८ मार्च २०१३ ... आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे संयुक्ताचे हे चौथे वर्ष! स्त्रीबाबत समाजाच्या मानसिकतेचा विकास होणे ही फक्त काळाची गरज राहिली नसून स्त्री-स्वास्थ्याचा व सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे प्रत्येकाची गरज झाली आहे. त्याच दिशेने मार्गक्रमणा करताना, वाटेतल्या अडसरांना ओलांडून पुढे जात असताना जे प्रश्न आपल्या मानसिकतेचा व वर्तनाचा पुनश्च विचार करायला लावतात अशा प्रश्नांचा वेध घेण्याचा व त्यांवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या वर्षीच्या महिला दिन उपक्रमात केला आहे.
“A promise is a promise : Time for action to end violence against women"
ही आहे संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवलेली, इ.स. २०१३ची 'आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम!
चंद्रशेखर गोखले ह्यांच्या 'मी माझा' ह्या प्रसिद्ध संग्रहात एक चारोळी आहे.
'घर दोघांचं असतं
ते दोघांनी सावरायचं
एकाने पसरवलं
तर दुसर्याने आवरायचं'
एक आणि दुसरा आलटून पालटून पसरवणं-आवरणं करत असतील तर खरंच त्यात रेखाटलेलं सहजीवनाचं चित्र रम्य आहे. गोखल्यांच्या प्रत्येक चारोळीबरोबर अनेक प्रति-चारोळ्या येतातच. ही चारोळी वाचल्यावर वाटलं की प्रत्यक्षात मात्र ...
'घर दोघांचं असतं
त्यात दोघांनी वावरायचं
त्याने पसरवलं
तरी तिनेच आवरायचं' असंच चित्र बहुतकरुन दिसतं.