Submitted by दर्शना पेडणेकर on 7 February, 2013 - 02:13
मुलाला झोपवण्यासाठी अंगाई गीते सुचवा. माझा मुलगा १ वर्षाचा आहे. त्याला गाणी एकायला आवडतात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझा आवाज फारसा चांगला
माझा आवाज फारसा चांगला नसल्याने मी पारंपारिक ओव्याच जास्त म्हणायची. त्या म्हणायला सोप्या आणि अर्थपूर्ण असतात. खालील साईट वर सापडतील :
http://saneguruji.net/2011-02-14-05-26-51.html
http://www.khapre.org/
स्वतः रचू देखिल शकाल
या शिवाय
भरजरी ग पिताम्बर दिला फाडून - चित्रपट शामची आई
आली बघ गाई गाई - इंदिरा संतांची रचना, सुमन कल्याणपूर यांनी गायली आहे
लिंबोणीच्या झाडामागे चन्द्र झोपला ग बाई - आशा भोसले
निज माझ्या नंदलाला - मंगेश पाडगावकर
अशी गाणी आहेतच
बा नीज गडेऽ नीज नीज
बा नीज गडेऽ नीज नीज लडिवाळा
पाळणा लवांकुश बाळा
मी वासंती आळविते अंगाई
छकुल्यांनो तुमची ताई, तुमची ताई
लुकलुकती चिमणे डोळे
जिभलीही चुटुचुटु बोले
वर उचलाया बाळ मुक्यांची जोडी
लावितसे लाडीगोडी, लाडीगोडी
किती दिवस अशीऽ चाटणार ही बोटे
व्हा गडे लवकरी मोठे
मग जाऊयाऽऽ आपण सारे मिळुनी
बघण्यास अयोध्या भुवनी
अळीमिळी गुपचिळी बर का, सांगाल कुणाला जर का, कुस्करीन गाल हे बर का
अन इवलाले ओठ असे झाकोनी, ठेवीन मुके घेवोनी, मुके घेवोनी
मी वासंती आळविते अंगाई, छकुल्यांनो तुमची ताई...
जुन्या म्रराठी सिनेमातील आहे (आता नाव आठवत नाहीये) - चाल बहुधा लक्षात येईलच..
माझ्या एका मैत्रिणीचा मुलगा
माझ्या एका मैत्रिणीचा मुलगा आईने 'हुड हुड दबंग दबंग...' म्हणत थोपटल्याशिवाय झोपत नसे.
मी लहान मुलांची मराठी गाणी म्हणायचे मुलीला झोपवताना.
शिवाय, बाळा जो जो रे , नीज माझ्या नंदलाला, लिंबोणीच्या झाडामागे आहेतच.
कधीकधी सुरमयी आखियोंमें (सदमा) सुद्धा म्हणायचे.
>>माझ्या एका मैत्रिणीचा मुलगा
>>माझ्या एका मैत्रिणीचा मुलगा आईने 'हुड हुड दबंग दबंग...' म्हणत थोपटल्याशिवाय झोपत नसे.
हम्मा हम्मा ये गं बाळाला दूध
हम्मा हम्मा ये गं
बाळाला दूध दे गं
चारा पाटीभर हम्माला
दूध वाटीभर बाळाला
हम्माच्या गळ्यात घुंगुरमाळा
बाळाच्या पायात चांदीचा वाळा
वाळा वाजतो छुम छुम
बाळ धावतो धुम धुम
कोणातरी सुप्रसिद्ध कवी/ कवयित्रीची आहे (नेहेमीप्रमाणेच नाव आठवत नाहीये...)
मी भोंडल्याची गाणीही म्हणते.
मी भोंडल्याची गाणीही म्हणते. जुन्या मायबोलीवर आहेत भोंडल्याची गाणी.
हे एक पारंपारिक (तुम्हाला
हे एक पारंपारिक (तुम्हाला नक्कीच माहित असणार..)
चांदोबा चांदोबा भागलास का
निंबोणीच्या झाडामागे लपलास का
निंबोणीचं झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी
मामाच्या वाड्यात येऊन जा
तूपरोटी खाऊन जा
तुपात पडली माशी
चांदोबा राहिला उपाशी
धीरे से आजा री अखियन मे
धीरे से आजा री अखियन मे निन्दीया (चित्रपट अलबेला)
तुपात पडली माशी >>>>>>>>>>>>
तुपात पडली माशी >>>>>>>>>>>>
त्याची झाली काशी
काशे काशे दिवा लाव
दिवा गेला वार्याने
काशीला नेल चोराने.
