"माऊली"

Submitted by विशाल कुलकर्णी on 21 May, 2009 - 00:18

मागच्या महिन्यात भावाच्या लग्नासाठी सोलापूरी गेलो होतो. तेव्हा अक्कलकोटी श्री माऊलींच्या दर्शनाचा योग आला. कधीही जा माऊलींचे दर्शन होतेच. इथे कधी रांगा लावाव्या लागल्याचे आठवत नाही. तिच्या चरणी डोके ठेवले की मन कसे शांत होवुन जाते.

चरण सदगुरुंचे, पंचप्राण माझे
सर्वतीर्थे दावी , सदगुरुराय माझा !!

गुरु सुखांचे आगर, गुरु भाग्य दाता
ज्ञानियांचा राजा, गुरुराज माझा !!

सेविता दु:खिता, ठेवा ऐहिकाचा
सदैव पाठीशी तो, स्वामीनाथ माझा !!

चैतन्याचा स्त्रोत, ते अद्वैत स्वरुप
मुर्तीमंत कैवल्य, प्रभुराय माझा !!

आता पश्चाताप, सारी उतरली भूल
आशिर्वादे ठेवील, वटवृक्ष माझा !!

तोचि सगुण, तोची निर्गुण, स्वयं परब्रम्ह
स्वामी समर्थ माझे,अक्कलकोटी राणा !!

श्री स्वामी समर्थ !

विशाल

गुलमोहर: 

छान आहे रचना. पण सद्गुरुंची विषेशणे प्रत्येक कडव्यासाठी सुसंगत केली असतीस तर अजून इफेक्ट वाटला असता.

उदा.

चरण सदगुरुंचे, पंचप्राण माझे
पुर्ण ज्ञान दाता, सदगुरुराय माझा

यात सद्गुरुंच्या चरणांशी एकवटलेला भाव पहिल्या ओळीत दिसतो पण दुसर्‍या ओळीत पुर्ण ज्ञान दाता हे विषेशण आल्याने वाचकाचे तिथले लक्ष डायव्हर्ट होते.

तुझा भाव मात्र कळतोय Happy

************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

चरण सदगुरुंचे, पंचप्राण माझे
पुर्ण ज्ञान दाता, सदगुरुराय माझा >> ह्या ऐवजी हे अस केलस तर?

चरण सदगुरुंचे, पंचप्राण माझे
ज्ञानमार्ग दावितसे, गुरुराय माझा

बाकी सुंदर

किंवा सर्वतीर्थे दावी गुरुराय माझा

असे केले तर? म्हणजे त्याच्या चरणांशीच सर्वतीर्थे एकवटली आहेत / आश्रयाला आली आहेत.

************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

मन शांत झाल कविता वाचून.
श्री स्वामी समर्थ!

भक्तीपूर्ण, मस्त जमलीय कविता

छान. जुन्या वह्या सापडल्या की सद्यस्थितीमुळे असाच देवाधर्माला लागतो माणूस!
.............................................................................
येता कणकण कवितेची
करा तपासणी डोक्याची!

भक्तीने ओतप्रोत भरलेली.
स्वामी महाराज तुमच्यावर नक्कीच प्रसन्न झाले असतील. Happy

जय जय स्वामी समर्थ !

मस्त कविता..मला अजुन तिथे जायचा योग आला नाही, पण घरचे म्हणतात खुप छान आहे माऊलींची मुर्ती आणि मंदीर...जय जय स्वामी समर्थ!!!

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

करून करून भागले आणि ..... (कविराज एकदम माऊलीच्या चरणांशी पोहोचलात. असे धार्मिक भावनांना हात घालू नये. आचारसंहिता लागू आहे.)
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

जय जय रघुवीर सर्मर्थ !!!!

*******************************************
बीज जसे अंकुरते मनी कल्पना येते,व्याकुळ होते,तीळ तीळ तुटते,खोल कुठे गलबलते

करून करून भागले आणि ...............>>>

कौतुक ते आहेत म्हणुनच करण्याची धमक आहे रे अंगात! Happy

***********************************
"आज खिडकीच्या गजांवर आभाळ येऊन थांबलं आहे,
ओंजळीत घेईल कवी म्हणून बरसणंही लांबलं आहे !"

विशाल, मस्त रे Happy

जय स्वामी समर्थ!!
---------------------------------
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी