चारचौघी - ११

Submitted by बेफ़िकीर on 7 February, 2013 - 06:17

हुडहुडी भरवणारा वारा! एलाईटच्या प्लँटकडून येणारा मळीचा वास! नि:शब्द हालचाली. अवाक मने!

बहुतेक सर्वच साहित्य व्हॅनमधून आधीच शिफ्ट झालेले.

दोन बॉडीगार्ड्स रफी आणि ओम, गोविंद हा खानसामा, सीरीनचा गोसावी, आहुजा नावाचा क्लाएंट, आशिष, देव, गोयल सर आणि सिमेलिया!

आशिष, देव आणि गोयल! तीन माना खाली झुकलेल्या! वर उचलल्या गेल्या की चुटपुटती नजर विजेसारख्या लकाकणार्‍या सिमच्या देहावरून फिरवून परत खाली झुकणार्‍या! आवाज नाही. फक्त आँखमिचौली! पाचच दिवसांपूर्वी हे लवलवते शरीर आपण सर्वप्रथम भोगल्याचा आनंद! त्या क्षणापासून सिममध्ये पडलेला अवाक करणारा फरक! उठलेला गदारोळ! सिमने अजूनही, याही क्षणी 'अ‍ॅट ईझ' असणे! मरणासन्न वृद्धाला संजीवनी मिळेल असा शॉट आत्ताच दिलेला! तिचा तो जोश पाहून मनात काहीसा पश्चात्ताप भरलेला. आज जिचे शेकड्याने फॅन्स आहेत तिला आपण नुकतेच कसे वागवले होते याची अपराधी जाणीव! त्यात पुन्हा आज रात्री जमले तर तिला बंगल्यावर नेता येईल का असा मोह!

गोविंद! प्लेट्स लावून आणि स्नॅक्स ठेवून चुलीकडे वळलेला! खास चुलीवर भाजलेली कोंबडी! रफी आणि ओम आपला वकूब माहीत असल्याने बर्‍यापैकी लांब अंतरावर, कोंबडीची प्लेट आपल्याकडेही येण्याच्या प्रतीक्षेत! गोसावीच्या खास परवानगीने आज त्यांनाही दोन दोन टिन्स मिळालेले कार्ल्सबर्गचे!

गोसावीच्या मनात सिमबद्दलच्या आकर्षणाचा लवलेशही नाही. शेकड्याने सुंदर मुलींना अर्धवस्त्र अवस्थेत पाहिल्याने त्याचे डोळे असल्या दृष्यांना सरावलेले. शरीराचे आव्हान मोडीत काढून मॉडेलच्या मनापर्यंत त्याचा वैचारीक प्रवास झालेला! त्याचा इन्टरेस्ट एकच! आहुजाकडून अ‍ॅन्युअल काँट्रॅक्ट मिळवायचे. त्यामुळे गोसावी आहुजाचा प्रत्येक शब्द हवेतच झेलतोय. आहुजाच्या पायाशी एका घमेल्यात छोटी वेगळी शेकोटी असावी असे गोविंदला सुचवतोय. तंदुर कांद्याची भली मोठी प्लेट प्रथम आहुजासमोर धरली जात आहे. जॅक डॅनियल्सचा नाईन्टी डायल्यूटेड आहुजाच्या हातात तळपतोय.

आहुजा! तोंडातून लाळ गळू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करत आपले सर्व लक्ष गोसावीकडे असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत आहे. आजच्या असाईनमेन्टच्या अनुषंगाने आजवरच्या अ‍ॅड्सची चर्चा करत आहे. पण नजरेच्या कोपर्‍यातून त्याचे खरे तर सर्व लक्ष सिमेलियाकडे लागलेले आहे. ही असाईनमेन्ट सीरीन एजन्सीला कंटिन्यू करायची असल्यास सिमेलिया जैन आपल्या वाट्यास यावी ही त्याची अगदी जुजबी मागणी अजून त्याने बोलून दाखवलेली नाही. आशिष, देव आणि गोयल तिथून कटल्यावर तो ही मागणी गोसावीसमोर ठेवणार आहे. सिमला विचारण्याची त्याच्यामते काही गरजच नाही आहे.

