बोमप्रकाश घोटाला, आता तू कुठेरे जाशील?

Submitted by मी-भास्कर on 23 January, 2013 - 04:17

बोमप्रकाश घोटाला, आता तू कुठे रे जाशील?

वेळीच का नाही गेलास त्या [बोफोर्स, आदर्श, टूजी, कॉमनवेल्थगेम,कोलगेट,चारा,ताजकॉरिडॉर,..] घोटाळे पचवीणार्‍या 'महात्मा' नामाचा सतत गजर चालू असणार्‍या, पवित्र, सर्वसमावेशक, अतिबलाढ्य मंदिरात ? मुल्लामुलायम, मायाहत्ती, लल्लु तुझ्यासमोरच गेले ना तिकडे? लल्लुकडे पहा. मिष्किलपणे जी जी करत कसा मजेत आहे ! मायाहत्तिही अन्याय झाल्याच्या डरकाळ्या फोडती आहे आणि तरीही तणावमुक्त आहे. मुल्लामुलायम तर त्या मंदिरात राहून पंप्रची स्वप्ने पाहातो आहे तरी तोही आंजारून गोंजारून घेतो आहे. तू मात्र दिल्लीत असलेले इतक्या जवळचे मंदीर सोडून पळत्याच्या पाठीमागे का लागलास? भोग आता त्याची फळे! त्यांच्या मंदिरात मुक्क्कामाला असतास तर सिबिआय, इन्कमटॅक्स यांना तू दिसलाच नसतास!
जेमतेम १०० कोटी रुपडे तू ५५ लोकात मिळून खाल्लेस असे कोर्ताला दिसले.
कोट्यावधी रुपये पचविणारे यातले दर्दी तुला हसत असतील!
शिक्षक भरतीत कमाई करणे हा तर भारतभरातील हजारो प्रतिष्ठितांचा अघोषित व्यवसायच आहे.
त्याला अधिकृत मान्यता मिळणेच फक्त बाकी आहे. शिक्षक दरिद्रीच असण्याची थोर भारतीय परंपरा कायम राहावी म्हणून नेमणूक देतांनाच आम्ही त्याला प्रथम दरिद्री करण्याचे महान कर्तव्य पार पाडतो असे त्यांचे म्हणणे आहे.
असे असूनही ते कर्तव्य पार पाडणार्‍या तुला मात्र सजा? असे का झाले याचे तूच आत्मपरिक्षण कर.
असो.
अपेक्षेप्रमाणे शिक्षा ऐकताच तुला छातीत कळा आणि अस्वस्थता आली. त्यामुळे तू आता सध्या तरी हॉस्पितलच्या वॉर्डात सुखेनैव राहाशील आणि जामिनावर सुटून घरी पण जाशील. पण पुढे?

बोमप्रकाश घोटाला, नंतर तू कुठे रे जाशील?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोमप्रकाशा, तू तर अडकला आहेसच
पण अद्याप हजारो बोमप्रकाश बाहेर उजळमाथ्याने हिडताहेत्.आता चोराच्या वाटा चोरांनाच ठाव्या! तेव्हा त्यांना पकडून त्यांच्यावरर्ही अशीच कारवाई कशी होईल ते पहा म्हणजे घाण स्वच्छ करायला मदत करायचे तरी तुला पुण्य लागेल.

खरेच काल नाही पण आज सुचले.
सध्या केजरीवालांबद्दल माध्यमांमध्ये फारसे येत नाही. त्यांनी एकाच वेळी सगळ्यांशीच (हारण्यासाठी )लढण्याची रणनीति अवलंबिली असल्याने त्यांना विरोधकांच्या भ्रष्टाचाराविषयी माहिती देणारे ( अद्याप कोणत्याही प्रकरणात न अडकलेले) भ्रष्टाचारीही प्रकरणे देईनासे झाले असावेत.
तुम्ही आता 'मेलेली कोंबडी जाळाला भीत नाही' हे लक्षात घेऊन केंद्रातील सत्ताधारी पक्षाची तुम्हाला ज्ञात अशी प्रकरणे वेगाने केजरीवालांना द्या. त्यांनाही योग्य काम मिळेल आणि तुमचाही एकटेपणा दूर होऊन सोबतीस आणखी कांहीजण येतील.' मग एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ' याचाही तुम्हाला पर्याय राहील.

आता गडकरीवर धागा काढा.

