Submitted by सतीश देवपूरकर on 8 February, 2013 - 14:51
गझल
हे असे घडणार नक्की!
मी पुन्हा फसणार नक्की!!
आवरू दे बाडबिस्तर....
मी उद्या नसणार नक्की!
शेवटी काटे, अरे, ते....
एकदा रुतणार नक्की!
वाट ही काट्याकुट्यांची.....
पार मी करणार नक्की!
मी तुझ्या झालो हवाली!
काळजी मिटणार नक्की!!
घोकले तेही विसरलो....
आज ती रुसणार नक्की!
फाटले आभाळ इतके;
दगडही द्रवणार नक्की!
शेपटीवर पाय पडला....
तो मला डसणार नक्की!
प्राक्तना! मी शब्द देतो....
जिंदगी जगणार नक्की!
शीड आहे फाटलेले!
नाव भरकटणार नक्की!!
कोण सांभाळेल तुजला?
मद्य हे चढणार नक्की!
ओत तू पाणी कितीही,
वीष ते भिनणार नक्की!
पानगळ येते नि जाते!
मी पुन्हा फुलणार नक्की!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली इतकी की शब्द नाहींत
आवडली इतकी की
शब्द नाहींत नक्की......
धन्यवाद शिवमजी!
धन्यवाद शिवमजी!
एकदा तरी लिहा असे की भावना
एकदा तरी लिहा असे की
भावना पोचतील नक्की....
bumrang, तू कुपोषित एवढा
bumrang,
तू कुपोषित एवढा की,
हे कधी कळणार नक्की?
.........प्रा.सतीश देवपूरकर
कुपोषण - उपोषण बरे कधीही नको
कुपोषण - उपोषण बरे कधीही![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
नको नको ते अजीर्ण नक्की!
(No subject)
(No subject)
जीर्ण पिंडाने किती तू! काय
जीर्ण पिंडाने किती तू!
काय तुज पचणार नक्की?
जीर्ण पिंडाने किती तू! काय
जीर्ण पिंडाने किती तू!
काय तुज पचणार नक्की?
गंध काव्याचा तुला ना! काय तुज
गंध काव्याचा तुला ना!
![Click to get more.](http://content.sweetim.com/sim/cpie/emoticons/000204AD.gif)
काय तुज सुचणार नक्की?
अशक्य स्मायली आहेत
अशक्य स्मायली आहेत![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
देवसराना गझलेतले काहीही अशक्य
देवसराना गझलेतले काहीही अशक्य नाही मग ते तिच्यावरील प्रतिसादातले स्माईलीज का असेनात
आचारी तवसम असता इथे अपचन
आचारी तवसम असता इथे
अपचन सर्वां होणार नक्की...
शब्द सारे दडुनि बसता
स्मायली हे पडणार नक्की!
स्मायली फुटतात वेड्या पडत
स्मायली फुटतात वेड्या पडत नाही!
स्मायलींचेही पचन तुज शक्य नाही? ...........अरेरे!
गझला सुचतात वेड्या, पाडत
गझला सुचतात वेड्या, पाडत नाहीत
रतीब जो घालतो तो मूर्ख नक्की!
गझला कशाही असेना प्रतिसाद
गझला कशाही असेना
प्रतिसाद विनोदीच नक्की
गझलांना मार गोळी
प्रतिसाद मी वाचणार नक्की
सतीश, क्वांटीटी मुळे क्वालिटी कडे लक्ष जात नाही त्यामुळे गझल वाचन होत नाही, तरी क्षमस्व.
सर्व रसिकांना नम्र
सर्व रसिकांना नम्र निवेदन.......
गझलकाराकडे पहाण्यापेक्षा गझलेकडे पाहू यात का आपण?
आपल्या सगळ्यांच्याच दृष्टीने ते श्रेयस्कर आहे, हितावह आहे!
गझलेची खरी आवड, गझलेवरील नितांत प्रेम, गझलेचा लागलेला लळा, वेड हे जर असेल तर संख्येची अडचण येवू नये! गझल कोणाची आहे हे गौण असते, ती कशी आहे हे महत्वाचे असते!
कामयाब शेर मग तो कुणाचाही का असेना परमेश्वराचाच उद्गार असतो, असे आम्ही तरी मानतो!