आगीचे वर्तुळ विझवलेले! आता तर त्याची धगही नाही. त्यामुळे एक लहान वेगळी शेकोटी पेटवलेली! जिच्या उबेत हे सहाजण बसून आपापले पेय घेत आहेत. सिम खळखळून हासत आहुजाच्या वाक्यांवर दाद देऊ लागलेली आहे.

हासता हासता सिमेलियाने लांबवर उभ्या असलेल्या रफी आणि ओमकडे पाहून स्वतःचा सेलफोन स्वतःच्या कानाला लावला. सेलफोनचा प्रकाश रफीला आणि ओमला दिसला तसे दोघांनीही आपापले सेलफोन्स तिकडे स्वतःच्या कानांना लावून आपापल्या सेलफोन्सचा प्रकाश सिमेलियाला दिसेल याची खात्री केली. तसे मग सिमने आपला फोन पर्समध्ये ठेवत पर्स खाली ठेवली आणि आणखीनच सहज देहबोली करत गोयलांकडे वळून बघत म्हणाली..

"सर?... व्हाय आर यू सो स्लो?"

गोयलांना हवे ते झाले! सिम आपल्यासंदर्भात आता कोणताही राग न धरता बोलत आहे याचे चिन्ह दिसताच ते इतके रिलॅक्स्ड हासले की आशिष आणि देवलाही अतिशय मोकळे मोकळे वाटले. आहुजाला ते तिघे तिथे नको होते. आहुजाची नजर सिमला 'य' तासांपूर्वीच लक्षात आलेली होती. तिला अश्या नजरेची नुसतीच घृणा नव्हती तर आहुजाचे लिंग पिळवटून नुसत्या वेदनेने त्याला यमसदनी धाडावा असे तिला वाटत होते. पण गोसावीसाठी म्हणून ती आहुजाशी अतिशय मैत्रीपूर्णरीत्या वागत होती. शेकोटीच्या लवलवत्या प्रकाशात आहुजा आणि गोसावीची झालेली नेत्रपल्लवी चाणाक्ष सिमने ओळखली. आहुजाला ते तिघे इथे नको होते. आणि सिमला तेच तिघे इथे हवे होते. हा तिढा कसा सुटणार? शेवटी गोसावीने हिय्या करून गोयलांना थेट प्रश्न विचारला.

"मिस्टर गोयल... मिस्टर आहुजा वॉन्ट्स टू डिस्कस द फर्दर बिझिनेस विथ मी.. सो... आय मीन.. हाऊ लाँग यू आर प्लॅनिंग टू बी हिअर सो दॅट वुई कॅन ... यू नो?"

खाड!

असला सुस्पष्ट अपमान फक्त गोसावीच करू जाणे गोयलांचा! गोयलांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली. त्यांना ना स्कॉचमध्ये स्वारस्य होते ना सिममध्ये! फक्त सिम आपल्याशी कशी वागू इच्छित आहे हे डिटेल्स तपासण्यात त्यांना स्वारस्य होते. आणि बोलणी सुरू व्हायच्या आतच गोसावींनी सरळ हाकलाहाकलीची भाषा सुरू केली होती. पण ही वॉज द कस्टमर! गोयलांनी एकदम अ‍ॅलर्टली सांगितले.

"ओह श्योर.. आय मीन.. आय अ‍ॅम लीव्हिंग.. इट वॉज अ ग्रेट असाईनमेन्ट... अ‍ॅन्ड मिस्टर गोसावी... प्लीज आस्क फॉर अवर सर्व्हिसेस इन फ्युचर टू... फॉर मिस्टर आहुजाज असाईनमेन्ट्स..."

"ओह शुअर.. अ‍ॅबसोल्यूटली... "

अचानक रसभंग होऊन गोयल, आशिष आणि देव उभे राहिले. तसे सिमने लांब रफीकडे पाहिले. रफी आणि ओमने घाईघाईने टेप तिथे आणला. सिम सगळ्यांकडेच बघत म्हणाली....

"नो म्युझिक? नो डॅन्स?"

