या उपक्रमानुसार रचलेल्या संकेत तरहीत माझा यथाशक्ती सहभाग. धाग्यासाठी डॉ. कैलास गायकवाड यांचे आभार!
-'बेफिकीर'!
==========================
पावसावाचून गेले पीक... म्हणणे ठीक होते
दु:ख हे की व्हायचे मातीसही नापीक होते
माणसाने शेत हालवले जरी सोयीप्रमाणे
पाखरे जमतात पूर्वी ज्या ठिकाणी पीक होते
श्रावणोत्सव पाहुनी ते गुंगले कामात अपुल्या
रूप नसलेल्या ऋतूंचे मन किती लवचीक होते
फक्त त्या झाडात दिसते लागलेली आग आता
क्षणभरापुरतेच वणवे काल सार्वत्रीक होते
काढुनी खस्ता मढवली सांज आयुष्या तुझी मी
रात्र झाल्यावर कळाले दिवस शृंगारीक होते
===== संकेत तरही समाप्त ==== पुढील शेर ====
एकदा स्वेच्छेतुनी उधळून दाखव तू स्वतःला
मागुनी जे लाभते ते दान नाही भीक होते
वाटले नव्हते खरे करशील हे म्हणणे तुझे तू
'त्या प्रसंगी वाटले ते सर्व प्रासंगीक होते'
भाळलो नसतो असा स्वस्तात जर माहीत असते
की तुझ्यावाचून जगणे केवढे खर्चीक होते
दोन ओळींतून देतो सूत्र सार्या जीवनाचे
गझलकाराचेच अक्षर तेवढे बारीक होते
औषधे नसलीच संतापी स्वभावावर तुझ्या तर
'बेफिकिर'शी बोलुनी बघ बोलणे लाडीक होते
-'बेफिकीर'!
व्व्वा ! मस्त गझल . संकेतातले
व्व्वा !
मस्त गझल .
संकेतातले नापीक आणि सार्वत्रीक खूपच आवडले .
इतरांतील भीक आणि प्रासंगीक त्याहूनही अधिक आवडले.
पहिला संकेत मी सुद्धा पावसाचाच घेतला होता. आता वेगळा विचार करावा लागणार .
पावसावाचून गेले पीक... म्हणणे
पावसावाचून गेले पीक... म्हणणे ठीक होते
दु:ख हे की व्हायचे मातीसही नापीक होते... सुंदर मतला
दुसऱ्यात सानी कमजोर वाटला
लवचीक, सार्वत्रीक, चांगले.
शेवटचा सो सो.
भाळलो नसतो असा स्वस्तात जर माहीत असते
की तुझ्यावाचून जगणे केवढे खर्चीक होते >> सगळ्यात जास्त भावला
बा़की ठिक ठिक
मक्ता नेहमी प्रमाणे ठेऊन दिलेला!!!!
.................................................. पु.ले.शु!
अनेक शेर मनापासून आवडले मी
अनेक शेर मनापासून आवडले
मी केलेली रचना पाहून ; संकेत तरही ही संकल्पना मला व्यवस्थीत समजली आहे की नाही अशा विभ्रमात मी असल्याने मी विस्तृत प्रतिसाद देणे बरोबर नाही असे मानून टाळतो आहे
माणसाने शेत हालवले जरी
माणसाने शेत हालवले जरी सोयीप्रमाणे
पाखरे जमतात पूर्वी ज्या ठिकाणी पीक होते
निरीक्षण आवडले.
प्रासंगिकचा शेरही छान आलाय.
बरेचसे शेर आवडले. दु:ख हे की
बरेचसे शेर आवडले.
दु:ख हे की व्हायचे मातीसही नापीक होते>> इतका नाही आवडला.
श्रावणोत्सव पाहुनी ते गुंगले कामात अपुल्या
रूप नसलेल्या ऋतूंचे मन किती लवचीक होते
फक्त त्या झाडात दिसते लागलेली आग आता
क्षणभरापुरतेच वणवे काल सार्वत्रीक होते
काढुनी खस्ता मढवली सांज आयुष्या तुझी मी
रात्र झाल्यावर कळाले दिवस शृंगारीक होते
हे तीनही सुंदर आहेत.
एकदा स्वेच्छेतुनी उधळून दाखव तू स्वतःला
मागुनी जे लाभते ते दान नाही भीक होते>> सर्वात जास्ती आवडला.
गझल गणित पायरीपायरीने सोडवून
गझल गणित पायरीपायरीने सोडवून दिल्यासारखी निर्दोष..
श्रावणोत्सव पाहुनी ते गुंगले कामात अपुल्या
रूप नसलेल्या ऋतूंचे मन किती लवचीक होते
हे हृदयद्रावक..
ब्लाब्लाब्लाब्ला
ब्लाब्लाब्लाब्ला .................निर्दोष>>>>>>
आपले विधान सिद्ध् करता येईल का ताईसाहेब ?
शृंगारीक होते>>>>तितकासा सांकेतिक नाही वाटत हा शेर
भाळलो नसतो असा स्वस्तात पण माहीत होते
की तुझ्यावाचून जगणे केवढे खर्चीक होते>>>>> असा वाचला
'बेफिकिर'शी बोलुनी बघ बोलणे लाडीक होते>>>>
कैतरीच
असो हाय काय नाय काय
"फक्त त्या झाडात दिसते
"फक्त त्या झाडात दिसते लागलेली आग आता
क्षणभरापुरतेच वणवे काल सार्वत्रीक होते
काढुनी खस्ता मढवली सांज आयुष्या तुझी मी
रात्र झाल्यावर कळाले दिवस शृंगारीक होते"
"वाटले नव्हते खरे करशील हे म्हणणे तुझे तू
'त्या प्रसंगी वाटले ते सर्व प्रासंगीक होते'" >>>> हे ३ सर्वात आवडले.
बेफि, आपले पहिले चारही शेर
बेफि,
आपले पहिले चारही शेर दिलेल्या खयालांनुसार पुरेश्या संकेतांमधे व्यक्त होत आहेत असे वाटले.
ऋतुंच्या शेरात 'लवचीक'(flexible हा अर्थ घेतल्यास - कारण जे घडलेय ते लवचीकतेच्या पलिकडले आहे असे मला वाटत आहे) हा काफिया कसा परफेक्ट आहे हा प्रश्न पडतो आहे.
संकेत तरही बद्दलचे माझे विचार तरहीच्या धाग्यावर लिहीत आहे.
धन्यवाद!
मी ही लिहीत अहे बेफीजी आधी
मी ही लिहीत अहे बेफीजी आधी जितूच्या तरहीवर लिहिलेले
कणखरजी म्हणाले तरहीच्या धाग्यावर लिही म्हणून
आवडली
आवडली
बेफीजी विपू पाहिलीर का अर्थात
बेफीजी विपू पाहिलीर का
अर्थात त्रेच मी तरहीच्या धाग्यावरही लिहेत आहेच
एक नवीन प्रतिसाद आहे यावेळी जरा लांब्लचक झालाय क्षमस्व
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
फक्त त्या झाडात दिसते लागलेली
फक्त त्या झाडात दिसते लागलेली आग आता
क्षणभरापुरतेच वणवे काल सार्वत्रीक होते
औषधे नसलीच संतापी स्वभावावर तुझ्या तर
'बेफिकिर'शी बोलुनी बघ बोलणे लाडीक होते
सुंदर शेर!