आपल्या लहान मुलाला घेऊन तुम्ही आणि तुमची बायको बाहेर फिरायला जाता.. समजा, बाजारात जाता.. (किंवा कुठेही, त्याने काही फरक पडत नाही म्हणा!) आणि तिथे एक फुगेवाला दिसतो. वेगवेगळ्या आकारांचे, रंगांचे सुंदर फुगे ! साहजिकच लहानगा/गी फुग्याचा हट्ट करतो/ते.. किंवा न करताही तुम्ही एक छानपैकी वेगवेगळ्या रंगांचा मोठा फुगा घेता. फुगा घेऊन घरी येता आणि खेळता खेळता 'फट्ट'दिशी फुगा फुटतो ! का फुटतो ? कळतच नाही ! तुमचं मूल, तुम्ही आणि तुमची बायको एकमेकांकडे बुचकळ्यात पडल्यागत पाहाता, क्षणभरच.. आणि मग भोकाड..............! फुगा फुटला कसा ? हा प्रश्न बाजूला राहातो आणि आता मुलाला/ मुलीला आवरू कसा ? हा प्रश्न पडतो..! रामबाण उपाय..... 'आपण उद्या अजून एक फुगा आणू या, ठीकेय ?' कसंबसं मूल शांत.
असंच काहीसं मी, माझी बायको आणि माझ्यातलाच 'मी' बाळ ह्यांचं झालं.. 'मटरू...' बघितल्यावर. फुगा रंगीत होता... मोठ्ठा होता... छान होता... पण तिच्या मारी.. फुटला ! आणि का फुटला, तेही कळलं नाही.. आता मीच मला समजावतोय, 'पुढच्या आठवड्यात अजून एक सिनेमा पाहू या, ठीकेय ?' कसाबसा 'मी' शांत !
तर हा फुगा असा आहे/ होता..
हरियाणातील एक शेतकरीबहुल गाव... 'मंडोला'. गावाचं नाव, गावातला पिढीजात अब्जाधीश/ खर्वाधीश 'हरी मंडोला' (पंकज कपूर) च्या आडनावावरून असतं. हा मंडोला म्हणजे एक नंबरचा पक्का 'पेताड' असतो. म्हणजे त्याला पिणं सुरू करणं माहित असतं, थांबणं माहित नसतं. शुद्धीत असताना मिस्टर मंडोला किंवा हरी (harry) असणारा हा पीवट प्यायल्यावर 'हरिया' बनत असतो. शुद्धीतला मंडोला पक्का बिझिनेसमन असतो. त्याला फायदा, पैसा, सत्ता, धंदा, ई. पुढे आणि शिवाय काही दिसत नसतं आणि टुन्न 'हरिया' कधी काय करेल ह्याचा नेम नसतो.. स्वत:च्याच विरोधात मोर्चा काढतो.. दारूचे दुकान लिमोझिन घुसवून फोडतो.. काहीही, अगदी काहीही ! गावातलाच एक तरुण 'मटरू' (इम्रान खान) मंडोलाकडे कामाला असतो. मटरु दिल्लीला शिकलेला असतो, शिक्षणासाठी त्याने मंडोलाकडूनच कर्ज घेतलं असतं पण शिक्षण झाल्यावर त्याचं शहरात मन रमत नाही म्हणून तो गावात परततो आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी मंडोलाकडे काम करायला लागतो. त्याचा ड्रायव्हर आणि केअर टेकर म्हणून. मंडोलाची बिनधास्त मुलगी बिजली (अनुष्का शर्मा) आणि मटरु लहानपणापासूनचे मित्र असतात. व्यावसायिक फायद्यासाठी बिजलीचं लग्न, स्थानिक राजकारणी चौधरी देवी (शबाना आझमी)चा बावळा मुलगा बादल (आर्य बब्बर) शी नक्की केलेलं असतं. गावातल्या शेतकऱ्यांच्या जमीनी हडप करून तिथे एक मोठा मोटार कारखाना करायचं मंडोलाचं स्वप्न, त्यात चौधरी देवीचं सशर्त सहकार्य, मटरुचा मंडोलावरील राग व त्याचं खरं 'माओ'वादी रूप, बिजली-बादलचं नकली प्रेम, अश्या सर्व प्रवासांतून ही कहाणी एका 'प्रेडिक्टेबल' सुखाच्या शेवटाला पोहोचते आणि सगळे कलाकार फेर धरून नाचतात.
