"को जागर्ती?".......... सॉSSल्लीड दचकलो मी. एक तर रात्र इतकी झालेली त्यात स्टडीरुम मधे मी एकटाच. त्यात आज पौर्णीमा म्हणुन खिडकी उघडी टाकलेली. अश्यावेळी जर असं कुणी म्हणालं तुमच्या मागे, तर तुम्ही नाही दचकणार? दचकाल ना? मी पण जोरात दचकलो. इतका की बुडाखालची खुर्ची खर्रर्रर्रकन आवाज करत सरली.
"को जागर्ती?" पुन्हा एकदा. जरा सावधपणे आजुबाजुला नजर फ़िरवली अंSSहं कुणी नाही, बाहेर येउन बेडरुमच्या दारातुन नजर टाकली चाफ़्फ़ी गाढ झोपलेली. आईशप्पत, ही झोपेत बडबडते की काय ?
" को जागर्ती?" शक्यच नाही चाफ़्फ़ी गाढ झोपेत घोरु शकते फ़क्त, बोलु नाही शकत. मग नक्की कोण बोलतय ? आता उत्तर द्यायचेच. अंगातले सगळे आवसान गोळा केले आणि पुन्हा हॉलमधे येउन बसलो सोफ़्यावर, कारण त्याच्या मागे भिंत आहे, मागुन कुणी मानगुट धरायची भीती नाही. आता माझे भिरभिरती नजर आजुबाजुला फ़िरत राहीली.
"को जागर्ती?"
"मीच आपला जागर्ती बाकी सगळे झोपर्ती " गोळा केलेले आवसान कधी सांडले ते कळले नाही.
"काय म्हणालास? बाकी काय करत आहेत?
" बाकी सगळे झोपर्ती...... आपलं झोपलेयत." होतं, थोडं अवसान होतं आजुन.
"का तुझे मित्र जागे आहेत ना आजुन?"
" आहेत ना जागे पण जरा वरच्या पातळीवर आहेत सध्या".
" मग तु नाही गेलास त्यांच्यात?"
"नाही, गेलो होतो थोडावेळ पण ते काळसर तपकीरी रंगाचे तरल द्रव्य त्यांच्या पोटात जाताच ते माझी ओळख विसरले"
"मग तु आता काय करत आहेस?"
" काहीतरी लिहीन म्हणतो एखादी भुताबिताची कथा"
" मग नखं चावत का बसला होतास?"
" विचार करत होतो."
" कसला?"
"म्हणजे बघा.... भूते असतात. सगळीच काही कुणाच्या मानगुटीवर बसत नाहीत, मग ती इतरवेळी काय करत असतील? कशी रहात असतील?"
" बस्स इतकेच?"
" इतकेच काय सोपे आहे का ते? नुसत्या कल्पनेने असे लिहीणे?"
" तु आजिबात कल्पना करु नको प्रत्य़क्ष अनुभव घे"
" क..क..काय"?
" का दचकलास?"
" नाही हो, इतक्या लवकर मरायचे नाही मला, आणि मरुन भूत तर बनायचे नाहीच नाही ."
"तुला मरावे लागणार नाही रे ! तु फ़क्त तिथली दृष्य पाहु शकशील"
" मग ठिक आहे, कुठे पाठवताय?"
" तु फ़क्त डोळे मीट"
पडत्या फ़ळाची आज्ञा घेउन मी डोळे मिटले. दुसयाच क्षणी मी एका भयाण काळोख्या रस्त्यावर उभा होतो. रस्ता तर निट ओळखता येत नव्हता. पण आजुबाजुची दाट झाडी आणि अवशेष राहीलेल्या घरांच्या भिंती, तिथुन जीव घेउन पळावेसे वाटत होते. पण तसे करणे शक्य नव्हते कसे परत जायचे तेच कळत नव्हते ना !
समोरची हालचाल बघुन मी स्तब्ध झालो. समोरुन एक हडळ येताना दिसत होती. आता हडळ याच साठी म्हणायचे की मी भूत मंडळीत आलो होतो हे मला माहीत होते. समोरुन आगदी नखरेल चालीने येणाया त्या हडळीकडे पहातानाच माझ्या मागुन एक जोरदार शिट्टी ऐकु आली. फ़ुटभर उंच उडाल्यावर ल़क्षात आलं की आपल्या मागे चार-पाच भूतांची टोळी आहे ती शिट्ट्या मारतेय. मी त्याना दिसण्याचा प्रश्न नव्हताच त्यामुळे मी सुऱक्षीत होतो.