आता काय करणार? प्रत्येकाचीच इच्छा होती की सिमच्या कंबरेत एका हाताचा विळखा घालून ट्यून्सवर थिरकावे! पण चमत्कारीक तिढा होता! गोयलांना निदान 'नाही नाही, आम्हाला जायला लागेल' असे म्हणावे तरी लागणार होतेच. आहुजा तर सिम म्हणाली असती तर त्या गार मातीतच तिला घेऊन पहुडला असता. गोसावीला कश्यातच स्वारस्य नव्हते. ना सिमसमोर आहुजाशी चर्चेत, ना नृत्यात, ना दारूत, ना कोंबडीत! त्याला आहुजाला घेऊन आहुजाच्या रूमवर जाऊन करारासाठी पटवायचे होते. पण आहुजाला सिम हवी असणार हे त्याच्या लक्षात आलेले होते. त्यामुळे तो डोके वापरून सिमला म्हणाला..

"सिम.. आहुजा सर आपल्या दोघांशी बोलू इच्छितात... मे बी... आपल्याला त्यांच्या स्विटवर जावे लागेल.. "

सिमला पक्के माहीत होते की एकदा स्विटवर गेलो की गोसावी तिथून निघून जाताना आपल्याला नक्की सुचवणार की तू थोडावेळा आहुजांबरोबर थांब! त्यामुळे ती स्पष्टपणे म्हणाली..

"मी एक काम करते मिस्टर गोसावी... पावणे अकरा वाजलेत ना?... तुम्ही सरांना घेऊन जा स्विटवर... मी पाठोपाठ येतेच... एवढा मस्त मूड क्रिएट झाला आहे.. चालेल का?"

आहुजाच घाईघाईत म्हणाला..

"ओह बाय ऑल मीन्स... पण आम्हीही थांबतो की?... एकत्रच जाऊ...??"

"नो प्रॉब्लेम सर... इट वुड बी अवर प्लेझर.. "

वातावरणाला झिंग यायला सुरुवात झाली. जॅक डॅनियल्सचे लाल तपकीरी रंगाने भरलेले पेले हिंदकळू लागले. एकाहून एक सरस ट्यून्स लागू लागल्या. हसत खेळत गप्पांना रंग चढता चढताच पाय उडू लागले. प्रथम अपेक्षेप्रमाणेच आशिष उठला. हळूहळू ट्यूनवर त्याचे पाय थिरकू लागले. सिमला आत्ता अभिनय करणे आवश्यक होते. आशिषला पाहून ती उठली म्हणताच गोयल, देव आणि मुख्य म्हणजे आहुजा अ‍ॅलर्ट झाले. कारण आत्ता इतक्या सुंदर वातावरणात सिमेलियाला जवळ घेऊन नाचणे हे स्वर्गसुखच होते. सिमेलियाचे स्वप्नील नशीले डोळे आशिषच्या नजरेत गुंतले. स्वतःहून ती त्याच्या निकड गेली. आशिषच्याही नकळत त्याचा एक हात सिमेलियाच्या कंबरेवर स्थिरावला. ती त्याच्या त्या हाताच्या पकडीत झुलू लागली. दोघांचे एकमेकांकडे पाहणे इतके वेगळे होते. आशिष बहकून पाहात होता तर सिम जन्मोजन्मीच्या प्रियकराकडे पाहावे तशी! हळूहळू निकटता वाढू लागली तसे खरोखरच न राहवून आहुजा पुढे झाला आणि आशिषसमोर बिनदिक्कतपणे आणि बिझिने काँट्रॅक्टच्या हक्कातून आलेल्या इगोमुळे ऑथोरिटेटिव्हला सिमला म्हणाला...

"कॅन... वुई डॅन्स???"

सिमची तंद्री भंगली. जॅक डॅनियल्स तिच्या पेल्यांमधून डोळ्यात जात होती की डोळ्यांमधून पेल्यात अशी शंका यावी असे तिचे डोळे झाले होते. तेच नशीलेपणाने ओतप्रोत भरलेले डोळे आहुजाच्या बटबटीत डोळ्यात तितक्याच सहजतेने गुंतवत सिमेलिया म्हणाली..

