जो भसीनच्या घरी पोचली तेव्हा दोन्ही मुले शांतपणे झोपी गेलेली होती. भसीन उदास चेहर्याने एकदा झोपलेल्या मुलांच्या निरागसतेकडे आणि पलीकडे झोपलेल्या पत्नीच्या असहाय्यतेकडे पाहात होता. दोन्ही बेड्सच्या मधोमध तो एका खुर्चीवर बसलेला होता. असहाय्यता आणि निरागसता यांच्यामध्ये खंबीरपणे बसलेला होता. पण आता ती खंबीरता हळूहळू विरघळत चाललेली असावी. याचे कारण त्याच्याच चेहर्यावर आता असहाय्यता आणि निरागसता दिसू लागली होती. त्याचवेळी जो चा तिथे प्रवेश झाला. आजवर जो अश्या वेळी कधीच त्याच्या घरी आलेली नव्हती. भसीनला खरे तर प्रियंका येईल असे वाटत असावे. पण आता प्रियंकाच्याही येण्याची आवश्यकता उरलेली नसावी कारण मुले झोपी गेलेली होती. अचानक दारात जो ला पाहून भसीन खडबडून उठला. या स्त्रीशी आपले संबंध फक्त ऑफीसशी संबंधित कामानिमित्त आहेत या जाणिवेने त्याच्यातील बॉस जागा झाला. अतिशय नवलाने त्याने विचारले.
"जो??? तू आत्ता?"
"प्रियंका म्हणाली... मुले झोपत नाहीयेत... तीच येणार होती.... पण ती होस्टेलवर नवीन आहे, वयाने लहान आहे, तिला परवानगी देताना कटकट झाली असती... मला परवानगी सहज मिळू शकते... एक गार्ड बरोबर घेऊन मग मीच आले.. झोपली वाटते मुले!"
"हो... जस्ट झोपली.... जो.. थँक्स.. तू आत्ता येशील अशी अपेक्षाच नव्हती... पण तुला पाहून मला खूप बरे वाटले हे मात्र खरे आहे... काय घेतेस? कॉफी? मला करता येते..."
जो हासली. म्हणाली...
"काही नको... एक पाच मिनिटे बसून निघते मी... "
बाहेरच्या खोलीत येऊन ती सोफ्यावर बसली. तिच्या मागोमाग भसीनही हॉलमध्ये आला आणि दोन ग्लास थंड पाणी त्याने टीपॉयवर ठेवले. स्वतः एक ग्लास पाणी पिऊन त्याने जो ला पुन्हा आल्याबद्दल आभार दिले आणि आत्ता या वेळी कशाला त्रास घेत बसलीस म्हणाला. म्हणाला नुसता फोन केला असतास तरी चालले असते.
काहीतरी जुजबी बोलायचे तसे जो बोलत होती. तिने मुलांची, त्यांच्या शाळेची, आया येते की नाही याची वगैरे चौकशी केली. मग विषय भसीनच्या पत्नीचा निघाला. तिला वैद्यकीय उपचार चालू असले तरीही फारशी काहीच आशा नाही आहे असे भसीन म्हणाला. एकंदर परिस्थिती अवघडल्यासारखी झाली होती. चांगल्या मनाने जो येथे आलेली असली तरी आत्तापर्यंत गेल्या काही दिवसांत भसीनबाबत तिच्या मनात जे विचार चालू होते त्यांचा प्रभाव तिच्या मनावर आत्ताही होता. भसीनला त्याची कल्पनाच नव्हती. त्यामुळे त्याच्याबरोबर तिथे तसे बसलेले असताना जो ला ते ऑक्वर्ड वाटत होते तर भसीनलाही अवघडल्यासारखे वाटत असावे कारण तिने त्याला अश्या अवतारात कधी पाहिलेलेच नव्हते. तेही अश्या वेळी आणि त्याच्याच घरी! शेवटी जो उठली. दारात थांबली आणि म्हणाली.
"कधी आवश्यकता वाटली तर कळवत जा सर... मी आणि प्रियंका येऊ शकतो.. "
"मी.. मला कृतज्ञता व्यक्त करता येत नाही जो... पण कोणीतरी आहे हे... खूप आवडत आहे मला.. धन्यवाद म्हणून तुझ्या आत्ताच्या येण्याची किंमत कमी करत नाही मी आता"
जो हासर्या चेहर्याने भसीनकडे बघत बाहेर पडली आणि गार्डला खुण करत रिक्षात बसली. भसीन दारातच थांबला होता. वळणावर जो ने मागे पाहिले. दारातल्या भसीनने हात हालवला. नकळत तिनेही हात हालवला. एक नाते तिने पुढाकार घेऊन निर्माण केले होते. ऑफीसच्या बाहेर असे हे नाते तयार झालेले होते. जो च्या मनात गेल्या काही दिवसांत येत असणार्या विचारांना अधिक चालना मिळेल अशीच आत्ताची भेट होती. हळुवार, आपुलकीची, नेहमीपेक्षा वेगळ्याच वेळी आणि ठिकाणी झालेली अशी ही भेट जो च्या मनात रुतून बसली. फोनवरून प्रियंकाला तिने स्टेटस दिले. ते रूमवर गेल्यावरही देता आले असते, पण गार्डलाही समजावे की ही बाई आत्ता या पुरुषाच्या घरी का आली होती म्हणून तिने मुद्दाम गार्ड रिक्षेत शेजारी असतानाच प्रियंकाला फोन लावला होता. नाहीतर मनाला येईल ते गैरसमज करून घेण्यात कोणी कमी नव्हतेच होस्टेलवर!
आयुष्यात प्रथमच जो एखाद्या पुरुषाचा असा विचार इतक्या मोठ्या प्रमाणात करत होती. नेमका तोच पुरुष विवाहीत होता व त्याला दोन मुलेही होती. ही गोष्ट जो च्या मनाला खात होती. पण भसीनच्या त्याच कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे तर ती आणि तो थोडे जवळ आले होते हेही तिला जाणवले. मुख्य म्हणजे, पत्नीपासून मिळणारी सांसारीक साथ भसीनला मिळतच नव्हती. त्यामुळे मैत्रीसंबंधांच्या चौकटीत जो साठी एक स्थान निर्माण होणे अगदीच अशक्यही नव्हते. तसेही आता होस्टेलवरचे समीकरण बदललेले होते. जया लग्नासाठी निघून गेली म्हणजे होस्टेलवरून कायमचीच गेलेली आहे हे सरळ होते. सिम वेगळ्या खोलीत राहात असली तरी फार तर एखाददोन दिवसांत तिची होस्टेलवरून उचलबांगडी करण्यात सोहनीबाईंना यश येईलच हे जो ला माहीत होते. इतकी वादग्रस्त मुलगी होस्टेलवर ठेवून रोजच्या कटकटी सोसत बसण्यात सोहनीबाईंना काडीचेही स्वारस्य असणार नव्हतेच. येऊन जाऊन निली, प्रियंका आणि आपण! म्हणजे परत रूम एकच राहणार तिघींसाठी! सध्या सिम राहात असलेली रूम नव्या पोरींना मिळेल कोणत्यातरी! निली बिझी असते आणि प्रियंकाला अभ्यास असतो. म्हणजे आपल्या रूममधील वातावरण सिम आणि जया असताना जसे होते तसे होणे अवघडच आहे. याचा अर्थ आपल्या मनाल इतर एखादा विरंगुळा असणेही आवश्यक आहे. भसीनबरोबर वाढत असलेले मैत्रीचे नाते कसकसे विकसित होत राहते हा चिक्कार मोठा विरंगुळा ठरेल.
सुखावल्या मनाने जो होस्टेलच्या दारात उतरली. गार्डकडे रिक्षेसाठी पैसे देऊन ती आत शिरताना तिने एक नजर पुन्हा बाहेर टाकली. एलाईट डिस्टिलरीच्या शेजारी कसलेतरी होर्डिंग उभारत असावेत. थकलेली जो, आता जया रूमवर नसणार या आठवणीने अधिकच उदास होत जिना चढून रूमवर पोचली.
