मराठी भाषा दिवस २०१३ - लहान मुलांसाठी कार्यक्रम - बोल बच्चन बोल!

Submitted by संयोजक on 12 February, 2013 - 06:39

BBB - 3.jpg

आपल्या बच्चूंचे बोल ऐकायला दरवर्षीप्रमाणे आम्ही उत्सुक आहोत. 'मराठी भाषा दिवस, २०१३'च्या निमित्ताने भरवूया आपल्या बच्चेकंपनीच्या बडबडगीतांची मैफल.

वयोगट : २ ते ६ वर्षे
आपल्या बाळाच्या आवाजातल्या मराठी बडबडगीताचे ध्वनिमुद्रण / चलचित्रण करा आणि आम्हांला पाठवा.

या उपक्रमाचे काही नियम :

१) या उपक्रमामध्ये केवळ मायबोलीकरांचेच पाल्य सहभाग घेऊ शकतील.
२) ध्वनिमुद्रण अथवा चलचित्रण युट्युबवर चढवून ते त्या पाल्याच्या मायबोली पालकाने sanyojak@maayboli.com या ईपत्त्यावर पाठवावे. विषयामध्ये 'बोल बच्चन बोल' असे नमूद करायचे आहे.
३) ईमेलमध्ये आपला मायबोली आयडी, आपले नाव, आपल्या पाल्याचे नाव आणि त्याचे वय लिहावे.
४) प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख आहे २४ फेब्रुवारी, २०१३.

तर मग बच्चन, बोल!!

..

हीहीऽ
अहो चालत नस्ती तर बोलतील कशी? चालणारीच आहेत दोघे.. म्हट्लं त्यांचे 'चिमखडे बोल' इथे पोस्टाले तर चालेल का?

दोन्ही उपक्रम छान आहेत. शुभेच्छा.
जरा मोठ्या मुलांसाठी काही उपक्रम नाहीत का यावेळी? लेक उत्साही आहे पण वय सहा पूर्ण आहे.

अहो, जरा गोंडस नाव द्या की. हे फारच प्रौढ वाटतंय > +१. स्वाती, Lol
बडबडगीतांच्या कार्यक्रमात ब च्च न?! हां, अभिषेक किंवा आराध्या बच्चन असेल. Proud

उपक्रमासाठी शुभेच्छा.
बडबडगीते ऐकायला धमाल येते.

शुभेच्छा!
हे शिर्षक मला तर आधी हिंदीच वाटलं!

इब्लिसराव, तुम्ही आजोबा आहात? वाटत नाही हो तुमच्या (इब्लिस)पणामुळे! Light 1

इब्लिसराव, तुम्ही आजोबा आहात? वाटत नाही हो तुमच्या (इब्लिस)पणामुळे!
<<
ते "तुमच्या (इब्लिस)पणामुळे!" जोडलं नस्तं तर चाललं नस्तं का? तेंव्हढेच आपण यंग दिस्तो असा समज करून घेता आला अस्ता.. 9.gif

(रच्याकने, आय अ‍ॅम नॉट. ग्रेट अंकल आहे, पण ग्रँड पॅरेंट नाही झालो अजून)

पाच वर्षाच्या पुढची मुलं बडबडगीतासाठी थोडी मोठी वाटू शकतात. बडबडगीताऐवजी एखादे बालगीत वगैरे चालेल का ?

मराठी भाषा दिवस आणि नाव 'बोल बच्चन बोल', मेरे को तो थोडा खटक्या.. जरा जास्तच खटकलं.
उगाचच कीस काढायचा म्हणुन काढत नाही आहे, तुमच्या लक्षात आले नसेल असे वाटले म्हणुन निदर्शनात आणुन देतो आहे. तुम्ही तसा विचार केला असेल तर माझ्या सुचने कडे दुर्लक्ष करु शकता.

'बोल बोलके बोल' किवां "बोल भाबडे बोल" जास्त शोभेल.

'बोल बच्चम बोल'
बच्चनचा मी मोठ्ठा पंखा असलो तरीही मराठी भाषा दिवसाला नो 'बच्चन', बदला कृपया नाव बदला..

.

सत्यजीत +१
बोल बच्चन बोल ' हिंदी भाषा दिनाला' जास्त संयुक्तिक वाटतं, बडबडगीत / बालगीत / बोबड्कांदा चाललं असतं.

अगो, आपल्या प्रश्नाला उत्तर द्यायला उशीर झाला आहे, त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो.
प्रताधिकारांचा प्रश्न उद्भवणार नाही असे कुठलेही गाणे तुम्ही निवडू शकता.

नमस्कार संयोजक,
प्रताधिकारांचा प्रश्न उद्भवणार नाही असे कुठलेही गाणे तुम्ही निवडू शकता. >> २-६ वर्षांच्या छोट्या मुलांच्या घरगुती स्वरुपाच्या ध्वनिमुद्रण/ चलचित्रणाला प्रताधिकार लागू होतील ?

माझ्या पाल्याने 'पिशी मावशी आणि तिची भुतावळ' या संग्रहातील एक कविता म.भा.दि साठी सादर केली आहे. त्याचे चलचित्रण पाठवलेले नियमात बसेल की नाही त्याबाबत साशंक आहे. चालणार असेल तर पाठवेन.
कळावे.

Pages

Back to top