चित्रपटाच्या काही भागांत पथनाट्याची झाक दिसते. एका गंभीर विषयाची जराशी वेगळी हाताळणी असल्याने सिनेमा बऱ्यापैकी आवडतो. पण मांडणी काही वेळा जराशी विस्कळीत वाटते.
गुलजारच्या शब्दांपेक्षा विशाल भारद्वाजचं संगीत खूपच उजवं आणि संवादही खुसखुशीत वाटतात.
पंकज कपूरने तोंडातल्या तोंडात हरयाणवीत पुटपुटलेले बरेच संवाद कळत नाहीत.
अनुष्का शर्मा पुन्हा एकदा छाप सोडते. तिचा पडद्यावरील वावर खूप सहज आहे.
इम्रान खान 'मटरु' दिसण्यासाठी त्याला भरगच्च दाढी असणं आवश्यक होतंच. पण त्या दाढीवरून जेव्हा अनुष्का शर्मा त्याला 'कीस' करते, तेव्हा तिची केवळ दया येते.. इंडस्ट्रीत स्थान बनवण्यासाठी काय काय करावं लागतं !
शबाना आझमी लौकिकास साजेसं काम करते आणि आर्य बब्बर बाप-लैकिकास.
'गुलाबो' ब्रांड ची दारू पिणाऱ्या मंडोलाला, दारू एकदम बंद केल्यानंतर दिसणारी गुलाबी म्हैस गंमतीदार आहे.
- पण फुगा का फुटला, ह्याचं कारण मला अजूनही मिळालं नाहीये. असो.. फुटला, तर फुटला.. पण जितका वेळ खेळलो, तितका वेळ मजा आली, एव्हढं मात्र नक्कीच !
रेटिंग - * * १/२
अॅडमिन, गेले काही रिव्ह्युज
अॅडमिन,
गेले काही रिव्ह्युज पहाता अॅडमिन नी चित्रपट बीबी वर कायमची वॉर्निंग चिकटवावी, 'स्टोरी' किंवा स्पस्पेन्स' लिहायचे असल्यास स्पॉयलर अॅलर्ट 'देउन सस्पेन्स फोडणे, निदान टायटल मधे स्टोरी कळु नये इतपत तारतम्यही काही लोक बाळगतान दिसत नाहीयेत.. ते तरी बाळगावे इ. बेसिक नियमावली देता येइल का अॅडमिन कडून ?
नाही तर हे असे रिव्ह्युज पडणं काही थांबणार नाही !
रसप तुमचे रिव्ह्यूज आताशा
रसप तुमचे रिव्ह्यूज आताशा सिनिकल होत आहेत सबब मी ते वाचण्याचे थाम्बवत आहे. धन्यचवाद.......
१. चित्रपटाचे शीर्षकच लेखाचे
१. चित्रपटाचे शीर्षकच लेखाचे शीर्षक म्हणून देणे, इतर काहीही न देणे; हे माझ्या मते कल्पकता नसणे आहे. आणि लेखाच्या ट्विस्टेड शीर्षकातून निर्माण होणार्या - फुटकळ व किरकोळ का होईना - गंमतीला समजू न शकणे हा सुद्धा माझ्या मते त्यातलाच भाग.
२. परीक्षण वाचून - तेही माझ्या सारख्या अजाण लेखकाचे - जर कुणी ठरवत असेल की सिनेमा पाहायचा की नाही, तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी मला सिनेमा पाहून जे वाटलं ते स्पष्ट व प्रामाणिकपणे लिहित असतो फक्त.
३. मी कधीच कुठल्याही सिनेमाचा 'सस्पेन्स' फोडत नाही, फोडला नाही. असमंजस लोकांनी नको तिथे, नको तितका कीस पाडून फोडाफोडी केल्यास मी काही करू शकत नाही.
बाकी ज्याचे त्याचे मत आणि ज्याची त्याची मर्जी ! वाचा, चावा किंवा इग्नोअर मारा ! तरी शक्यतो अधिकाधिक लोकांच्या पसंतीस उतरेल असं लिहिण्याचा प्रयत्न करीन..... शिकतो आहे सुधारणाही करीन.
धन्यवाद !
काल हा चित्रपट बघितला.
काल हा चित्रपट बघितला. 'अध्धा' पर्यंत बराच ठीक होता, नंतर कुठच्याकुठे गेला. वि.भा. कडुन जास्त अपेक्षा ठेवुन बघितल्याने असेल. काही सीनही उगाचच वाटले. यावर बर्याच लोकांनी चित्रपट बघुन झाल्यावर बोलुयात.
