फिचर्स वॉण्टेड

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

कोणीतरी मध्यंतरी एक आकडा दिला. तिथे गेलो तर सांगीतलेला विषय नव्हता. ऐकण्यात चूक झाली असावी म्हणून आजुबाजूचे आकडे धुंडाळले. शेवटी एकदाचे हवे ते गवसले. पण ध्येया पर्यंतचा प्रवासही अल्हाददायक होता (मनोरंजक असे वाचावे).

या कसरतीमुळे मायबोलीवर दोन परस्परविरोधी अत्यावश्यक फिचर्स नाहीत हे जाणवले. ते प्रशाशनाच्या निदर्शनास आणून देण्याकरता केलेला हा खटाटोप.

(१) पुढील आकडा, मागील आकडा अशी बटणे प्रत्ये पानावर असावीत म्हणजे हरवलेल्यांचा प्रवास सुकर होईल
(२) रॅण्डम आकडा असे एक बटण असावे. ज्यांना मायबोलीचे वैविध्य चाखायचे आहे अशांना मदत होईल

बनवले मीच असे एक "बटण":
रॅण्डम मायबोली सॅम्प्लरः पापी लोकांना कदाचीत दिसणार नाही (८०८० वर आहे)

सुधारीतः http://avyakta.caltech.edu:8080/maayboli/random_maayboli_node.html

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

आकडा म्हण्जे बाफ नंबर की नवीन लेखनात दिसणार्‍या लीस्ट प्रमाणे बाफ नंबर?
रँडम ... ह्याच्या करता काहीतरी सिलेक्शन ठेवावं लागेल .. नाहीतर आचरट लेखन ही येईल.
ह्याच धर्ती वर जास्त/कमी/ प्रतिसाद असलेला वा नसलेला असे वर्गीकरण पण करता येईल की ... सेम अ‍ॅज ऑटो साँग प्लेलीस्ट Happy

changale aahe paN tyatun kavita gazala na yeNyakarata kaheetaree bandobast kara buva Happy 3 paikee 2 vala kavita aalya :'(

आमची मायबोली

(अ) मायबोलीवर दोन प्रकारच्या खुंट्या (nodes) असतातः
(१) लेख - ज्यांना node/xyz असे नामांकीत केले जाते, आणि
(२) सदस्य - ज्यांना user/abc असे क्रमांकीत केले जाते

क्रमशः

(ब) सदस्यांमध्ये काही banned id असतात, त्या वगळता सगळ्यांचे प्रोफाईल दिसते
webmaster चे १, ajay_admin चे २, माझे २४५ वगैरे

(क) लेख प्रकारात जास्त वैविध्य आहे:
(१) साधे लेख (म्हणजे नेहमीचे, जसा हा ४०४७८ आहे)
(२) कुलुपात असलेले लेख (म्हणजे दिवाळी अंकाच्या संपादकीय मंडळाचा असतो तसा),
(३) कुलूप घातले गेलेले लेख,
(४) लेखांच्या समुहाकरता ठेवलेली खुंटी,
(५) ग्रूपमध्ये नसल्यामुळे न दिसणारे लेख (उदा. केवळ पुरुषांकरता नसलेला सम आयुक्ता)

क्रमशः

(ड) प्रत्येक लेखावर शून्य किंवा अधीक प्रतिक्रीया येतात, सदस्यांच्या. काही सदस्य एकाच लेखावर अनेक प्रतिक्रीया देतात. कधी लेखक ( also सदस्य) स्वत:च प्रतिक्रीया देतो (जसे इथे) [लेख -> सदस्य]

क्रमशः

रँडम मायबोली बटण लै भारी. धन्यवाद.

'शोध' करताही तीन पर्याय असावेत असं करता येईल का?
१. आता आहे तसा, संपूर्ण मायबोलीवरचा शोध
२. फक्त एखाद्या गृपपुरता
३. एका लेखाकरता

छानच आहे. पण 'random विचारपुस' असायची गरज नाही असे वाटले. Happy ...

इब्लिस, कविता या कविता ग्रुप मधे असतील तर सहजच करता येईल. (http://www.maayboli.com/gulmohar/marathi_kavita)

मामी, शोधासाठी टेक्स्ट-प्रोसेसींग लागेल (देवनागरी) जे सध्याच्या गोष्टींपेक्षा वेगळे आहे. पण हो, करता येऊ शकते.

सुनिधी, विपू पब्लीक असते. तुम्ही पहात नाही म्हणजे कोणीच पहात नाही असे नाही. त्यात खाजगी गोष्टी असतील तर त्या लोकांनी डिलीट करायला हरकत नाही. विपू हे मनोरंजनाचे उत्तम साधन आहे. मायबोलीतील कनेक्टिवीटी त्यातून सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारे दिसते (खोलवर असलेली). [ज्योतिष्याच्या बुवावर तर लोक जन्मवेळ्/तारीख, आईचे नाव सर्व काही राहु देतात - त्याचा सर्च करून ते पण कुठे टाकता येईल. मी बहुदा नाही करणार, पण कोण करत असेल कुणास ठाऊक? ]

(इ) प्रत्येक सदस्याचे प्रोफाईल असते. त्यात शून्य किंवा अधीक गमती असतात. [सदस्य -> इतर]

क्रमशः

(फ) सर्वात मोठे आकर्षण असते ते विपूचे - एक सदस्य दुसर्‍या सदस्याशी थेट पण उघड संपर्क साधतो.
काही सदस्य खूप विचार पूसतात, अनेक उलट पूसतात. [सदस्य -> सदस्य]

क्रमशः

(ग) काही सदस्य त्यांच्या आवडीच्या लेखखूंट्या मार्क करून ठेवतात (जास्तीत जास्त १०) [सदस्य -> लेख]

आपल्याला एखाद्या बाफ मध्ये ज्या पोस्टी नविन आल्या आहेत त्यात रस असतो
पण त्यासाठी तो बाफ उघडून 'शेवटा'वर क्लिक कराव लागतं .
खरतर नविन पोस्टी पहिल्यांदा दिसल्या पहिजेत .आणि जुन्या सन्ग्रहीत झाल्या पाहिजेत.

ही रचना जुन्या मायबोलीवर होती .नविन मायबोलीवर हा 'user experience' तितकासा बरा नाही

अस्चिग,
कविता नको म्हणजे, नविन लेखन टॅब बघतानाच अमुक टॅग वाले नोड्स नकोत असं स्पेसिफाय नाही करता येणार का?
अशा फीचर्स वालं फाफॉ वा क्रोम अ‍ॅड ऑन काढून पब्लिश केले तर मज्जा येईल.
ग्रीस मंकीत वापरता येईल असा जावा कोड देखिल कुणी लिहिला तर बरे होईल.
अजून एक स्पेसिफिक सदस्य इग्नोर बटन तयार करायला हवं.

बघू मला यदाकदाचित रिकामा वेळ मिळाला तर ट्राय करीन.