================
नवीन असाईनमेन्ट असल्याने किंचित उत्साहात असलेली सिमेलिया सकाळी पावणे सहालाच उठून बसली. ब्रशवर पेस्ट घेत तिने ब्रश करता करताच सेलफोन तपासायला सुरुवात केली. काही मेसेजेस, काही ईमेल्स वगैरे दिसत होत्या. बहुतेक सगळे किरकोळच होते. फटाफटा डिलीट मारत तिने सेलफोन ताजातवाना केला. पुन्हा चार्जिंगला लावला. बेसीनमध्ये चुळा भरत आणि तोंडावर पाण्याचे हबके मारत तिने टॉवेलने तोंड पुसले. टेरेसमध्ये जाऊन फ्लोअर एक्सरसाईझेस करावेत म्हणून तिने टीशर्ट आणि स्लॅक्स घालायला घेतल्या. आणि स्लॅक्स घालतानाच तिची नजर अर्धवट उघड्या असलेल्या खिडकीतून बाहेर गेली.
सिमेलिया जैन! भूकंप व्हावा तशी हादरलेली सिमेलिया त्या दृष्याकडे पाहात होती. एलाईट डिस्टिलरीशेजारी एक भले मोठे होर्डिंग होते. एरॉटिकाचे! त्यातील मुलगी अंगावरचे टीचभर कपडेही अंगावरून गळत असल्याने बावरून कसेबसे ते दोन्ही हातांनी सावरत होती. ते बावरलेले भाव अचूक टिपले गेलेले होते. कंबरेच्या टोकापर्यंत उघड्या पडलेल्या मांड्या लालबुंद अन रसरशीत दिसत होत्या. सिमेलिया जैनला आपण सुंदर आणि सेक्सी आहोत हे माहीत होते. पण आपण इतक्या आव्हानात्मक दिसत असू याची तिला कल्पनाच नव्हती. ते चित्र पाहून तर मुलींनाही आपण पुरुष असायला हवे होते आणि सिम आपली मैत्रीण असायला हवी होती असे वाटणे शक्य होते. पुरुषांची तर बातच सोडा!
इकडे रूममध्ये सिमला अक्षरशः घाम फुटला होता. कोणत्यातरी मूर्ख एजन्सीने हे होर्डिंग मुद्दाम होस्टेलसमोर लावून प्रक्षोभ उचकवण्याचा प्रयत्न केलेला दिसत होता. पुढच्या एका तासात आपली या रूमवरून गच्छंती निश्चीत आहे हे सिमला समजले. व्यायाम रद्दच करून तिने पहिला फोन फिरवला. सीरीनच्या गोसावीला!
"सिम? व्हॉट हॅपन्ड?"
"मि. गोसावी, आय अर्जंटली नीड यूअर हेल्प... आय नीड अ प्लेस टू स्टे.."
"एनी... एनी प्रॉब्लेम ??"
"ते सगळे नंतर सांगते... तुम्ही होर्डिंग्जचे काँट्रॅक्ट कोणाला दिले होतेत?"
"तन्मया अॅड्स... का?"
"होस्टेलसमोर होर्डिंग लावले आहे..."
"गॉश"
"मला येथून निघावे लागेल..."
"आय नो... यू स्टे अॅट रविनगर... सी २०३, मनीष रेसिडेन्सी... इट्स अवर एजन्सीज गेस्ट हाऊस... जागा नंतर पाहता येईल... तिथे आत्ता एक गोविंद म्हणून असेल अटेंडंट... तो तुझी सगळी व्यवस्था करेल.. तेथे जाऊन सेटल हो... अकरा वाजल्यानंतर आपण जागा शोधू... बॉडी गार्ड्स आजपासून येतीलच... एक इंडिकाही देऊन ठेवतो.. म्हणजे तुला कुठेही यायला जायला बरे.."
"आय अॅम... आय डोन्ट नो हाऊ टू... "
"इट्स ओके सिम.. यू आर अ पार्ट ऑफ सीरीन एजन्सीज... आम्हाला तुझी काळजी घ्यायला हवीच..."
सिमने फोन ठेवला तेव्हाच दार वाजत होते. म्हातार्या अक्का आज चहा देण्याऐवजी बाहेरूनच सिमला सांगत होत्या.
"सोहनी म्याडमनी बोलावलीय गं तुला... अर्जंटे म्हनाल्या"
"त्यांना सांगा आक्का... म्हणाव मी होस्टेल सोडून चाललीय.. पैसे आधीच दिलेले होते... रिसीट आणि कागदपत्रे नंतर घेईन..."
आक्का निघून गेल्या तशी सिमची तुफानी वेगात आवराआवर सुरू झाली आणि दारावर थाप पडली. सिमने वैतागून दार उघडले तर निली दारात उभी होती.
"चाललीस?"
"अर्थातच निली..."
निलीच्या, म्हणजे सिम आधी जिथे राहात होती त्या रूममधून ते होर्डिंग अधिक स्पष्ट दिसत असणार हे सिमला माहीत होते. सगळ्यांनी आत्तापर्यंत ते पाहिलेले असेल याची सिमला कल्पना होती. तेवढ्यात इंडिकाच्या ड्रायव्हरचा फोन आला. तो पंधरा मिनिटात पोचत होता. त्याने कारचा नंबर सिमला सांगितला आणि एलाईटच्या दारात उभा राहतो म्हणाला. सिमने त्याला होस्टेलच्या दारात गाडी उभी करायला सांगितले.
पाठोपाठ आलेल्या जो आणि प्रियंकाही सिमची आवराआवर नुसतीच पाहात राहिल्या. निली म्हणाली...
"एका दिवसात किती फेरफार घडले ना आपल्या चौघींमध्ये?"
जो ने उदासपणे उत्तर दिले...