गझलेचा सच्चा आशिक गझला आधाशासारख्या वाचून काढतो! मग त्या कुणाच्या आहेत हे त्याच्या दृष्टीने महत्वाचे नसते! त्याला तृष्णा असते ती दिव्य अलौकिक उद्गारांची!
प्रा.सतीश देवपूरकर
श्वासांचा का रतीब
श्वासांचा का रतीब असतो?
कवितांचा का रतीब असतो?
मूर्ख माणसे म्हणती ऐसे,
गझलांचा का रतीब असतो?
प्रा.सतीश देवपूरकर
भाव जरासा तयात असता ठाव घेतला
भाव जरासा तयात असता ठाव घेतला असता
नुसत्या जुळवाजुळवीला रतीब म्हणावे नक्की!
तुला स्वत:चा ठाव कुठे रे? कसा
तुला स्वत:चा ठाव कुठे रे?
कसा कळावा भाव तुला रे?
कधी चाखली गझल नव्हे तू;
नकोस आणू आव असा रे!
उगा अहंता अंगी बाणता गर्जत
उगा अहंता अंगी बाणता
गर्जत जाते उथळ पाणी
अथांग म्हणजे कळते जेंव्हा
गर्वाचे घर खाली नक्की!
तुला स्वत:चा थांग न
तुला स्वत:चा थांग न पत्ता.....
अथांग म्हणजे कसे कळावे?
कसली लांबी, कुठली रुंदी?
तुज खोलीचे काय समजते?
प्रांत कलेचा असे वेगळा;
कसली प्रौढी, गर्व कोणता?
देव सांगतो, आम्ही लिहितो!
सारे त्याचे सदा मानतो!
खळबळ, झुळझुळ, धो धो, रिमझिम;
फरक तरी तुज कळतो का रे?
एक गझलही लिहिली नाही;
उगाच गरजू नकोस काही!
उगाच भुंकू नकोस वेड्या,
डरकाळी वेगळीच वेड्या!
तुझा नव्हे हा प्रांतच वेड्या....
कशास खुडबुड करतो वेड्या?
बिळात उंदिर दिसे साजरा,
तिथेच तू दिसशील गोजिरा!
गझल अरे ही गझल असे ही,
तुला तिथे ना कामच काही!
डोकेफोडी करू कशाला?
रक्त आटवू तरी कशाला?
जा तू आता कडेकडेने.....
मीही जातो दुज्या दिशेने!
..........प्रा.सतीश देवपूरकर
वाचका लेखुन कमी का बरळत
वाचका लेखुन कमी का बरळत जातो
त्रागा करुनि कशास तु रे गरळ ओकतो
खात्री आपुल्या खुजेपणाची पटता पक्की
शब्द सोडिती पातळी... हे दिसले नक्की!
तुला स्वत:ची अशी कुठे पातळी
तुला स्वत:ची अशी कुठे पातळी वेगळी?
शब्दांची पातळी तुला का कळते वेड्या?
कोण उंच अन् कोण खुजा तुज कसे कळावे?
तुला स्वत:ची उंची कोठे माहित आहे>
भावाचा दुष्काळच होता...
भावाचा दुष्काळच होता... शब्दही आता आटले का रे?
शंभर वेळा वेडा म्हणशी... वेड लागले तुलाच नक्की!
वेड्याला म्हटले भले कितिकदा
वेड्याला म्हटले भले कितिकदा 'वेडा' कुणीही जरी;
![Click to get more.](http://content.sweetim.com/sim/cpie/emoticons/000201C7.gif)
त्याला हे वाटे सतत की, तो शाहणा रे किती!
समृद्धी असते जिथे पण तया दुष्काळ वाटे पडे......
समृद्धी कुठली, कशास म्हणती, दुष्काळ हे ना कळे!
आयला कलगी_तुराच
आयला कलगी_तुराच की
....येउद्या~~~![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
कलगी तुरा??? . असे वाटते की
कलगी तुरा???
.
असे वाटते की संसद मधे बसलोय आणि अधिवेशन चालु आहे
मला झक्कींची आठवण आली ...कुठे
मला झक्कींची आठवण आली ...कुठे आहेत ते सध्या ??
सर्व आस्वादकांचे आभार!
सर्व आस्वादकांचे आभार!
Pages