Submitted by माणूस on 6 November, 2008 - 15:22
Johnny Gaddar पाहील्यापासुन चांगली रहस्यमय कथांची पुस्तके शोधत आहे, तुम्हाला माहीत असतील तर ईथे यादी लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
manya2804, धन्यवाद
manya2804, धन्यवाद
lee child ची पुस्तके. एकदा
lee child ची पुस्तके. एकदा हाती घेतले की संपवल्याशिवाय झोप येत नाही.
भरत, मी हेच लिहायला आले होते.
भरत, मी हेच लिहायला आले होते. नुकतंच त्याचं one shot वाचलं. या आधी Echo Burning वाचलं होतं. त्याचं Reacher हे पात्र भन्नाट आहे.
लोकप्रिय रहस्यकथाकार -
लोकप्रिय रहस्यकथाकार - अॅगाथा ख्रिस्ती हिच्यावर एक मस्त लेख लोकसत्तात वाचला.
गाथा अॅगाथा
निंबुडा, मी हीच लिंक द्यायला
निंबुडा, मी हीच लिंक द्यायला इथे आले होते.
वेगळ्या/ अतिंद्रीय / गूढ
वेगळ्या/ अतिंद्रीय / गूढ अनुभवांबद्दल वाचायचं असेल तर मायकेल क्रायटनचं 'ट्रॅव्हल्स' वाचा. अप्रतिम पुस्तक. मी स्ट्रँड बुकशॉप मध्ये गेले असताना श्री शानबाग यांनी खास सजेस्ट केलं होतं. मायकेल क्रायटनसारखा बुद्धीवादी माणूस असे विविध अनुभव घेऊन बघतो आणि त्याबद्दल इतकं तटस्थपणे लिहितो यामुळे हे अनुभव आपल्यालाही भावतात.
जवळ जवळ चार वर्षांपूर्वी एक
जवळ जवळ चार वर्षांपूर्वी एक गूढ कादंबरी वाचनात आली..
पुस्तकाला एक विषय हवा म्हणून 'कल्पना विलास' असेल कदाचित किंवा मला बऱ्याच वर्षात सतत त्रास देणारे काही प्रश्न लेखकाला देखील पडत असणार...(पडत असणार का?).... कारण काय माहिती नाही पण फक्त विरंगुळा म्हणून हे पुस्तक वाचून मी विसरू शकले नाही...
पुस्तकाची कहाणी काहीशी अशी होती (पुस्तक वाचून जरा वेळ गेलाय...थोडं कमी अधिक गृहीत घेणे)
दोन मूल आणि प्रेमळ नवरा असणाऱ्या संसारात अतिशय सुखी असणारी एक स्त्री एका संध्याकाळी मुलांच्या हट्टाखातर त्यांच्यासाठी केक घेण्यासाठी बाहेर पडते...हाकेच्या अंतरावर असणाऱ्या दुकानात जात असतांना आणि रस्ता ओलांडून जात असतांना अचानक समोरून येणाऱ्या ट्रक ला आपण आदळणार म्हणून घाबरते-किंचाळते..कानावर हाथ ठेवून डोळे मिटून घेते...रस्त्यावर होणारा गोंगाट तेव्हा तिला स्पष्ट ऐकायला येत असतो...काही क्षण असेच जातात.......आणि अचानक सगळं शांत झाल्याच जाणवत....ती डोळे उघडते....
आणि ती जे काही बघते ते सगळे तिला वाटत असतं त्या पलीकडचे....ती तिथेच त्याच जागेवर उभी असते..मात्र...सगळं नॉर्मल असतं....गाड्या त्यांच्या मार्गाने जात असतात...तिच्या भोवताल आजू-बाजूला आत्ताच ऐकू येत होता तो गोंगाट नसतो...खरतर कुणीच नसतं.....मलाच भास झालाय असा समज करून ती स्वतःच गालात हसते अन पुढे चालू लागते........