अन्कुरी >>> मस्त मी माझ्या
अन्कुरी >>> मस्त
मी माझ्या बाळासाठी[२] "गाई गाई गोठ्यात ये मला दुध वाटीत दे "
गाते
हा बाळ टिळक माझा नवा नवसाचा
हा बाळ टिळक माझा नवा नवसाचा (२)
सतेज-तेली टाळू भरली
कुरळ जावळाचा, नवा नवसाचा ||१||
शुद्ध खादीचे अंगरखे ते
ताईत धर्माचा, नवा नवसाचा ||२||
उतरावासा नच वाटे हा
बाळ कडेवरचा, नवा नवसाचा ||३||
हे कदाचीत माहीत
हे कदाचीत माहीत असेल.
लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई
आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही ?
गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई
परसाच्या वेलीवरती झोपल्या ग जाई-जुई
मिट पापण्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई
आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही?
लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई
अजुन गाण्यांसाठी ही लिंक बघ.
http://www.aathavanitli-gani.com/Geet_Prakar/Bal_Geete
आमच्या घरची आम्ही सगळी बाळं
आमच्या घरची आम्ही सगळी बाळं या एकाच गाण्यावर झोपत होती. मीसुध्धा..
गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या
का गं गंगा यमूनाही या मिळाल्या?
उभय पितरंच्या चित्त चोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला?
मी म्हणत असलेल्या काही ओव्या
मी म्हणत असलेल्या काही ओव्या लिहिते इथे :
मुलाचे नाव चिन्मय आहे असे मानूया. त्याजागी आपण आपल्या मुलाचे/मुलीचे नाव घालावे.
चिन्मय बाळ माझा, मला ग हवा हवा
देवाजीने द्यावा, जन्मभरी
चिन्मय बाळ खेळे, तिथे ग माझा जीव
कधी मावळेल देव, येईल घरा
चिन्मय बाळ माझा, खेळून येईल
मला विसावा होईल, शिणल्याचा
खेळून खेळून, बाळ येई विसाव्याला
मांडी देते बसायला, चिन्मय बाळाला
चिन्मय बाळ खेळे, अंगण ओसरी
त्याला संगत दुसरी, रेवा ताईची (इथे मोठ्या भावंडाचे, शेजारी मित्र/ मैत्रिणीचे नाव घालावे)
चिन्मय बाळ माझा खेळाया जाई दूरी
त्याच्या हातावर पुरी, साखरेची
चिन्मय बाळाच, गोडसं जेवण
दुधाला विरजण, साखरेचं
आंबेमोहोर तांदुळाला, देते दुधाचा शिडका
जेवे आईचा लाडका, चिन्मय बाळ
माझ्या ग अंगणात, सांडला दुध-भात
जेवला रघूनाथ, चिन्मय बाळ
माझ्या ग अंगणात, नाचते चिमणी
बाळाला खेळणी, देवाजीची
माझ्या ग दारावरनं, रंगीत गाड्या गेल्या
भावांनी बहिणी नेल्या, दिवाळीला
मामा मांडी पाट, मामी काढते रांगोळी
तुझे कौतुक आजोळी, चिन्मय बाळा
बहिणीचं घे कडेवरी, आपुलं धरी हाती
श्रेयसमामा तुझा, मन धरणीचा किती
वळीवाचा ग पाऊस, बरसून ओसरला
भावाला झाअली लेक, भाऊ बहिण विसरला
चिन्मय बाळ माझा, आहे ग गुणी गुणी
त्याला बोलू नका कोणी, येता जाता
जळो ग माझी दृष्ट, तुला होते ठाई ठाई
सारे कौतुके पाहती, चिन्मय माझा गुणी बाई
अश्या खुप आहेत. अजून जमलं की लिहिन. आता दमले टायपून
ही आमच्या घरातली अत्यंत आवडती
ही आमच्या घरातली अत्यंत आवडती ओवी आहे आणि प्रत्येक लहान मुल ह्यावर झोपतं.. सोपी चाल, ठेका आणि ऐकायला गोड वाटते (इतरांची मुलही ह्या ओवीवर एन्टरटेन होताना पाहिली आहेत.) चाल कशी कम्युनिकेट करावी कळत नाही, पण सध्याकरता ओवी:
गांधी माझा सखा ग, ओवी त्याला गाईन
तुरुंगात जाईन मी, स्वराज्य मिळवीन
कस्तुर माझी माता ग, वंदिन तिजला आता ग
सुभाष माझा भ्राता त्याच्या चरणी ठेवीन माथा ग
टिळक गोखले नौरोजी, अब्दुल गफारखान गांधीजी
अरुणा असफ आली, लक्षुमी बाई कमला बहिण ती माझी
भगत सिंग आणि दत्त वीर, राजगुरु शिरीषकुमार
देशासाठी प्राण अर्पूनी अर्पण केले रणी शीर
नाना पाटील किसनवीर आणिक पांडू मास्तर
गुंडांना त्या पत्र्या ठोकून केले बहूत जर्जर
नाना पाटील नाही एकला प्रांत सातार्याच्या दिमतीला
घरोघरीचे शूर शिपाई आहेत त्यांच्या मदतीला
ऐशा ओव्या गाईला साबळे बंधूनी रचईल्या
अंतकरणी ठसल्या त्या मी <<पिल्लू>> साठी गाईल्या
----
इथे आपल्या पिल्लाचं नाव घालता येतं.