पंकज कपुर, शबाना आझमी मस्तच. अनुष्काचेही काम छान झालेय. मटरुमात्र तितकासा आवडला नाही. त्याचे कॅरेक्टर नीटसे उभे रहात नाही. हरयानवी बोलीतले डायलॉग काही वेळा नीटसे कळत नाहीत.
हरयानाबद्दल एक गाणे आहे,लोकसंगीत असावे ते ऐकुन छान वाटले. अन्यथा हल्ली ते राज्य फार बदनाम झाले आहे.
वीकेंडला १५०-२००रु बघण्याइतका भारी वाटला नाही. मॉर्निग शो टाकायला हरकत नाही.
< तरी शक्यतो अधिकाधिक
< तरी शक्यतो अधिकाधिक लोकांच्या पसंतीस उतरेल असं लिहिण्याचा प्रयत्न करीन..... >
मागे मी, "लोकांना आवडेल असे परीक्षण लिहिण्यासाठी चित्रपट पाहता का?" असे विचारले होते. केवळ त्यासाठी चित्रपट पाहायला माझी काहीच हरकत नाही. (आसली तरी विचारतो कोण? चित्रपट पाहताना त्यातली मजा घेता की परीक्षणात या-याबद्दल काय खुमासदार, चुरचुरीत वाक्य लिहिता येईल याचा विचार करता? परीक्षणाचे लेखन डोक्यात केव्हा सुरू होते? चित्रपट पाहताना की पाहून संपल्यावर? (कशालाही आक्षेप नाही. पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना)
लोक प्रवासाला का जातात? याचे उत्तर प्रवासवर्णन लिहिण्यासाठी असेही असू शकते याची मला पूर्ण कल्पना आहे. but is it possible they might be missing something?
.
.
मला स्वताला सिनेमाची पोस्टर्स
मला स्वताला सिनेमाची पोस्टर्स जी काही मी बघतेय त्या वरून बघावासा वाटत नाहीये . त्यातून नाव पण " मटरुकी बिजली का मंडोला " अरारारारा तसही एका दोघांनी शिफारीश केली नावावर जाऊ नको . मस्त आहे बघच तर बघिनही
इथे शीर्षकात सस्पेन्स फोडला
इथे शीर्षकात सस्पेन्स फोडला आहे असे मला तरी काही वाटत नाही.... पण जेंव्हा "चिकवा" मध्ये एखाद्या पोस्टीत न लिहता लिहण्यासाठी वेगळा धागा काढला जातो तेंव्हा अधिक विस्तारित, सर्वांगाने रसग्रहण करणारे काहितरी वाचायला मिळेल अशी अपेक्षा असते. (काही वर्षापूर्वी मटात येणारी मुकेश माचकरांची चित्रपट परीक्षणे मस्त असत)
बाकी इथले परीक्षण वाचून चित्रपट बघणे मी "धोबीघाट" नंतर सोडले आहे
रणजित, वर बराच उहापोह वाचला,
रणजित,
वर बराच उहापोह वाचला, मी माझी काही मते देतो,
१. कुठलेही परीक्षण्/समीक्षण लिहीण्याकरीताचा आवश्यक असणारा त्रयस्थपणा अंगी बाणवायला हवा
लिहीणार्याने. परीक्षण वाचकाला कधीही फक्त चुका काढण्याच्या दृष्टीने लिहील्यागत वाटू नये. सिनेमा बनवणे
ही फार अवघड/ जिकीरीची गोष्ट आहे. त्यामुळे लिहीलेल्या प्रत्येक गोष्टीतून केवळ नकारात्मकता प्रतित होऊ
देऊ नये. अगदी रद्दड(कथेच्या दृष्टीने) सिनेमातही काही बाबी खूप चांगल्या असतात.
२. आपणास आवडलेली/ न आवडलेली गोष्ट त्या त्या क्षेत्रातल्या बेंच मार्कींगच्या कुठे आहे हेही नमूद करावे.
३. परीक्षणाचे शीर्षक काय असावे ह्यावर लिहीणार्याने विचार करावा. शीर्षकही आवडले नाही असे वाचकाला
म्हणण्याचा हक्क असला तरी ते चांगले/योग्य नाही असे काही नसते.