"शुअर सर... माय प्लेझर"

स्वतःवर ताबा नसावा तशी सिमेलिया आहुजाच्या बाहुपाशात झुलू लागली. आहुजा स्वर्गात पोचला होता. त्याचे डोळे सिमवर असे रोखले गेले होते नाचताना, की त्याने निर्लज्जपणे आत्ता येथेसुद्धा तिला खाली झोपवले असते. पण एका क्षणी तो सिमच्या कानावरून जीभ फिरवत असताना त्याचाही कान सिमच्या तोंडाजवळ आला आणि संधी पाहून सिम म्हणाली...

"इथे तुमच्या आणि माझ्यावर चारजणांचे लक्ष आहे... तासभर थांबाल का? आय विल बी इन यूअर स्विट, मायसेल्फ"

आहुजाच्या सर्वांगातून चारशे चाळीस हजार व्होल्ट्सचा करंट पास झाला. जणू आता निघावे लागणार असा अभिनय करत नृत्यातील वेग आणि आवेग हळूहळू कमी करत आणत आहुजा एकदम सगळ्यांकडे बघत म्हणाला..

"राईट गाईज.. एन्जॉय यूअरसेल्फ... कम ऑन गोसावी.. लेट्स गो टू माय प्लेस.. पुढची डिस्कशन्स तिथेच करू.. दीज यंग पीपल... लेट देम एन्जॉय हिअर... हा हा हा"

गोयल, आशिष आणि देव! तिघांसाठी हे विधान म्हणजे सुखाचा धबधबा होता. भन्नाट वारा! भन्नाट ट्यून्स! स्कॉचची झिंग! आणि सिमेलिया! फक्त तिचे अंगरक्षक आणि हा खानसामा, या तिघांना परत पाठवले की झाले!

अच्छा बाय बाय करून गोसावीच्या कारमधून आहुजा सुळ्ळकन निघून गेला.. सिमेलिया आता खुर्चीवर बसली.. स्वतःसाठी तिने आणखी एक ड्रिंक बनवून घेतले.. तिला आशिषने नवल वाटून विचारले..

"तू स्कॉच घेतेस सिम???"

सिमने आपले मादक डोळे आशिषवर रोखले... आणि तितकीच मादक हासत म्हणाली...

"तुझ्याकडच्या बर्थ डे पार्टीनंतर बीअरमधला इन्टरेस्ट संपला माझा... आय लव्ह हार्ड... हार्ड ड्रिंक... "

अक्षरशः काळजं थडाथड उडू लागली तिघांची! शी हॅड लाईक्ड द रेप इट सीम्स! इट सीम्स, शी लव्ह्ड इट! सो, वन्स मोर??????

'मी प्रेमासाठी आसूसलेली आहे'! पै ने क्षितिजमध्ये तिच्यानावे छापलेली ही लाईन आत्ता सगळ्यांना आठवली. आजची रात्र! भुसभुशीत माती! गोठवणारा वारा! आणि सिम!

"तू... तू आज कमाल केलीस सिम... तुझी एक्स्प्रेशन्सच त्या गोळ्यांपेक्षा पुरेशी आहेत... हव्यात कशाला शक्तीवर्धक गोळ्या कुणाला?"

गोयलांनी स्तुती केली. खदखदून हासत सिमेलियाने स्कर्टमध्येच आपला उजवा गुडघा जरा जास्तच उचलून डाव्या गुडघ्यावरून टाकला. क्षणभराच्या त्या अस्वस्थ करणार्‍या दर्शनाने चलबिचल झालेले गोयल ड्रिंक घेऊ लागले तेव्हा सिमने लटका राग धारण करून वाक्य टाकले..

"यू गाईज आर क्रिमिनल्स.. यू गाईज.. यू शूड हॅव.. यू शूड हॅव हॅन्डल्ड द होल थिंग इन सच अ वे... दॅट.. आय डोन्ट फील लाईक आय अ‍ॅम बीइंग रेप्ड ना? ... यू डोन्ट नो हाऊ टू ट्रीट अ गर्ल???"