दीपा, गोड आहे ओवी.. तूपात
दीपा, गोड आहे ओवी..
तूपात पडली माशी चं माझं व्हर्जनः
तूपात पडली माशी,
चांदोबानं खाल्ली पोळी जॅमशी
---
बाकीची अनेक गाणी आहेत, सगळीच आठवत नाहीत, आठवली तर लिहिन..
दीपा, मला माहीती नसलेली बरीच
दीपा, मला माहीती नसलेली बरीच कडवी आहेत ग ह्या ओवीत.
बापरे ती वरची देशभक्तीपर जी
बापरे ती वरची देशभक्तीपर जी आहे ती अंगाई आहे ??
अगदी छोट्या मुलांपेक्षा सुद्धा जी मुले साधारण १० वर्षे किंवा पुढची आहेत त्यांना जास्त उपयुक्त वाटते.
अशा प्रकारची नविन गीते लिहिली जात नाहीत दुर्दैवाने
उदा. अण्णाई गीते, रा.बा.योगाई गीते, इ.
बापरे ती वरची देशभक्तीपर जी
बापरे ती वरची देशभक्तीपर जी आहे ती अंगाई आहे ?? >> अशी एक ओवी ऐकली आहे कुठेतरी.
माझ्या आई मुळे मला बरीच गाणी
माझ्या आई मुळे मला बरीच गाणी येतात लहानमुलांची.त्यातली काही खाली लिहित आहे
जंगल झाडीत वाघोबा लपला ,म्हातारीला पाहून खुदकन हसला
थांब थांब म्हातारे कुठे चाललीस,खाऊ दे मला आता भूक लागली
थांब थांब वाघोबा घरी जाते लेकीचे लाडू खाऊन येते
लाडू खाऊन होईन ताजी,मग कर माझी खुशाल भाजी
दोन चार दिवसात गम्मत झाली ,म्हातारी भोपळ्यात बसून आली
वाघोबा ने भोपळा अडवला,भोपळ्याच्या आतून आवाज आला
म्हातारी खोतारी मला नाही ठाऊक चाल रे भोपळ्या टुणूक टुणूक
१. हा शिवरायांवर लिहिलेला
१. हा शिवरायांवर लिहिलेला पाळणा. मूळ गीत लता मंगेश्करांच्या आवाजातील आहे.
http/www.marathisongs.netbhet.com/2011/11/guni-bal-asa-jagasi-ka.html.
२. नीज न ये तर गीत म्हणावे, अथवा झोके देत बसावे
कोण करी हे जीवेभावे ती माझी आई ||धृ.||
हसता मजला पाहुनि हसते
मुके पटापट कितीतरी घेते
परि अंतरी जी तृप्त न होई ती माझी आई ||१||
रडवे माझे वदन बघोनी
भूक लागली हे जाणोनी
___________ ||२||
सॉरी - दुसर्या कडव्यातली शेवटची ओळ आत्ता आठवत नाहीये, कुणाला आठवत असेल तर प्लीज, रिकाम्या जागा भरा. :स्मितः
छान धागा! आमच्या घरी गायली
छान धागा!