तिला जायचे होते त्याच दिशेने अन त्याच वाटेने ती चालत असते पण आता ती बघत असते ते सगळंच नवं असतं...ते हाकेच्या अंतरावरच दुकान आता दूर दूर पर्यंत दिसत नसतं .....रस्तेच्या कडेला असणाऱ्या रोजच्या परिचयाच्या गोष्टी तिथे नसतातच......सगळंच नवं असतं.....ती गांगरते,घाबरते आणि परत सपाट्याने घराच्या दिशेने चालू लागते ....ठराविक अंतर चालूनही पराचयाच अस काहीच तिथे नाही.....तीच घर; घराच्या जागेवर नाही....शोध शोध शोधते....मनात काहूर हेलकावे घेतंच असतं 'माझ घर कुठे आहे...माझी ती दोन निरागस मुल केकची वाट बघत असतील...माझा नवरा..' हाच विचार करत असतांना घेरी येऊन शुध्द हरपून पडते....
जाग येते तेव्हा ती कुणाच्या तरी घरी आहे हे तिला लक्षात येते......एका तरुण मुलाने तिला त्याच्या घरी आणले असते...त्या मुलाची आई तरुण बहिण आणि तो असे ते तिथे राहत असतात....त्या सर्वांच्या जिव्हाळ्याने ती जरा सावरते ...स्वतःची कहाणी त्यांना सांगते....कुणालाही काही कळत नसतं....पण ती खोट बोलत नाहीये हे मात्र ती लोक ओळखतात....ती तरुण मुलगी आणि तिची मैत्री होते....तो मुलगा सुद्धा तिला तीच घर सापडून देण्यास मदत करत असतो.....
या कहाणीला आणखी एक मोड येतो तेव्हा जेव्हा त्यांच्या घरी येणारे एक परिचित जोडपे तिला वेगळ्या नावाने हाक मारतात..... ओळखत असल्याचा दावा करतात....यांना गैरसमज झाला असावा अस समजून विसरण्याच्या प्रयत्नात असतांनाच परत एकदा बाजारात तिला ओळखणारे परंतु वेगळ्या नावाने जाणणारे भेटतात ....आता येता जाता हे घडत असतं.... स्वतःच्या दुःखाने व्यथित त्या हिला हे सर्व आणखीनच दुखद असल्याच जाणवत असतं....या परिवारावर आणखी ओझ नको म्हणून एक दिवस ती या सर्वांना समजावून वेगळं राहायचं ठरवते....आणि हि 'दुसरी' अशी कोण आहे याचा शोध लावायचं ठरवते याकामात तिला तो तरुण मदतीला सतत तिच्या सोबत असतो.....
माहिती मिळते ती फार वेगळी असते....या 'इथे' तीच नाव वेगळं असतं...तिची ओळख वेगळी असते...इथे ती प्रोफेसर आणि लग्न झालेली परंतु नवऱ्यापासून वेगळी राहत असलेली स्त्री असते.....अजूनही तिला थांग लागत नसतो कि हे आहे काय.....ती अजूनही त्या तिच्या हक्काच्या संसाराच्या शोधात असते.....पण काही महिन्यांनी, वर्षांनी शेवटी थकून हे नवं आयुष्य पत्करायच ठरवते....तिच्या प्रेमात पडलेल्या त्या तरुणाच प्रेम स्वीकार करून नवं आयुष्य सुरु करायचं ठरवते....आणि मनाची संपूर्ण तयारी करून नव्या आयुष्याचा आनंद उपभोगणार असतेच अन परत......तिच्या समोर तिच्या त्या आधीच्या आयुष्याच देखील सत्य आ वासून उभ राहतं..............
मला हे पुस्तक हवं आहे.....फक्त कथा माहिति असुन मी शोध घेऊ शकत नाहिये ..कुणाला या पुस्तकाचं नाव किंवा लेखक महिति असल्यास प्लिज सांगा....
मयी, मला वाटतेय की ह्या
मयी, मला वाटतेय की ह्या कथेचे/पुस्तकाचे लेखक श्री. धारप आहेत - हे पुस्तक माझ्याजवळ आहे बहुतकरून. शोधावे लागेल. तुम्हाला जर लेखकाचे नाव पटत असेल तर मला सांगा - मी ते पुस्तक शोधून काढते.
