दिनांक : १३ - ०२ - २०१३
क्षण - कथा
क्षण - कथा अर्थात सध्या सर्वत्र , किंबहुना पाश्चात्य देशांमध्ये जास्तच लोकप्रिय होत असलेला नवीन कथा-प्रकार , Flash Fiction अथवा Micro Fiction या नावाने सर्वत्र परिचित .
मोजक्याच आणि कमीत कमी शब्दात आपली कथा कशी मांडता येईल याचा वस्तुपाठ म्हणजे क्षण - कथा . इथे मायबोली.कॉम वर हा क्षण - कथांचा धागा सुरु करताना खरेच खूप छान वाटतेय . आणि हा , क्षण - कथांची गम्मत म्हणजे , अगदी जपानी Haiku सारख्याच ह्या मोकळ्या आणी छान सुटसुटीत असतात . अगदी तुमच्या माझ्यासारख्या . No rules nothing , जे आलय मनात अगदी बिनदिक्कत कागदावर , आणि तिथून इथे आपल्या मायबोलीवर ... वाचणारी सगळी आपलीच तर आहेत ... तर .. क्षण - कथा ...
I S A A C
मी डॉक्टर माधव परांजपे ....." आंतरराष्ट्रीय यंत्रमानव प्राधिकरण " अर्थात INTERNATIONAL ROBOTICS चा R & D HEAD . वेगवेगळ्या प्रकारचे अगदी ५० फुटी ते अर्ध्या सेमी . इतपत साईझेस चे , वेगवेगळ्या गरजा पूर्ण करणारे यंत्रमानव आम्ही DESIGN करतो. आत्मस्तुती नाही पण , अशी कुणकुण आहे कि
ब्रिटनचे ह्या वर्षीचे " NIGHTHOOD " माझ्या ROBOTICS मधल्या योगदानाबद्दल मलाच जाहीर होणार आहे .
तर ,
यावेळी मी माणसाचा पूर्णवेळ सेवक आणी सहकारी होईल अशा यंत्रमानवाचे DESIGN करत होतो .खरे सांगतो एक औद्योगिक यंत्रमानव DESIGN करण्यापेक्षा , एक घरगुती यंत्रमानव .. DEVELOPE करणे केव्हाही कठीणच .आमच्या क्षेत्राचा आद्य यंत्रमानव शास्त्राज्ञ SIR ISSAC ASIMOV ने घालून दिलेल्या १० ROBOTICS नियमांच्या परिघातच राहून आम्हाला नवनवीन शोध लावावे लागतात . आणी आम्ही मानतो पण खूप त्यांना , म्हणूनच तर माझ्या ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे नावच मी ISAC ३००० असे ठेवलंय .
पण , मी बनवलेले पहिले prototypes माझे मलाच पसंत नाही पडले .त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी त्यांच्या मालकांना त्यांच्या आज्ञा काही विशिष्ट संकेत आणि Syntexes मधेच द्याव्या लागतील. त्यात एका अक्षराचीही चूक झाली तर होणारे परिणाम विचित्र असू शकतात . उदाहरणार्थ तुम्ही ISAC कडे जर नुसती कॉफी मागीतलीत तर , तो तशीच कॉफी बनवेल जशी आम्ही त्याच्या अज्ञाप्रणालीत लिहून ठेवलीय .तुम्ही जर त्याला काही नवीन त्यात add करायला सांगितलात . तर कदाचित Infinite loop activate होऊन तोच तुम्हाला शेकडो cups कॉफी पाजत सुटेल.
तर , यावर उत्तर ? आहे ना माझ्याकडे AI अर्थात ARTIFICIAL INTELLIGENCE माझ्या ISACS ना मी AI ची देणगी देईन . त्याने ते तसेच वागतील , जसे तुमच्या घरातले रामुकाका किवा सखुबाई वागतात . आहे कि नाही मी Genius . पण यात पण एक गोम आहे , आमच्या बापाने म्हणजे ASIMOV ने सांगून ठेवलाय कि बाबानो काहीह करा पण ROBOTS न मानवत्व देऊ नका . त्याचा शब्द कसा मोडू , पण Rules are meant to be broken .. खरे कि नाही ?
मला माझ्या ISACS ना अगदी TYPICAL कामगारांची मानसिकता द्यायची होती . मला माझ्या ISAC ला तुमचा रामुकाका बनवायचे होते . ARTIFICIAL INTELLIGENCE NEURAL PROTOCOLS चा वापर करून हळूहळू मी माझा ROBOTS च्या CORECHIPS वर HUMANOID आज्ञाप्रणाली लिहू लागलो . त्यासाठी माझ्याच ISACS च्या तिसऱ्या पिढीचे चे ४ PROTOTYPES मी निवडले . त्यांच्यात मी ती चीप बसवली . आता फक्त एक कळ दाबायचा अवकाश कि बिंगो ....
