ऑस्ट्रेलियन ओपन - २०१३

Submitted by Adm on 12 January, 2013 - 03:14

यंदाच्या वर्षीची पहिली ग्रँड स्लॅम अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन येत्या सोमवारपासून म्हणजे १४ जानेवारी पासून सुरु होते आहे. महिला आणि पुरुष एकेरीत अनुक्रमे व्हिक्टोरिया अझारेंका आणि नोव्हाक जोकोविक अग्रमानांकित आहेत. नदाल दुखापतीमुळे ह्याही स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीये.
पुरुष एकेरीत जोको, फेडरर आणि मरे ह्यांना विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहे. द्वितीय मानांकित फेडरर साठी खडतर ड्रॉ आला आहे. फेडररचे डेव्हिडेंको, टॉमिक, रॉनिक, त्सोंगा आणि मरे ह्यांच्याशी सामने होण्याची शक्यता आहे.
महिला एकेरीत द्वितीय मानांकित शारापोव्हा वि व्हिनस विल्यम्स असा सामना तिसर्‍या फेरीत होण्याची शक्यता आहे. अझारेंका, सेरेना विल्यम्स, शारापोव्हा ह्या विजेतेपदाच्या शर्यतीत आहेत.

हा धागा ह्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेरेनाची मॅच जेव्हढी बघितली त्यावरुन तरी दिल्यासारखी वाटली नाही.. .

आत्ता फेडेक्स - त्सोंगा जोरात चालू आहे.,, २-२ सेट झालेत आणि पाचव्यात फेडेक्स सुरुवातीलाच ब्रेक घेउन ४-२ पुढे आहे

वेळे संपवल्याबद्दल धन्यवाद.
मधेच चांगली, मधेच फडतूस अशी मॅच होती, चुका पन्नाशीत असतील दोघांच्याही.
कामाला जावं..

सरिना दुखावली गेली आणि मग जमलेच नाही तीला स्लोनशी भिडणे. पण मला नाही वाटत कि स्लोन अ‍ॅझर ला हरवेल. अ‍ॅझर चा विश्वास नक्किच उंचावेल आता.

जिंकणार शेरापोवा!!

आवाज बंद झाला का सगळ्यांचा?
इथपर्यंत तर आम्ही जातोच. खडतर ड्रॉ चे काय झाले? Proud

गो फेर्रु!

खडतर ड्रॉ चे काय झाले? >>>> झाली की पाच सेटर.. Wink

शारापोवा किरकोळीत हरली !!! Sad Sad
अगदीच डिसअपॉईंटमेंट.. Sad Sad

शारापोवा किरकोळीत हरली !!!
हो ना! हे अनपेक्षित होते. जशी ती खेळत होती तशी नाही खेळली काल. जोको सरळ सेटसने जिंकला. ते एक बरे.

.

शेवटचा सेट फेडररची सर्व्हिस ब्रेक केलीये मरेने... त्यामुळे फेडरर आता कितपत कमबॅक करेल याबद्दल शंका आहे...

चवथा सेट हातात असताना घालवत परत मिळवला फेडेक्स नी.. पण मरेला जेव्हा चान्स मिळाला तेव्हा त्यानेच सेट जिंकला... त्यामुळे हा सेट मरे जिंकले असे वाटते आहे.. एकूणातच फेडेक्सला दुसर्‍यांची सर्व्हीस ब्रेक करणे कठिण जाते आहे सध्या..

फेडरर वाईट खेळला नाही. पण शेवटच्या सेट मध्ये ढेपाळला. शेन वॉर्ननी कॅच पकडल्यामुळे दचकला का? Happy

आता गो ज्योको!!

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र..... मी तिसर्‍या सेटची सुरूवात पाहिली नि झोपलो... ली ना जिंकायला हवी होती... असो. टॉपसीडेड जिंकणार म्हणजे सिंगल्समध्ये...

Pages