गझलरंग : महिलादिन विशेषः ९ मार्च, पुणे

Submitted by बागेश्री on 7 March, 2013 - 01:48

नमस्कार दोस्तहो....

सुरेश भट गझलमंच, पुणे आणि यू. आर. एल. फ़ाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने
जागतिक महिला दिन ( ८ मार्च ) आणि गझल सम्राट सुरेश भट पुण्यतिथी ( १४ मार्च ) या निमित्ताने...
शनिवार दिनांक ९ मार्च २०१३ रोजी सांयकाळी ६ वा.
एस. एम. जोशी फ़ाउंडेशन सभागृह, नवी पेठ, पुणे-३० येथे

“ गझलरंग ”
फ़क्त महिला गझलकारांचा सहभाग असलेला मराठी गझल मुशायरा..

आपल्या पाच मायबोलीकरणी आहेत, त्यांच्यावतीने हे निमंत्रण..
अवश्य या ...!

https://www.facebook.com/photo.php?fbid=361137530668972&set=a.2611920906...

https://www.facebook.com/photo.php?fbid=360137007435691&set=a.2611920906...

facebook_766523862.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन आणि मनःपुर्वक शुभेच्छा!!

तिघी मायबोलीकरणी कळल्या - प्राजु, सुप्रिया जाधव आणि क्रांति. बाकी दोघी कुठल्या?

सर्वजणींना शुभेच्छा, मायबोलीकरांपैकी कुणी जाणारं असेल तर इथे वृत्तांत जरूर लिहा.

कोण कोण आहेत सहभागी?

फेसबुक उघडता येत नाहीये, बागेश्री नावे लिहाल का मूळ धाग्यात?

त्यांचे अभिनंदन करायला आणि शुभेच्छा द्यायला बरे!

सख्यांनो.. नक्की या गं.
माबोकरांना आग्रहाची विनंती नक्की येणे करावे.