Submitted by सुप्रिया जाधव. on 10 January, 2013 - 05:51
संभ्रमांचे घोट गेले पीत मी
आज आले नेमकी शुद्धीत मी
'त्या' क्षणाला होय की नाही म्हणू?
प्रश्न गहिरा, अडकले कात्रीत मी
लाजण्याचा अर्थ तू समजून घे
पाळते अवघ्या जगाची रीत मी !
याचसाठी हात मी धरला तुझा
बदलले असते जरा भाकीत मी
'मृगजळाचा ध्यास हा नाही बरा'
विसरले !... होते जरी घोकीत मी
एकदाची सापडू दे मी मला
हरवले आहे पुन्हा गर्दीत मी
प्रेयसी, पत्नी, सखी की 'निर्भया'
नेमकाली कोणत्या यादीत मी ?
-सुप्रिया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बहोत खूब!
बहोत खूब!
संभ्रमांचे घोट गेले पीत मी आज
संभ्रमांचे घोट गेले पीत मी
आज आले नेमकी शुद्धीत मी
याचसाठी हात मी धरला तुझा
बदलले असते जरा भाकीत मी<< वा वा, सुंदर, मतला फार मस्त आहे.
एकदाची सापडू दे मी मला<<< मस्त मिसरा
प्रेयसी, पत्नी, सखी की 'निर्भया'<<< मिसरा आवडला.
गझल आवडली. धन्यवाद!
ज्जे ब्बात सुप्रीया... मजा आ
ज्जे ब्बात सुप्रीया... मजा आ गया ....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ज्जे ब्बात सुप्रीया... मजा आ
ज्जे ब्बात सुप्रीया... मजा आ गया ....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त पण शेवटच्या शेरातला
मस्त
पण शेवटच्या शेरातला नेमकाली हा शब्द खटकतोय... हेमावैम.
वाह! फार सुंदर!
वाह! फार सुंदर!
व्वा! फारच सुंदर!
व्वा! फारच सुंदर!
सुंदर!
सुंदर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
याचसाठी हात मी धरला
याचसाठी हात मी धरला तुझा
बदलले असते जरा भाकीत मी>>> उत्तम शेर
एकदाची सापडू दे मी मला
हरवले आहे पुन्हा गर्दीत मी>>> पहिला मिसरा उत्कृष्ट, दुसर्या मिसर्याने शेराची उंची कमी केली.
मतला छान, पण नुसते वर्णनापेक्षा अधिक काही असायला हवे होते असे वाटले.
गैरसमज नसावा. प्रतिसादाच्या लांबीवरून दुसरा एखादा धागा निर्माण व्हायच्या आत थांबतो![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
विदिपा... सगळ्या
विदिपा...:-)
सगळ्या प्रतिसादकांचे मनःपुर्वक आभार!
प्रतिसादाच्या लांबीवरून दुसरा
प्रतिसादाच्या लांबीवरून दुसरा एखादा धागा निर्माण व्हायच्या आत थांबतो <<<![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आहाहा! प्रत्येक शेराला
आहाहा!![talya.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37993/talya.gif)
प्रत्येक शेराला
याचसाठी हात मी धरला
याचसाठी हात मी धरला तुझा
बदलले असते जरा भाकीत मी..........व्वा..
आवडली विजयरावांशी सहमत
आवडली
विजयरावांशी सहमत
मस्त गझल. मस्त मतला!
मस्त गझल. मस्त मतला!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप आवडली (तरहीच म्हणतात ना
खूप आवडली (तरहीच म्हणतात ना ही ? ) -तशी कठीण होती तरी अगदी नेमक्या शब्दात आलीय !
बहोत खुब
बहोत खुब
सुप्रियाताई, छान आहे
सुप्रियाताई, छान आहे गझल.
भाकितचा शेर आवडला. शेवटाच्या शेरातली पहिली ओळ मस्त. द्उसर्या ओळीत नेमकाली शब्द कळला नाही. तो सोडला तर तो शेर पण भारी.
बहोतही ज्यादा खूब... वाह! भा
बहोतही ज्यादा खूब... वाह! भा गयी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<<<एकदाची सापडू दे मी
<<<एकदाची सापडू दे मी मला
हरवले आहे पुन्हा गर्दीत मी>>> पहिला मिसरा उत्कृष्ट, दुसर्या मिसर्याने शेराची उंची कमी केली.>>>>
उंची वाढवण्याचा प्रयत्न केलाय विदिपा... बघा जमलाय का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<<<खूप आवडली (तरहीच म्हणतात ना ही ? ) -तशी कठीण होती तरी अगदी नेमक्या शब्दात आलीय !>>>
हो तरहीच आहे ही.... 'आज आले नेमकी शुद्धीत मी' ....'आहे' च्या ऐवजी 'आले' वापरल्याने 'तरही' असे लिहीले नाही भारतीताई![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद!
नविन प्रतिसादकांचे आभार.
-सुप्रिया.
सुप्रिया.. जियो...
सुप्रिया.. जियो...
खूप खूप मस्त प्रत्येक शेर
खूप खूप मस्त
प्रत्येक शेर आवडला
भाकीत , तंद्रीत ,यादीत हे जरा जास्त आवडले!!
गझल छान! मतला विशेष. भाकीत ,
गझल छान!
मतला विशेष. भाकीत , रीत सुंदर.
.. पुलेशु!
आता दिसत असलेला बदलही आवडला
आता दिसत असलेला बदलही आवडला
माझे प्रतिसाद जास्तच अघळ्पघळ
माझे प्रतिसाद जास्तच अघळ्पघळ झाल्याने संपादित केलेत
क्षमस्व
धन्यवाद मंडळी.
धन्यवाद मंडळी.
एकदाची सापडू दे मी मला हरवले
एकदाची सापडू दे मी मला
हरवले आहे तुझ्या तंद्रीत मी >> किती छान ..सुरेख रचना !
संभ्रमांचे घोट गेले पीत मी आज
संभ्रमांचे घोट गेले पीत मी
आज आले नेमकी शुद्धीत मी
मस्त मतला..
लाजण्याचा अर्थ तू समजून घे
पाळते अवघ्या जगाची रीत मी !
सुंदर...
गझल सुरेख झाली आहे...शुभेच्छा..
छान गझल. आवडली
छान गझल. आवडली
धन्यवाद!
धन्यवाद!
Pages