"एका रात्रीत... "
जाताना निली आणि जो ला घट्ट मिठी मारून आणि प्रियंकाला पॅट करून वादळी वेगाने सिमेलिया होस्टेलबाहेर पडली. रडायलाही वेळ नव्हता. चिडायलाही वेळ नव्हता. कालच दोन मोठे मोर्चे होस्टेलजवळ येऊन गेले होते. आता तर शहरात होर्डिंग्ज लागली म्हणजे गोंधळच होणार होता. इंडिकाच्या ड्रायव्हरला आपल्या कारच्या मागच्या सीटवर बसलेलीच बाई समोरच्या चित्रात आहे हे समजलेलेच नव्हते. इंडिका वळवताना त्याने अधाशीपणे आणि चोरटेपणाने ते चित्र चारपाच वेळा पाहून घेतले होते. बाराव्या मिनिटाला त्याने रविनगरच्या मनीष रेसिडेन्सीमध्ये सिमच्या बॅगा आणून टाकल्या आणि गोविंद नावाचा अटेंडंट सिमला सलाम करून चहा करायला धावला. अतिशय आलिशान खोलीत सिमचे पाऊल पडलेले होते. बघावे तेथे भव्यता आणि श्रीमंती थाट होता. ही रूम कोणत्याही स्टँडर्डने खूप मोठी रूम होती. जवळपास अठरा बाय वीसची एकच रूम असावी ही! नटवलेली रूम होती. सुसज्ज होती. बाथरूम म्हणजे थाटच होता. सिमने अस्ताव्यस्तपणे बॅगा टाकल्या आणि अक्षरशः बेडवर धाडकन कोसळली. शेजारीच पडलेल्या रिमोटने टीव्ही ऑन करून चाळा म्हणून टीव्ही पाहात राहिली. नॉक करून आत आलेल्या गोविंदने चहा टीपॉयवर ठेवला, पेपर्स सिमच्या साईड टेबलवर ठेवले आणि रफी आणि ओम हे सुरक्षारक्षक बाहेर येऊन थांबल्याचे सिमला सांगितले. सिमने मान डोलावली आणि गोविंदच्या हातात पन्नासची नोट ठेवली. ती नम्रपणे नाकारत गोविंद बाहेर निघून गेला. गोविंद बाहेर गेल्यावर सिमने पेपर भराभर चाळला. कालचे दोन मोर्चे, काही नागरिकांच्या सिमच्या विरुद्ध तर काहींच्या तिच्याबाजूने असलेल्या अश्या प्रतिक्रिया मधल्या एका पानावर होत्या. सिमच्या चेहर्यावर हलकेच स्मितहास्य पसरले. टी व्ही वर दिसणार्या जाहिरातीतील मॉडेल्स कोणत्यातरी घरातल्या, कोणत्यातरी गावातल्या, कोणाच्यातरी शेजारच्या असतातच की? पण त्या खपवून घेतल्या जातात कारण त्या रोज येता जाता दिसत नाहीत. सिमेलिया आपल्याच गावात राहते म्हणून तिने कपडे काढले की संस्कृती बाटते काय लगेच? मग मीही आता ऐकणार नाही. अख्ख्या गावालाच हतबुद्ध करेन. तेवढ्यात फोन वाजला. सिमने सवयीने फोन हातात घेतला आणि स्क्रीन पाहिली. ताडकन उठून बसली सिम! हे होणारच होते. पण हे इतक्या लगेच, असे अचानक होईल याची कल्पना नव्हती. काय विचारले जाईल आणि त्याला काय उत्तरे द्यायची हे तिने मनातच अनेकदा घोकून ठेवलेले होते. पण आत्ता त्यातले काहीही आठवत नव्हते. आत्ता फक्त इतकेच समजत होते की हातापायातील त्राण गेलेले आहेत आणि घामाने शरीर भिजलेले आहे. रोहन भैय्या! राजस्थानहून फोन होता. सर्वात मोठ्या भावाचा! नक्कीच धाकटा भाऊ जिग्नेश आणि माँ, तसेच सारिकाही आसपास असणार होती रोहनभैय्याच्या! फोन घ्यायला तर हवाच होता. पण जे बोलायचे ठरवलेले होते ते आठवतही नव्हते आणि आठवले असते तरी धीर झालाच नसता बोलायचा!
सिमने कसाबसा कॉल अॅन्सर केला आणि फोनमध्ये कुजबुजल्यासारखी म्हणाली..
"ह.. हॅलो???"
"सिमेलिया...."
नेहमी सिमू हाक मारणार्या रोहन भैय्यांनी आज पूर्ण नाव उच्चारले होते. परकेपणा हाकेतच जाणवला होता.
"जी... जी भैय्या"
"भैय्या कहना बंद करदो हमे... "
"......"
"और सुनो... "
"... जी..."
"हमारे खानदानसे अब तुम्हारा ना कोई रिश्ता है ना कोई वास्ता... किसीकी मौतकी खबर सुनकरभी मत आना... यहाँसे तुम्हे कभी कुछ नही मिलेगा... न दौलत... न प्यार.. न घर.. यहाँ तुम्हारा अब कोई नही है... कोई नही रहता यहाँ तुम्हारा... समझरही हो?"
"..... "
"सिमेलिया?"
"... ज... जी"
"और आगे सुनो... फिलहाल तो जान बख्श रहे है हम तुम्हारी... लेकिन इसके बाद अगर तुम्हारी कोई और तस्वीर छपगयी... तो जिंदाभी नही बचोगी.. क्या सुना?"
".... "
"क्या सुनाऽऽऽऽ???"
तळहाताच्या आणि कानाखालच्या घामाने सेलफोन ओलाकच्च होत होता. त्राण गेलेले होते. नाती तुटलेली होती. जीवाची भीती होती आता. सगळेच संपलेले होते. जर सगळे संपलेलेच होते, तर ऐकून तरी कशाला घ्यायचे?
सिमच्या तडाखेबाज स्वभावाने तिला पुन्हा एकदा आठवण करून दिली. की दुसर्याला धक्के देण्यात आणि अनपेक्षित वर्तन करण्यात नेहमी विजयाची संधी मिळते. वय वर्षे जेमतेम चोवीस पंचवीस! निव्वळ चार ते पाच दिवसांत जगाची शेकडो रुपे पाहून पाच वर्षांचा अनुभव गाठीस आलेला! एक पाशवी बलात्कार, एक लज्जास्पद असाईनमेन्ट, एक महाभयानक गदारोळ, सर्व नाती तुटणे, हाकलून दिले जाणे, अव्हेरले जाणे आणि स्वीकारलेही जाणे! या आंदोलनांनी ढिसाळ मातीसारखे झालेले मन स्वतःच कणखर बनवत सिमेलियाने प्रतिप्रश्न केला.
"आप मारेंगे हमे?"
ज्या घरात पुरुषांसमोर बायकांची मान वरही उचलली जात नाही आणि पदरातून कधी हनुवटीही दिसत नाही त्या घराच्या कर्त्या पुरुषाला त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेल्या बहिणीने उर्मट प्रतिप्रश्न केला होता. संतापाने तीळपापड झाला होता त्याचा!
"रोहनभैय्या.. हम जिंदाही कहाँ थे जो आप हमे मारोगे?"
"........"
"मै जब पैदा हुवी थी ना? तो बिना कपडोंकेही पैदा हुवी थी! आपके इस संस्कृतीनेही मुझे कपडे पहनाये. और इसी संस्कृतीने वो कपडे छीनभी लिये. उतारभी दिये. अगर मै ऐसा नही करती तो किसी खानदानमे मेरी शादी करा देते आप और समझते के बहेन खुष हो गयी... मै वहाँ ससुरालमे ससुरालवालोंके सामने गर्दन झुकाकर काम करती रहती... बच्चे पैदा करती रहती... ससुरालवालोंके पैर धोकर पीती रहती... और एक दिन मरजाती.. कोई सुनताही नही के मुझे कहना क्या था... न आप... न माँजी.. न ससुरालवाले.. रोहन भैय्या... आज मै लाखोंमे खेल रही हूं... आप तो मेरे आसपास भटकभी नही सकते.. जो भाई बहनकोही मारनेकी बात कररहा हो वो भाई कैसा?.. मै अलग हूं रोहन भैय्या... और नाते तो मैही तोड रही हूं आप सबोंसे... अगर मै मरभी गयी तो लाश का अंतिम संस्कार आप मत करीयेगा.. लेकिन एक बात ध्यानसे सुनियेगा.. हर औरत पैदा होती है क्युंकी उसका एक बाप होता है जो एक मर्द होता है... औरतका भाई, बेटा, पती ये सब मर्द होते है... औरतको तवायफभी मर्दही बनाता है... कभी अपने गिरेबाँमेभी झाँककर देखिये रोहन भैय्या.. जिसे आप राजस्थानकी महान संस्कृती कहते है .. उसीमे सबसे जियादा व्यभिचार क्यूं हो रहा है? माँ को प्रणाम कहना.. बहेनोंको प्यार... रखरही हूं फोन"
सिमने धाडकन फोन बंद करून फेकून दिला. फोन खाली गालिच्यावर पडला, त्यामुळे वाचला. आणि फोनपाठोपाठ सिम! सिम बेडवर कोसळली. सगळे संपलेले होते. मुळेच तुटलेली होती. जगात आता कोणीही नव्हते. अगदी कोणीही नव्हते तिला! सिम ओक्साबोक्शी रडत होती. उशी भिजत होती. अश्रूंबरोबर सगळी नाती, लहानपण, आठवणी, मानसिक आधार देणारे खंदे हात, सगळे वाहून जात होते. एक प्रकारे हा निचरा आत्ताच होत होता हे बरेच झाले होते. निदान यातून बाहेर पडल्यावर यापेक्षा वाईट काहीच घडू शकणार नव्हते. किंवा जे काही घडेल ते सोसण्याची आणि परतवण्याची धमक अंगी येणार होती. हक्काने प्रश्न विचारणारेच कोणी नसल्याने जे करायचे ते करता येणार होते. बलात्कार तर एकदा होऊन गेलेलाच होता. आता अंगरक्षक होते बरोबर! आता कोणाची हिम्मत नव्हती जवळपास फिरकायची. सीरीनचा वकील होताच वाचवायला. सीरीनच्या असाईनमेन्ट्स हातात असेपर्यंत कसलीच काळजी नव्हती. म्हणजे पुढचे तीन महिने! नंतरचे नंतर! तोवर धुरळाही खाली बसला असताच.
