Submitted by योगितापाटील on 6 February, 2013 - 04:51
गर्दीत भावनांच्या....मजलाच शोधते मी
का हरवुनी सुखाला...दुख्हास भेटते मी
जगणे कसे म्हणावे...जगण्यास या कळेना
विजनात या अशी का...वनवास साहते मी
आकाश हि खुणावी...घेण्यास बघ भरारी
धरणीवरच तरीही...पंखास छाटते मी
मज पाश हा नकोसा...पण मुक्तता हवीशी
ओलांडण्या मनाई....रेषेस पाळते मी
तुकड्यात विखुरलेले...आयुष्य जमवताना
भेगाळल्या मनाच्या....रानास सांधते मी
शब्दात गुंफताना...एकेक गुज मनीचे
कवितेत का नव्याने...मजलाच लाभते मी?
-योगिता पाटील
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
गंभीर समीक्षकांचा प्रतिसाद
गंभीर समीक्षकांचा प्रतिसाद गंभीरपणेच घ्यावा असा चपखल आहे
आपले या पेक्षा चांगले लेखन फेस्बुकवर वाचले आहेच
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुढील लेखनास शुभेछा
फेस्बुक्वाले इकडे जास्त दिसूलागलेत हल्ली ...
योगिताताई, मायबोलीवर
योगिताताई,
मायबोलीवर स्वागत..
गझल प्रयत्न खूप चांगला आहे...पण अजून थोडी पॉलीश करावी लागेल चमकण्यासाठी..
इथे तुम्हाला खूप चांगले मार्गदर्शन मिळेल...लिहित रहा..
पुलेशु...
gambhir samikshakani jar
gambhir samikshakani jar chuka dakhavun margadarshan kela asat tar jast aawadal asat ,aani vaibhav kulkarni facebook valyana ekade yayla bann aahe ka? tumhi pan tar tyach gavache ho na? vaibhav fatak shubhechhansathi dhanywad ,i will try my best![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
tumhi pan tar tyach gavache
tumhi pan tar tyach gavache ho na? >>>>
नाही नाही मी पंढरपूरचा आहे मॅडम !!
मी सर्वात आधी केवळ मायबोलीचेच। सदस्यत्व स्वीकारलेले आहे मग आताकुठे फेसबुक्वर वगैरे गझल लिहितोय २-१ महीने झाले असतील फार्फार्तर फक्त
अजून एक ........मायबोलीला आम्हीतरी गाव नाही घर मानतो
स्वागत आहे योगिता ! तुम्ही
स्वागत आहे योगिता !
तुम्ही तंत्रास फारच सहज अवगत केलेले आहे आणि तेही खूप कमी वेळात. अजून लिहित राहिल्याने व इतरांच्या गझला, प्रतिक्रियांतून, चर्चांतून 'मंत्रा'च्या अधिक मूल्यवर्धन होत जाईलच. एकत्र शिकूया !
शुभेच्छा !
शब्दात गुंफताना...एकेक गुज
शब्दात गुंफताना...एकेक गुज मनीचे
कवितेत का नव्याने...मजलाच लाभते मी?<<<
चांगला शेर! बागेश्री यांची कवितेची प्रोसेस आठवली. स्वतःच्या कवितेतून स्वतःचा अधिक शोध ही ती प्रोसेस!
आकाश हि खुणावी..<<< यात 'ही' दीर्घ घ्यावा लागेल आणि आकाश या शब्दाला जोडूनही घ्यावा लागेल.
गझल लेखनास शुभेच्छा!
-'बेफिकीर'!
रनजित सर , बेफिकिर सर prerana
रनजित सर , बेफिकिर सर prerana denyasathi dhanywad![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शब्दात गुंफताना...एकेक गुज
शब्दात गुंफताना...एकेक गुज मनीचे
कवितेत का नव्याने...मजलाच लाभते मी?
व्वा..!
मजलाच लाभते मी..! ची जाणीव होणे फार छान.
तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी म्हटले आहे की,
"मीच मज व्यालो, पोटी आपुलिया झालो.."
पुलेशु.