" आयला, ती बघ आपल्या एरीयातली आयटेम".
" आज एकटीच कुठे निघाली ही दिपिका?" आयलाड, या दिपिकाची चर्चा या श्रेणीत पण? महान आहे हो लेक तुमची प्रकाश.
" निघाली असेल तिच्या युवीला भेटायला" आता मला आश्चर्य नाही वाटले कारण हे नाव तर येणारच तिच्या पाठोपाठ.
" तु तिला प्रपोज मारणार होतास ना ?"
" मारले ना प्रपोज पण च्यायला मला म्हणते, कवटी बघ आरशात त्यातले एक भोक कमी आहे काय? की सांगु दुसरे भोक पाडायला दादाला माझ्या?"
" तीचा दादा? भाउ पण आलाय तिचा इथे?"
" नाय रे, मानलेला भाउ आहे, तो मागच्या गँगवॉर मधे टपकवलेला येडा नंद्या"
" बाप रे ! तो जाम खतरनाक आहे यार जिवंतपणीची सवय आजुन नाही गेलीय, आजुन साला एरीयात राडे करतो."
" मग! मागच्या अमावस्येला आमच्या बाजुच्या वडावरच्या भूताशी राडा झाला त्याचा त्याची उलटी पावले सरळ करुन टाकली रे याने"
" आयला, टरकु लेकाचे आपण नाय घाबरत त्या येड्याला साला आपली वट आहे एका मांत्रीकाशी साल्याला बाटलीत बंद करुन टाकायला सांगेन. बस म्हणावं बोंबलत बाटली फ़ुटेपर्यंत"
" टोण्या तुझी त्या मांत्रीकाशी ओळख काय? त्यानेच तुला त्याच्या तालावर नाचवलाय"
" ए, तसं नाय हां"
" आयला, भांडण बंद करा रे ! समोर बघा आपल्या दिपीकाचा युवी येतोय"
मग मी पण जरा मन लाउन समोर पाहीले. समोरुन एक स्टायलीश भूत येत होते. जीन्स, टी-शर्ट आणि चालता चालता कवटीवरुन हात फ़िरवल्याची स्टाईल. ध्यानच होतं ते. एव्हाना मागे पुन्हा चर्चेला तोंड फ़ुटलं.
" साला, बघ काय स्टाईल मारतोय."
" आता मारेल स्टाईल पण दिपिकाच्या घरुन फ़टके पडतील तेंव्हा कळेल"
" का रे? तिच्या घरुन म्हणजे ती रहाते त्या घरातुन विरोध आहे का रे?"
" तगडा ! "
" तिच्या घरातले म्हणजे तो दिड पायाचा खवीस आणि ती जळलेल्या सांगाड्याची जखीण ना ?"
" तेच रे ! मुंबईच्या बाँबस्फ़ोटात तो उडाला ना ! त्यात त्याचा एक पाय गुल झालाय"
" आणि तीचे काय?"
" ती हुंडाबळी आहे रे त्यामुळेच दोघे यांच्या लग्नाच्या विरोधात आहेत"
" वेताळाशप्पथ, आपल्याला चान्स आहे आजुन"
" का रे? तु काय स्वतःला रणबिर समजतो का रे?"
" का समजु नको साल्या माझं जीवंतपण सगळं स्ट्रगलर म्हणुन गेलय"
" तो येडा नंद्या ल़क्षात आहे ना?"
" अले त्या येल्या नंद्याला काय घाबलताय? आपला एक मित्ल हाय त्याचे कलाटे क्लास चालवायचा, मोलुन ठेवेल त्याला" हा नविन बोबडा आवाज कुणाच ते जरा वळून बघितले, आपला तो राजपाल यादव आहे ना? त्याच्यापे़आ एखादा इंच कमीच असेल असे भूत बोलत होते. तोंडात समोरच्या बाजुचे दात गायब दिसत होते. नक्की काय झाले असावे?
" साल्या, चिंधीचोर तुला वाळत घातलेले कपडे पळवताना पब्लिकने पकडून धुSधुS धुतला त्यात तु इकडे आलास ते पण समोरचे दात तिथेच ठेउन तु काय ‘त्याची हाले मोलनाल’"? उत्तर सापडायला जास्त वेळ लागलाच नाही.
" म..म.. मी क.क्काय वाईट अ..आहे ?" हा पण नवाच आवाज.
" बे तोतल्या आधी बोलायला शिक रे !"
" तु तिला अ..अ आय ल..ल लव्ह य..य.. यु म्हणायला जितका वेळ घेशील ना? तितक्या वेळात ति चार वेळा बॉयफ़्रेंड बदलेल."