गावातल्या टेकडीच्या मागच्या बाजूला असलेल्या एका जुन्या खोलीचे सिमच्या मंदिरात रुपांतर करण्यात आले होते. सिम आज तेथे जाणार होती. देवळात खुद्द देवी येणार म्हणून सजावट झालेली होती. तिथेच एक मोर्चाही येणार होता. त्यामुळे पोलिस असणार हे उघड होते. एक पुढारी सिमच्या विरोधात तेथेच भाषण देणार होता. अर्थातच सिमचे फॅन्स ते भाषण उधळून देण्याचा प्रयत्न करणार होते. एकंदर धमाल येणार होती. खळबळ होणार होती. आणि या सर्वाच्या केंद्रभागी सिमेलिया असणार होती.
रडता रडता सिमला या विचाराने हसूच फुटले. डोळ्यात आणि गालांवर पाणी तसेच ठेवून सिम खुदकन हासली. मग हासण्याचा जोर वाढला. मग स्वतःच्या रडण्याचे हसू यायला लागले. मग जया आणि सोहनीबाईंचे हसू यायला लागले. मग होस्टेलसमोरच्या होर्डिंगचे हसू यायला लागले. मग रोहन भैय्यांच्या फोनचे हसू यायला लागले. आणि शेवटी स्वतःच्या हासण्याचेच हसू यायला लागले. आपल्याला वेड लागले असावे असे वाटून सिमला आणखीनच हसू यायला लागले. पोट धरधरून ती खदखदून हसू लागली. सेलफोनवर मेसेजेस येत होते जो आणि निलीचे! कुठे उतरली आहेस, जागा बरी आहे का ती, वगैरे! गोसावीचा कॉळही येऊन गेलेला होता. त्याचाही मेसेज आला होता की तो अकरा वाजता तेथे येणार आहे. सिम ते वाचत असतानाही खदाखदा हासत होती. संपूर्ण जगाचे तिला हसू येत होते. जगात चांगली माणसेही का आहेत आणि वाईट माणसेही का आहेत हेच न समजल्यामुळे हसू येत होते तिला! शेवटी शेवटी आपण रडतो तरी का आणि हासतो तरी का हेही कळेनासे झाल्यावर हासणे थांबले. सिमचा पुतळा झाला. बाथरूममध्ये जाऊन तिने गरम पाण्याचा शॉवर सुरू केला. आणि टेंपरेचर हवे तितके झाल्यानंतर आरश्यात स्वतःचे प्रतिबिंब निर्विकार मनाने बघत तिने कपडे काढायला सुरुवात केली. सर्व जगासमोर कपडे काढून झाल्यानंतर स्वतःकडे निरखून बघण्यासारखे काही उरतच नाही ही नवीनच भावना आज तिच्या मनात आली होती. पण इतर कोणी तिला आत्ता पाहिले असते तर त्याने पैजेवर सांगितले असते, की होर्डिंगपेक्षा सिमेलिया प्रत्यक्षात अधिक सेक्सी दिसते.
===================================
राहुलच्या आजीला तडक भेटायला जावे लागणार असल्याने जयाने माहेरी आवरण्यात फार वेळ घालवलाच नाही. जेमतेम तयार होऊन ती आई वडिलांबरोबर सासरी पोचली तेव्हा आजी घरघर लागल्यासारखे करत होत्या. कोणीतरी जया आल्याची बातमी आजींना सांगितल्यावर जया आणि राहुलने आजींना नमस्कार केला. आजींचा थरथरता हात जयाच्या केसांमधून फिरला. अजब जादू होती त्या स्पर्शात! बरे वाटले जयाला! पण ही म्हातारी व्यक्ती लवकरच निधान पावण्याची शक्यता आहे या विचाराने ती खिन्न झाली. तशीच पटकन स्वयंपाकघरात जाऊन सासूला मदत करू लागली. सासू तिच्याशी आपुलकीने बोलत राहिली. जयाचे आई वडील बाहेर तिच्या सासर्यांशी आणि राहुलशी बोलत बसले होते. एक प्रकारे अचानक लग्न करावे लागत असल्याने जयाकडच्यांचा आर्थिक ताण कमीच झाला होता. कारण जमेल तसे लग्न आवरावे लागणार होते. जेमतेम महत्वाची माणसे येणार होती. मानपान, पंगती, सगळ्यालाच फाटा होता. परवादिवशीच लग्न ठरलेले होते, जयाच्या घरामागच्या अंगणात! लहानसा मांडव घालण्याची तयारीही सुरू झाली होती.
लग्न या समारंभामधील मुख्य आनंदच त्या आजीमुळे हिरावून घेतला गेला होता. पण जयाला त्याचे वाईट नव्हते वाटत. तिला ती प्रेमळ आजी मरणार याचे वाईट वाटत होते. अचानक सर्व स्वप्नांचे रंगरूप पालटले होते. साड्या, दागिने, इतर खरेदी, मेंदी, केळवणे, व्याहीभोजन, घरचे आहेर अश्या कित्येक गोष्टी आता होणारच नव्हत्या किंवा अतिशय वेगळ्याच पद्धतीने उरकल्या जाणार होत्या. सहजीवनाचे पहिले पाऊल जोडीने टाकण्याआधी ज्या आनंददायी घटनांची मालिका असते ती रद्द होऊन एकदम तिसर्या दिवसापासून सासरीच जावे लागणार होते. आणि फार तर आठ एक दिवसांत तिथून थेट मुंबईलाच! त्यामुळे जया आपल्या आईला बिलगूनच झोपत होती रात्रीची! जमेल तितकी तयारी तिच्या नात्यातील मंडळी करू लागले होते. दोन दिवसांत लग्न उभं करायचं म्हणजे मस्करी नव्हती. अचानक माहेर सोडावे लागणार, अचानक नव्याच घरी जाऊन राहावे लागणार, अचानक मधुर आयुष्याला सुरुवात होणार, त्यातच ती आजी मरणासन्न अवस्थेत असणार अश्या संमिश्र मनोवस्थांमुळे विचारच करू न शकणारी जया माहेरचा एक एक क्षण जपून जगत होती. जगून जपतही होती. होत असलेल्या थट्टेमागे आता आपण इथून जाणार ही खिन्नता होती. मधूनच थबकून आपल्याकडे पाहून डोक्यावरून हात फिरवून लगबगीने कामाला लागणारे बाबा पाहून जयाला ओक्साबोक्शी रडावेसे वाटत होते, पण तेवढाही वेळ नव्हता. जो आणि निलीचे मेसेजेस, कॉल्स येऊन गेलेले होते. शाळेतल्या सहकार्यांचेही कॉल्स येऊन गेलेले होते. लग्न उंबर्यावर उभे होते. जया नटत होती, सजत होती, हसत, रडत होती. लग्न करावे की करू नये या विचारापर्यंत आपण पोचलेलो होतो हेही तिला आत्ता आठवत नव्हते.
... किती... बेसावध होती जया..
==================================
"मी... सिमेलियाची रूममेट.. तुम्हाला भेटायचे होते"
"बसा?.... बोला??"
