मायबोलीवर सध्या हजर असलेले सदस्य कसे पहावेत?

Submitted by मदत_समिती on 27 December, 2009 - 17:29

मायबोलीवर सध्या हजर असलेले सदस्य दिसत नाहीत. मायबोली सर्वरवर येणार्‍या अतिरिक्त ताणामुळे ही यादी दाखवली जात नाही.

सागर आपण इथे नवीन दिसता, स्वागत Happy
फेसबुकसारखे इथे सदस्य जोडावे लागत नाहीत. प्रत्येक जण एकमेकांशी बोलू शकतो. त्यासाठी प्रत्येकाच्या 'सदस्यत्वा'त 'विचारपूस' हा पर्याय आहे. तसेच वेगवेगळी गप्पांची पाने आहेत, गावांनुसार, विषयांनुसार गृप्स आहेत.
तुम्हाला आवडेल त्या धाग्यावर जाऊन बोला, गप्पा मारा, वाचा Happy होईल हळुहळु सवय तुम्हाला Happy

बागुलबुवा, काहो घाबरवता त्याला Happy

काही सदस्यन्च्या प्रोफाइल मध्ये गेल्यावर अवलोकन , विचारपुस , त्यानी केलेल लेखन सगळ दिसत तर कहि वेळा ' हे पान सर्वजनिक नही तुम्हाला हे पान पाहायची परवानगी नाहि' असे का?

मुग्धा ....अग मस्त लिहिले आहेस ...दिसतिये तुझि कथा.......

अड्मिन ------अहो मा बो वर चाट करायची सोय आहे का हो? किवा करायचा विचार आहे का हो ?

म्हणजे लिमिटेड नं ऑफ कमेंटस!
३०च प्रतिसाद एका पानावर.
त्यानंतर ३१ वा प्रतिसाद आल्यास सगळ्यात पहिला दिसेनासा होतो.
आटुकमाटुक.
Happy

'वाहता धागा' म्हणजे काय?>
ज्या धाग्यावर सगळे प्रतिसाद सेव्ह होत नाहित, विशिष्ठ संख्येनंतर, नविन प्रतिसाद येताच आधिचा जुना प्रतिसाद निघुन जातो व नविन प्रतिसाद दिसतो, उदा २० प्रतिसादांची मर्यादा असेल तर त्या पानावर २१ वा प्रतिसाद टाकताच, १ ला वाहुन जातो आणि गोळाबेरिज २० च राहते. याउलट न वाहणार्‍या धाग्यावर प्रतिसाद मर्यादा जास्त असते (२०००) ह्यात जुने प्रतिसाद वाहुन न जाता नविन पाने तयार होत जातात.

Back to top