४. कुठल्याही परीक्षणावरून कलाकृती अनुभवायची की नाही हे ठरवायच्या आधी 'ऐकावे जनाचे करावे मनाचे' ही
म्हण आठवावी.
५. लिहीणार्यावर टीका करणार्यांनी कसे असले असते तर योग्य वाटले असते ते सोदाहरण स्पष्ट केल्यास उत्तम.
(जे वर काही लोकांनी केलेले आहेच)
हा सिनेमा कशासाठी पहावा, आणि कशासाठी पाहू नये असे ढोबळ काही शेवटी लिहीता आले तर पहावे.
जसे, अनुष्का, शबाना आणि पंकज ह्यांच्या अभिनयासाठी पहावा वगैरे....
धन्यवाद!
not a bad movie. close to
not a bad movie. close to black comedy,
इथे शीर्षकात सस्पेन्स फोडला
इथे शीर्षकात सस्पेन्स फोडला आहे असे मला तरी काही वाटत नाही....
>>
अनुमोदन!
बाकी या सिनेमात कोणाला तरी काही तरी सस्पेन्स वाटला आणि तो टिकून रहावा असं वाटलं तेच खुप आहे
रच्याकन मला वाटतं अशी परिक्षण वाचूनच त्या चित्रपटाकडून किती अपेक्षा ठेवाव्यात याबद्दल मत तयार होतं
जस जतहैजा ला रसपने इतक्या शिव्या घातलेल्या की मी त्या सिनेमाकडून शुन्य अपेक्षा ठेवून तो पाहिला
आणि मग त्या मनाने मला तो आवडला ( म्हणजे इतकाही काही वाईट नव्हता बर का अशी प्रतिक्रिया उमटली)
तसचं तलाश बाबात... रसपने लिहिलेलं की ठिक आहे त्यामुळे मला तो सिनेमा जरा तरी चांगला असेल अशी अपेक्षा होती जी फारच फोल ठरली, त्यामुळे तो अजिबातच आवडला नाही.
शेवटी परिक्षण वाचावं की नाही हा आपला निर्णय असतो.. मला नाही वाटत रणजीतकडून काही चुक होतेय ( शिर्षकात किंवा परिक्षण लेखनातही)
अगदिच अवांतर - माझ्या लेकाने
अगदिच अवांतर - माझ्या लेकाने (पूर्णतः सिडनीत वाढलेला...), मूव्हीचं नाव, 'मातृकी बिजली का मन डोला' असं मला सांगितलं. त्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थंही विचारला. मी जी भंजाळले, ती भंजाळलेच.
अतिशय नम्रपणे त्याने मग मूव्ही "आई" वगैरे बद्दल असणार असं सांगितलं. वर आणखी विशाल भारद्वाजचं म्युझिक आणि "तुझ्या गुलजारचं" (हो! "माझ्या गुलजारचं"!) लिरिक्स आहेत वगैरे सांगुन मला भुलवलं होतं.
शेवटी तूनळीवर त्यातली गाणी "बघून" (त्याला हिंदी शब्दं सगळेच कळतात असं नाही.... हे आलंच असेल लक्षात)... आई, do you think I should watch this with you?... इथपर्यंत आला, तो.
ते मातृ नसून मटरू आहे हे समजायला आम्हाला दोनेक आठवडे लागले
आणि तो पिन्क बुल नसून ती गुलाबी म्हैस आहे हे मात्रं मी त्याला लग्गेच सांगितलं.
दाद, सहमत. मला पण प्रमो चालू
दाद, सहमत. मला पण प्रमो चालू होईपरेन्त ते मातृ वाट्त होते.
मयेकर रसप, मलाही पौर्णिमा
मयेकर
रसप, मलाही पौर्णिमा ह्यांना पडला तो प्रश्न होता की सिनेमा आवडला तरी "आयचा घो" का बरं लिहीलं आणि त्यामुळे मयेकरांची पोस्ट खुपच विनोदी वाटली. खरच तुम्ही खुमासदार रिव्यु लिहीण्याकरता चित्रपट पहायला जाता की काय असं वाटलं. पण परत शेवटी मयेकर म्हणतात तसच, पसंद अपनी अपनी हे आलच त्यामुळे आक्षेप वगैरे आजिबात नाहीच.