पै ला आपल्या घरात कधी एखादी मुलगी येईल असे कधी वाटलेच नव्हते. त्यालाच काय, त्याच्या आजूबाजूला राहणार्या कोणालाही वाटलेले नव्हते. ही मुलगी आलेली पाहून पै ने सरळ अंगणातच खुर्च्या टाकल्या आणि पाणी आणून तिला दिले. सगळ्यांसमोर आपण असलेले बरे असे त्याला वाटले. उगाच घोळ नकोत. एक तर आपण पत्रकार, त्यात हे असले फोटो आपण क्षितिजतर्फे छापून रोषास पात्रही झालेलो आहोत. अडकवायची एखादी पोरगी आपल्यालाच! या विचाराने पै ने अंगणातच बसणे प्रिफर केले. नीलाक्षीलाही अंगण छान वाटले त्याच्या घरापेक्षा! एका मध्यमवयीन बॅचलरचे घर असावे त्याहून पै चे घर अस्ताव्यस्त होते. आणि त्याहून पै अस्ताव्यस्त होता. त्याच्याकडे बघितले की अगदी कायम लक्षात राहील अशी एकच गोष्ट होते, ती म्हणजे त्याचे अतिशय शार्प डोळे!
"माझे नाव नीलाक्षी"
"हो, मी ओळखतो"
"मला... आमच्या केंद्राची माहिती द्यायची होती तुम्हाला"
"मला माहीत आहे ते केंद्र...पुनर्वसनाचे ना? मागे मी निधीही उभारलेला होता त्यासाठी... "
नीलाक्षीच्या दृष्टीने संवाद पुढे जाण्याची शक्यताच मावळली. 'हंहं' असे म्हणून मान डोलावून ती मनात म्हणाली की एक दोन मिनिटे बसून निघावे लागणार येथून आपल्याला!
"घरी, कोण कोण असते?"
"मीच असतो एकटा... का?"
"नाही काही नाही... फॅमिली?"
"नाही... लग्न नाही झालेले माझे..."
"हंहं"
"काय चहा वगैरे???"
सवयीने निली नाही म्हणणार होती. पण ज्या हेतूने ती येथे आली होती, 'हो' म्हणणे श्रेयस्कर ठरले असते.
"मीच करते ना?"
"नाही नाही? तुम्ही बसा... मी आलोच पाच मिनिटांत चहा घेऊन..."
"मी... आले तर चालणार नाही का?"
"नाही नाही... तसं काही नाही... पण... मी एकटाच राहतो ना.. तुम्हालाच आवडणार नाही पसारा"
"नाही तसं काही नाही..."
बावळट होत चाललेल्या संवादांचं निलीलाच हसू यायला लागलं होतं! ती त्याच्यामागोमाग किचनमध्ये आली. किचन मात्र पै ने अत्यंत स्वच्छ ठेवलेले होते. नाव ठेवायलाच जागा नव्हती. अगदी आले किसून वगैरे त्याने मनापासून चहा केला. निली त्याच्या त्या शिस्तबद्धपणे चहा करण्याचे निरिक्षण करत होती.
"चहा करायला आवडतो वाटतं तुम्हाला?"
"अं? हो... आवडतो... स्वयंपाकही आवडतो करायला.."
निली मनातच हासत होती. आपल्याला पाहून हा गोंधळलेला आहे याचे तिला हसू येत होते.
चहाचे कप घेऊन दोघे पुन्हा अंगणात आले.
"मस्स्त झालाय चहा"
"थँक्स"
पै अल्प बोलणारा दिसत होता. किंवा एकदम आपण घरी आल्यामुळे त्याला कळतच नसेल की काय बोलावे! कदाचित ऑफीसमध्ये भेटायला हवे होते. पण जे बोलायचे आहे ते ऑफीसमध्ये बोलता आले नसतेही.
"काही... विशेष काम काढलं होतंत का? माझ्याकडे?"
पै ने आता मुद्याला हात घातला.
"अं! हो. म्हणजे, एक तर केंद्राची माहिती द्यायची होती पण ती तुमच्याकडे आहेच. आणि दुसरे म्हणजे असे विचारायचे होते की ... सिमेलियाची पहिली बातमी जर तुम्हीच छापलीत... तर नंतर तिला सपोर्ट का करत राहिलात? मला तुमची भूमिका समजून घ्यायची होती... आणि.. "
".... आणि काय???"
"आणि.... एक व्यक्ती म्हणूनही तुम्हाला समजून घ्यायचे होते..."
एका परक्या पुरुषाशी त्याला आधी न सांगता त्याच्या घरी जाऊन आपण सलग इतकी वाक्ये कधी बोलू यावर नीलाक्षीचाही विश्वास बसत नव्हता. तिच्या मनात अनेक शंका होत्या. 'पै' असा कसा या प्रश्नाने तिला भंडावून सोडलेले होते. या फायदा घेणार्या जगामध्ये चांगली माणसे नसतीलच असे तिला म्हणायचे नव्हते. पण सिमची जी केस झालेली होती, ती बघता त्या केसमध्ये स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी जो तो आसूसलेला असणार हे तिला नक्की ठाऊक होते. पण पै ने तिच्या गृहीतकांना तडा दिल्यामुळे आणि समहाऊ त्याच्यावर विश्वास बसू लागल्याने नीलाक्षीने स्वतःलाही खरा वाटणार नाही असा निर्णय घेऊन पैची भेट घेतली होती.
दिड तास पै अखंड बोलत राहिला. दरम्यात नीलाक्षीने दोन वेळा चहा करून आणला. पै समोरचा अॅश ट्रे भरून वाहू लागला. दिड तास पै उलगडत राहिला. जितका उलगडला तितका आवडला तिला तो! पै कष्टी होता. हपापलेला नव्हता, पण हक्कासाठी झगडणारा होता. स्त्रीबाबत त्याचे विचार ठाम होते. स्त्रीला मन असते आणि गरजाही असतात. स्त्रीला कर्तव्ये असतात तसेच अधिकारही असतात. स्त्रीला स्त्री म्हणून खास सन्मान नको असतो. फक्त तिला समान मानले जायला हवे असते. लिंगभेद मधे न आणता तिच्याशी केलेले वर्तन तिला हवे असते. आपला समाज नेमका हीच भिंत पाडू शकत नाही. याचे कारण ही भिंत शेकडो पिढ्यांनी बांधलेली असते. झालेल्या संस्कारांमुळे ही भिंत ओलांडावीशीही वाटत नाही. पै ला ही भिंत नको होती. पै स्त्रीसाठी खास काही करण्याच्या विरुद्ध होता. त्याला लढावेसे वाटायचे ते स्त्रीला आधी स्त्री म्हणून पाहिले जाते या वृत्तीविरुद्ध! स्त्रीला नुसते एक माणूस म्हणून जगू तरी द्यावे असा त्याचा आग्रह होता. नंतरच्या गोष्टी नंतर करता येतात, पण आधी निदान दोघे समान आहेत या विचारापर्यंत लोकांनी यायला हवे असे त्याचे म्हणणे होते.
पै चे बोलणे नीलाक्षी लक्षपूर्वक ऐकत होती. गंभीरपणे! तिला त्याच्या आविर्भावात एकदाही खोटेपणा दिसला नाही. त्याने त्याचे म्हणणे इतरांना पटावे यासाठी आजवर केलेले प्रयत्नही ऐकून घेतले. पै ने काही शोषित स्त्रियांना न्याय मिळवून दिलेला होता.कामाच्या ठिकाणी होत असणारे शोषण अश्या काही केसेसमध्ये त्याने त्या स्त्रीसाठी शक्ती पणाला लावलेली होती. एकाच शहरात राहून आणि एकाच दिशेने प्रवास करत असूनही आपल्याला पै आजवर भेटला नाही याचेच नीलाक्षीला आश्चर्य वाटत होते. पै ला स्त्री देवी ठरायला नको होती, सर्व आघाड्यांवरती समान अधिकार असलेली एक माणूस ठरायला हवी होती. भाषणात देशाची महान संस्कृती सांगून स्त्रियांना आई बहिण माना असे म्हणणार्या पुढार्यांपेक्षा पै ची भूमिका पूर्णपणे वेगळी व नीलाक्षीला आतून पटण्यासारखी होती.
