वालाच्या तयार डाळींब्या.
[वाल भिजवुन्,मोड आणुन्,गरम पाण्यात ठेवुन सोललेल्या वालाच्या डाळींब्या.]
सुका मसाला--
किसलेले सुके खोबरे,धणे-जिरे-मिरे-दालचिनी चा तुकडा-थोडीशी जायपत्री,लाल सुक्या मिरच्या हे सर्व भाजुन त्याची पुड करुन घ्यावी.
ओला मसाला:--
खवलेले ओले खोबरे,आले,लसुण पाकळ्या ,१ लहान कांदा चिरलेला,चवीला हिरवी मिरची,कढीपत्त्याची पाने.कोथिंबीर हे सर्व थोडे पाणी घालुन मिक्सरमधे बारीक वाटुन घ्यावे.
फोडणीसाठी तेल्,मोहोरी,जिरे ,हिंग. व हळद
१ लहान कांदा बारीक चिरलेला,
तिखट,मीठ.
गरम मसाला .
आवश्यकतेनुसार पाणी.
आंबटपणासाठी कोकम आगळ किंवा लिंबु.
वरुन घालायला कोथिंबीर.
एका जाड बुडाच्या पॅन मधे फोडणी साठी तेल तापवुन त्यात मोहोरी-जिरे व हिंग घालावा.त्यात बारीक चिरलेला कांदा पारदर्शी होईपर्यंत परतावा.त्यात वालाच्या डाळिंब्या घालुन छान परतुन घ्याव्या.
त्यावर वाटलेला ओला मसाला व सुका कोरडा मसाला घालुन परता.त्यावर चवीप्रमाणे तिखट ,मीठ,हळद,गरम मसाला पसरवुन पातळ ग्रेव्ही होईल इतके पाणी घाला..वर झाकण ठेवुन अगदी मंद आचेवर डाळिंब्या शिजु द्या.अधेमधे चमच्याने छान ढवळा.डाळिंब्या शिजल्यावर गॅस बंद करा.डाळींबी थोडी रसदार असली पाहिजे. चवीप्रमाणे कोकम आगळ मिसळुन वर कोथिंबीर पेरा.
या डाळींब्यां बरोबर गरम भात किंवा पोळी,तांदुळाची मऊसुत भाकरी काहीही चालेल.
डाळींब्याच्या प्रमाणानुसार ओला,सुका मसाला व इतर साहित्य घ्यावयाचे आहे.
वॉव, आवडता पदार्थ. असाच केला
वॉव, आवडता पदार्थ. असाच केला जातो घरी...
सुप्पर्ब रेस्पी.. आज कचोर्या
सुप्पर्ब रेस्पी..
आज कचोर्या कर्णारे.. !!जय सुलेखादेवी प्रसन्न !!
बासच! लय खास...
बासच! लय खास...
वॉव तोंडाला पाणी.....आजच भिजत
वॉव तोंडाला पाणी.....आजच भिजत टाकलेत वाल...आम्हि याला वालाचे बिर्डे म्हणतो...कधि कधि नुस्त कांदा टोमॅटो वर पण करुन पहा छान होते.... तेल, कांदा, वाल, मसाला, गरम मसाला, टोमॅटो, खोबरं, मीठ , थोडी साखर/ गुळ , कोथिंबीर .....कधी कधी वाटण घाटण करायला वेळ नसतो पण हे खायची इच्छा होते तेव्हा हे पटकन होते...
दक्षे वि पु चेक कर
दक्षे वि पु चेक कर
कातिल फोटू आणि रेस्पी!
कातिल फोटू आणि रेस्पी! तों.पा.सु.
हे मस्तच. आज भिजत टाकलेच आहेत
हे मस्तच.
आज भिजत टाकलेच आहेत वाल. उद्या करणार आहे.
जगातला सर्वात आवडता
जगातला सर्वात आवडता पदार्थ!
मस्त फोटो. मला डाळिंब्या काहीही वाटण घाटण न करता फक्त फोडणी, तिखट, मीठ, ओलं खोबरं आणि गुळ घालून पण तितक्याच आवडतात.
कडवे वाल घरात नाहीत याचं फार दु:ख होतय.
मस्त..
मस्त..
अहा! फोटो तोंपासु आहे.