हा खरे तर जहरी घाव होता. तिचा राग लटका आहे हे तिच्या चेहर्‍यावरून समजत होते म्हणून! नाहीतर रफी आणि ओम जिच्या सोबतीला कधीही येऊ शकतील अश्या सिमने आत्ता हे वाक्य उच्चारणे म्हणजे घामच फुटला असता खरे तर! पण तिच्या चेहर्‍यावर लटका राग आहे हे जसजसे समजले तसतसे सगळ्यांचे श्वसन व्यवस्थित सुरू झाले. पहिल्यांदा देव बोलला..

"मी... मी शपथेवर सांगतो सिम... जगात असा एकही पुरुष नसेल... जो तुला प्रत्यक्ष पाहील आणि त्याला ती इच्छा होणार नाही... आवरूच शकत नव्हतो आम्ही स्वतःला... माफी मागणेही चूक आहे आता... पण... तू आहेसच अशी की.. "

सिमच्या सातमजली हासण्याने त्या तिघांना आपली पापे धुतली जात असल्याचे जाणवले आणि... अगदी हळूहळू... अगदी हळूहळू त्यांच्या चेहर्‍यावरही हलके हलके स्मितहास्य पसरू लागले.. अजूनही हासतच असलेली सिम म्हणाली..

"व्हॉटेव्हर.. इट चेंज्ड मी फॉरेव्हर.. आय अ‍ॅम नो लाँगर द सिम दॅट आय वॉज... मी आता लोकांच्या मनावर राज्य करते... राज्य! गोयल सरांनी ती ऑफर दिली नसती तर आज इथे कुणी मेघना बिघना असत्या..."

"शिट... तिचे नांवही काढू नकोस..." - आशिषने सिम आणि मेघना यांच्यात सिम किती सरस आहे हे या उद्गारांमधून दाखवून दिले... फक्त सिमला खुष करण्यासाठी..

गोयलांच्या अंगावर दहा मुठी मांस चढलेले होते. नेव्हीनगरसकट महाराष्ट्र ढवळणारी ही मुलगी आपल्यामुळे या क्षेत्रात आल्याचे कबूल करते ही बाब त्यांना अतीव सुखद वाटत होती.. तो त्यांचा हक्क आता वटवल्याशिवाय ते तिला जाऊही देणार नव्हते..

अचानक सिमचा चेहरा गंभीर झाला.. जमीनीकडे बघत ती म्हणाली...

"गोविंद... तू रफीबरोबर जाऊन थांब... आता आम्हाला जरा बोलायचे आहे... "

आत्तापर्यंत इंग्लिशमिश्रित मराठी असल्याने काहीच कळत नसलेला गोविंद चिकन रोस्ट करत बसला होता... घाईघाईने त्याने झालेले चिकन पीसेस डिशमध्ये ठेवले आणि तो रफीच्या दिशेने निघून गेला.. सिमेलिया जमीनीकडे बघतच म्हणाली..

"तुम्ही तिघांनी... यू ऑल.. यू रेप्ड मी.. इट वॉज अ रेप.. ... आता माझा संताप होतो आहे.. संताप नुसता... माझ्या इच्छेविरुद्ध यू कान्ट डू दॅट टू मी.. पण.. केवळ लगेच आलेल्या असाईनमेन्टमुळे मी लीगल इश्यूज केलेच नाहीत... पण मी जर... मी जर केस केली... तर यू गाईज विल बी बिहाईंड द बार्स.. आर यू अ‍ॅग्रीइंग???"

अपराधी स्वरात आणि खाली बघत आशिष म्हणाला..

"आय डू अ‍ॅग्री... सिमेलिया... खरे सांगायचे तर.. आम्ही मगाचपर्यंत खूप घाबरलेलो होतो.. तू अजूनही आमचे आयुष्य बरबाद करू शकशील अशी परिस्थिती आहे... अर्थात.. वकीली डावपेच वेगळेच असतात म्हणा.. पण लोकांच्या रोषाला आम्ही बळी पडू शकू याची पूर्ण जाणीव आहे आम्हाला... आणि.. तुझ्यापुढे खरे तर काही बोलण्याचे मुद्देच नाहीयेत आमच्याकडे... पण देव म्हणाला तसे... मीही तेच म्हणेन... की... की तू इतकी... इतकी स्वर्गीय आहेस... की नाही राहवले..."