आमच्या घरी गायली जाणारी अंगाई :
नीज वो श्रीहरी चांद ये मोहरू
नंदराणी तुला गातसे हल्लरू
विहगगण झोपला झोपि गेले तरू
वात हळुवारसा लागला वावरू
नीजली गाऊली नीजले वासरू
नीज वो श्रीधरे नीज वो सांवळे
माझिया मांडिये स्वर्गसुख पेंगुळे
शांतरस त्यावरी घालते पांघरू
आणखी जपतपा काय मी आचरू
ब्रह्म ते माझिया पोटिचे लेकरू
आस मी कोणती आज चित्ती धरू
- ग.दि.माडगूळकर
निज नीज माझ्या बाळा बा नीज
निज नीज माझ्या बाळा
बा नीज गडे, नीज गडे लडिवाळा.
रवि गेला रे, सोडुनि आकाशाला
धन जैसें दुर्भाग्याला.
अंधार वसे चोहिंकडे गगनांत
गरिबांच्या जेवीं मनात.
बघ थकुनि कसा निजला हा इहलोक
मम आशा जेवीं अनेक.
खडबड हे उंदिर करिती,
कण शोधायातें फिरती,
परि अंती निराश होती,
लवकरि हेही सोडतील सदनाला
गणगोत जसे आपणांला.
जोंवरतीं या कुडींत राहिल प्राण
तोंवरि तुज संगोपीन.
तद्नंतरची करूं नको तूं चिंता
नारायण तुजला त्राता.
नीज न ये तर गीत म्हणावे,
नीज न ये तर गीत म्हणावे,
अथवा झोके देत वसावें;
कोण करी हें जीवेंभावें ?
ती माझी आई....।। १ ।।
रडवें माझे वदन बघोनी,
भूक लागली हें जाणोनी,
कोण उगें करि मज पाजोनी ?
ती माझी आई....।। २ ।।
हसतां मजला पाहुनी हसते,
मुके मटामट किति तरि घेते,
परि अंतरिं जी तृप्त न होते,
ती माझी आई....।। ३ ।।
येई दुखणें तेव्हां जपते,
सुखवाया मज अतिशय झटते,
परोपरी करि उपचारांतें,
ती माझी आई....।। ४ ।।
चालत असतां पडलों पाहुनि,
उचलाया मज येई धावुनि,
गोंजारी पोटाशी धरुनी,
ती माझी आई....।। ५ ।।
स्मरण तुझ्या ममतेचे होई,
तव उपकारां सीमा नाहीं,
कैसा होऊ मी उतराई,
गे माझे आई ? ।। ६ ।।
माझा मुलगा सात आठ महिन्यांचा
माझा मुलगा सात आठ महिन्यांचा होई पर्यंत मी
यशोदा का नंदलाला ब्रीज का उजाडला है
मेरे लाल से तो सारा जग झिलमिला ऐ
जु जू जू
हे गाणं म्हणायचे आणि तो झोपतही होता जसं त्याला समजायला लागले तेव्हा पासून झोपतच नाही काही करा
रागवा ,भिती घाला पण तो आम्हाला झोपी लावतो .आता १२ वर्षे वय आहे तरी तेच
मी रात्री झोपवताना “छान छान
मी रात्री झोपवताना “छान छान छान मनीमाऊचं बाळ कसं गोरं गोरं पान“ आणि “सुरमयी अखियोंमे“ म्हणायचे.. माझ्या दोन्ही लेकींना फार आवडायची ती गाणी.
आंघोळ घालताना “शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा“ हे म्हणायचे. हे ही फार आवडीचं होतं
भीगे होंठ तेरे
भीगे होंठ तेरे
मी बरीच वेगवेगळी गाणी
मी बरीच वेगवेगळी गाणी म्हणायचे माझ्या लेकाला झोपताना, पण फेवरेट अंगाई माझे वडील म्हणायचे सगळ्या नातवंडांना ती आहे
ये गं तू गं गाईsssss, चरूनीsss भरुनी sss,
यश बाळाला म्हणूनी दूदू देई, अंगाई जो जो
यश बाळ खेळे, गाईच्या गोठ्यात,
त्याला राखण जानकी रघुनाथ, अंगाई जो जो
यश बाळ खेळे तिथे माझा जीव
कधी मावळेल देव, येईल घरा, अंगाई जो जो
दुधातुपाने भरल्या वाट्या वर साखर माइना
अन छांदिष्ट जेवेना यश बाळ, अंगाई जो जो
बाळाची गं झोप कावळ्याने नेली
हलविता गेली रात सारी अंगाई जो जो