http://www.maayboli.com/node/40267 भाग पहिला
http://www.maayboli.com/node/40322 भाग दुसरा
शेवटच सेमिस्टर संपवुन समीर घरी परतला. बाहेर राहिल्यामुळे थोडा सावरला असावा. त्याच घरी येण वार्याच्या झुळुकीप्रमाणे वाटल. पपानाही थोड बर वाटल. पूर्वीसारख ते बोलू लागले.लवकरच समीरने कामाशी जूळवून घेतल. कामाचा भार हलका झाल्यामुळे मलाही थोडस सुटावल्यासारख झाल.
ठरल्याप्रमाणे समीरला डायरेक्टर बनवण्यात आल. माझ्याप्रमाणे स्वतंत्र केबिन आणि कार्यभार. समीरचा आता धोरणात्मक निर्णयातही सहभाग निश्चित झाला.महत्वाचे निर्णय तिघात वाटले गेले.सगळ काही सुनियोजित घडत होत. या निमित्ताने पपानी छोत्याश्या पार्टीच आयोजन केल. समीरच्या भविश्यातल्या चेअरमन पदाची ती नांदी होती. माझही भविष्य याचवेळी नक्की झाल. त्याच्या मित्राच्या मुलाशी माझ्या लग्नाची घोषणा केली. पपा आता थांबणार नव्हते. त्यांना आता जबाबदारीतून मोकळ व्हायच होत. त्यासाठीच धडपड चालली होती सगळी. परिस्थिती मूंळ्पदावर येण्यास सुरुवात झाली.
________________________________________________________________________________________________________-
दैवगती कधी कुणाला कळली आहे का?? पुढच्या मिनिटात काय घडेल हे आपण सांगू शकत नाही. "परधीन आहे जगती पुत्र मानवाचा या ओळी खर्या वाटू लागतात. या विश्वात आपल्यापेक्षा वरचढ आहे कोणीतरी, आपल्या नियंत्रणापेक्षा ते फार ताकदीच अस वाटू लागत.
______________________________________________________________________________________
घड्याळाचे टोले वाजले तसे मी फाईलीतून मान वर काढली. ५ वाजले होते. मीटींगची वेळ अझाली . दर वीकेंडला कामाचा आढावा घेणारी मीटींग घेण हा पपांनी घालून दिलेला शिरस्ता होता
कॉन्फरस हॉलमध्ये पोचले,तर कोणाची चाहूल नव्हती. मीच लवकर पोचले बहुदा. ह्म्म आता काय कराव. परत केबिन मध्ये जायचा कंटाळा आला. हॉल तसा प्रशस्त होता. भिंतीवरची पेण्टीग्ज पपाच्या खास आवडीची. पपा तसे चोखद्म्ळ ऑफिस असो वा घर प्रत्येक गोष्ट कलात्न्मक्तेने सजवलेली. पेनापासून ते खुर्चीपर्यत सार काही वेचून निवडलेले. त्यांची चेअरमनची खुर्ची तर खास होती. एकदम बर वाटायच तिथे बसल्यावर. बसताना काही प्रॉब्लेम होणार नाही, आरामदायी अषी ती खुर्ची . मस्तपैकी पसरुअन बसता येत असे. आताही बसून बघितल तर छान वाटल एकदम. साखरदांडे फर्मच्या चेअरमनची खुर्ची . आतून एक वेगलच फीलिंग आल. आईची आठवण झाली
तेवढ्यात पपा आणि समीर आत आले. बरोबर कुलकर्णी होतेच. मी चटकन उठले. समीर तिथे बसला . शेवटी तो त्याचाच हक्क होता. मीटींग सुरु झाली.
त्या दिवशी फार दिवसांनी घरी आम्ही तिघ एकत्र बसलो होतो. हल्ली हे क्षण दुर्मिळ झाले होते. शिळोप्याच्या गप्पा मस्त चालल्या होत्या. अशावेळी समीर माझी हमखास थट्टा करायचा॑. आताही तेच झाल. मी त्याला कृतक कोपाने रागावून घेतल. पपाही खुशीत होते. शेवटी सरुताईने घड्याळात बारा वाजल्याची आठवण करुन दिली तेव्हाच आम्ही झोपायला गेलो. त्या गडबडीत टेडीला मी समीरच्याच खोलीत विसरले
_____________________________________________________________________________________
दुसरा दिवस ऊजाडला तोच एक सुन्न बातमी घेऊन!! पपा पूर्ण कोसळले होते. समीरचा मृत्यू झाला होता. सरुताई सकाळी ऊठवायला गेली तेव्हा हाताला लागलेल थंडगार शरीर पाहून चरकली होती. धसकून तिन सगळ्यांना जाग केल. बेडवर निपचित पडलेल्या समीरला पाहून सुन्न व्हायला झाल. काहीच कळेना. सरुताईनेच धावाधाव करुन डॉक्टरांना बोलावल. पण त्याचा काही ऊपयोग नव्हता. सगळ संपल होत.
