Submitted by समीर चव्हाण on 4 February, 2013 - 01:27
रानामधी सरी, श्रावणाच्या पोरी
धिंगाणा घालती का
गुजबोल्यासाठी आभाळाची नाती
वेलींशी बोलती का
पानांतून वाजे, मनांतून लाजे
नाचरा वारा कसा
ओथंबल्या राती, धरतीची नाती
बिलगती पावसा
वयाचेच भाले, काळजात गेले
मातला चांदवा का
चिंब पावसाने, झिंगली का पाने
पेटला गारवा का
(हौस संग्रहातून)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"वयाचेच भाले, काळजात
"वयाचेच भाले, काळजात गेले
मातला चांदवा का
चिंब पावसाने, झिंगली का पाने
पेटला गारवा का" >>>
व्वा ! ..... मस्तच
पेटला गारवा >> खूप मस्त.
सुंदर कविता..
सुंदर कविता..
मस्त कविता!
मस्त कविता!
धन्यवाद.
धन्यवाद.
पहिल्या ओळीतच जिंकून घेणारी
पहिल्या ओळीतच जिंकून घेणारी कविता. ले.शु.
छान !
छान !
अतीशय मस्त लय ठेका आहे या
अतीशय मस्त लय ठेका आहे या कवितेस
गागागा... गागागा...गागागा ...गागागा...गागागागागागा... गा !!
शब्दन्शब्द पर्फेक्ट चपखल..... अर्थासाठी
खूप खूप आवडली
क्या बात... मिट्ट काळोखातला
क्या बात...
मिट्ट काळोखातला रानातला पाऊस उभा केलास... मुसळधार पाऊस ओसरत येताना -चिंब चिंब न्हालेली पानं... आकाशीची कमनीय चंद्रकोर.. सळसणारा वारा अन पावसाला बिलगून पडलेली रात्र सारं उभं राहिलं..
वयाचेच भाले, काळजात गेले... क्लास समीर.. टू गूड!!
मस्तच .. आवडली!
मस्तच .. आवडली!
खूपच छान कविता
खूपच छान कविता
क्लासिक
क्लासिक
धन्यवाद.
धन्यवाद.
शब्द, लय छान आवडली
शब्द, लय छान आवडली
शब्दलय पर्फेक्ट
शब्दलय पर्फेक्ट
चाल जशी सुचली तशीच ध्वमु करत
चाल जशी सुचली तशीच ध्वमु करत गेलो....
http://www.divshare.com/download/23688752-85f
गंमत म्हणूनच चाल लावलेय...
(समीर, पण ह्यामुळे आपला हक्कभंग होत असेल तर कृपया तसे सांगा...चाल मूळापासून पूसून टाकली जाईल.)
देव्काका नमस्ते कवितेला चाल
देव्काका नमस्ते
कवितेला चाल लावायच्या आधी त्याही अशा लयबद्ध...त्या कवीला एकदा प्रत्यक्ष त्याच्या मनात आलेल्या भावभावानांनिशी ही कविता ऐकवून दाखव म्हणावेत असे मला सुचवावे वाटते हे फार महत्त्वाचे आहे माझ्यामते
आपण असे आवर्जून करीत चला आपल्या चाली अजून नेमक्या (चपखल) व भावपूर्ण होतील त्या त्या बारकाव्यानिशी आम्हाला ऐकू येतील (आता तसे होत नाही असे काहीही मी म्हणत नाही आहे बरका काका अजून होतील असे म्हणतोय )
टीप : हा प्रतिसाद लिहीत असताना आजवर हेडफोन उपलब्ध नसल्याने मी एकही चाल ऐकलेली नाही याचेही दु;ख आहे


माझ्या करवी असे झाल्याबद्दल मी आपल्यासमोर दिलगिरी व्यक्त करतो
_______________________________________________-
माग मी हा प्रतिसाद का लिहितोय ??????
<<<<<< तुमचे औस्तुक्य, हौस, कार्यतत्परता इत्यादीइत्यादी पाहून ती केवळ 'घाई' नसेलना अशी मला काळजी वाटली म्हणून!!!
______________________________________________
लोभ असावा
आपला नम्र
वैवकु
वैवकु, अरे बाबा,मी हे सगळं
वैवकु, अरे बाबा,मी हे सगळं हौस ह्या सदरातच करत असतो...कवीशी बोलून वगैरे चाल रचण्याइतका मी प्रगल्भ नाही...तालाचं आणि माझं वैर जगजाहीर आहेच....त्यामुळे इतरांच्या शाब्दिक प्रतिसादांसारखाच हा माझा चालीय प्रतिसाद कवितेला दाद म्हणून समजावा...त्याकडे फारसे सांगितिक गांभीर्याने पाहू नये ही विनंती.
चाल जशी सुचली तशीच ध्वमु करत
चाल जशी सुचली तशीच ध्वमु करत गेलो....
http://www.divshare.com/download/23688752-85f
गंमत म्हणूनच चाल लावलेय...
(समीर, पण ह्यामुळे आपला हक्कभंग होत असेल तर कृपया तसे सांगा...चाल मूळापासून पूसून टाकली जाईल.)
चाल आवडली.
कवींना मुळातच हक्क नसतो तर हक्कभंग कसला आला. गंमतीत घ्यावे.
इन्डिड इट्स अ प्लेजर.
धन्यवाद.