जाहीरात क्षेत्राविषयी संपूर्ण माहीती हवी आहे.

Submitted by dreamgirl on 27 February, 2013 - 06:35

जाहीरात क्षेत्राविषयी संपूर्ण माहीती हवी होती.
शैक्षणिक पात्रता, कोर्सेस, पार्टटाईम - फूलटाईम, डिप्लोमा कोर्सेस, बेसिक, प्रोफेशनल कोर्सेस (मुंबईमध्ये)
व्यावसायिक संधी, घरातून काम केल्यास संधी, कोणी मायबोलीकर या क्षेत्रात असतील तर दिग्गजांकडून सहकार्याची अपेक्षा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी जाहिरात क्षेत्राशी अजिबात निगडीत नाही. पण तुमचे पोस्ट वाचून जे वाटलं ते लिहितेय, कृपया गैरसमज नको.

१. जाहिरात क्षेत्र हे बरेच व्यापक क्षेत्र आहे. तुम्हांला त्यात नक्की काय करायचे आहे हे ठरवले आहे का?
२. तुम्हांला जाहिरात क्षेत्रातील काही अनुभव आहे का?
३. जाहिरात क्षेत्रच निवडण्याचे कारण काय?
४. ह्या संदर्भातील कोणती माहिती तुम्ही स्वतः जमा केली आहेत?
५. आत्ताची नोकरी जर जाहिरात क्षेत्रातली नसेल तर ती का सोडायची आहे?

ह्याची उत्तरे तुम्ही वर हेडिंगमध्ये लिहिलीत तर तुम्हांला नक्की काय करायचे आहे ह्याचा अंदाज वाचणार्‍यांना येईल आणि त्यानुसार तुम्हांला मार्गदर्शन करणे सोपे जाईल.

तुमच्यामधले स्ट्राँग आणि वीक पॉईंट्स हे फक्त तुम्ही स्वतःच जास्त चांगल्याप्रकारे अभ्यासू शकता. हे सर्व करून झाल्यावर तुम्हांला नवीन दिशा नक्कीच सापडली असेल. Happy

( हा बाफ तुम्ही स्वतःसाठी उघडला आहेत असं मी गृहित धरले आहे. )

संपदाला अनुमोदन.

नोकरी व्यतिरिक्त बॅक अप प्लॅन हा जाहिरातीच्या क्षेत्रातला करायचा आहे का? तसे असल्यास स्वतःची जाहिरात एजन्सी काढण्या व्यतिरिक्त मॉडेलिंग हाच एक पर्याय आहे. फ्रि लान्स कॉपिरायटींग सुद्धा करता येऊ शकते पण त्याकरता आधी या क्षेत्रात काम केल्याचा बराच अनुभव लागतो.

जाहिरात एजन्सीमधे वेगवेगळ्या डिपार्टमेन्ट्सकरता वेगवेगळी क्वालिफिकेशन्स लागतात. क्रिएटीव्ह डिपार्टमेन्ट आणि मार्केटींग किंवा अकाउंट जनरेटींग डिपार्टमेन्ट असे दोन ढोबळ विभागात करिअर करता येते.
बेसिक म्हणजे मास मिडियातली पदवी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदव्युत्तर मास कम्युनिकेशन अथवा अ‍ॅडव्हर्टायझिंग/मार्केटींग कोर्स करणे आवश्यक असते. या विषयात एमबिए करुन आल्यास जास्त चांगले प्लेसमेन्ट मिळते.
कॉपिरायटींग करता इंग्लिश लिटरेचरमधे पदवी किंवा भाषेवर अत्युच्च प्रभूत्व असावे लागते.
आर्ट डिपार्टमेन्टकरता फाईन आर्ट अथवा कमर्शियल आर्टमधली पदवी लागते.
मिडिया प्लानिंग करता स्टॅटीस्टीक्स, मार्केट सर्व्हे यामधे प्राविण्य/पदवी आवश्यक आहे.
अकाउंट एक्झिक्युटीव्ह म्हणून नोकरी मिळवण्याकरताही आता एमबिए डिग्रीधारक लागतात.

यापैकी कोणतीही पदवी असली तरी जाहिरात एजन्सीज त्यांची स्वतःची कॉपी किंवा क्रिएटीव्ह टेस्ट घेतल्याशिवाय ट्रेनी म्हणूनही जॉब देत नाहीत.