अमी
मेरी हिगीन्स-क्लार्क ची
मेरी हिगीन्स-क्लार्क ची पुस्तकंही रहस्यमय कथा प्रकारची आहेत.>>>>
सध्या या पुस्तकान्चा सपाटा लावला आहे . 'murder mystery ' categoryमधली पुस्तके आहेत ही.
मस्त , गुंगवून ठेवणारी वातावरण निर्मिती आणि कथानकं
मयी, ही नारायण धारपांच्या
मयी, ही नारायण धारपांच्या कथासंग्रहातली एक गोष्ट आहे. त्या कथा संग्रहाच नाव आता आठवत नाही आहे
Read Dan Brown - Deception
Read Dan Brown - Deception Point, The Lost Symbol, Angels & Demons, कोणतही, सगळेच रहस्यमय आहेत.
मयी, अगदी अगदी. मला आठवली हि
मयी, अगदी अगदी. मला आठवली हि कथा. नारायण धारपांची आहे.
पण शेवटी सत्य येत का समोर? माझ्या आठवणीप्रमाणे ' नवं आयुष्य सुरु करायचं ठरवते..' असा शेवट आहे.
danger होती कथा.
ही नारायण धारपांची 'ग्रहण' ही
ही नारायण धारपांची 'ग्रहण' ही कुटकथा आहे
narayan dharap yanchich asavi
narayan dharap yanchich asavi ashi shanka hoti mala....pan pakke mahiti naslyane naav takle nahi....tumha saglyanche khup dhanyavaad....narayan dharap yanche 'Grahan' pustak mi aata shodhun magavte
Vinarch, Chaitrali, Chafa ...Thnx
मयी मीही वाचलिय ती कथा. त्यात
मयी
मीही वाचलिय ती कथा. त्यात ती नायिका भविष्यकाळात पोहोचते आणि तिला parellel जग असते याची जाणीव होते. कारण तिच्या जागी तिच्यासारखी दिसणारी दुसरया विश्वातली जगत असते. म्ह्णुन ती निमुटपणे येणारे जीवन जगण्यास सुरूवात करते. ही रह्स्यकथेबरोबर si-fi कथा ही आहे.
ही नारायण धारपांची 'ग्रहण' ही
ही नारायण धारपांची 'ग्रहण' ही कुटकथा आहे - कोणता कथासंग्रह ????
वाचायची उत्सुकता वाढली आहे .
मी काल नारायण धारपान्ची
मी काल नारायण धारपान्ची "चेट्कीण" ही भयकान्द्बरी वाचली. खुप छान आहे हि गोष्ट....आणि त्यात कोकणाचे , वाडीचे जे वर्णन केलय त्यावरुन अस वाट्त की ही खरच घड्ली आहे की काय....
सायली प्रकाशन, पुणे यांनी शशी
सायली प्रकाशन, पुणे यांनी शशी भागवतांच्या पुस्तकांची नवीन एडिशन काढलीय
मर्मभेद, रत्नप्रतिमा, रक्तरेखा
सायली प्रकाशन, पुणे यांनी शशी
सायली प्रकाशन, पुणे यांनी शशी भागवतांच्या पुस्तकांची नवीन एडिशन काढलीय स्मित मर्मभेद, रत्नप्रतिमा, रक्तरेखा
अगदी गूढ नाही पण murder
अगदी गूढ नाही पण murder mystery टाईप्स थोडेसे विनोदी वातावरणात, वाचायचे असेल तर
Myron Bolitar series by Harlan Coben , रेकमेन्डेड .
रहस्य कथा वाचायच्या असतील तर
रहस्य कथा वाचायच्या असतील तर सौरभ वागले यांच्या अल्फा च्या सर्व कथा वाचा, खुपच छान आहेत, शेवटपर्यंत वाचण्याची उत्सुकता असते. त्यामधील मृत्युचे संदेश, अमर अकबर अँथनी, कोरलेल्या तीन आकृत्या एकदम बेस्ट.
महाभारताचे रहस्य (ख्रिस्तोफर
महाभारताचे रहस्य (ख्रिस्तोफर डॉयल) कोणी वाचली आहे का?
Pages