मला आठवतंय...फस्ट इयर चा शेवटचा पेपर होता त्या दिवशी..ताई घ्यायला आलेली..मी स्कुटी च्या मागल्या सीटवर बसून पेपर चेक करत होते (पेपर म्हणजे प्रश्नपत्रिका बर का....नागपूर युनिवर्सिटी ला एकदा बदनामी चा डाग लागलेला असला तरी उत्तर पत्रिका नाही दिली आमची आम्हाला तपासायला त्यांनी कधी आणि हो हि खंत नाही बर का...:D ) दोन सिग्नल पार करून तिसर्या कुठल्याश्या मोठ्या सिग्नल वर गाडी थांबली होती....तेवढ्यात सायकल वर एक मुलगी शेजारी आली अगदी त्वेषात येउन सायकल वरून उतरली....सायकल stand वर लावून झपाझप चालत मागे गेली आणि काय होतंय हे कळायच्या आत एका बाइक वरच्या मुलाला गालावर, डोक्यावर अगदी मिळेल तिथे चटचट मारायला लागली....सोबत तिचे बोलणे चालू होतेच " काय म्हणत होतास तू आता बोल न ****...बोल काय घाण शिवी घातलेलीस ******* ना बोल आता बोल न....तुझ्या आईला तू असच ***** बोलतो काय साल्या...***** हे तू तुझ्या बहिणीला जाउन बोलायचं कळले ना" हे सर्व केवळ ३०-३२ सेकंदात घडलेले हे सर्व करून ती हाथ झटकत सायकल जवळ आली आणि आम्हाला अंदाज आला काय झाले असेल ते.....भर सिग्नल वर ताई ने आणि मी तिच्यासाठी टाळ्या वाजवलेल्या ....खूप अभिमान वाटला तेव्हा तिचा...सिग्नल सुटल्यावर पुढे जाउन आम्ही बोललो तिच्याशी तेव्हा तिने सांगितले....बर्याच दुरून तो बाइक वाला तिच्या सोबत सोबत गाडी घेऊन येत होता काय काय घाण घाण बोलत होता..सोबत चल असे खुणावत होता..शिव्या घालत होता .. एक दोनदा तिने त्याला वॉर्न पण केले पण त्याचे चालूच होते...तिने चांगल्या संधीची वाट पहिली आणि चारचौघात येउन भरचौकात त्याला त्याच्या वागण्याचा परिणाम दाखवून दिला....क्या बात है ...मानल बा त्या पोरीला....त्या नंतर उगाच आम्हालाच भीती वाटत होती म्हणून आम्ही तिला तिच्या घरापर्यंत सोबत दिली ...
आज हे आठवण्याचं कारण म्हणजे आत्ताच काही दिवसा आधी असेच कुठेतरी जातांना एक सडक छाप मजनू 'तेरा पिच्छा ना मै छोडूंगा सोनिये' च्या तोऱ्यात मागे मागे आलेला....सुरुवातीला वाटलं मागे नसेल येत त्याचा रस्ता पण हाच असावा कदाचित म्हणून रस्ता बदलून पहिला, त्याला पुढे जाऊ देऊन टर्न घेतला, थोडावेळ कुठल्याश्या दुकानात थांबून पहिले पण मजनू महाशय पुढल्या गल्लीतून टर्न घेऊन पुन्हा पुढ्यात....मग ती सिग्नल वरची झांसीराणी आठवली आणि जरा जोम चढला....मग ठरवलं जरा विचाराव त्याला 'बाबारे काय तुझा प्रोब्लेम काय आहे" म्हणून...मग एक मोक्याची जागा बघून गाडी जरा स्लो केली आणि बाजूला घेत घेत त्या मजनू ला थांब असा हाथ दाखवला...पण.....
तो मजनू चांगलाच अनुभवी वर्गातला असला पाहिजे त्याने धूम च्या स्टायील मध्ये एक्सलेटर वाढवले आणि हवेच्या वेगात धूम ठोकली....माझ्या नजरेत दिसणारे दोन सिग्नल त्याने तोडले होते....पुढे कुठपर्यंत जाउन त्याने दम घेतला असेल तोच जाणे....उगाच माझी कॉलर नसलेल्या कुर्त्याची कॉलर टाईट झाली ..मला हसू फुटत होते आणि हसताही येत नव्हते...बाकी घरी गेल्या गेल्या मी सर्वात आधी माझा चेहेरा आरशात पहिला....माझ्या चेहेर्यावरून त्याला कोणती सिग्नल ची झांसी दिसली असेल हे शोधत राहिले ..........
अगदी बरोबर केलेत, पहिल्याच
अगदी बरोबर केलेत,
पहिल्याच वेळी अश्या मजनूंना कडक रागपट्टी द्यायची, अन्यथा ते आपल्या सोयीने वेगळा अर्थ काढतात आणि मग प्रकरण भारी पडते.
प्रकरण भारी म्हणजे मग त्यांचा अहंकार दुखावणे आणि त्यांनी पलट हल्ला करणे वगैरे घटना घडू शकतात, मात्र पहिल्याच वेळी त्यांना खणखणीत रेड सिग्नल दाखवल्यास ते गपगुमान आपला मार्ग धरतात, अर्थात हा मार्ग म्हणजे नवीन मुलगी. तसे हे सुधारणार्यातील नसतात.
ह्म्म्म्म्म्म.......धन्यवाद
ह्म्म्म्म्म्म.......धन्यवाद
(No subject)
)
:))
मजा आ गया, काय तोंड पडले असेल
मजा आ गया, काय तोंड पडले असेल त्या मुलाचे ---- दोन्ही किस्सांमधे
अभिनंदन,मयी,त्या मज॑नुला
अभिनंदन,मयी,त्या मज॑नुला नागपुरी हिसका दाखवलात तुम्ही,ग्रेट
Thaaanku
Thaaanku
मस्त हिसका दाखवला त्या मुलीने
मस्त हिसका दाखवला त्या मुलीने !
मस्त - असा हिसका सगळ्या
मस्त - असा हिसका सगळ्या जणींनी दाखवायला पाहिजे - एकटीला भिती वाटली तर काही मित्र-मैत्रीणींना एकत्र घेऊनही - पण हिसका दाखवलाच पाहिजे - ही काळाची गरज आहे....
मनापासून अभिनंदन....
कृपया एकच आणि योग्य ग्रूप
कृपया एकच आणि योग्य ग्रूप निवडा.
dhanyawad sarvanche
dhanyawad sarvanche
बरं
बरं
केले बर का ...अड्मिन जी
केले बर का ...अड्मिन जी
व्वा नागपुरकर ... मस्तच....
व्वा नागपुरकर ... मस्तच....
मस्त!
मस्त!
(No subject)
well done!
well done!
मस्त
मस्त