ऐन ऊमेदीतला समीर असा कोणालाच वाटल नव्हत. मी डोक गच्च धरुन बसले होते.पांढर्या चादरीवरच्या समीरच्या चेहर्याकडे पाहावत नव्हत. फार वेदना दायक मृत्यु झाला असावा. ते दुख तो त्रास चेहर्यावर स्पष्ट दिसत होता. पोस्ट मॉर्टेम मध्ये कॉज ऑफ डेथ मॅसिव्ह अॅटॅक दाखवल होत. अनाकलनीय!!!!!! पपाना हे काही सहन झाल नाही. दोन दिवस ते कोणाशीच बोलत नव्हते. विषण्ण मनाने त्यांनी समीरच क्रियाकर्म ऊरकल. पण आतून ते पूर्णत ऊध्वस्त झाले होते. वय वर्षे साठ असलेले माझे पपा अचानक एशींचे वाटू लागले. समीरचा मृत्यू हा आमच्या घरावरचा फार मोठा आघात होता. त्यातून सावरण कठीण होत.
_______________________________________________________________________________________________________
समीरच्या जाण्याने घराला एक अवकळा आली.सगळीकडे उदासपण भरुन राहिल. आम्हाला जबरदस्त झटका बसला होता. विशेषत पपांना. मनातून ते पूर्णपणे खचले होते. त्याचा परिनाम त्यांच्या शरीरावर दिसू लागला. डॉक्टरांच्या अलिकडे फेर्या वारंवार वाढल्या होत्या. यावेळी ऑफिसात कोणाचच लझ नव्हत. नेहमीची काम पार पाडत होती ईतकच. कुलकर्णी विश्वासातलेच होते. त्यांनी निभावून नेल.
_______________________________________________________________________________________________________
आजकाल पपांना झोप लवकर न येण हे नित्याचच झाल होत. ऊशिरापर्यत ते जाहे राहून विचार करत असत. अस सारख होण त्यांच्या प्रकृतीला चांगल नव्हत. आज बघितल तर ते अजूनही जागे होते. मला काही ते बर दिसल नाही. खोलीच दार ऊलटून पाहिल तर ते तसच एकटक पाहत होते.
"पपा" मी हळूवारपणे हाक मारली
लक्ष नाही दिल त्यांनी
"पपा, अजून कशाला जागे आहात, झोपा आता. डॉक्टरांनी सांगितलय ना तस" त्यांच्याजवळ जाऊन मी त्यांना थोपटत म्हटल
तंद्रीतून जाग होत त्यांनी माझ्याकडे पाहिल. डोळे भरुन आले त्यांचे.
"झोप??? ती आता काही येणार नाही. ती गेली समीरसोबत"
"एवढे निराश होऊ नका पपा. समीर कुठेही गेला नाहीये. तो आपल्या सगळ्याच्या मनात अजून आहे आणि कायमचा राहिल.टेन्शन नका घेऊ"
"हं टेन्शन?? आता कसल टेन्शन आलय?? आता तर हे जगण नको वाटत. काय करु जगून ?? टेन्शन असतात ती जगून राहणयासाठी, ईथे कोणासाठी जगू??"
"पपा, अस का बोलताय?? मी आहे ना. मी तुमची कोणीच नाही का??" माझा स्वर दुखावल्यासारख झाला.
"तू आहेस म्हणून तर मी जगलोय ना ईतके दिवस?? खरतर माझ आता कशातच लक्ष लागत नाही. हा एवढा पैसा , बिझिनेस ऊभा तरी कशासाठी हा प्रश्न पडलाय. कंटाळा आला या सर्वाचा. एकदा तुझ व्यवस्थित लग्न करुन दिल की सुटलो सगळ्यातून"
"पपा होईल हो लग्न, तुम्ही काळजी नका करु. झोपा आता"
"नाही ग!!! मला ही प्रॉपर्टी पैसा काही नको. शाप आहे या सगळ्याला!!! काही एक नको हे. ज्यासाठी स्वप्न पाहिल तो निघून गेला. उद्याच मुळे वकीलांना बोलावून घे. सगळ दान करुन टाकणार आहे मी. तुझा हिस्सा तुला दिला की सगळ काहि गंगार्पण!! तुला काही कमी पडणार नाही. सुखी राहा. " पपांचा स्वर ओलावला होता.
"आता खूप झाल बोलून. झोपा पाहू आता तुम्ही"
पपा काही न बोलता तसेच बसून राहिले. मी त्यांना थोपाटल. काही न बोलता मी बाहेर आले.