पुढे तुम्ही फुगा का फुटला हे समजलं नाही हे ही लिहील, त्यामुळे थोडक्यात तुम्हाला सिनेमा ठीक ठाक वाटला पण काहीतरी "मिसिंग" आहे असं वाटत राहतय असा अर्थ मी घेतला जे शक्य आहे. मलाही काही सिनेमांविषयी हा अनुभव आलाय. त्यामुळे भावना पोहोचल्या! सरतेशेवटी, टायटलात काही रहस्यभेद न करण्याकरता धन्यवाद.
आता बघितला सिनेमा की येइनच लिहायला.
पहिली गोष्ट सिनेमाचं नावच
पहिली गोष्ट सिनेमाचं नावच भंगार आहे
अनुष्का शर्मा डोक्यात जाते... त्यामुळे अजिब्बातच पाहणार नाही सिनेमा..
तु ही वेळ वाया घालवलास रे .. रणजित...
नावच इतके विचित्र आहे की
नावच इतके विचित्र आहे की बघावासा वाटत नाही .
आणि तो ' सात खून माफ ' नंतर विशाल भारद्वज , जर शन्काच येते मनात
<<घाई करताय रसप तुम्ही
<<घाई करताय रसप तुम्ही परिक्षण टाकायची असं वाटतय. जे लोक अशी परिक्षण वाचून ठरवत असतात सिनेमा पहायचा की नाही (वरील प्रतिक्रियांवरुन तरी अशी लोकं खरंच असतात असं दिसतय) त्यांच्याकरता तरी तटस्थपणे सिनेमातल्या आवडलेल्या, न आवडलेल्या गोष्टी, स्क्रिप्ट, दिग्दर्शन वगैरेंबद्दल काही लिहित जा अशी नम्र विनंती. >>
त्यांना वाटलं त्यांनी टाकलं. आम्हाला बुवा आवडतं त्यांचं असलं लिखाण. रसप, तुम्ही नका लक्ष देऊ अशा लोकांकडे. निदान धेडगुजरी मराठीत लिहीलेल्या जुन्या सिनेमांच्या कथेपेक्षा हे बरं.
>>रसप तुम्हाला हवं तसंच आणि तेच लिहित जा शीर्षक आणि परिक्षणातही!
आम्हाला आवडतं वाचायला.<<
अनुमोदन.
चांगलं लिहीलं आहे. मी पाहिला
चांगलं लिहीलं आहे.
मी पाहिला नाही पण नावातला सस्पेन्स फोडला म्हन्जे काय हे कळलं नाही कारण ही सगळी माहीती कितीतरी वेळा केंव्हापासून वेगवेगळ्या ठिकाणी येते आहे. अगदी leading newspapers मधे. मला वाटतं दिवाळीपासून. आणि ती गुलाबी हीच खरी आयटेम गर्ल आहे असं advertising पिक्चरवाले स्वतःच करत आहेत.
@दक्षीणा - अनुष्का डोक्यात
@दक्षीणा - अनुष्का डोक्यात कशी जाते तुमच्या? कीती सुंदर आहे ती.
फक्त तिला बघत मी शारुक चा कूठला तरी सिनेमा बघितला होता.
मी पाहिला नाही पण नावातला
मी पाहिला नाही पण नावातला सस्पेन्स फोडला म्हन्जे काय हे कळलं नाही कारण ही सगळी माहीती कितीतरी वेळा केंव्हापासून वेगवेगळ्या ठिकाणी येते आहे
सहमत. टाईम्सच्या परिक्षणातही पहिल्या वाक्यातच मंडोला काय आहे ते लिहिलेय.
मटरु की मात्रू याबाबतही सहमत. मी एफेम रेडिओवरही मात्रुकी बिजली.... असेच ऐकलेले. बहुतेक त्यांचाही गैरसमज झाला असावा.
अनुष्काबाबत दक्षिणाशी सहमत. दक्षे, माझ्याही डोक्यात जाते ती बँड, बाजा.. मध्ये बरीच बरी होती, नंतर त्या तीन-चार बाया नी एक बाब्यावाल्यात थोडीफार बरी होती.. त्यानंतर मात्र ती सुटलीच. तिच्या चेह-यावरचे भाव बघवत नाहीत.....
इम्रान आणि अनुष्का.. दोघांमध्ये मला काहीच बघणेबल दिसत नाहीय
रसप, तुमचे परिक्षण चुक का बरोबर मला माहित नाही, पण मला तरी वाचायला आवडतात. तलाशच्या रहस्यभंग उत्साही माबोकरांनी केला, मुळ परिक्षणातुन आणि त्याच्या शीर्षकावरुनही मला तरी भुताचा चित्रपट आहे हा बोध झाला नव्हता... मी बहुतेक सामान्यातली सामान्य प्रेक्षक आणि वाचक आहे.
रसप, तुमचे परिक्षण चुक का
रसप, तुमचे परिक्षण चुक का बरोबर मला माहित नाही, पण मला तरी वाचायला आवडतात. तलाशच्या रहस्यभंग उत्साही माबोकरांनी केला, मुळ परिक्षणातुन आणि त्याच्या शीर्षकावरुनही मला तरी भुताचा चित्रपट आहे हा बोध झाला नव्हता... मी बहुतेक सामान्यातली सामान्य प्रेक्षक आणि वाचक आहे.>>>>>>>>>>>>>+१००
रसप, तुमचे परिक्षण चुक का
रसप, तुमचे परिक्षण चुक का बरोबर मला माहित नाही, पण मला तरी वाचायला आवडतात. तलाशच्या रहस्यभंग उत्साही माबोकरांनी केला,>>> +१
बिग बॉसमधे हे दोघे प्रमोशनसाठी आले होते तेव्हाही स्वतः अनुष्काने बिजली ही मंडोलाची मुलगी आहे असं सांगितलं होतं.
मला अनुष्का आवडते. सहज काम
मला अनुष्का आवडते. सहज काम करते. छान दिसते. एरवीही मुलाखती, प्रमोशन्स, अवॉर्ड फंक्शन्स मधेही खूप प्रोफेशनल वागते.
तीन-चार बाया नी एक
तीन-चार बाया नी एक बाब्यावाल्यात >>>
साधना
शीर्षकात सस्पेन्स फोडायला
शीर्षकात सस्पेन्स फोडायला सस्पेन्स नव्हतंच काही. मयेकरांचा प्रतिसाद चांगला वाटला.
तीन-चार बाया नी एक
तीन-चार बाया नी एक बाब्यावाल्यात >> लॉल !!
बहुतेक 'लेडीज वर्सेज रिक्की बहल' असावा तो, असा माझा एक 'वाईल्ड गेस' !! अनुष्का शर्मा आपल्याला तर आवडते बुवा!!
'झीरो फिगर' म्हणजे मरतुकडेपणा नाही, हे अनुष्का आणि प्रियांकाला बघून कळायला लागलं.
'लेडीज वर्सेज रिक्की बहल' >>
'लेडीज वर्सेज रिक्की बहल' >> बरा होता जरा....
रणजित अनुष्का व्यवस्थित
रणजित
अनुष्का व्यवस्थित घाणेरडी मरतुकडी आहे बरं का...
'झीरो फिगर' म्हणजे मरतुकडेपणा
'झीरो फिगर' म्हणजे मरतुकडेपणा नाही, हे अनुष्का आणि प्रियांकाला बघून कळायला लागलं.
प्रियांका बारीक दिसते पण मरतुकडी नाही, तिचे तोंड तिच्या शरिराच्या प्रमाणाशी सुसंगत आहे. तिचे बारीक असणे त्यामुळे खटकत नाही. ती बारीक पण तरीही हेल्दी वाटते. तसे बारीक असणे मलाही आवडेल
अनुश्का आणि दीपिका ह्या दोघीही भयाण दिसतात, हातपाय खुरटलेले आणि तोंड मात्र शरीर बारीक होण्याआधी जेवढे होते तेवढेच भयाण हा एकच शब्द परत परत आठवतो ह्या बायांना पाहिल्यावर. बँड.. मध्ये एवढी नव्हती बारीक, नंतर मात्र.... मध्यंतरी पेज ३ पानांवरही तिच्या अतीबारिकपणावर टीका वाचलेली.
हो, तो लेडिज... हाच होता. बराच बरा होता चित्रपट. नाव वाचुन मला आचरट वाटलेला पण प्रत्यक्षात चांगला होता. खोसला का घोसला इतका उच्च नव्हता पण त्याची आठवण नक्कीच करुन देत होता.
अनुष्कावर इतके पुराण चालू
अनुष्कावर इतके पुराण चालू आहे. तिला कसलातरी विकार आहे असे हल्लीच कळले. की ज्यामुळे तिचे शरीर एका ठराविक आकारापुढे वाढणारच नाहीये म्हणे. असा कोणता आजार्/विकार आहे? माहीत नाही.
Pages