुळे ती आली की तिला खायला काहितरी असेल (१० पैकी ८ वेळा धिरडी करतो )>><< छान! भूकेला हे आयतं(पदार्थाचे नाव नाही) हे नशिब.
मजा आली वाचताना.
टण्या, पोस्ट खूपच आवडली!!
टण्या, पोस्ट खूपच आवडली!!
टण्याची पोस्ट खूप आवडली.
टण्याची पोस्ट खूप आवडली.
माझा नवरा माबोकर नाही नाहीतर त्याने सुद्धा टण्याच्या स्टोरीशी मिळतीजुळती पण १३ वर्षांइतकी लांब स्टोरी लिहिली असती.
लहान (म्हणजे आजकालच्या तुलनेत :)) वयात लग्न, अमेरिकेतील दोघांची पदव्युत्तर शिक्षणं, नोकरीची धडपड, त्यानुसार एकत्र/वेगळे राहणे, माझे शिक्षण चालू असतानाच मुलीचा जन्म (गोड सरप्राईज म्हणा हवं तर), त्यावेळी घरचे कुणीही मदतीला नसताना त्याने एकट्याने केलेले माझे बाळंतपण, बाळाचा सांभाळ, आणि आता गेली ९ वर्षे मुलीच्या सगळ्या अॅक्टीव्हीटीज/अभ्यास सांभाळताना दररोज लागणारा त्याचा हातभार......सगळं सगळं कौतुकास्पदच आहे.
आता अगदी रोजचा स्वयंपाक वगैरे चटचट करणं नाही जमत एखाद्याला, भारंभार पसारा करायची असते सवय, पण हे आवरून घे, ते चिरून दे म्हणल्यावर घेतो हे विशेष.
बाकी देवधर्म, घरचे कुलाचार, नातीगोती, या सर्व बाबत टण्याच्या स्टोरीला मम म्हणू शकतो आम्ही. दोघे बर्यापैकी नास्तिक गटातले आहोत पण मला हळदीकुंकू टाईप सोशल प्रकार जाम आवडतात. मी खूप बडबडी तर तो एकदम अबोल आहे. मी पक्की खवय्या आहे तर त्याला खाण्याची तशी विशेष आवड नाही. मी साबासाबुंबरोबर खूप क्लोज आहे त्यामुळे त्यांच्या गप्पांपेक्षा आमच्याच जास्त गप्पा होतात.
महिलादिनाच्या निमित्ताने या सर्व मंडळींचे अभिनंदन.
वरच्या सर्वच पोस्टी आवडल्या,
वरच्या सर्वच पोस्टी आवडल्या, बेफिकिर्,आगावु,बुवा आणी टण्या या.न्च्या पोस्टी प्रामाणिक वाटल्या.
वाचत आहे. आवडत आहे.
वाचत आहे. आवडत आहे.
धागा वाचतेय, आवडला.
धागा वाचतेय, आवडला.
लग्न होण्यापूर्वीही आमची
लग्न होण्यापूर्वीही आमची चांगली मैत्री होती. त्यामुळे लग्नाआधीपासुन एक्मेकांची चांगली ओळख होती. एकमेकांच्या आचार विचारातील भिन्नता आधीपासुनच माहीत होती. ती अतिशय संयोजन बद्ध काम करते तर माझे त्याच्या उलट आहे. प्रोक्रास्टिनेशन हा एक कलाप्रकार म्हणुन मी जोपासला आहे. शेवटच्या षटकात दहा धावा असल्यावरच मला माझ्यातला तेंडुल्कर सापडतो. ह्या मुळे मिळुन काम करताना आधी बराच त्रास तिने भोगला. आमच्या एक्त्रतीत कामाच्या जाबदार्या ह्या आमच्या ह्या (अव)गूणाशी जोडलेल्या आहेत. एकमेकांच्या कामाच्या पद्धतीवर आधी राग, मग अविष्वास, मग अपरिहार्य स्विकार आणि आता विष्वास आलेला असल्याने. एकत्रित काम करताना मी निमुटपणे तिच्या प्लॅनिंग प्रमाणे वागतो आणि शेवटच्या क्रंच पिरिअड मधे ति मला फोलो करते.
घर दोघांचे खर्या अर्थाने व्हायचे असेल तर आपापल्या आडमुठ्या भुमिकांचा फेरविचार मग त्या सांस्कृतिक, वैयक्तिक, भावनिक, वा राजकिय असोत हे प्रत्येक जोडिदाराने करायलाच हवे असे मला वाटते. त्या प्रमाणे अनेक भुमिकांबद्दल फेरविचार व प्रसंगी बदलही आम्ही केले आहेत. वानगी दाखल बोलायचे झाल्यास मी पारंपारिक शाकाहारी आहे. तर ती पारंपारिक मांसाहारी आहे. अजुनही घरी तिच्या स्टाइलचे जेवण (सिकेपी) केले तर आम्ही एकत्रितपणे त्याचा आनंद घेऊ शकत नाही. हळुहळु मी स्वतःच्या शाकाहारी असण्याची व्याख्या बदलायचा प्रय्त्न करत आहे
घरकाम हा आमच्या करता नो इश्यु आहे. मला स्वयंपाक करायला आवडतो. तिला माझ्या हातचे खायला. स्वयंपाकाच्या बाबतीत आमच्या एक्स्पर्टिज वेगळ्या आहेत मला शुद्ध शाकाहारी बनवता येते. तर ती चांद्रसेन्यांच्या ठेवणितल्या बनवते. उरलेले घरकाम दोघे वाटुन घेतो व कुणावरही उपकार न करता करतो.
एक्मेकांचे करिअर एक्मेकांसाठी तेव्हडेच महत्वाचे आहे. नुकतिच तिची एक डोयुमेंट्रि फिल्म पुर्ण झाली. तेंव्हा 'कमी तिथे आम्ही' ह्या धोरणाने तिने मागितलेली सर्व मदत करू शकलो ह्यातच आनंद आहे. माझ्या पेपर्स चे प्रूफरिडींग तिच करते. माझ्या कथा / लेख ह्यावर तिचा क्रिटिकल फिडबॅक पोस्ट करण्या अगोदर मी आवश्यक मानतो. कवितेवर ती क्रि फी देऊ शकत नसल्याने मी त्या इथे टाकू शकतो
खूपच सुंदर!!! 'लाइक'
खूपच सुंदर!!! 'लाइक'
Pages