अहा! फोटो तोंपासु आहे.
देशातून कडवे वाल आणलेत हे विसरूनच गेले होते. आता भिजत घालायलाच हवेत.
तोंपासु एकदम!! पुढच्या पुणे
तोंपासु एकदम!!
पुढच्या पुणे दौर्यात वाल आणलेच पाहिजेत
तोँपासु
तोँपासु
मस्तच!
मस्तच!
मस्त मस्त मस्त!!
मस्त मस्त मस्त!!
वालाची डाळ भिजवून पण बिरडे
वालाची डाळ भिजवून पण बिरडे होते. सोपे आणि पटकन.
शूम्पी +१. इथे आल्यापासून
शूम्पी +१. इथे आल्यापासून मिसते आहे डाळिंब्या
मी २-३ वेळा मृणच्या रेसिपीने
मी २-३ वेळा मृणच्या रेसिपीने केलं आहे बिरडं. डाळिंब्या कुठल्या आणि बिरडं कुठलं ?
मस्त! मीही असंच करते. कधी कधी
मस्त! मीही असंच करते.
कधी कधी फक्त जिरं ओलं खोबरं हि. मिरची आणि कोथिंबीर असंही छान लागतं.
मस्त. मी नारळाचं (रेडिमेड)
मस्त. मी नारळाचं (रेडिमेड) दूध आणि थोडसं आल्यालसणाचं वाटण घालून, हिरव्या मिरच्या (मिर्ची पावडर ऐवजी), कांदा, कढिपत्ता, कोथिंबीर इ घालून करते.
सिंडी, डाळिंब्या आणि बिरडं
सिंडी, डाळिंब्या आणि बिरडं एकच. माझ्यामते कोकणात डाळिंब्या आणि देशाकडे बिरडं म्हणत असावेत.
डाळींब्या,बिरडं,डाळींबी उसळ
डाळींब्या,बिरडं,डाळींबी उसळ हे सगळं एकच आहे..वाल जास्त प्रमाणात घेतले तर ,सुरवातीला तर काही प्रॉब्लेम येत नाही पण काही महिन्यानंतर हे च वाल भिजवुन ,कपड्यात बांधुन ठेवले तरी त्याना छान मोड येत नाही ,साले सुटत नाहीत किंवा बरेच गणंग निघतात.जीव हळहळतो .त्यामुळे जास्त प्रमाणात घेवु नये.[महाराष्ट्राबाहेर राहिल्याने वालाची महती जास्तच कळली.]त्यापेक्षा वालाची डाळ-ज्यावर साले नसतात-वर्षभर टिकते.लौकर -अर्ध्या तासात गरम पाण्यात भिजते.सुके खोबरे वापरुन लगेच चवदार कालवण करता येते."त्या" वालाच्या जवळपास ची चव येते
स्ल्प ..... लोक्स कधी पेणचे
स्ल्प ..... लोक्स कधी पेणचे वाल खाल्ले आहात काय ?
मस्त. आमच्याकडे शिजतानाच यात
मस्त. आमच्याकडे शिजतानाच यात वेलची पावडर टाकतात. खास करुन हिरव्या वाटणाची केली तर. उग्र वासही जातो आणि पोटासाठी पण चांगले.
सिंडे, वाटण लावून करतात ते
सिंडे, वाटण लावून करतात ते बिरडे आणि मोड आलेले वाल फोडणीला टाकून करतात ती डाळींब्यांची उसळ असे मी समजत आलेय.
शूम्पी, सेम पिंच!
सायोने लिहिलिय तशीच डाळींब्यांची उसळ मला आवडते, ब्राह्मणी पद्धतीची.
माझी अतिशय आवडती भाजी.. जराशी
माझी अतिशय आवडती भाजी.. जराशी शिळी झालेली तांदूळाची भाकरी किंवा चपाती आणि सोबत वालाची भाजी जरा जास्तच प्रिय आहे..
- पिंगू
समवेत सुरमईचे शैलो फ्राय
समवेत सुरमईचे शैलो फ्राय तुकडे वाह वा!! सुंदर रेसिपी.
एकदम तोंपासु!!
एकदम तोंपासु!!
नक्किच करुन बघेन
नक्किच करुन बघेन