Submitted by मामी on 7 February, 2013 - 22:38
खाऊन एक संतरा
गायला त्यानं अंतरा
मोजताना तालाच्या मात्रा
जाणवला त्याला खतरा
मग,
एकतालाच्या दीडपटीत
भेळ चापली चटपटीत
तान घेऊन येता सीमेवर
गाडी पकडली लटपटीत
धागीनती नक धीं, धागीनती नक धीं
तिरकीट धा, तिरकीट धा, धीं धीं
दरवाज्याचे कुलुप उघडता
बेसुरल्या ज्या बोल-ताना
फ्रीजचे पाणी पीता पीता
मनी गुंजला गोड अडाणा
सा रे म प, नि म प, सां
सां ध नि प, म प ग म, रे सा
बडा ख्याल मग रंगत जाई
सोबत व्हिस्की आणि चकना
अलंकार एकेक उतरले
होरी, धृपद, धमार, तराणा
नादिरदिरदा नी तदानी तोम, तनन तोम
नादिरदिरदा नी तदानी तोम, तनन तोम
तानपुर्याच्या जुळता तारा
'गम', 'मनी', विसरून 'सारे'
सुस्तावूनी मग सुखे झोपला
उद्या सकाळी दुसरे गाणे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लोल्स भारीच लिवलय
लोल्स
भारीच लिवलय
काव्यलेखन कविता न
काव्यलेखन कविता न येणार्यांची कविता कैच्याकै कवि ताटुकार कविता महान टुकार कविताविश्वस्य टुकारेस्ट कविता
<<<
हा! हा! हा! मस्त जमल्ये!
हा! हा! हा! मस्त जमल्ये!
अरे वा !!! महान कविता....
अरे वा !!!
महान कविता.... मामी तु ह्या कवितांचा मुशायरा काढ..... मी नक्की येइन...
आयुष्याचे गाणे आवडले "मनी
आयुष्याचे गाणे आवडले
"मनी गुंजला गोड अडाणा" ईथे मनी घुमला असे करा.
कारण अडाणा ताल आहे. सूर गुंजतो. ताल घुमतो.
आवडली.
आवडले ग मामी
आवडले ग मामी
'गम', 'मनी', विसरून 'सारे' >>
'गम', 'मनी', विसरून 'सारे' >> हे धमाल आहे!
कविता आवडली. वाचताना मजा आली.
कविता आवडली. वाचताना मजा आली.
ज्यांना ज्यांना ही कविता
ज्यांना ज्यांना ही कविता आवडलीये त्यांच्या साहित्यिक अभिरुचीबद्दल शंका घ्यायला भरपूर वाव आहे.
उमेश वैद्य, अडाणा रागही आहे. मी त्या अनुषंगानं लिहिलंय. पण तरीही सुचनेबद्दल धन्यवाद.
वाह वाह वाह
वाह वाह वाह
ज्यांना ज्यांना ही कविता
ज्यांना ज्यांना ही कविता आवडलीये त्यांच्या साहित्यिक अभिरुचीबद्दल शंका घ्यायला भरपूर वाव आहे. >>>
..... कविता आवडली नाही असा प्रतिसाद द्यायचा का मग !!!!! .....
असो ....
माझा प्रतिसाद, 'कविता न समजणार्यांचा प्रतिसाद' समजायला भरपूर वाव आहे
कविता मजेदार झालेय.
शेवटच्या कडव्यातली शेवटची ओळ (गांभीर्याने वाचल्यास) एक वेगळाच अर्थ देऊन जाते असे वाटले.
प्रसन्न वाटले.
प्रसन्न वाटले.
मामी, फ्यान क्लब काढावासा
मामी, फ्यान क्लब काढावासा वाटतोय !
रोज सकाळचे गाणे टाकलेस... तर प्राध्यापक होशील लवकरच !
वा वा ...उद्या सकाळी दुसरे
वा वा ...उद्या सकाळी दुसरे गाणे..वावा
अख्खी कविता आवडली
धन्यवाद, धन्यवाद. रोज सकाळचे
धन्यवाद, धन्यवाद.
रोज सकाळचे गाणे टाकलेस... तर प्राध्यापक होशील लवकरच ! >>>> अरे बापरे, दिनेशदा, नको नको. एक आहेत तेवढे बास.
अरे बापरे, दिनेशदा, नको नको.
अरे बापरे, दिनेशदा, नको नको. एक आहेत तेवढे बास.
>>>
मला नाही बाई आवडली कविता
मला नाही बाई आवडली कविता >>>
मला नाही बाई आवडली कविता >>> शाब्बास मुली, तुझ्या उच्च अभिरूचीबद्दल तुझं अभिनंदन.
भारीये!
भारीये!
(No subject)
मामी,तुसी ग्रेट हो ! फॅन तर
मामी,तुसी ग्रेट हो ! फॅन तर मी पूर्वीपासूनच आहे.मला टॅलंट लवकर ओळखू येतो.
मामी,तुसी ग्रेट हो ! फॅन तर
मामी,तुसी ग्रेट हो ! फॅन तर मी पूर्वीपासूनच आहे.मला टॅलंट लवकर ओळखू येतो.>>>>>>>
लै भारी
लै भारी
मस्त
मस्त
मा>>मे.... काय
मा>>मे.... काय चालवलंयस्..भार्रीच्चेस हां..
'ज्यांना ज्यांना ही कविता आवडलीये त्यांच्या साहित्यिक अभिरुचीबद्दल शंका घ्यायला भरपूर वाव आहे'"