" ए, ते बघ दोघे तिकडे जुन्या बागेत चाललेत, इतक्या पहाटेच्या वेळी काय काय झोल चालतात रे तिकडे !"
" मायला, ती तिकडे जाउन तोंड पांढरे करते हे तिच्या घरी कळले तर?"
" चला, आपण पण जाउ तिकडे, साला बनी तो बनी नही तो?"
"अब्दुल गनी" कोरस मधे सगळे म्हणाले.
सगळे तिकडेच निघाले पण इतक्यात समोरुन एक रावडी भूत हातात तलवार घेउन येताना दिसले, आणि मागे हलकल्लोळ माजला!
" अबे, भाग तो बघ येडा नंद्या येतोय हातात तलवार घेउन, आता इथुन कल्टी मारु नायतर एखादा अवयव इथेच ठेउन जायला लागेल"
मागे पळापळीचे आवाज येत राहीले. आता हा येडा नंद्या कुणाचा गेम करणार हे उत्सुकतेने पहात असताना.
" इतक्या रात्री काय ध्यान लावुन बसलायस? सोफ़्यावर, झोपायचं नाही का?" चाफ़्फ़ीच्या आवाजाने दचकुन डोळे उघडले.
" आलोच इतक्यात" तिला पुन्हा बेडरुमच्या वाटेला लावले. आणि पुन्हा डोळे मिटले पण फ़क्त अंधार मघाचे दृष्य दिसे ना ! म्हंटल काय स्वप्न बिप्न पडलं होतं की काय?
" स्वप्न नाही सत्यच होतं ते"
" मग परत का दिसत नाही?"
" तु मधेच डोळे उघडल्याने तिथली तुझी लिंक तुटली आता पुन्हा एखाद्या पौर्णीमेच्या दिवशी तुला पुन्हा त्या पातळीवरची दृष्ये दिसतील"
" पुन्हा कधीतरी म्हणजे नक्की कधी?"
" जेंव्हा वेळ येईल तेंव्हा मी येईन आणि पुन्हा तुला विचारेन ‘को जागर्ती?’"
आता यापुढच्या प्रत्येक पौर्णीमेला मी जागा रहाणार आहे आणि वाट पहाणार आहे पुन्हा त्याच प्रश्नाची ‘को जागर्ती?"
चाफ्या
चाफ्या अजून वाढवायला हवी होतीस रे
मस्तच
मस्तच
जमलिये रे
जमलिये रे चाफेश!!!!!!!!
दिसलीस तू...फुलले ॠतू..................
को घाबर्ती
को घाबर्ती झाले..
मजा आली
मजा आली एकदम!
"मीच आपला जागर्ती बाकी सगळे झोपर्ती " >>
सही आहे.
*~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~*
समाधानाच्या तेलात राहो सुखाची वात, आनंदाच्या ज्योती लावू .. करू दीपोत्सवाला सुरुवात!
मस्त आहे
मस्त आहे पण अजून लिहायला हवी होती रे.
चाफ्या,
चाफ्या,
चाफ्फ्या
चाफ्फ्या मेल्या... अरे तुला लव्हस्टोरी लीही म्हटले होते....
ही काय लव्हस्टोरी आहे का? पुढचा पौर्णिमेला व्यवस्थित ध्यान लावून बस..
--------------
नंदिनी
--------------
मेल्या
मेल्या चाफ्फ्या.. इतकीच..
- अनिलभाई
चाफा, लेख
चाफा,
लेख वाचण्याआधी भिती होती की हा लेख पण मायबोलीच्या आयडी वर आधारीत आहे की काय..
राग मानू नका पण मला तुमचे गूढ्कथा सोडले तर इतर लेखन विशेष आवडले नाही.
(माझे वैयक्तीक मत)
तुम्ही हल्ली गूढ्कथा लिहिणे बंद केले आहे का? पुढच्या गूढ्कथेची वाट पाहत आहे.
धन्यवाद.
चाफ्या
चाफ्या तुझ्या गोळ्या परत सुरु कर.
तुला नाही नाही ती भुत परत भेटु लागली आहेत.
सर्वात आधी
सर्वात आधी धन्यवाद !
केदार , palla, अनिलभाई मुद्दाम लहान केलीये, याच कल्पनेवर वेगवेगळ्या कथा तयार होउ शकतात त्यांची मालिका तयार करण्याचा विचार केला होता त्या पुर्वी सर्व दर्दी मंडळींचा प्रतीसाद पहाणे गरजेचे वाट्ले म्हणुन आधी ही कथा लिहीली. आवडली तर नक्की पुढे चालु ठेवण्याचा प्रयत्न करेन.
