अभिमान कसला??

Submitted by मी मी on 2 February, 2013 - 11:59

ओसाड माळावर पर्णहीन झालेल्या त्या झाडाच्या
गळलेल्या सळसळत्या पानांचा थरथरणारा आवाज

मला माझ्या मनाच्या स्थितीची आठवण करून देतात.....

आयुष्यात मिळालेल्या अनेक अनुभवांच्या एक एक अंशाने
माझे अस्तित्व स्वरूपाला आले.....आणि त्याच सृष्टीने
हे अस्तित्व कणाकणाने संपवायला लावले....

एक एक अवसान गाळून टाकायला लावलीत
प्रत्येक गळणाऱ्या पानांच्या जागी मग एक नव्या अनुभवाचे नवे पान
नवा बहर, नवी सृष्टी, नव चेतना, नवी प्रेरणा आणि
त्याबरोबर आलेला नव-नवलाईचा नवा अभिमान

कधीपर्यंत??

वसंत फुलतोय, बहरतोय तोपर्यंत..

पण....परत शिशिर येणारच
आणि परत आलेले अवसान अभिमानासकट गळून पडणार.....

मग परत आपली पाटी कोरी, नव्या रेघोट्या ओढायला
नवे अवसान आणायला......नवा अभिमान बाळगायला

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

छाने..