खरेच बिन्गोच झाला एकदम , नाझे मलाच कळेना एकदम काय घडतंय ते , मी काळ दाबताक्षणी माझे चारही ISACS एकदम ताठ झाले . त्यांचे LED चे डोळे गरगरा फिरून एकदम निर्जीव झाले . PANEL वरची सारी INDICATORS त्यांचा STATUS .. SYSTEM OVERLOAD दाखवीत होती .
आणी अचानक ते घडले . एकदम ते चारही यंत्रमानव पुन्हा जिवंत झाले . LAB भर दिशाहीन इकडेतिकडे एकदम फिरून , चारही जण वेगाने माझ्या दिशेने आले . आणी अचानक त्यांची मान उन्नत होऊन चोघेही FREEZE झाले. ते पण शांत आणी मी पण सुन्न . काहीच कळेना काय घडलंय ते .
आणी अचानक चर्र - चर्र -चर्र असा आवाज करत माझा PRINTER जीवाच्या आकांताने पाने च्या पाने प्रिंट करू लागला .पूर्णपणे शुद्धीवर आल्यावर मी जाऊन ते PRINTOUTS हातात घेतले . मला कळेचना मी हसू कि रडू ते , एकाच वेळी मी जिंकलोही होतो आणी हरलोहि होतो .
माझे ISACS आता ISACS उरले नव्हते . ते रामुकाका झाले होते .
PRINTOUTS मध्ये माझ्या ROBOTS नि मला आणी ASIMOV ला अगदी कचकचून शिव्या घातल्या होत्या . आणी हे काय ह्या कसल्या मागण्या ?
..............
..............
थोडक्यात काय ? माझ्या चेम्बर मध्ये आत्ता आत्ता एक युनियन जन्माला आली होती , आणी आल्या आल्या तिने संप पुकारला होता .....
लेखक : अमित राणे
amitr25@gmail.com
चांगलीये. पण क्षण कथा म्हटली
चांगलीये. पण क्षण कथा म्हटली तर त्यामानाने बरीच मोठी वाटली. तरीही प्रयत्न आवडला. क्षणकथेत शेवटी एखादा ट्विस्ट अपेक्षित असतो का?
कृपया, तो 'पसंद' शब्द बदलून 'पसंत' करा. आणि शीर्षकात, कथेच्या आरंभी, शेवटी इतकी कलाकुसर करण्याची गरज नाही असं वाटतं. पाऊलखुणाही जरा जास्तच सर्वसमावेशक झाल्यात असं वाटतंय.
आपल्या बर्याच सिनेमांच्या कथा क्षणकथा म्हणून लिहिता येतील असा एक फुटकळ विचार डोक्यात आला.
मामी , प्रतिक्रिये बद्दल
मामी , प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद , नाही क्षण कथेत नेहमीच ' ट्विस्ट ' अपेक्षित असतोच असे नाही . तसे पहिले तर हि माझी पहिलीच क्षण कथा , त्यामुळेच शब्द-संख्या वाढली असावी , पण क्षण - कथांचा जन्मच मुळी ' नो रुलेस ' ह्या रूल बरहुकूम झाल्या असल्यामुळे , शब्द संख्येच बंधन असावे असावे कि नसावे हे ज्याचे त्याने ठरविलेले उत्तम
कालाकुसारीबद्दल वाचून मलाच हसू आले , तो गुन्हा झालाय खरा . आणि ते क्षण- कथा आणि आपल्या चित्रपटांच्या कथा ... बात में दम है !!
रामूकाका कधी संपावर जात नाही
रामूकाका कधी संपावर जात नाही हो! अगदी स्वामीभक्त जमात असते ती, संप विरोधी.
असो.
नविन प्रकारच्या लेखनाचा प्रयत्न आवडला.
लेखन थोडं लांबलय. अन तांत्रिक शब्द फार आलेत ते कमी करता आले असते.
पहिला प्रयत्नात असं होतंच.
अजुन येउ द्या.
(No subject)
राणे साहेब,कथा आवडली. असेच
राणे साहेब,कथा आवडली.
असेच लिहीत रहा.
तुमच्या पुढील लेखनास आमच्या मनापासून शुभेच्छा.
बाबा महाराज , खरोखर धन्यवाद
बाबा महाराज , खरोखर धन्यवाद
पहिला प्रयत्न आवडला. कथा
पहिला प्रयत्न आवडला. कथा मजेदार होती.
Concept अगदि फ्रेश वाटला.
इन्ग्रेजि शब्द सुद्धा मराठीत लिहिलेत तर अजुन बरे वाटेल.
अजुन लेखनाची वाट असेल...
अभिरुची , प्रतिक्रिया आणि
अभिरुची , प्रतिक्रिया आणि प्रोत्साहनाबद्दल मनापासून धन्यवाद