पै चे विचार ऐकून नीलाक्षीच्या मनामध्ये अनेक विचार येत होते. अशी शंभर माणसे प्रत्येक गावात असती तर आज स्त्रीचे आयुष्य खूप सुसह्य झाले असते. जगात काही चांगले विचारवंतही असतात. प्रत्येक विरुद्धलिंगी नात्याचा शेवट लग्नातच किंवा शारीरिक संबंधातच व्हावा लागतो असे नाही. स्त्रीनेही शारीरिक संबंध प्रस्थापित करून जर नात्याला लग्नाचे लेबल लावण्यास नकार दिला तर तिला तो अधिकारही असायला हवा आणि निवडीला वावही!
संवाद संपला तेव्हा नीलाक्षीने अगदी मनाच्या आतून आलेला एक प्रश्न पै ला विचारला...
"माझ्या मनात पुरुषाबाबतची निर्माण झालेली ओंगळवाणी प्रतिमा जवळपास नष्ट करण्याइतके ताकदवान व्यक्तीमत्व तुमच्याकडे आहे म्हणून हे विचारत आहे... आपण दोघे... आपण दोघे एक होऊ शकतो का?... कसेही... लग्नाशिवाय... किंवा लग्न करून... किंवा एकत्र काम करून.. एकत्र राहून.. कसेही???"
'पै' चे उत्तर ऐकून समाधानाने नीलाक्षी रूमवर परतली होती.
पै म्हणाला होता...
"आपण विचारांनी मुळात एकत्र आहोतच.... फक्त शरीरांची समोरासमोर प्रत्यक्ष भेट आज पहिल्यांदाच झाली आहे... आता आणखीन एकत्र होणे याचा अर्थ शरीरांनीही एकत्र होणे इतकाच असू शकतो... तो अर्थ प्रत्यक्षात आला काय आणि नाही काय... आपण कार्य करत राहू शकतोच... पण... माझी दोन्हीला तयारी आहे"
पै! नीलाक्षीपेक्षा कैक वर्षांनी मोठा होता. पण नीलाक्षीच्या दृष्टीने ती बाब गौण होती. आणि जगातले कोणीही तिचे लग्न कधीच कोणाशीच ठरवणार नव्हते. तिच्या आयुष्याचा निर्णय तिलाच आणि पै च्या आयुष्याचा पैलाच घ्यायचा होता...
पुरुषाची सावलीही नकोशी वाटणार्या निलीची मते पै या माणसामुळे बरीच बदललेली होती...
मुख्य म्हणजे, नीलाक्षीशी लग्न करणे किंवा तिने आणि त्याने एकत्र राहणे याला पै 'आपण नीलाक्षीचे पुनर्वसन करत आहोत' असे मानत नव्हता... त्याच्यामते ती आधीच पूर्णपणे सक्षम होतीच... फक्त समविचारी असल्याने एकत्र राहणे सुखद ठरू शकेल इतकेच पै ला मान्य होते असे त्याचे म्हणणे होते... आणि हेच नीलाक्षीला महत्वाचे वाटत होते... आपला भूतकाळ विसरायला तो आपल्याला भरपूर मदत करेल पण ती मदत करताना 'मी मदत करतोय' असा आव आणणार नाही हे तिच्यासाठी फार फार महत्वाचे होते...
=================================
"आज संध्याकाळी प्रियंका आणि तू याल का? मुलांशी जरा खेळायला वगैरे? तेवढेच त्यांना बरे वाटेल. सॉरी, मी असे विचारणे चूक आहे हे मला माहीत आहे... पण..."
"नो नो सर... व्हाय आर यू सॉरी???... नक्की येऊ आम्ही दोघी... किती वाजता?"
"मे बी... सात? सात वाजता या... मी जेवण बाहेरून मागवेन... जेवण झाल्यावर माझ्याच गाडीतून मी सोडेन तुम्हाला दोघींना होस्टेलवर... "
"शुअर सर... येऊ आम्ही..."
मनातच हरखलेली जो आनंद चेहर्यावर न दाखवता भसीन तिथून जाताक्षणीच सेल हातात घेऊन प्रियंकाचा नंबर डायल करू लागली. प्रियंकाने फोन उचलला.
"हाय जो ताई"
"हाय पियू... आज भसीनने बोलावलंय त्याच्या मुलांबरोबर वेळ घालवायला... संध्याकाळी... त्याच्याकडेच जेवायचे आणि तो ड्रॉप करणार रात्री... सात वाजता पोचायचंय..."
"आऽऽऽज?? आज कसं शक्यंय???"
"काऽऽ?"
"उद्या टेस्ट आहे माझी???... आय हॅव टू स्टडी"
"ओह"
हिरमुसलेल्या जो ने इंटरकॉमवर भसीनला तो चेंज कळवला. तर भसीन म्हणतो, प्रियंका येत नसली तर तू ये की?
अधिकच आनंदलेल्या जो ने किंचित भाव खाल्ल्यासारखे करून प्रस्ताव स्वीकारून टाकला.
टूडे, शी वॉज गोईंग टू ट्राय टू लूक हर बेस्ट!
संध्याकाळी लवकरच रूमवर परतून जो आवडीची साडी नेसून मार्केटमध्ये गेली. मुलांसाठी एक दोन वस्तू आणि थोडी स्वीट्स खर्दी करून ती सव्वासातला भसीनच्या घरी पोचली तेव्हा भसीनचे घर छान लावलेले दिसत होते. मुले जो ला पाहून आनंदली. स्वतःच्या वस्तू दाखवू लागली. जो ने त्यांना आणलेल्या भेटी दिल्या, त्या पाहून ती हरखलीही. मग सगळेजण मागच्या बागेर क्रिकेट खेळले. भूक लागल्यावर भसीनने आणलेले जेवण जो ने पुन्हा गरम केले आणि सगळ्यांना वाढले. लहान मुलाला तर चक्क जो ने घासही भरवले काही. मुले अव्याहत बोलत होती तिच्याशी. आपण या घरातल्या कोणीतरी आहोत ही भावना जो ला प्रमाणाबाहेर सुखावत होती. भसीनच्या चेहर्यावर उपकृत असल्याचे जे भाव आले होते ते पाहून जो अधिकच बहरून येत होती. जेवणे झाल्यावर आईसक्रीम खात काही वेळ पत्ते खेळणे झाले. मग टीव्हीवर पंधरा एक मिनिटे काहीतरी बघून मुले गुडनाईट म्हणून त्यांच्या खोलीत निघूनही गेली. जो ला मात्र परत ये असा खूप आग्रह करून गेली.
एकुण सव्वा सात ते सव्वा दहा ही वेळ अत्यानंदाची गेली. जो ला आता निघायला हवे होते. पण भसीनबरोबरही थोडा वेळ घालवला पाहिजे असे तिला वाटले. नाहीतर मुलांसाठी बोलावले म्हणून अगदी मुले झोपल्याझोपल्या निघणे चांगले दिसणार नाही असे तिला वाटले.
दोघेजण बाहेरच्या खोलीत बसले. भसीनने मान खाली घातली होती. आपल्यामुळे जो ला त्रास झाला असे काहीसे भाव त्याच्या चेहर्यावर होते. कृतज्ञतेचे! भसीन म्हणाला..
