गझल
संपलेल्या मैफिलीचा सूर होतो!
मी तिच्या हृदयातली हुरहूर होतो!!
तू कुठे जाशील मज शोधावयाला?
मी तुझ्या तबकातला कापूर होतो!
वर्ख त्या वस्तीस होते शांततेचे.....
मात्र मी गर्भातले काहूर होतो!
काळ येणारा उद्या ठरवील सारे....
मी जरी तुम्हास नामंजूर होतो!
लागलो होतो जरी मी ओसराया;
पण, तुझ्या प्राणातला मी पूर होतो!
फाडतो जेव्हा मुखवटे या जगाचे;
या जगाचा चेहरा भेसूर होतो!
पत्र मी, ज्याच्यावरी पत्ता चुकीचा;
पोचण्यासाठी किती आतूर होतो!
दे हवा आता चितेला, पेटली ती....
या मढ्यांना त्रास होतो, धूर होतो!
आज हातांच्या घड्या, चुपचाप तोंडे;
बोलण्याने वादही भरपूर होतो!
मी तुझ्या श्वासांत अंतर्भूत होतो!
मी तुझ्यापासून कोठे दूर होतो!
ठेवले हृदयी तिने, डोळ्यांत नाही!
बंद पत्रातील मी मजकूर होतो!!
स्पंदनांची समजते मजलाच बोली!
मी धडकणा-या जिवांचे ऊर होतो!!
लागली स्पर्धाच बोली लावताना....
मी लिलावी त्या असा मगदूर होतो!
येवुनी संधी कधी गेली कळेना........
मी जिच्या स्वप्नात अगदी चूर होतो!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
पत्र मी, ज्याच्यावरी
पत्र मी, ज्याच्यावरी पत्ताचुकीचा;
पोचण्यासाठी किती आतूर होतो!>>>>आवडेश
aavadaleech befeejeenchee ek
aavadaleech
befeejeenchee ek gazal aathavalee
kahee misare
>>mee tichyaa poojemadhe kaapoor aahe
>>tee malaa bhetaayalaa atoor aahe
aso ! tumachee hee gazalahee chhaanach aahe aavadaleech
नेहमीप्रमाणे छान.. आवडली
नेहमीप्रमाणे छान..
आवडली
सर्व रसिकांचा आभारी आहे!
सर्व रसिकांचा आभारी आहे!
प्राध्यापकमहोदय, कविता
प्राध्यापकमहोदय,
कविता एकंदरीत आवडली. काहूर, आतूर आणि चूर विशेषकरून आवडले. मला गझलेतलं काही कळत नाही म्हणून कविता असा उल्लेख केलाय. कृगैन.
जाताजाता, मगदूर = ?
आ.न.,
-गा.पै.
धन्यवाद गामापैलवान! मगदूर
धन्यवाद गामापैलवान!
मगदूर म्हणजे सामर्थ्य/किंमत/योग्यता /शक्ती इत्यादी
वर्ख त्या वस्तीस होते
वर्ख त्या वस्तीस होते शांततेचे.....
हा आणि असे अनेक मिसरे आवडले.
फाडतो जेव्हा मुखवटे या जगाचे;
या जगाचा चेहरा भेसूर होतो!
हा शेर भारी वाटला.
तू कुठे जाशील मज
तू कुठे जाशील मज शोधावयाला?
मी तुझ्या तबकातला कापूर होतो!
या दोन ओळींचा संबंध काय आहे?
वर्ख त्या वस्तीस होता शांततेचे.....
मात्र मी गर्भातले काहूर होतो!
शेर ठीक आहे
मी जिच्या स्वप्नात अगदी चूर होतो!
स्वप्नात चूर? लाजून चूर ऐकले आहे. आता लोक स्वप्नातही चूर व्हायला लागले. हाय रे कर्मा
आवडली
आवडली
"वर्ख त्या वस्तीस होते
"वर्ख त्या वस्तीस होते शांततेचे.....
मात्र मी गर्भातले काहूर होतो!" >>> हा शेर सर्वाधिक आवडला.
धन्यवाद विजयराव!
धन्यवाद विजयराव!
ग.सो. तबक पूजेचे प्रतिक आहे!
ग.सो.
तबक पूजेचे प्रतिक आहे! पूजेतील तबकात कापूर असतो. कापूर जळाल्यावर काहीही शिल्लक रहात नाही.
आता पहा शेर उलगडतो का?
मुद्दे दिले आहेत, गोष्ट आपण पुरी करा.....
वर्ख....अनेकवचनही वर्ख......म्हणजे मुलामे!
चूर होणे असे म्हणतात म्हणजे गढून जाणे (कशातही), खजील होणे, चकीत होणे , गोंधळून जाणे इत्यादी!
स्वप्नात चूर होतो म्हणजे स्वप्नात व्यग्र/मग्न होतो/गढून गेलो होतो!
धन्यवाद उल्हासराव!
धन्यवाद उल्हासराव!