भाग पहिला http://www.maayboli.com/node/40267
सरुताईपाठोपाठ समीर आत आला. मूळचाच देखणा असा तो अधिकच छान दिसत होता. डोळे पाणावलेलेच होते. नुकताच रडला असावा. शेवटी ममी त्याच्या सख्या आई होत्या. दुख वाटण साहजिकच होत. तो समोर येताच आम्ही तिघेही व्याकूळ झालो. ममी सावत्र असल्या तरी त्यांनी आईची जागा घेतली होती.ताण सहन न झाल्यामुळेच रात्री अक्षरश मी थकले होते.पपांनी आम्हाला हळूवार पणे थोपाटल. आम्ही तिघेही हॉलमध्ये आलो. ममीचा मोठा फोटो तिथे लावण्यात आला होता. त्या फोटोवरचा हार पाहून समीर कोसळलाच. पपांनाही गदगदून आलं. त्यांना सावरण्याची जबाबदारी आता माझी होती.
ममीचे दिवस झाले. आता रुटीन सुरु झाल. एवढे दिवस येण्यार्या जाण्यार्या माणसांनी घर गजबजून गेल होतं. आता जरा मोकंळा श्वास घेता आला. पपा आता थकून गेले होते. समीरला आता शेवटच्या वर्षाच्या सबमिशनसाठी परत जाण भाग होत. पण पपा एकेचनात. त्यांना आता हे सहन होत नव्हत. लवकरात लवकर त्याच्यावर जबाबदारी सोपवून मोकळ व्हाव ही ईच्छा मनाशी प्रबळ होत होती. त्यात नातेवाईकापैकी एकाने दीपालीच्या लग्नाच आता लवकरात लवकर पाहायला हव अस आडून सुचवल्यामुळे ते अधिकच अस्वस्थ झाले होते.शेवटी समीरन सबमिशन करुन लवकरात लवकर भारतात परतायच अस ठरल. रिझल्टचीही तो वाट पाहणार नव्हता. मूळचाच हुशार होता तो. फर्मच्या नव्या प्रोजेक्टसची जबाबदारी त्याच्यावरच येणर होती. शेवटी तो मुलगा होता. भावी वारसदार!! पपांनी तस ठरवलच होत मनाशीच या दिवसांत.
तेच पेपर्स आता चाळत होते. मुळ्यांच काम अगदी परफेक्ट असत. अजिबात लूपहोल्स नाहीत
"काय बघतेस" पपांनी आत विचारल.
"पेपर्स बघतेय, मुळ्यांनी तयार केलेले"
"आपण ठरवल्याप्रमाणेच केलय ना?? मुळ्यांचा तसा काही प्रश्न नाही म्हणा"
"हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आहे सगळ" पेपर्सकडे पाहत उत्तर दिलं
"एकदा समीरला सगळ सोपवल की मी सुटलो, तसा तो हुशार आहेच अनुभवाने परिपक्व होईलच. त्यात तूही आहेच मदतीला. तुम्हा दोघावरच आहे सगळी जबाबदारी आता फर्मची " पपांनी शांतपणे म्हटल.
मी पपाकडे पाहिल. एक प्रकारचा निवांतपणा चेहर्यावर रेंगाळत होता. ममीच्या मृत्यूनंतर सावरण जमू लागल असाव.
"तुम्हाला झोपायच नाही का?? बरीच रात्र झालीय "
"अरे हो, जास्त वेळ जागायला नको. झोपल पाहिजे आता निघतो. तु सुध्दा झोप लवकर. गुड नाईट"
पपा बाहेर पडताच मी ही आवराआवर केली. टेबलावरच टेडी पडल होत . मी त्याच्याकडे पाहून सुस्कारा सोडला.
#########################################################################
समीर गेला तस मला अधिकच एकट वाटू लागल. पपा असले तरी ते आपल्याच धुंदीत असत. त्यांना आता माझ्या लग्नाचीच चिंता पडली होती. त्याच खटपटीत ते असत. मी आता ऑफिसात जायला सुरुवात होती. पपा जास्त वेळ घरीच असत. महत्वाच असल तरी तरच ऑफिसात चक्कर मारत. ते नियमित ऑफिसात येत नसल्याने कामाचा पूर्ण माझ्यावर पडे. कामाचा हा बोजा त्रासदायक असला तरी एकीकडे सुखावून जात होता.