जाहिरात क्षेत्रात करिअर करण्याकरता प्रचंड मेहनत, वेळ देण्याची तयारी, स्ट्रेस ड्युरेबिलिटी, आणि उच्च दर्जाची कल्पकता या महत्वाच्या गोष्टी आपल्यात असण्याची आवश्यकता हे सर्वात बेसिक क्वालिफिकेशन.

करिअर्स इन मास-मिडिया या विषयावर अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. त्यात जाहिरात क्षेत्रासंबंधी योग्य माहिती, कोर्सेस-कॉलेजेसची माहिती इत्यादी दिलेली असते ती काळजीपूर्वक वाचा. नेटवरही करिअर्स इन अ‍ॅडव्हर्टायझिंग असा सर्च दिल्यास भरपूर माहिती उपलब्ध होईल. ही एक लिंक बघा उदाहरणार्थ-

http://www.rediff.co.in/getahead/2008/mar/27ad.htm

संपदा व शर्मिला खूप धन्यवाद
संपदा...

१. जाहिरात क्षेत्र हे बरेच व्यापक क्षेत्र आहे. तुम्हांला त्यात नक्की काय करायचे आहे हे ठरवले आहे का?>> अजून ठरवलं नाही. पूर्ण माहीती हेऊन मगच ठरवता आलं असतं. त्यातही अभ्यासक्रमासाठी वयाची अट वगैरे पण माहीत नव्हतं
२. तुम्हांला जाहिरात क्षेत्रातील काही अनुभव आहे का?>> दूरदर्शन माध्यम जाहीरातींचा काहीच अनुभव नाही. अर्थात तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मास्टर्स पदवी, बराच अनुभव आणि किमान ओळखी गाठीशी असणं जरूरी असतं. पण आंतरजाल माध्यमाचा व वृत्तपत्र माध्यमाचा अनुभव होता थोडाफार. अर्थात माध्यमानुसार पण या क्षेत्रात काही संधी आहेत का माहीत नाही.
३. जाहिरात क्षेत्रच निवडण्याचे कारण काय?>> क्रिएटिव्हिटी!!! हे च मुख्य कारण! त्यापैकी आपल्याला कितपत शिवधनुष्य पेलता येइल याचा अदमास घेण्यासाठी हा धागा
४. ह्या संदर्भातील कोणती माहिती तुम्ही स्वतः जमा केली आहेत?>> नाही. ही सुरूवात आहे!
अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे जाहीरात क्षेत्र व्यापक आहेच. त्यात ही माध्यमानुसार प्रकार आहेत का? प्रत्येक माध्यमातील संधी वेगवेगळ्या आहेत का? किमान पात्रता जी सगळ्या माध्यमांसाठी लागू होइल ती काय? असे बरेच प्रश्न आहेत. प्लेसमेंटचा विचार सध्या नाहीच. जाहीरात एजन्सींना संपर्क करून अनुवादाचे, कन्सेप्ट्चे किंवा इतर काही काम मिळेल का ते पाहायचे आहे. स्वरूप अजून नीट नाही...
५. आत्ताची नोकरी जर जाहिरात क्षेत्रातली नसेल तर ती का सोडायची आहे?>> सोडायची नाहीच. बॅक अप प्लॅन तयार करून ठेवतेय... सपोर्ट सिस्टीम म्हणा हवं तर! जाहीरात क्षेत्रातील नाहीय पूर्णपणे पण निगडीत आहे. आंतर्जालीय जाहीराती व विपणन पाहावे लागते.

हा बाफ तुम्ही स्वतःसाठी उघडला आहेत असं मी गृहित धरले आहे.>>
सध्या मलाच हवी आहे माहीती. पण येथील बेसिक माहीती इतर इच्छुकांनाही उपयोगी पडावी.

शर्मिला येस! फ्री लान्सचाच विचार चालू आहे सध्या.
मास मिडीयातील पदवीसाठी,
पार्टटाईम (शनि रवि. ) मुंबईमधील कॉलेजेस सुचवू शकाल का? नेटवर खूप यादीच मिळाली पण त्यातही जर माहीती असेल तर गोंधळ नको.
वयाची अट असते का?

माहीतीसाठी खूप आभार. आणखी काही शंका असल्या तर येइनच इथे. इतरत्रही शोधते आहेच माहीती. Happy