"जो.. तू इथे केव्हाही येत जा... पण तुला असे बोलावणे मला अवघड वाटते.. यावेस असे खूप वाटते... पण नेहमी कसे बोलावता येईल असेही वाटते... मुले तर किती खुष झाली तुला पाहून... तुला.. राग नाही ना आला त्यांच्यासाठी तुला बोलावले म्हणून..."
"व्हॉट आर यू टॉकिंग सर?... आय एन्जॉइड इट सो मच... "
"वुई ऑल एन्जॉइड इट जो... अॅन्ड... आय मस्ट टेल यू... दॅट यू आर लूकिंग गॉर्जियस टूडे..."
भसीनच्या डोळ्यात वासना किंवा पाप नव्हते. स्पष्ट स्तुती होती. रागावण्याचे काही कारणच नव्हते. उलट जो सुखावलीच होती. तिला आजवर अनेकांनी या साडीत पाहून काँप्लिमेन्ट्स दिलेल्या होत्या. नवल नव्हते की भसीननेही दिली.
जो ने खाली बघत भसीनचे आभार मानले व म्हणाली..
"निघूयात?"
"तू म्हणशील तेव्हा... पण.. थोडी... वाईन घेतली असती..."
"ओह... मी नाही घेत... "
"तुला किती वाजता पोचावेच लागते होस्टेलला?"
"तसे काही नाही... पण कुठे गेले होते आणि कोणाबरोबर परत आले हे नोंदवावे लागते.."
"मग... थांबतेस???"
जो तिच्या नकळतच हो म्हणाली. टीव्ही बघत बसली. नजरेच्या कोपर्यातून ती भसीनच्या हालचाली न्याहाळत होती. भसीनने वाईन ऐवजी ड्रिंक बनवले स्वतःसाठी! स्वतःच्या संसारातील दुखडे सांगत सांगत भसीन म्यूट केलेल्या टीव्हीकडे शून्यात बघतात तसा बघत राहिला. भसीनच्या डोळ्यात पाणी तरळत होते. जो ला स्पष्ट दिसले ते. ती त्याच्या जवळ जात त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाली..
"संसारावर, मुलाबाळांवर इतके प्रेम करता तुम्ही... पण... ही गोंडस मुले किती तहानलेली आहेत प्रेमासाठी बिचारी... आणि... इथे कधीकधी येऊन त्यांच्याशी खेळण्याव्यतिरिक्त मला काही करताही येत नाही आहे.. आय अॅम सॉरी मिस्टर भसीन... अॅन्ड यू कॅन ऑल्वेज काऊंट अपॉन मी अॅज अ फ्रेंड... "
जो चा आपल्या खांद्यावर असलेला हात अलगद आपल्या डाव्या हातात घेत भसीनने जो ला काहीसे चकीतच केले.. जो ने हात पटकन सोडवून घेतला नाही कारण ते अपमानास्पद ठरले असते त्या हळव्या क्षणी.. रिलक्टंटली तिने तो हात भसीनच्या हातात राहू दिला... पण भसीन रिअली सरप्राईज्ड हर अगेन..
भसीनने तिच्या हाताचे चुंबन घेतले... आणि म्हणाला..
"मुलेच नव्हेत... मीही तहानलेलाच आहे... साडे तीन वर्षे... पण.. कोणी इतके प्रेम केलेच नाही माझ्या कुटुंबावर... त्यामुळे तहानलेलेच राहण्याची सवय झाली होती... पण तू एकदोनदा आलीस... आणि मुलांना आणि मलाही प्रेमाचा ओलावा म्हणजे याची चुणूक दिसली... आता ते हातचे घालवावेसे वाटत नाही जो.. प्लीज.. प्लीज कम क्लोज टू मी.. "
काय घडते आहे यावर जो चा विश्वासच बसत नव्हता. तत्परतेने हात सोडवून घेत जो घाईघाईने म्हणाली..
"मी केव्हाही येईन मिस्टर भसीन.. इतक्या गोंडस मुलांवर कोणाचे प्रेम नसेल.. उशीर झाला आहे... निघूयात का?"
"जो... यू आर अॅव्हॉइडिंग मी.. बट.. आय.. मला ... मला आत्ता खूप आधाराची गरज आहे.. खूप"
जो च्या शरीरात लाटा उसळत होत्या. मनात वादळे उठली होती. जे घडत आहे ते घडू नये असे आजवरचे संस्कार सांगत होते. स्त्रीत्व सांगत होते. आणि जे घडत आहे ते अजून घडत राहिले तर पुढे कसे वाटेल याची उत्सुकता शरीर निर्माण करत होते... भसीनचे साहस जो च्या या द्विधा मनस्थितीमुळे वाढत होते आणि त्या साहसामुळे जो ची मनस्थिती आणखीन द्विधा होत होती...
शेवटी एका क्षणी निग्रहाने जो बाजूला सरकली.. काहीसे स्पष्टपणे म्हणाली..
"आय नीड टू गो बॅक मिस्टर भसीन.. "
पण भसीनने तिच्या मागून दोन्ही हात पुढे टाकून तिच्या कानात कुजबुज केली..
"प्लीज... आय नीड यू.. डोन्ट गो... प्लीज..."
हा रेपचा अटेंप्ट होता का? हे शोषण होते का? ही शरीरसुखाची याचना होती का? याला कायद्याच्या चौकटीत बसवता येणे शक्य होते का? हे प्रेम होते का? ही क्षणिक सुखासाठी चाललेली भसीनची धडपड होती का? ही हाती आलेली संधी वापरायचा त्याचा प्रयत्न होता का? ही जबरदस्ती होती का? की याचना होती?
कोणतेच प्रश्न जो च्या मनात प्रवेश करू शकत नव्हते. भसीनचे दोन्ही हात तिच्या ब्लाऊजवरून पोटावर आले. भसीनच्या दाढीचे खुंट जो च्या गालावर घासले जाऊ लागले.. भसीनच्या हातांना दूर करण्यासाठी ती वापरत असलेले तिचे दोन्ही हात आता फक्त भसीनचे धाडस आणखी वाढू नये इतपतच प्रयत्न करू लागले... हळूहळू तर तेही प्रयत्न ते करत आहेत की नाहीत हे जोलाच समजेनासे झाले..... पाठीमागे कंबरेखाली कसलासा फर्म स्पर्श झाला.. तो कसला आहे हे जो ला जाणवले.. आता सुटणे म्हणजे अक्षरशः जोरदार विरोध करून पळत सुटणेच शक्य उरलेले होते... नुसते शब्दांनी आणि विनंत्यांनी भसीन मागे हटणार नव्हता... नुसते त्याचे हात धरून तो थांबणार नव्हता.. आणि जोरदार विरोध करण्याचे बळ जो एकवटू पाहात होती.. तिला हे आत्ता असे नको होते.. पण का नको होते याचे उत्तर तिच्यापाशी नव्हते.. तिच्यातलीच एक जो तिला सांगत होती की परवाच तर नाशिकला तू त्याच्या एस एम एस साठी तडफडत होतीस... रात्री कितीतरी वेळ जागीच होतीस... तिच्यातलीच दुसरी जो तिला सांगत होती की तो तुला गृहीत धरू शकत नाही.. तुला नाही म्हणण्याचा चॉईस हवाच.. पण मग पहिली जो म्हणत होती की तो कुठे जबरदस्ती करतोय? ... तो तर अजूनही प्लीज थांब, प्लीज थांब असेच म्हणतोय.. डबल माईन्ड... एका कोणत्यातरी क्षणी भसीनने तिचे तोंड आपल्या उजव्या हाताने मागे फिरवले आणि तिच्या ओठांवर अलगद आपले ओठ टेकवले.. व्हिस्कीचा आणि गोल्ड फ्लेकचा तो दर्प जो ला क्षणभर असह्य झाला.. पण भसीनचे राकट ओठ आणि मिश्या तिच्या ओठांवर ग्रीप करू लागल्या.. नंतर भसीनचे दातही.. कोणत्यातरी क्षणी स्वतःच्याच नकळत जो चे ओठ स्वतःहून विलग झाले.. जिभांनी एकमेकांशी खेळ सुरू केला तेव्हा जो च्या शरीरातील उरलासुरला शहाणपणा नष्ट झाला आणि तिचे दोन्ही हात अलगदपणे स्वतःहून भसीनच्या गळ्यात जाऊन पडले.. तिच्या गंधाने बेभान झालेल्या भसीनने तिला सोफ्यावर ठेवले.... पूर्णंपणे भसीनच्या स्वाधीन झालेल्या जो ला आपल्या सर्वांगावर भसीन व्यापत असताना एक स्वर्गीय सुख प्राप्त होत आहे ही शुद्धीत असतानाची शेवटची भावना जाणवलेली होती... त्यानंतर माणूस, मन, वस्त्र आणि शरीर या संज्ञांना अर्थ राहिलेला नव्हता.. एका परतण्याची शक्यता नसलेल्या बिंदूला मागे टाकून पद्मजा कुलश्रेष्ठ स्वतःहून आपले कपडे दूर करू लागली...