भाटबोलीवर गडकरीच्या धमक्यांबद्दल अवाक्षरही धागा निघाला नाही. Proud

गडकरींच्या धमक्यांकडे बघून घ्यायचे काम केजरीवाल(आयकर विभागातील माजी अधिकारी) यांनाच देण्यात आलेले आहे Lol

भाटबोलीवर गडकरीच्या धमक्यांबद्दल अवाक्षरही धागा निघाला नाही.
>>
गडकरींवर असलेल्या आरोपांप्रमाणे हजारो नेत्यांवर आरोप आहेत पण सिबिआय, इन्कमटेक्स दिपार्टमेंट कोणाच्या इशार्‍यांवर विरोधकांनाच छळते? सर्वांवर टाका ना छापे. ज्यांच्यावर छापे टाकले पाहिजेत असे लाखो लोक सत्तेत आहेत त्यांना हात का लावला जात नाही?
सत्तेतील सलमान खुर्शिदने तर केजरीवाल यांना 'येणे तुमच्या हाती आहे जाणे नाही' असे म्हणणे ही तर जिवे मारण्याचीच भाषा म्हणता येईल. त्याला तर उलट बढती दिली गेली. त्याच्या भ्रष्टाचारावर आणि धमक्या देण्यावर आधी धागा काढायला तुम्हाला कोणी अडविले आहे काय? खुर्शिदने दिलेली धमकी आणि केलेला भ्रष्टाचार यावर धागा काढा. मग बोला.

राजनाथ यांच्या विशाल NDA त, चौतालांच्या इंडियन नॅशनल लोकदलाचा समावेश Wink

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18232164.cms

भास्कर यांनी आपलेच पाय तोंडात जाण्यापूर्वी धागा काढायला नको होता Wink

@sunilt | 29 January, 2013 - 17:50
युपिए ने असल्या चिल्लर घोटाळे करूनही पचवू न शकलेल्यांना प्रवेश नाकारला असावा. एन्डिए त आला म्हणून काही त्याला स्वच्छतेचे सेर्टिफिकेट मिळत नाही. ते त्याला न्यायालयात जाउनच मिळवावे लागेल.
कुणि सांगावे उद्या युपिए देखिल त्याला पावन करून घेईल. लालु, मायावती, मुलायम असे कितितरी घोटाळे महारथी त्यांच्या तंबूत आहेतच. तेही न्यायालयावर भरोसा ठेवून असतात. जसा सत्ताधारी पक्ष तसाच विरोधी पक्ष व्हायला लागतो. भजनलाल नव्हता इंदिराजींनि पावन करुन घेतला?
धागा योग्य वेळीच काढला आहे. काळजी करू नये.

कुणि सांगावे उद्या युपिए देखिल त्याला पावन करून घेईल.

वेळ पडली तर नक्कीच घेतील. शेवटी ते तर काय भ्रष्टाचारात आकंठ बुडालेलेच Wink

प्रश्न आहे तो "चरीत्र की राजनीति" वाल्यांचा Wink

@सुसुकु | 29 January, 2013 - 23:33 नवीन
वेळ आल्यास आणि गरजेनुसार कुठेही जाण्यास आम्ही तयार आहोत - बोम. घो.@>>
जसे बोमप्रकाश वेळ आल्यास आणि गरजेनुसार कुठेही जाण्यास तयार आहेत तसेच सत्ताधारी आणी विरोधक दोघेही वेळ आल्यास आणि गरजेनुसार कुणालाही आत घेण्यास तयार आहेत.
आज बोमप्रकाशला युपिएने गोत्यात आणले आहे. उद्या युपिए गोत्यात आली आणि बोमप्रकाशचा आधार आवश्यक झाला तर बोमप्रकाशला पायघड्या घालून युपिए आत घेईल.
आमच्या दृष्टीने या खेळात एक तरी मोठा भ्रष्टाचारी बाराच्या भावात गेला तरी कांही साध्य झाले असे वाटेल.
आम्ही भ्रष्टाचाराबद्दल लिहितांना राजकीय पक्षांमध्ये सत्ताधारी किंवा विरोधक अशी विभागणी करून लिहित असतो. निदान त्याबाबत आम्ही कोठल्याच राजकीय पक्षाच्या बाजूने नसतो. पण
सत्तारूढ पक्षाचा भ्रष्टाचार हा विरोधी पक्षाच्या भ्रष्टाचारापेक्षा देशाचे खूप अधिक नुकसान करीत असतो असे मात्र आम्हाला ठामपणे वाटते.

>>सत्तारूढ पक्षाचा भ्रष्टाचार हा विरोधी पक्षाच्या भ्रष्टाचारापेक्षा देशाचे खूप अधिक नुकसान करीत असतो असे मात्र आम्हाला ठामपणे वाटते.
सत्यवचन श्रीमान !

सत्तारूढ पक्षाचा भ्रष्टाचार हा विरोधी पक्षाच्या भ्रष्टाचारापेक्षा देशाचे खूप अधिक नुकसान करीत असतो असे मात्र आम्हाला ठामपणे वाटते.>>>> +१

इतके धागे काढूनही या आयडीला त्या वेळी कुणीच कसं समजावून सांगितलं नसावं ?
पक्षीय भूमिका बद्दल भाषणबाजी करणारे, आग विझवणारे आयडी यांचे या आयडीशी चक्क सहमत होताना दिसतेय की...

म्हणजे सध्याचं सरकारच (फक्त) यू टर्न घेतंय असं नाही