__________________________________________________________________________________________________________
पपांना रात्री दुधातून गोळ्या द्यायच्या असतात. त्यांची गोळ्या घेण्याची वेळ झाली होती.
होय, वेळ आली होती . टेडी बेअरची!! पुन्हा एकदा!! यावेळीही ते आपल काम चोख बजावणार यात कोणतीही शंका नव्हती.ममीच्या, समीरच्या वेळी ते त्यांने आपल काम व्यवस्थित पार पडल होत. कुणालाही शंका न येऊ देता.
माझ्या मार्गातले दोन्ही अडथळे टेडीमुळेच तर विनासायास दुर झाले होते.
अडथळेच!!! साखरदांडेची फ़र्म मी अशी हातातून नाही जाऊ देणार. माझ स्वप्न आहे ते. अस सहजासहजी निसटू देणार नाही. ममीला समीरला यासाठीच जाव लागल. तुम्ही ममीच्या सल्ल्याने समीरला सगळ काही द्यायला निघालात आणि मला काय तर एक छोटासा तुकडा.!!! हा न्याय नव्हे. त्या दोघांच्या जाण्याला तुम्ही जबाबदार आहात. हो तुम्हीच . कारण मला काय वाटत याची तुम्हाला कधी फिकीर नव्हती.
चेअरमनच्या खुर्चीत एक वेगळ्या प्रकारची नशा आहे. ती खुर्ची, तो मान मला हवाय. पण तुम्हाला फक्त ममी आणि समीर हवे होते. त्यापुढे काही नाही . आता तुम्ही म्हणताय की सगळ काही देऊन टाकायच?? एवढ्या वर्षाच गुडविल, पैसा एका क्षणात द्यायच?? ते ही भावनेपोटी. !!! तुमच्या दुखापायी????
नाही पपा, मला यावेळी तुमच म्हणण मान्य नाही. जे तुम्ही उपभोगल ते मला नाकारण्याचा कोणताही हक्क तुम्हाला नाही. जे मला हवय ते मी मिळवणारच.
सॉरी पपा पण तुम्हाला आता जाव लागेल. समीरच ममीच जाण व्यर्थ नको ठरायला. माझ्या मार्गातला शेवटचा अडथळा तुम्ही आहात. मला वाटल होत की समीर गेल्यानंतर तुम्ही सगळ काही मला द्याल. पण तुम्ही तर वेगळाच मार्ग धरलात. आता हा शेवटचा काटा दूर करायला हवा. नाहीतर माझ स्वप्न कस पूर्ण होणार??? तुम्हाला माहितेय तुम्ही फार चांगले आहात. पण हा चांगुलपणा माझ्या काहीच कामाचा नाही. तुमची वेळ झालीय पपा समीर आणि ममीकडे जाण्याची.
सॉरी पपा. बट यू हॅव टू गो. बाय फॉर एव्हर!!!!!
बापरे ! मस्त रंगवली आहे
बापरे ! मस्त रंगवली आहे कथा. असेच लिहीत रहावे.
धन्यवाद अनघा
धन्यवाद अनघा
ह्म्म्म... चांगली आहे. पण मला
ह्म्म्म...
चांगली आहे. पण मला पूर्णपणे उलगडा झाला नाहीये. कदाचित पुन्हा वाचावी लागेल.
पण असंच लेखन येत राहू दे.
थँक्स मनस्विता
थँक्स मनस्विता
अगदीच प्रेडीक्टेबल होती.
अगदीच प्रेडीक्टेबल होती.
ओह ---- आत्ता कळल टेडी बेअर
ओह ----
आत्ता कळल टेडी बेअर
मस्त
टेडीने हे कसे केले ते नाही
टेडीने हे कसे केले ते नाही कळले
सस्मित धन्यवाद रायबागान आणि
सस्मित धन्यवाद
रायबागान आणि नियती
थँक्स:-)
वाव सही
वाव सही
नियती, >> टेडीने हे कसे केले
नियती,
>> टेडीने हे कसे केले ते नाही कळले
त्यासाठी कृपया इथे पहा (इंग्रजी दुवा).
आ.न.,
-गा.पै.
अनुकूल थँक्स गामा पैलवान
अनुकूल थँक्स
गामा पैलवान धन्यवाद:)
मलाही टेडीनी नक्कि काय केलं
मलाही टेडीनी नक्कि काय केलं कळालं नव्हतं.
गामा पैलवान धन्यवाद:)
चौकट राजा थॅक्स
चौकट राजा थॅक्स
छान आहे कथा.
छान आहे कथा.
थँक्स कंसराज
थँक्स कंसराज
जाई.साहित्ययात्री, कथावस्तू
जाई.साहित्ययात्री, कथावस्तू चांगली आहे. नायिका एव्हढी कठोर होऊ शकते याचं मात्र नवल वाटलं.
आ.न.,
-गा.पै.
@ गा.पै.: परवाच क्राईम
@ गा.पै.: परवाच क्राईम पॅट्रोल मध्ये पंजाबची एक केस दाखवली त्यात एक मुलगी आपल्या प्रेमासाठी पूर्ण कुटुंबाला (आई-वडील आणि भाऊ) मारण्याची सुपारी देते. त्यामुळे असंही क्रौर्य असू शकतं.
धन्स गा पै... मलाही कळलं
धन्स गा पै...
मलाही कळलं नव्हतं टेडी कसा काय मारतो ते.. आधी तो टेडी तात्या विंचु टाइप आहे की काय वाटलेलं
गामा पैलवान धन्यवाद कदाचित
गामा पैलवान धन्यवाद
कदाचित तुम्हाला नायिका क्रूर दाखवल्याने नवल वाटल असाव
मुळात सत्ता अधिकार पैसा यांच्या हव्यासापोटी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो
त्यात स्री पुरुष असा भेद मला मान्य नाही
सोयराबाईँच आनंदीबाईच ऊदाहरण आहे
मनस्विता थँक्स
चिमुरी थँक्स
ही कथा लिहीताना टेडी नक्की काय करतो याच गुढ ठेवाव हे नक्की केल होतं
त्यामुळेच ते बिटविन द लाइन ठेवल
जाई, ते गुढ शेवटी उकलायला हवे
जाई, ते गुढ शेवटी उकलायला हवे होते. गापै नी लिन्क दिली तेव्हा कळले, प्रत्येकाला हे माहित नसते.
नियती अग माझ्यावर रत्नाकर
नियती अग माझ्यावर रत्नाकर मतकरीँच्या गूढकथांचा प्रभाव आहे थोडासा
त्यामुळे मी तस ठेवलं
प्रतिसादाबद्दल थँक्स
अजुन रंगवता आली असती. अंतिम
अजुन रंगवता आली असती. अंतिम भागात मसाला थोडा कमी वाटला.
जमेश...
पु.ले.शु...............
तृष्णा थँक्स
तृष्णा थँक्स
मलाही नीटसं कळलं नव्हतं टेडी
मलाही नीटसं कळलं नव्हतं टेडी प्रकरण.. गा पै धन्स..
मस्त कथा..
मला वाटलं होतं त्यापेक्षा
मला वाटलं होतं त्यापेक्षा गोष्ट फारच लवकर संपली की. मला वेगळाच ट्विस्ट अपेक्षित होता. त्यामुळे माझा माझा माझ्यापुरता अपेक्षाभंग.
जाई, टेडीमुळे नक्की कसं मरण येत होतं हे कळलं तरच कथा पूर्ण होईल. टेडी मारत असेल तर ते अमानवीय / भूतांच्या गोष्टीत येईल. टेडीत काही घातक द्रव्य ठेऊन मारण्यात येत असेल तर ती एक डिटेक्टिव कथा म्हणून पुढे नेता येईल.
कथा जरा घाईघाईत संपली असं वाटलं आणि त्यामुळे कथेचं उद्दिष्ट पूर्ण झालं नाही असं वाटलं.
मामी +१
मामी +१
जाई, टेडीमुळे नक्की कसं मरण
जाई, टेडीमुळे नक्की कसं मरण येत होतं हे कळलं तरच कथा पूर्ण होईल. टेडी मारत असेल तर ते अमानवीय / भूतांच्या गोष्टीत येईल. >> हेच लिहणार होते...
टेडी ने मारले म्हणजेच तिने स्वतः मारले असे आहे का?
ही कथा लिहीताना टेडी नक्की काय करतो याच गुढ ठेवाव हे नक्की केल होतं > पण त्यामुळे कथा मधेच संपल्यासारखी वाटते.कोणतीही गूढ कथा वाचताना वाचक तर्क लावत जातात म्हणून शेवटी रहस्याचा भेद करणे आवश्यक आहे असे मला वाटते.
दिपू धन्स मामे थँक्स पुढची
दिपू धन्स
मामे थँक्स पुढची गोष्ट लिहिताना लक्षात ठेवेन
सामी थँक्स
गामा ने दिलेली लिंक आमच्या
गामा ने दिलेली लिंक आमच्या नेट वर उघडत नाहिये... बॅन आहे.... नक्की काय केलं टेडीने?
हम्म्म... आधी अंदाज आलाच
हम्म्म... आधी अंदाज आलाच होता... तसंच निघालं!
तरीही छान झाली आहे!
पुलेशु!
Pages