>>>>>>>>>>>>>>>तुम्ही हल्ली गूढ्कथा लिहिणे बंद केले आहे का? पुढच्या गूढ्कथेची वाट पाहत आहे.
मनस्मी १८ सध्या गुलमोहोरवर खुप छान गुढकथा लिहील्या जात आहेतच की
असो, एक दिर्घकथा लिहीली आहे ती टाकेन लवकरच.
>>>>>>>>>>>>चाफ्या तुझ्या गोळ्या प>>>>>>>>>>>>
झकोबा कुठल्या रे गोळ्या ?
>>>>>>>>चाफ्फ्या मेल्या... अरे तुला लव्हस्टोरी लीही म्हटले हो>>>>>>>>
लिखेंगा लिखेंगा जरुर लिखेंगा वेळ लागेल थोडा ना !
.................................................................................................................................
** खरे मित्र असाल तर तुमच्या दुखा:तही सहभागी करुन घ्या ! **
अरे लिहि
अरे लिहि रे ... मस्त जमतेय
चाफ्फ्या,स
चाफ्फ्या,सही रे.. पण मलाही लहान वाटली. मालिका चालू करणार असशील तर ठिक आहे पण
चाफा, तुझी
चाफा, तुझी लेखनशैली छानच असते. पण आता जरा ट्रॅक बदल रे. या कथेत नाविन्य नाही वाटलं म्हणजे नेहेमी सारखं खिळवुन नाही ठेवलं तुझ्या या कथेने.. राग नको मानुस बरं..
झकास रे
झकास रे चाफ्या.... पुन्हा कथेत भुतं बघीतल्यावर राग आला होता.........
पण मालिकेचे आश्वासन वाचुन वाट पहतोय.
लव्ह स्टोरीची वाट पहतोय. (ती तरी भुतांवर नसावी....... जिवंत दिपीका, युवी, रणबीर चालतील!!)
>>>>>> ती
>>>>>> ती तिकडे जाउन तोंड पांढरे करते हे तिच्या घरी कळले तर?"
तोन्ड पान्ढरे करते......
...;
आपला, लिम्बुटिम्बु
सही है
सही है
चाफ्फ्या, सुशि चे 'लटकंती' वाच
मला पण
मला पण "तोंड पांढरे केले" प्रकार आवडला. टपोरी भुतं झाली, आता सोफिस्टिकेटेड भुतांवर लिही पाहू.
आयला
आयला नितीन, मला लव्हस्टोरी नाही रे लिहीता येणार म्हणजे ते हिरवेगार डोंगर ते झुळझुळ वहाणारे झरे अश्या धुंद वातावरणात तीने त्याला विचारले "लाडक्या, तु माझ्यावर आयुष्यभर असेच प्रेम करशील ना?" असले काहीतरी लिहील्यावर मला तरी पुढचे वाक्य धड सुचणार नाही हे नक्की
माझा विचार होता याच मुळ थीम वर वेगवेगळ्या कथा लिहीत जाण्याचा. पण बहुतेक कंटाळलेले दिसतात मायबोलीकर त्यामुळे........
.................................................................................................................................
** खरे मित्र असाल तर तुमच्या दुखा:तही सहभागी करुन घ्या ! **
तू भुतांची
तू भुतांची लव्ह स्टोरी लिही. मग पटापट सुचेल
चाफ्या,
चाफ्या, ब्रम्हराक्षसानंतर भुते... एकदम भुतोस्की जागर्ती झाली तुझी. चालू दे हे हेही. माणसावर लिहीणारे बरेच आहेत. तुझ्या निमित्ताने तेवढीच भुते माणसाळतील.
छान कथा
छान कथा आहे,
चाफ्फ्या,
चाफ्फ्या, कथा छान आहे.
मस्त.. आहे राव, खरचच, याचा
मस्त.. आहे राव,
खरचच, याचा वी़क्रम वेताळ सारखा कथा सन्ग्रह होऊ श़कतो.
आता पार्ट २ येउ
आता पार्ट २ येउ दे...........लवकर
भारी लिहिलय हे! चाफ्फ्या
भारी लिहिलय हे!
चाफ्फ्या मेल्या... अरे तुला लव्हस्टोरी लीही म्हटले हो>>>>>>>>
लिखेंगा लिखेंगा जरुर लिखेंगा वेळ लागेल थोडा ना !>>> कधी??????? लव्हस्टोरी लिही आता लवकर