"ऑल ऑफ यू रेप्ड मी?"

आता तर आणखीनच अपराधी वाटू लागले. कारण समीर, जो आत्ता तिथे नव्हता, त्यानेही रेप केला होता..

"येस सिम.. ऑल ऑफ अस"

"यू मिस्टर गोयल?"

"लीव्ह इट सिम.. यू आर अ ग्रेट मॉडेल नाऊ..."

गोयल वेगळ्याच धुंदीत होते.. सिम उदासवाणे पणाने जखमांवरचे खपलीचे एकेक पापुद्रे अलगद काढत होती...

"आशिष, कोणत्याही मुलीला शक्य तितक्या लवकरात लवकर विस्मरणात घालवावासा वाटेल असा तो प्रसंग होता... आय ट्रस्टेड यू गाईज... बट यू टूक अ‍ॅडव्हान्टेज... पण.. आता परिस्थिती बदलली आहे.. परिस्थिती अशी आहे की मी म्हणाले तर आत्ता इथून गेलेला आहुजासुद्धा मला मोठा वकील स्पॉन्सर करेल.. सीरीनचे अ‍ॅडव्होकेट्स तर असे आहेत की वारिया दस्तूरचे धिंडवडे निघतील कोर्टात.. आत्ता परिस्थिती अशी आहे की... माझ्यावर कितीही पैसा खर्च करून माझे तीन महिन्याचे काँट्रॅक्ट दोन वर्षाचे करण्यासाठी सीरीन धडपडेल.. आत्ता परिस्थिती अशी आहे की... मी म्हणाले तर अख्खे डिपार्टमेंट तुमच्या मागे लागेल.. पण आशिष तो... तो एक सूड ठरेल.. जो घ्यायला कोणत्याही मुलीला आवडेलच.. पण.. तुम्हाला धक्का बसेल... की ... की मी वेगळाच विचार करत आहे... आता तुम्हाला तिघांना समजा शिक्षा झाली... तरी मी जे घालवलेले आहे ते मला परत मिळणार नाही आहे... मग.. जे मला मिळू शकते ते मी कशाला घालवायचे???.. ही केस करून आणखीन वादग्रस्त ठरायचे आणि शेवटी काय तर तुम्ही तिघे जेलमध्ये सडणार आणि तोवर माझ्या हातातून करार गेलेले असणार... त्यापेक्षा.. ......"

"...... त्यापेक्षा???"

"एक विचित्र वाटेल, अविश्वसनीय वाटेल अशी डिमांड आहे माझी.. "

"व्हॉट्स दॅट???"

"यू... यू पे मी रुपीज टेन लॅख्स अ‍ॅन्ड ऑल ऑफ अस फर्गेट व्हॉट हॅपन्ड.. प्लस... इच वन ऑफ यू कॅन स्लीप मी टुनाईट, फॉर वन्स अ‍ॅन्ड द लास्ट टाईम... लेट दॅट ब्लडी आहुजा वेट देअर"

खूप वेळ! खूप वेळ गहन शांततेत गेल्यावर आशिषने धीर करून एक प्रश्न विचारला सिमला!

"सिम... एक विचारतो... रागवू नकोस... पण ... काही अतिशय दुर्मीळ केसेस असतात... तसे तुझे... तसे तुझे आहे का गं? मला तरी तसे वाटत आहे.. आय फील... आय फील यू एन्जॉईड रेप... डिडन्ट यू?"

सिमेलिया जैन! शरीरात संतापाचे त्सुनामी येत असताना चेहर्‍यावर एक लाटही फुटू न देता खदखदून हासत म्हणाली..

"मग मी त्या परिस्थितीत एर्रॉटिकाची गोयलांनी दिलेली ऑफर स्वीकारली असती का आशिष?"

'चीअर्स'! ग्लासेस पुन्हा किणकिणले. रेकॉर्ड्सचा आवाज वाढला. सिमच्या सेलवर गोसावी आणि आहुजाचे कॉल्स येऊ लागले तसा तिने सेल बंदच केला. तसे मग या सगळ्यांनीच आपापले सेल बंद केले कारण गोसावी या तिघांनाही कॉल करणार हे त्यांना माहीत होते. तरी रफी धावत आलाच सिमपाशी! म्हणाला..