त्या दिवशी प्रचंड काम होत. खूप थकायला झाल. नवीन बिझिनेस सुरु करायचा म्हटल कि मेहनत आलीच. समीर यायच्या आत सगळ आटपायला हव होत. थकवा घेऊनच मी घरी आले. पपा झोपलेलेच होते. मी सुध्दा जेवून बेडवर लवंडले. पण थकवा असूनही डोळे मिटेनात. थोड वाचून पाहिल तरीही. शेवटी थोड फिरुन पाहू म्हणून हॉलमध्ये आले.हॉलला लागूनच पपांची बेडरुम होती. दार लोटून पाहिल तर पपा गाढ झोपी गेले होते.मी आत गेले. ममींचा मोठा फोटो समोरच लावला होता. जवळच माझ आवडत टेडी बेअर पडल होत.ममी जायच्या दिवशी मी आणि ममी गप्पा मारत बसलो होतो. तेव्हापासून ते तिथेच पडले होत. माझ आवड्त टेडी. लहानपणापासूनच. आईने गिफ्ट दिलेल. आठवणी असलेल. अगदी हॉस्टेलवर मी त्याला घेऊन गेले होते. कधी झोप आली नाही तर त्यालाच बाजूला ठेवून मी झोपायचे. टेडीला उचलून मी ममीच्या फोटोकडे पाहिल. ममीच वय झाल असल तरी त्या म्हातार्या नव्हत्या. गौर वर्ण त्यात सुखवस्तूपणा लाभल्याने एक प्रकारच तेज होत. बांधाही सुदृढ होता. पंचावन पार केल तरी त्या चाळीशीच्या वाटत. वयपरत्वे त्यांना तसा आजारही नव्हाता. त्याचं अस एकाएकी जाण धक्कादायक होत.हार्ट अॅटॅकने त्यांना मृत्यू येईल अस त्यांना स्वप्नातही वाटल नसेल. पहिलाच अॅटॅक तोही मॅसिव्ह!!!!!! मरताना त्यांना खूपच त्रास झाला असावा. चेहर्यावरच्या वेदना याल साक्षी होत्या. रात्रभर कोणालाच काही कळल नाही. पपाही बाहेर गेले होते त्यादिवशी. सकाळी उलगडा झाला या सगळ्याचा.
ममीच्या फोटोकडे पाहून ते सार आठवल. डोळे मिटून घेतले मी लगेच. एकवार पपांकडे पाहिल. झटकन त्या टेडीसकट मी बाहेर पडले. माझ्या खोलीत येताच लोटून दिल स्वतला. पाचच मिनिटात झोप लागली शांत.
क्रमश
भाग पहिला
भाग पहिला http://www.maayboli.com/node/40267
वाचतेय. जरा मोठे भाग टाक की
वाचतेय. जरा मोठे भाग टाक की गं.
अरे वा, रहस्य कथा दिसतेय.
अरे वा, रहस्य कथा दिसतेय.
वाचतेय. जरा मोठे भाग टाक की
वाचतेय. जरा मोठे भाग टाक की गं. >>>>
धन्स मामी. टायपायचा कंटाळा येतो आणि आळशीपणा थोडास
(No subject)
थॅक्स साती
थॅक्स साती
छान वाटतंय. सस्पेन्स वाढत
छान वाटतंय. सस्पेन्स वाढत चाललाय.
थॅक्यू भारतीताई
थॅक्यू भारतीताई
ए मला अंदाज आलाय्सा वाटतोय..
ए मला अंदाज आलाय्सा वाटतोय.. कथा संपली की बघू बरोबर निघतो का ते
हं मलाही अंदाज आलाय. बघूयात.
हं मलाही अंदाज आलाय. बघूयात.
ए मला अंदाज आलाय्सा वाटतोय..
ए मला अंदाज आलाय्सा वाटतोय.. कथा संपली की बघू बरोबर निघतो का ते>>>>> धन्स जाईजुई
हं मलाही अंदाज आलाय. बघूयात.>>>>>
जरा मोठे भाग टाक .
जरा मोठे भाग टाक .
मस्त गो. पण जरा न्हाय वायच
मस्त गो. पण जरा न्हाय वायच मोठेच भाग टाक. ह्या काय..सुरु केला नाय तोवर सोपला वाचुन ..:(
tejas13, प्रीमो धन्स
tejas13, प्रीमो धन्स
छानचं.
छानचं.
धन्यवाद तृष्णा
धन्यवाद तृष्णा
चांगली चालली आहे कथा. थोडे
चांगली चालली आहे कथा. थोडे मोठे भाग टाकाहो जाई
अनघा धन्स!!!
अनघा धन्स!!!
मस्त सुरु आहे, पण खरच् मोठे
मस्त सुरु आहे, पण खरच् मोठे भाग टाक.
साधारण अंदाज आला , बघु खरा ठरतोय का.
छान चालली आहे कथा.
छान चालली आहे कथा.
रिमझिम , विद्याक थॅक्स मस्त
रिमझिम , विद्याक थॅक्स
मस्त सुरु आहे, पण खरच् मोठे भाग टाक.>>>>>>>>>>>>> नक्की पुढचा भाग मोठा टाकेन.
व्वा खूप छान चाललीये कथा ...
व्वा खूप छान चाललीये कथा ... पुढच्या मोठ्या भागाच्या प्रतीक्षेत
छान लिहलंय. दोन्ही भाग आत्ता
छान लिहलंय. दोन्ही भाग आत्ता एकदमच वाचून काढले.
स्नेहनिल आणि किसन शिँदे
स्नेहनिल आणि किसन शिँदे धन्यवाद