Submitted by सतीश देवपूरकर on 19 January, 2013 - 22:33
गझल
नको उसळूस तू हृदया, तुला झेपायचे नाही!
तिचे साधेसुधे बघणे तुला सोसायचे नाही!!
फुलांचा एकमेकांचा अबोला बोलका असतो!
तुला गंधातले, रंगातले समजायचे नाही!!
तुझी माझी पुन्हा चर्चा कराया लागले तारे....
कितीही मी जरी म्हटले अता बोलायचे नाही!
समुद्री दोन डोळ्यांच्या किती भंडावती लाटा;
किनारी थांबणा-याला कधी उमगायचे नाही!
दिले पहिल्याच भेटीला तुला काळीज मी माझे!
अता तू बोल काहीही मला टोचायचे नाही!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमच्या रानफुले गझलसंग्रहातील
आमच्या रानफुले गझलसंग्रहातील रचना, जी खूपच जुनी आहे. जशी रानफुलेत आहे, तशीच्या तशी काहीही बदल वा भर न करता इथे, पोस्ट केली! नोंदनीय/दखलपात्र आहे का हे रसिकंनीच ठरवावे!
तुझी माझी पुन्हा चर्चा कराया
तुझी माझी पुन्हा चर्चा कराया लागले तारे....
कितीही मी जरी म्हटले अता बोलायचे नाही!
हे असे उद्योग नसलेले तारे कोणत्या आभाळात असतात बुवा? आम्ही बघतो तेव्हा तर एन टी पी सी च्या धुराने काळवंडलेले किंवा संक्रांतीच्या पतंगांनी गजबजलेले आकाश दिसते. काव्यात्म भाषेच्या वापराचा अट्टाहास केल्याने कवितेची गझल होते असा एक गैरसमज या क्षेत्रात पसरवण्यास या अश्या गझला (?) कारणीभूत ठरत आहेत.
देवपुरेकर, अतिशय मनमोहक गझल.
देवपुरेकर, अतिशय मनमोहक गझल. सुंदर गझलियत. लिहीत रहा...
सतीश तुझ्या गझलेची चर्चा
सतीश तुझ्या गझलेची चर्चा पुन्हा कराया लागले तारे
प्रतिसाद वाचून दिवसा आभाळात दिसाया लागले तारे
चांगली आहे ! तुझी माझी पुन्हा
चांगली आहे !
तुझी माझी पुन्हा चर्चा कराया लागले तारे....
कितीही मी जरी म्हटले अता बोलायचे नाही!
येथे आता हवे आहे का ?
दिले पहिल्याच भेटीला तुला काळीज मी माझे!
अता तू बोल काहीही मला टोचायचे नाही!!
येथे भेटीत ठीक आहे का ?
महेश काय राव विपूत विचारायचं
महेश काय राव![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
विपूत विचारायचं ना
आता क्लास भरेल
रिया ओह पहले बोलने का था ना !
रिया ओह पहले बोलने का था ना !
रियुडे तू इकडे कशी ? काल तर
रियुडे तू इकडे कशी ?
काल तर मला म्हणालीस की सरांच्या गझला मला वाचायला का लावता म्हणून![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
वैवकु मी वाचतेच गझला नेहमी
वैवकु मी वाचतेच गझला नेहमी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
)
आवडली तरच प्रतिसाद देते
आज जरा मस्तीके मूड मे थी म्हणुन
चालतं कधी कधी
(इकडे अवांतर चालेल
इकडे अवांतर चालेल >>>>> अगं
इकडे अवांतर चालेल >>>>>
अगं सरांची रचना व त्यावरील प्रतिसाद म्हणजे अथ पासुन इति पर्यंत वेगळे काय असते मग ??![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अगं सरांची रचना व त्यावरील
अगं सरांची रचना व त्यावरील प्रतिसाद म्हणजे अथ पासुन इति पर्यंत वेगळे काय आहे मग ??![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>>
हेच मी सौम्य शब्दात बोलले
(No subject)
अट्टहासाने कुठे होते कधी का
अट्टहासाने कुठे होते कधी का काव्य रे?
गझल लिहिणे वा समजणे, गोष्ट आहे दूरची........
...................................................................
कोणते आभाळ? कुठले पाहतो तारे अरे?
चार प्याले प्राशल्यावर बहरतो म्हणतात तू!
........................................................................
समज किंवा बोध कोणीही कुणाचा ना करे;
झोपला आहे खरा त्यालाच उठवावे खरे!
...........................................................................
.........प्रा.सतीश देवपूरकर
शायर पैलवान! धन्यवाद
शायर पैलवान! धन्यवाद अभिप्रायाबद्दल!
सतीश तुझ्या गझलेची चर्चा पुन्हा कराया लागले तारे
प्रतिसाद वाचून दिवसा आभाळात दिसाया लागले तारे
आहो सोसवेल का हे कुणाला?
आमच्या गझलेत आहे काय कटुता एवढी?
वाचण्याआधीच त्यांना मळमळाया लागते! ...........ही आहे इथली परिस्थिती!
कळत बिलकुल नसुनही गझल,
कळत बिलकुल नसुनही गझल, त्यांचा "क्लास घेता" रे
नि अमुच्या 'प्रा.स.दें'ना लोकहो का त्रास देता रे
निषेध निषेध निषेध !!!
वाह वैवकु ; अगदी माझ्या
वाह वैवकु ; अगदी माझ्या मनातलं बोललात !!!!!!
प्रा.साहेब लोकांकडे लक्ष देवू नका त्यांनी जितकी चेष्टा आरंभली आहे .....गझल बरी आहे त्यामानाने
मौज आली, छान तू केलीस माझी
मौज आली, छान तू केलीस माझी मस्करी!
हासता आले मलाही प्राण जाताना तरी!!
लागले कोणी कण्हाया, फोडला टाहो कुणी!
मी जगाला आवडाया लागलो मेल्यावरी!!
........प्रा.सतीश देवपूरकर
(No subject)
प्रोफेसर "अता" असते का "आता"
प्रोफेसर "अता" असते का "आता" असते. - तुमच्या शेवटच्या शेरातल्या शब्दाबद्दल
मायबोलीवर अता पण
मायबोलीवर अता पण चालते!..............इति मायबोलीकर जाणकार!
त्रिवार स्वागत, स्वागत आणि
त्रिवार स्वागत, स्वागत आणि स्वागत!
एक नावाचा कुणी तरी, धन्यवाद!
एक नावाचा कुणी तरी,
धन्यवाद!