"सरका कॉल है मॅम"

" उनको बोलो ढाई बजे पहुंचरही हूं... और तुम तीनो अपना अपना फोन बंद करदो... खाना खाओ.. लगे तो और बीअर लेकर जाओ... और सुनो... अब गोविंदकी जरूरत नही है... इतना चिकन बहुत हो गया... ओमको बोलो गोविंदको छोडकर यहाँ वापस आयेगा...ठीक है??"

'ढाई बजे'! तीन तास! तीन तास सिम अजून इथे बसणार आहे. म्हणजे प्रत्येकी एक तास? की कसे? गोयलांना वीस मिनिटे जास्ती हवी असणार बहुधा! हिशोब मनातल्या मनात सुरू झाले.

सिमसाठी असलेल्या कारमधून ओम गोविंदला घेऊन निघून गेला. रफी लांब उभा राहून बीअर आणि चिकनचा आस्वाद घेत राहिला. देवने इथल्या शेकोटीत आणखी थोड्या काटक्या टाकल्या. जरा ऊबही वाढली आणि जरा प्रकाशही! ट्यून्सच्या वाढवलेल्या आवाजावर आता उत्साहाच्या लाटेवर स्वार झालेली चार शरीरे स्वैर थिरकू लागली. स्वत्वाचे भान लवकरात लवकर विसरण्याच्या इच्छेने पेले भरले जाऊ लागले.. सिमच्या शरीराला काटेरी स्पर्श होऊ लागले... त्यांनी सिम हुरळल्यासारखी हसू लागली... लांब उभ्या असलेल्या रफीला ते दृष्य अतिशय ओंगळवाणे वाटत होते... पण असली दृष्ये त्याने अनेकदा पाहिली होती...

कधीतरी गोविंदला सोडून ओम परत आला.. तेव्हा हे चौघे बेभान होऊन नाचत होते... वाट्टेल त्या ट्यून्सवर.. !!

आणि अचानक सिमची नजर रफी आणि ओमकडे वळली... बघते तर ते अगदी दहा पाच फुटांवर येऊन पोचलेले.... सिम गंभीर झाली.. तिने चेहर्‍यावर तसे दाखवले नाही... पण या सगळ्यांपासून किंचित किंचित अंतर ती वाढवू लागली... कारण कधी काय होऊ शकेल हेच सांगता येत नव्हते... पाच बेभान पुरुष... एक कोवळ्या वयाची अप्सरा.. मध्यरात्र... एकांत... दारूची झिंग.. नृत्याची नशा.. काहीही होऊ शकले असते... प्रचंड सावध होत सिम एक एक पाऊल थोडे थोडे लांबून टाकू लागली.. तिने आयडिया केली... ती गोयल, आशिष आणि देवच्या भोवती किंचित अंतर, एक चार सहा फुटांचे अंतर ठेवून वर्तुळाकार नाचू लागली... आणि...

... आणि ती जशी फिरेल... तसे रफी मगाचपासून जपून ठेवलेले पेट्रोलचे कॅन्स त्याच वर्तुळावर ओतत जाऊ लागला.. दोन कॅन्स ओतले गेले तेव्हा अचानक भस्सकन पेट्रोलचा वास सगळ्यांच्या नाकात शिरला.. काय होत आहे हे समजले नाही... पण देवने फटाफट रेकॉर्ड्स बंद केल्या.. आता बरीच लांब पोचलेली सिमेलिया भेसूर चेहरा करून या तिघांना सांगत होती...

"नाऊ... यू एन्जॉय डेथ"

शेकोटीच्या प्रकाशात तिचा तो भेसूर चेहरा पाहून आणि ते वाक्य ऐकून गोट्या कपाळात गेल्या होत्या तिघांच्या.. काही कळायच्या आत... केवळ पंधरा ते वीस सेकंदात तीन तीन फुट अंतरावर पेट्रोलची तीन काँसेट्रिक वर्तुळे काढली होती रफी आणि ओमनी! सिमेलिया वर्तुळांच्या बाहेर उभी होती... हातात जळती सिगारेट घेऊन.. रफी आणि ओम धूम ठोकून तिथून गाडीकडे पळत सुटले होते... वर्तुळातून आपण सटकायला पाहिजे ही भावना पहिल्यांदा गोयलांच्या मनात आली... त्यांनी पाय उचलला खरा... पण तोवर ... इट वॉज ऑल ओव्हर..