===================================
रात्री साडे दहाला शूटिंग म्हणजे कै च्या कै च होते. पण ती आवश्यकता होती. शहराबाहेरच्या त्या पटांगणात शहराचे दिवे दिसणार नाहीत अशी जागा शोधण्यात आलेली होती. शहरातील कोणी सोम्यागोम्या तिथे टपकणार नाही याची व्यवस्था बघण्यात आलेली होती. कमीतकमी माणसांमध्ये हे उरकायचे होते नाहीतर गावकर्यांना सुगावा लागला असता तर आत्ता इथेही बघे जमले असते... अंधारामध्ये साधारण पंचवीस मीटर त्रिज्येचे एक वर्तुळ तयार करण्यात आले होते.. त्या वर्तुळावर ज्वलनशील पदार्थ होते... आजूबाजूला पेट्रोल आणि रॉकेलचे मुबलक कॅन्स होते.. तयारी जोरदार चालू होती... फोकस लाईटच्या प्रकाशात छातीवर फक्त एक पांढरी कापडी पट्टी बांधलेली आणि कंबरेला गुडघ्यांपर्यंत पांढरे पारदर्शक कापड अर्धवट गुंडाळलेली सिमेलिया स्वतःच एक ज्वाळा, एक आग वाटत होती. तिच्या शरीरावरून लाईट सरकला की वीज पडल्यासारखे वाटत होते बघणार्याला! फॅशन इंडस्ट्रीत अनेक वर्षे घालवणारे काही जण तिथे होते, पण तेही तिला पाहून स्टन्ड होते.. कोणीतरी मॉडेल म्हणून स्वतःला तिच्यासमोर पोझ करून तिला वेगवेगळ्या पोझेस शिकवत होते... कोणत्यातरी पोझेस फायनल होत होत्या... आगीच्या भल्या मोठ्या रिंगणात मध्यभागी एक अर्धनग्न तरुण जोडपे प्रणय करत आहे अशी त्या शक्तीवर्धक गोळ्यांच्या जाहिरातीची थीम होती.. अजून आपल्यासमोर उभा राहणारा तरुण कोण याचा सिमेलियाला अंदाज नव्हता... शेवटी एकदाचे ते वर्तुळ पेटवण्यात आले.. आत बाहेर करायला एक पॅसेज तेवढा ठेवलेला होता... तास सव्वा तासात पोझेस कॅप्चर झाल्या की वर्तुळ विझवून त्याच वर्तुळात जंगी पार्टी करायचे ठरवलेले होते... सीरीनचा गोसावी सिमेलियाच्या बोल्डनेसकडे आ वासून पाहात होता... शी वॉज अॅबसोल्यूटली अॅट होम इन दोन पोझेस.. कसलेली मॉडेल असावी तसे तिचे नेत्र गहिरे आणि शरीर उन्मादलेले वाटत होते... आणि एका क्षणी तो तरुण मॉडेल तिच्यासमोर पेश झाला..
त्याला पाहून सिमेलिया किंचितही थबकली नाही... जाहिरातीतील तरुणीची भूमिका ती आत्ता जगत होती... उत्तान पोझमध्ये तरुणाला आपल्या कवेत घेणार्या तरुणीची भूमिका... ठरल्याप्रमाणे तो तरुण जमीनीवर आडवा झाला... सिमेलिया त्याच्याशेजारी झोपून छातीवरच्या पट्टीची पाठीवर असलेली गाठ सोडून हात वर ताणून भेदक नजरेने त्याच्याकडे पाहात राहिली... फ्लॅशेसचा अतीप्रचंड लखलखाट झाला.. श्वास रोखले गेले होते... कॅमेर्यात जे कॅप्चर झालेले होते ते गजब उडवणारे होते... अभिनंदनाच्या वर्षावात सिमेलिया पाठीवरची गाठ परत बांधत तेथून उठली तेव्हा तिच्याशेजारचा तो तरुण अवाक नजरेने तिच्याकडे बघत तिचे अभिनंदन करत होता..
सिमेलिया त्याच्या अभिनंदनाचा स्वीकार करत हासत हासत आणि शेकहँड करत म्हणत होती...
"थँक यू आशिष.. पार्टीला थांबताय ना सगळे? तू, देव आणि गोयल सर?"
============================================
-'बेफिकीर'!
आता ही मी पहिली. सुन्न
आता ही मी पहिली. सुन्न होतंयं वाचताना..
कमाल!!! पण बेफि, एक छोटिशी
कमाल!!!
पण बेफि, एक छोटिशी तक्रार आहे माझी, तुम्ही फारच वाट बघायला लावताय! (म्हणजे मला मान्य आहे की तुमच्याकडे असा नवेनवे भाग लिहिणारा कारखाना नाहीये ते) (की आहे?)
मस्तं! पुलेशु... पुढ्चा भाग
मस्तं!
पुलेशु...
पुढ्चा भाग लव्कर येवू द्यात!!
छानच
छानच
बेफिकिर, तुम्हाला खरच असा
बेफिकिर, तुम्हाला खरच असा एखादा पै माहिती आहे की हा तुमच्या कल्पने मधला आहे?????????
भाग ९ मधल्या मैत्रीणीच वर्णन एकदम मस्त. धन्यवाद विशय निवडी बाबत.
खुपच छान कथा.....................
छान
छान
मस्तं! पुलेशु...
मस्तं! पुलेशु...
सुरेख पुढिल भागात आशीष व
सुरेख
पुढिल भागात आशीष व इतराना पोकळ बांबुचे द्या !
निला़क्षीला पै ची मैत्री
निला़क्षीला पै ची मैत्री मिळाली, सिमोलिया ला माहिती आहे ती काय करते आणी काय करणार ते पण जयाचे काय ? नविन भागाची प्रती़क्षा.
सही पु.ले.शु.
सही पु.ले.शु.
ह्ह्ह्म्म्म...
ह्ह्ह्म्म्म... छान्...वाचतेय!
"... किती... बेसावध होती जया.. "
यात जया ची पुढची काही ट्रजेडी लपली आहे का.... विचार करतेय!
मस्त राव. पण जो चे काय होणार
मस्त राव. पण जो चे काय होणार पुढे?.
ह्म्म्म हा भाग चुकला होता
ह्म्म्म हा भाग चुकला होता
its amazing
its amazing
its amazing
its amazing
its amazing ? >>> यात काय
its amazing ? >>> यात काय amazing आहे?
खुपच छान................नेहमि
खुपच छान................नेहमि प्रमाने खिलवून थेवनारि कथा.......................marathi type karata karta sagle wichar wahun gele....anyways befikir katha nehmi pramanech chhaan jamli aahe ..pudchya bhagachi utsukta aahe....
Mala plz sarv bhagan chi link
Mala plz sarv bhagan chi link send kara na
Tia