... सर्रकन विजेसारखी एक ज्वाळा वर्तुळाकार फिरली... मग दुसरी... शेवटी तिसरी.. तीन लेयर्सच्य अमागे सिमेलियाचा आता फक्त लालबुंद चेहरा दिसत होता... विस्फारलेले संतप्त डोळे.. तोंडातून शिव्यांचा भडिमार.. आणि दोन्ही हातांनी पेट्रोलचे दोन कॅन्स आतमध्ये फेकतीय..

शेवटी केव्हातरी तिला जबरदस्त झळ पोचली एका ज्वाळेची... चर्रकन चटका बसून मागे सरकली.. पळत पळत मागे आली.. आता तिघांच्या किंचाळ्याही ऐकू येत नव्हत्या.. आपण हे काय केले याची भीती वाटून क्षणभर सिमने रफीचा हात धरला.. रफीने दुसर्‍या हाताने तिचा हात थोपटला आणि म्हणाला..

"तीन राक्षस संपले मॅडम.. तुम्ही संपवलेत.. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी आणि ओम सांगत राहू... की तुम्ही सव्वा अकरालाच तुमच्या सर्व्हिस अपार्टमेंटवर निघाला होतात... गोसावी सर तुम्हाला काहीही होऊ देणार नाहीत.. गाडीत बसा.. कळजी करू नका..."

खरे तर त्या आधाराच्या शब्दांनी प्रथमच सिमला आपण केलेल्या कृत्याच्या भयानकतेची खरी जाणीव झाली.. पायातले बळ गेले.. कशीबशी कारच्या मागच्या सीटवर बसली.. स्विफ्ट रिव्हर्स घेऊन कार तुफान वेगात सिमच्या रूमकडे अक्षरशः विमानवेगाने निघाली तेव्हा.. चढावरून सिमला खालचे दिसत होते.... ओमच्या शेजारी बसलेला रफीही तिकडेच बघत होता..

एक मोठा आगीचा लोळ... तीन शरीरे आगीने वेढून लुढकत लुढकत कोसळतायत.. एक हास्य... गाडीत एक हास्य निनादले.. रफी आणि ओम दोघांनी दचकून मागे पाहिले.. एरवी उर्वशीची मूर्ती वाटेल अशी दिसणारी सिमेलिया... आत्ता जमदग्नीचा अवतार भासत होती... आणि बेभान होऊन कोणत्या कोणास ठाऊक आनंदाने खदखदून हासत होती.... भयाण वार्‍याने तिचे मोकळे केस उडत होते.. आणि ... तिचे ते हासणे रफी आणि ओमला सहन होत नव्हते..

सिमने स्वतःचा सेल ऑन केला.. आहुजा आणि गोसावीचे मिस्ड कॉल अ‍ॅलर्ट्स सुरू व्हायच्या आत पहिला फोन पै ला लावला..

पै च्या आवाजात आश्चर्य भरलेले होते...

"सिमेलिया?????"

"एलाईटच्या प्लँटमागे जे ग्राऊंड आहे त्याच्या साऊथ साईडला अ‍ॅक्सिडेन्टली आग लागली... तीन जण जळून खाक झाले.. देव, आशिष आणि गोयल.. मी तिथून पास होताना बघितले..."

"तू... आर यू.. व्हॉट द हेल... सिमेलिया.. तुझ्या अपार्टमेन्टवर जाऊ नकोस.. "

"मग????"

"क्रिएट अ‍ॅन अ‍ॅलिबाय.. फास्ट"

सिमने हासत हासत फोन ठेवला आणि ओमला सांगितले..

"मुलवानी होस्टेलच्या सोहनी मॅडमचं घर माहितीय ना? तिकडे घे गाडी... तमाशा... त्यांच्या घरासमोर करायचाय"

=================================================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच